Monday 11 May 2020

गोम



गोम


" आता मी तुझ्या तळहातावर आहे " ती मला म्हणाली . ती एक गोम होती .  तांबडा रंग , शेकड्यांनी असलेले तिचे पाय , माझ्या तळहातावर वळवळ करत होती . ती वळवळ मला सहन होत नव्हती . मी झटकायचा प्रयत्न केला पण ती गोम माझ्या तळहातावरुन  सरकत माझ्या खांद्याकडे निघाली . 
" तु मला पकडू नाही शकत.." 
" कसा नाही पकडू शकत बघतोच मी..." मी माझा डावा हात जोरात उजव्या हाताच्या दंडावरती मारला.  मला वाटलं गोम चेंदामेंदा होऊन तिथेच मेली असेल , पण ती माझ्या काखेत जाऊन बसली होती . 
" उबदार आणि ओली जागा आहे , मला अशाच जागी राहायला आवडतं ....
      मी माझे उजवी काख जोरात दाबली , पण ती  तिथून निसटून छातीवरून डाव्या काखेत गेली . मी डावी काख  दाबण्या अगोदरच ती मानेवरून चढत माझ्या केसात घुसली  . मी जोरात माझा हात केसात फिरवला . ती माझ्या डोक्यावरून हातात आली . मी हात जोरात झटकला पण तो हात माझ्या तोंडाजवळ असल्याने तिने माझ्या चेहऱ्यावरती उडी घेतली . 
" किती मउ आहेत ना तुझे गाल ...
       ती माझ्या गालावरुन फिरत कानामध्ये असलेल्या पोकळीत शिरायचा प्रयत्न करत होती . गोम साधारणपणे तीन इंच होती . कानात शिरताना तिची शेपटी मला सापडली . मी जोराने ओढायचा प्रयत्न केला पण ती कानात जातच राहिली .  शेवटी ती अर्धी तुटत माझ्या हातात आली . आता अर्धी गोम माझ्या कानात शिरली होती व अर्धी माझ्या हातात . 
" तु मला तोडलं , आता मी तुला तोडल्याशिवाय राहणार नाही... 

    ती  माझ्या कानात जोरात ओरडली . मी तुटलेली अर्धी गोम फरशीवर टाकली आणि पायाने चेचुन तिचा चेंदामेंदा करून टाकला . कानात गोम असली तरी मला फार काही जाणवत नव्हतं .  ती हालचाल करत नव्हती . जखमी झाल्यामुळे तिला पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागणार होता .  त्याचे वेळाचं मी सार्थक करायचे ठरवले .  गॅस चालू करून त्यावर ती मी पाणी तापायला ठेवलं . 

" पाण्याचा माझ्यावर परिणाम होत नाही , पाणी ओतलं तर तुझ्या कानाचा पडदा फाटलाच म्हणुन समज...

     जनु तिला मी पुढे काय करणार आहे ते समजत होतं . ती माझं मनातलं ओळखु शकत होती काय...?
" अरे , तुला सांगितले नाही का मी , मी तुझ्यासारख्या मानव रूप धारण करुन माणसात फिरणाऱ्यांचे विचार ऐकु शकते. त्यासाठीच तर बनले आहे मी ... 

    मला धक्का बसला , ती माझं विचार एकु शकत होती . ' कसंही करून आपले विचार तिच्यापासून लपवायला हवेत.....' पहिल्यांदा हाच विचार माझ्या मनात आला 
" नाही , तु माझ्या पासुन काही लपवू शकत नाही , तुझी सर्व रहस्ये मी एकु शकते....
 
   रहस्याचा उल्लेख होताच , नको असलेले विचार डोक्यात गर्दी करू लागले . मी पुरलेली रहस्ये माती उकरत त्याचं अस्तित्व प्रकट करू लागली . मी कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी पुराच्या पाण्याप्रमाणे माझ्या मनाचा गुप्ततेचा बांध फोडत बाहेर येत राहिली.
" वा , सरते शेवटी ज्यासाठी आले ते मिळालं तर ...

     काय बोलत होती ती . काय मिळालं तिला...? तिला माझी रहस्ये जाणून घेण्यासाठी नक्की कोणी पाठवलं होतं...? माझी रहस्ये जर उघड झाली तर अनर्थ होइल  . तिनं नक्की कोणतं रहस्य उकरून काढलं होतं. नाही , मला तिला संपवायलाच हवं होतं ..

       का मी हे मानवी रुप धारण केलं...? भरपुर झाला खेळ.....! ' कुणी पाठवलंय तुला...? कोणतं रहस्य सापडलं तुला...? त्याचं काय करणार तु...' मी मनातंच तिला विचारलं... 

" तु नको विचार करू . वेळ आली कि कळेलंच तुला... 

    आता मला तिला संपवायलाच हवं होतं . मी कपाट उघडत एक डबी काढली , त्यातील सुइ घेत मी कानात टोचवली . हे तिला माझ्या विचारावरुन अगोदरच कळालं होतं . सुइ कानात टोचण्यापुर्वी तिने कानातून बाहेर झेप घेतली . मी सावधपणे  तिला हातात पकडलं . मघाशी तिचे तुकडे झाले होते , पण आता ती चत्मकारिकरित्या पुर्ववत झाली होती . मी हातातच तिला जोरात कुस्करलं . तिचं पीठ करून उकळलेल्या पाण्यात टाकलं .  मला वाटलं संपलं सगळं. शेवटी माझी रहस्ये माझ्याकडे सुरक्षित होती . मात्र माझा भ्रमनिरास झाला . त्या उकळत्या पाण्यात अजुन एक गोम तयार होत होती . तिचं पीठ झालेलं शरिर पाण्यात उकळून पाणी गढुळ झालं होतं . त्या गढुळ पाण्यातून तिने बाहेर उडी घ्यायचा प्रयत्न केला . यावेळी मी तिला पाहिलं , ती पुर्वीपेक्षा जास्त लांब व जाड होती . मी पुन्हा एकदा तिला हातात पकडलं व चेंदामेंदा करत पाण्यात टाकलं . ती पुन्हा अधिकच लांब व मोठी झाली . आता मला नको ते करावं लागणार होतं . 

     मानवी शरिर धारण केलं आमची मुळची  किटकनाशक क्षमता याही शरिरात असतेच . विश्वात आमची प्रजाती सर्वात शुद्ध आहे  . ती गोम आता फुट लांब व चांगलीच जाड झाली होती . मी माझं मस्तक थोडं मोठं करत जबड्याचा आकार वाढवला . माझ्या हातात ती वळवळ करत होती . तिची शक्ती आता भलतीच वाढली होती . तरीही कसतरी तिचं तोंड पकडत मी माझ्या जबड्यात घातलं व करकर चावत संपूर्ण गोम संपवली . पोटात जाताच आम्ले व जंतुनाशकांचा मारा सुरु झाला . ती गोम आता पुन्हा जीवंत होणार नव्हती .  
 
    आता या मानवी शरिराचा त्याग करायची वेळ आली आहे .  ही गोम नष्ट झाली कि मी शरिर त्यागुन मुख्यालयात या हल्ल्याची नोंद करयाला निघुन जाइन . , पण ही गोम साधी नाही , तिचं विष आमच्यासारख्या शुद्ध जीवावर देखिल परिणाम करणारं आहे. माझा मृत्यु निश्चित आहे . 

.............................................................................

आजकाल काहीही करतात लोक .  सकाळी मी सहजच टीव्ही लाउन बसलो होतो तर भलतीच बातमी पाहिली .  त्या निवेदकाचे शब्द अजुनही जसेच्या तसे माझ्या डोक्यात फिरत आहेत... 

"  ठराविक विधी करून व गोम शिजवुन खाल्ल्याने चिरतरून राहता येतं या अंधश्रद्धेने घेतला  बळी. ...

मी मागच्या प्रयोगशाळेत गेलो , अजुन एक गोम काढली...

" त्या मानवरुपधाऱ्याकडुन सर्व रहस्ये मला पाठव ... 

    मी त्या गोमेला आदेश दिला . मानवरुपधाऱ्याकडे भरपुर शक्ती होत्या . हे माणासात राहतात , आपलं सारं शिकतात , मग नंतर आपलं जग काबीज करतात . बरेच छोटे देश त्यांनी काबीज केले आहेत . त्यांची रहस्यं व शक्तींविषयी माहिती करूण घेतल्याशिवाय मानवता तग धरू शकणार धाही . 

नंतर मी वहीत नोंदवलं 
गोम क्रमाक ४३ 
हल्ला ३५७

समाप्त 

Monday 6 April 2020

धाडस

 धाडस

    तो शांतपणे झोपला होता .  एक हात तिच्या अंगावरती होता.  ती जागी होती .  टक्क जागी होती . काही वेळापूर्वी जे काही झालं होतं त्यानंतर तिला झोप येणं शक्यच नव्हतं .  तिने हळुवारपणे त्याचा हात बाजूला केला व बेडवरून उठली . तिने  नाईट ड्रेस नीटनेटका केला .  बेड खालील कप्प्यातून तिने तिची बॅग काढली व तिला लागतील तेवढे कपडे व इतर गरजेच्या वस्तू बॅगमध्ये भरून गुपचूप घराबाहेर निघाली . दारातून बाहेर पडताच तिने रुचाला फोन लावला

" कुठे आहेस तू...?  आलीस का नाही ?

"  काय झालेय श्वेता , मला सांगशील का ...? मी आलेय  खाली .  चाललय काय तुझं...?  इतक्या रात्री का बोलावलंयस मला....?

"  आलेच . आल्यावर सांगते...

     ती जेवढ्या शांत सुरात म्हणता येईल तेवढ्या शांतपणे म्हणाली व लिफ्टकडे निघाली  . इतक्यावेळ संयमाने आवरून धरलेले अश्रू लिफ्टमध्ये एकांत मिळताच  मोकाट वाहू लागले .  ती भरपूर रडली . लिफ्टचे दार उघडताच तिने गडबडीने अश्रू पुसले .  पार्किंग मध्ये रुचाची कार उभी होती .  तिने श्वेताच्या  हातात बॅग पाहताच गाडीची डिकी उघडली .  श्वेताने बॅग मागे ठेवली व रुचाच्या शेजारच्या सिटवर येऊन बसली . ती अजूनही शांत होती

" आता तरी सांग ... रुचा म्हणाली .

" इथुन चल अगोदर .. रुचाने काही न बोलता  गाडी चालू केली व दोघेही निघाल्या....

    रात्रीचे दोन वाजले होते. तरस्त्यात कुठेतरी एखादी कार वगळता संपूर्ण रस्ते रिकामे होते .  बराच वेळ दोघीही शांत होत्या . कोणी काहीच बोलले नाही . ती जीवघेणी शांतता असह्य होऊन शेवटी रुचा म्हणाली

" श्वेता काही सांगणार आहेस कि नाही ...? झालंय काय नक्की...?

    दुसऱ्यासमोर रडायचं नाही ,  आपली जखम उघड करायची नाही,  श्वेताचा स्वभावच होता तसा . मात्र  तिने बराच वेळ ते रडू रोखून धरलं होतं ,  शेवटी त्याचा भडका उडाला .
" He raped me..." ती रडत रडत म्हणाली. 
रुचा  काही न  समजून म्हणाली
" He what...? काय , काय बोलतेस काय तू....?

 " He raped me , रुचा , He raped me ,   त्याने माझा बलात्कार केला....
        त्याने पुन्हा तीच वाक्ये उच्चारली .  ती मोठ्या मोठ्याने रडत होती .  ती घटना घडल्यापासून ठेवलेला संयम आता ढासळला होता  . श्वेताला काय बोलून  शांत करावे हे समजत रुचाला नव्हतं  . हळूहळू तिच्या रडण्याचा सुरु ओसरला व नंतर काही वेळाने ती रडायचं थांबली . ती रडायचं थांबल्यावर रुचा म्हणाली

" मला सांगशील का नीट काय झाले...? अगं दोन वर्षापासून तो तुझा नवरा आहे आणि त्या अगोदर तीन वर्षे तुझा प्रियकर होता तुमचं लव मॅरेज आणि आता तू म्हणते की he raped you , I mean ...

तिचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच श्वेता म्हणाली

" काही नसतं नवरा ,  प्रियकरा वगैरे . पुरुष तो पुरुषच.... तिच्या स्वरातून उद्वेग होता .

" अग सांगशील का काय झालंय नक्की...?"  ऋचा मोठ्या आवाजात म्हणाली .

" काही नाही ग तेच ते जे सगळ्या घरात  घडते . इतक्या दिवसानंतर जयचेचे पेरेंट्स म्हणजे माझे सासु-सासरे घरी राहिला आले ...

" हो माहित आहे मला.... पुढे  ...

" पुढे काय .... आमच्या सासूबाईंनी सासूगिरी करायला सुरुवात केली . माझ्या घालायच्या कपड्या पासून बोलण्याच्या सवईपर्यंत सर्व काही चुका काढल्या . बाईच्या जातीने असं करू नये , बाईच्या जातीने तसं करू नये ..... मी म्हटलं काळ बदललाय आता , तुम्ही पण बदला ... पण तसं थोडीच होणार होतं . घरात चिढ चिढ आणि वाद होऊ लागले .    शेवटी वैतागून मी माझे कपडे वगैरे वेगळे घालायला सुरुवात केली ....

" अरे त्यामुळे बदलले होते होय कपडे... मला वाटलं नवीन फॅशन ट्रेड ट्राय करते काय....

 रुचाने वातावरण मोकळं करायचा प्रयत्न केला .  त्याच्याकडे लक्ष न देता श्वेता बोलतच राहिली.

"  एकेक मागणी पूर्ण झाल्यावर त्यांची हिंमत भलतीच वाढली .  काल सकाळी जय म्हणाला " अगं संध्याकाळी जरा लवकर येशील का ..? आईला जरा मंदिरात घेऊन जायचंय.  मी संध्याकाळी लवकरच येणार होते , मग मी हो म्हटलं . आईंना मंदिरात घेऊन गेले . तिथे चर्चा व गप्पागोष्टी झाल्या . कधी नव्हे ते त्या मोकळेपणाने बोलत होत्या . मी त्यांच्याशी खुलून बोलत होते .  मला छान वाटत होतं . मात्र तेव्हाच त्यांनी नको ते बोलायला सुरुवात केली .
' जयलाही पगार भरपूर आहे. सगळं व्यवस्थित चाललंय . काही अडचण आली तर आपली गावाकडे जमीनही आहे ....' सुरुवातीला मला त्यांच्या बोलण्याचा रोख कळला नाही.
'  अग तुझ्या नोकरीच म्हणतेय मी .  तुला काही गरज नाही नोकरी करण्याची ..'
    मला राग आला पण चारचौघात तमाशा नको म्हणून मी शांत राहिले .... "

   रुचा ऐकत होती . तिला हळूहळू कळत होत श्वेता इतकी अपसेट का झाली होती . ती बोलत होती .


" घरी आले . तो आला होता  . स्वयंपाक झाला . जेवण झालं.  आम्ही बेडरूममध्ये आलो  . मी जय पुढे विषय काढणारच होते.  तेव्हाच तो म्हणाला
" मग काय विचार आहे तुझ्या आईच्या सजेशन बाबत....?  त्याचं ते वाक्य ऐकून मला धक्का बसला.  म्हणजे त्याला हे सगळं माहीत होतं आणि तरीही तो मला विचारत होता .
" म्हणजे तुला माहीत होतं आई  विचारणार आहेत,  त्यामुळेच तु मला त्यांना मंदिरात घेऊन जायला सांगितलं होतंसतर......"  मी त्याला चिडून म्हणाली
" हो पण ते फक्त सजेशन आहे . तुला जबरदस्ती थोडीच आहे ....चिडतेस कशाला...
"  तुला माहितीय माझे विचार नोकरीबाबत काय आहेत आणि तरीही तू म्हणतो चिढू नकोस . तू आईंना माझी बाजू समजावून सांगायची तर उलट ......
"  हे बघ जास्त issue करायची गरज नाही .  तुला सोडायची नसेल तर नको सोडून...
 तो शांतपणे व समजुतीच्या स्वरात म्हणाला . त्याने मला मिठीत घेतले .
" तुला माहितीये ना... I love you... तुला नकोय ना ,  तर नको सोडू . मी सांगेन समजावून आईला ..
तो जवळ येत म्हणाला . मला त्यांच्या नाटकीपणाचा राग आला . त्याला झिडकारून  लावत मी म्हणाले
"  अगोदर समजून जायचं होतं ना..
" हे बघ तू उगाच भांडण उकरून काढतेयस , मी म्हटलं ना सांगेन म्हणून ..." त्याचा आवाज जरा चढला होता .
" मी ,  मी भांडण काढतेय ,  मी.... आई आल्यापासून माझी नुसती कोंडी चालू आहे .  मीच ऍडजेस्ट करतेय सगळं ... आणि तुला साधं समजावून सांगणं होत नाही का तुझ्या आईला.....?
       मी रागात म्हणाले
"  काय..?  काय ...? Adjust केलं तू ...? हं ,  सांग ना मला पण...."  तो रागात होता .
" तुला जणू माहीतच नाही ,  आईला आवडत नाहीत म्हणून मी कपडे बदलले ....
" काय झालं बदलले म्हणून , तसेही ते अतीच 'तसले' असायचे ....
त्याच्याकडून हे उत्तर मला अपेक्षित नव्हतं . माझा पारा भलताच चढला , पण मीही त्याला तोडीस तोड प्रतिवाद केला.
"  तुला जर माझ्या आई-बाबांनी अमुक कपडे घाल , तमुक कपडे घालू नको म्हटलं तर चालेल का...?
      तो काही क्षणासाठी शांत झाला . त्याला काय बोलावं कळेना . मग मीही रागाच्या भरात बोलून गेले...

" मग सांग ना समजाउन तुझ्या म्हातारीला ...

" काय म्हणाली....? तो रागात माझ्याजवळ आला.

" सांग ना समजाउन तुझ्या म्हातारीला ...
     मीही उद्दामपणे म्हणाले . त्याने हात उगारला .  माझ्या गालावर जोरात चापट बसली .
" मार मला , मार . पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी पुरुषांना फक्त मारायला आणि  झवायालाच येतं ...
      माझीही जीभ नको तितकी घसरली. ते वाक्य कोणाही पुरुषाला लागेल असंच होतं , म्हणूनच मी बोलले होते . मला मात्र त्याच्याकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती . त्याने मला जोरात थोबडावत बेडवरती पाडलं  .
" मस्ती आलीय ना तुला... 
     मग त्याने नाईटी व panty सारली . मी त्याला विरोध केला पण ..
" He did it , He did in asshole ...

    आणि ती पुन्हा रडत सुटली.....  मोठमोठ्याने .

   श्वेताला anal sex आवडायचा नाही हे तिला माहित होतं . तिचा अपमान करण्यासाठी , तिच्या  मताला काही महत्त्वच नाही हे दाखवण्यासाठी त्यांना ते कृत्य केले होतं , असं रुचाला वाटलं .

      श्वेताला तिने मनसोक्त रडू दिलं ।  शेवटी ऋचा म्हणाली
" मग पाच वर्षाची रिलेशनशिप तु या कारणासाठी मोडणार का....?

"  हे कारण छोटं नाही ऋचा....  श्वेता म्हणाली

    आणि दोघेही शांत राहिल्या . रात्रीच्या अंधारात गाडी वाटेवरून जात राहिली .


समाप्त ......

लफडं

 लफडं

   हात त्याचाच होता .  त्याच्या हातात दगड होता . रक्ताचे थेंब जमिनीवरती ठिबकत होते . त्याच्या समोर ती पडली होती .  तिचा कधीकाळी सुंदर दिसणारा चेहरा ,  आता फक्त रक्त व मांसाचा चिखल होता .  हातातील दगडा  धक्क्याने खाली फेकला . तिचा पडलेला मुडदा पाहून त्याला भडभडून उलटी आली . त्यानं तोंड बाजूला करायचा प्रयत्न केला , पण  त्याच्या पोटातील अर्धवट पचलेला अन्नाचा तो पिवळसर चिकट द्रव तिच्या विवस्त्र शरीरावरती पडला . ते दृश्य पाहून त्याला अजून जास्तच उबळ आली .  भिंतीचा आधार घेत त्याने भडभडून उलटी केली .  आता त्याच्या मेंदूला त्या दृश्याचा अर्थ लागला . त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली होती .  त्याची पत्नी , अर्धांगिनी ,  जिच्यासोबत त्याने संसार मांडला होता , अशी ती आता त्याच्यासमोर मरून पडली होती . त्याने तिला मारलं होतं . आता त्याचा राग ओसरला होता .  रागाच्या भरात चूक घडून गेली होती .  तिच्या निश्चल पडलेल्या मृतदेहाला मांडीवर घेऊन तो जोरात रडू लागला ,ओरडू लागला .

काही तासांपुर्वी .

 " मी जाऊन यितु जरा , उशीर हुइल यायला ..." तो म्हणाला

"  कुठं चाललाय , कशाचं काम हाय ....?" ती दारात उभी राहत म्हणाली

" काय न्हाय ,  बँकेचं काम हाय आणि परत खत बी आणायचा हाय...  संध्याकाळ हुइल , जनावराचं तेवढं बघ तू व्यवस्थित . नुसता टी व्ही बघत नकं बसू....

   तो असं म्हणाला आणि त्याच्या मोटरसायकलला किक मारून निघून गेला .  त्याचं घर आडबाजूला होतं . फारशी वस्ती नव्हती घराच्या आजूबाजूला . तो निघून गेला व तिने लगेच मोबाईल काढला . कोणाला तरी फोन लावला .

" तासा-दीड तासाने ये ,  कोणी नाही घरी ..." एवढंच बोलली आणि तिने फोन ठेवला . तो गाडी घेऊन निघाला खरा पण पुढे जाऊन गाडी बाजूला काढून लपून राहिला . 

      लफडं . गावात कधी लपून राहत नाही .  त्याच्या कानावर कुरबुर आलीच होती , तिला रंगेहात पकडायचं असे त्याचे नियोजन होतं . त्याने त्याचा फोन काढला उगाच काहीतरी करत बसला . प्रत्येक क्षण त्याला त्रासदायक वाटत होता . मनोमन तो हे सारं खोटं असावं अशी प्रार्थना करत होता . त्या अफवाच असाव्यात असं त्याला वाटत होतं . अफवा पण काही हवेतच बनत नसतात . एकदाच काय तो निकाल लावायचा असे त्याने ठरवलं होतं . त्यांच्या लग्नाला तेरा वर्षे झाली होती .  एकुलता एक मुलगा बोर्डिंग शाळेत शिकायला होता .  त्याला तीन एकर शेती होती , पाणी कमी असल्यामुळे त्यातून उत्पादन निघायचं नाही . त्यातून बोर्डिंग शाळेचा खर्च अधिक , त्यामुळे तो मिळेल ती शेत मजुरीची कामे घ्यायचा . तो कष्टकरी होताच . आई-बाबाच्या एका खोपटा पासून त्याने सुरूवात करून एक चार खोल्यांचे घर बांधलं होतं , तेही स्वतः घेतलेल्या तीन एकर जमिनीत .

   सर्व काही व्यवस्थित चाललं असेल तर कुठेतरी माशी शिंकते आणि काहीतरी घोळ होतोच . बऱ्याच दिवसापासून त्याच्या कानावर त्याच्या बायकोच्या लफड्याविषयी गोष्टी येत होत्या . सरळ सरळ नाही पण कळतात लोकांच्या बोलण्यावरून , हावभावावरून अशा गोष्टी .  म्हणूनच त्याने हा डाव मांडला होता . त्याला वाटायचं , घरी जावं आणि तिला सरळ सरळ विचारावं.  पण विचारणार काय ...? कसं बोलणार...?  काय सांगणार ....?  अफवांवर विश्वास ठेवून स्वतःच्या पत्नीवर संशय घ्यायचा का...?  आणि तसं नसलं तर उगाच  वाद . त्यापेक्षा हा डाव चांगला . तसं काही नसलं तर विषयच नाही आणि असेल तर काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा...

     तो बराच वेळ बसुन होता .  तासाभराने एक दुचाकी त्याच्या घराकडे जाताना दिसली . तो मनाचं समाधान करून घेत होता . ' असेल कुणाचातरी शेताकडे आलेला '  .  त्याच्या घराच्या रस्त्याला दुसरी घरे नव्हती , पण लोकांची बरीच शेती होती .  त्यांच्या गाड्या अधून-मधून यायच्या .

    गाडी निघून गेल्यानंतर तो बराच वेळ थांबला .  खरं काय ते उघड होणार होतं , मात्र त्याचा सामना करायला त्याचं मन तयार नव्हतं . जर खरंच तिचं लफडं चालू असेल तर काय ....? या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हतं .  त्याने तसा विचारच केला नव्हता . त्याने गाडी बाहेर काढली व घराकडे निघाला .  घरापासून काही अंतरावर  त्याने गाडी थांबवली . घरापुढे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली एक गाडी लावलेली होती . तो जो कोणी होता त्याने ती गाडी बाजूला किंवा दुसरीकडे लपवण्याचे जरादेखील कष्ट घेतले नव्हते . ही गाडी त्याला ओळखीची वाटत नव्हती ,  तो कोण होता हे त्याला आत गेल्याशिवाय कळणार नव्हते .

   वैरी न चिंती ते मन चिंती .  घराचं दार बंद होतं , कधीच त्यांच्या घराचं दार बंद नसायचं .   घरात त्याची पत्नी व दुसरा कोणीतरी होता .  बाहेर तिचा पती उभा होता .  त्याच्या डोक्यात नको ती चित्रे उभा राहिला वेळ लागला नाही .  त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली .  तो धावत गेला आणि दार वाजवू लागला . बराच वेळ गेला  तरी दार उघडले जात नव्हतं . त्याचा संयम संपला . ते तकलुपी असलेल्या लाकडी  दाराला तो जोरात धक्के देऊ लागला .  काही धक्क्यानंतर  दार उघडले . दार उघडल्या नंतर लगेच समोर हॉल होता , त्याला लागूनच उजव्या हाताला किचन होते व किचनच्या मागे बेडरूम होती . तो पटापट पावले टाकत हॉलमधून किचनमध्ये व तिथून बेडरूममध्ये गेला . झोपायच्या खोलीला मागे उघडणारे दार होते .  ते सताड उघडे होते , तो जो कोणी होता तो तिथून पळाला होता . त्याची पत्नी विवस्त्र होती .  तिने स्वतःभोवती पटकन साडी गुंडाळून घेतली होती .

   " कुठाय त्यो ? कोणाय त्यो .. ?"

    आणि तो पुन्हा दाराकडे निघाला.  तेव्हाच  दारात उभी असलेली गाडी चालू झाल्याचा आवाज आला . तो पळत बाहेर आला . गाडी रस्त्याला लागली होती . त्याने एक दगड उचलला व नेम धरून मारला . दगड त्या गाडी चालवणाऱ्या डोक्याला बसला . गाडी वेगात असल्यामुळे व अचानक डोक्याला लागलेल्या दगडाने त्याचा तोल ढासळला आणि तो गाडी घेऊन कोसळला .  गाडीच्या खाली पाय येऊन त्याचा पायाला जखम झाली . तो वेदनेने कळवळला .  तोपर्यंत हा जवळ आला आणि  पाहिलं  . दुसरा पुरुष त्याच्या ओळखीचा होता .  त्याने त्याच्या तोंडावर जोरात लाथ मारली ...

"  तुझ्या आयचा *** , आयघाल्या... का...."

 " विचार की तुझ्या बायकोला ...? "

  त्याही परिस्थितीतही तो दुसरा पुरुष स्वतःच्या कृतीचा गर्व असल्यासारखं बोलत होता .  सहा महिन्यापूर्वी घराचे रंगकाम काढलं होतं .  रंगकाम गावातल्या एका पोराकडे दिल होतं . तो तोच होता .  रंग द्यायच्या वेळेस तो मजुरीसाठी बाहेर गावी गेला होता . त्याला राग आला . त्या पोराचं त्याला माहीत होतं , पण स्वतःच्या बायकोने असं का वागावं हे त्याला कळत नव्हतं . तो रागात घराकडे निघाला .  त्याची बायको दारात उभी होती . कशीतरी साडी गुंडाळली होती . दारातून आत जाताच त्याने तिला जोरात मुस्काटीत मारली . तोंडातून सासुचा अवयवांचा उद्धार करणाऱ्या शिव्या चालू होत्या .

" का ...? "  त्याने विचारलं ती काहीतरी बोलत होती .  त्याचे डोळे , कान सर्वकाही रागाने भरले होते . त्याला ऐकू येत होतं ,  पण रागाचा ज्वर असलेल्या मेंदूला शब्दांचा अर्थ लागत नव्हता . त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या आसवांमुळे त्याला नीट दिसत नव्हतं .

" कशाला घातलीय आता साडी . त्याच्या खाली झोपली तवाच सगळी लाज आब्रु वेशीला टांगली त्वा.."

      त्याने साडीचा पदर खेचुन तिला विवस्त्र केलं .

" माझं ऐकून तर घ्या ....?

" काय ऐकायचं तुझा ग...?  दुसऱ्या बायांकडे मी नजर वर करून दिकुन बघत नाही , सुपारीच्या खांडाचसुदिक यसन न्हाय , अन् तु असली थेरं करती व्हय....

    त्याने तिला लाथाडले . तीही रडत होती .

" का ..? सांग... न्हायतर...."

     तो मारायला काहीतरी शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहत होता .  किचनमध्ये असलेला तो दगडी गोटा त्याला दिसला .

" नुस्त पैशाच्या मागून लागून चालत नसतंय बायकोकडंबी लक्ष द्यायचं असतंय.......  " बाहेरुन आवाज आला व तो गाडीवर निघून गेला . त्याच्याकडे परत पाहता येईल म्हणून तो तिच्याकडे वळला .

" काय कमी होतं तुला ...? बोल की .." तो खाली बसत म्हणाला .

   ती घाबरली होती .त्याच्या हातातून गोटा पाहून तिची दातखीळ बसायची राहिली होती .

"  काय न्हाय ,  काय कमी नव्हती ,  मी चुकले...."  ती कशीबशी म्हणाली .

    अजून शिव्या हासडून तो म्हणाला ,
" का माझी अब्रू काढली तु का ...? "
      काहीतरी बोलण्यासाठी तिनं तोंड उघडलं पण त्या अगोदरच तो दगड तिच्या तोंडावर पडला आणि पडतच गेला . जोपर्यंत त्याचा राग होता तोपर्यंत . चेहऱ्याची हाडे तुटली , मांसाचा चिखल झाला.  रक्ताचे शिंतोडे त्याच्या सर्वांगावर उडाले .

       त्याला कधीच कळलं नाही ती तशी का वागली . तेरा वर्षांचा संसार , बारा वर्षाचं मुल ,  सगळं काही चांगलं असताना तिला दुर्बुद्धी का सुचली . तिने काही सांगण्या अगोदरच त्याने तिला संपवून टाकले .

      आता तिचा मृतदेह घेऊन तो रडत होता . टाहो फोडत होता . माफी मागत होता .  चुकलं म्हणत होता ,  पण घडलेलं घडून गेलं होतं .  ती आता जिवंत होणार नव्हती.....
       

व्यसन

 व्यसन


   तो त्याच्या रूम मध्ये गादीवरती पसरला होता . त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल होता , कानात हेडफोन होता आणि दुसऱ्या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होतं . मोबाईलवर अश्लील वेबसाईट  वरील व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते . काहींना मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटली असती पण त्याला ती फारच चित्तवेधक वाटत होती . जसा जसा तो व्हिडीओ पुढे सरकत होता तसतसे त्याच्या दुसऱ्या हाताची हालचाल वाढत होती . शेवटी शेवटी त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला कानात फक्त आवाज येत होता. तो जोरात हालचाल करु लागला , त्याचा श्वास चढलेला होता . आता कोणत्याही क्षणी तो मोकळा होणार होता , तेव्हाच त्याच्या रूमचे दार उघडले . दारात त्याची आई उभी होती . त्याच्या छातीत धस्स झालं .  श्वास कोंडला गेला , कुणीतरी त्याच्या छातीवरती भलंमोठं वजन ठेवावं अशी त्याची छाती दुखू लागली.   त्याने पटकन त्याची पॅन्ट  ओढून घेतली .   आईलाही चुकीच्या क्षणी आलो याची जाणीव झाली तिने दार पटकन लावून घेतले व बाहेर गेली .

           या आठवड्याभरात ही तिसरी वेळ होती .  आठवड्याभरात तो तीन वेळा आईला सापडला होता . त्याला स्वतःची लाज वाटत होती .  त्याने मनातल्या मनात स्वतःला कितीतरी वेळा बंदुकीच्या गोळ्या घालून टाकल्या . आई गेल्यानंतर त्यांना काही वेळ जाऊ दिला नंतर हळूच दार उघडलं आणि चोरपावलांनी तो घराबाहेर पडला . 


     ' मी काही चुकीचं केलं नाही ,  हस्तमैथुन नैसर्गिकच आहे ' तो स्वतःला समजावत होता . ' नैसर्गिक असले म्हणून त्याचा इतका अतिरेक करावा का..?' दुसरा आवाज  म्हणत होता . त्याचा स्वतःशीच युद्ध चालू होतं .  एका बाजूने तो स्वतःच्या कृतीचे समर्थन करायचा आणि दुसऱ्या बाजूने तो स्वतःच्या कृतीची निंदानालस्ती करायचा , ती  कृती किती चुकीची आहे हे स्वतःला समजून सांगायचा . त्याच्या मित्रांबरोबर ह्याबाबतीत बोलणं व्हायचं . इंटरनेटवर इकडे तिकडे  त्यानं बऱ्याच वेळा ऐकलं होतं हस्तमैथुन करणं नैसर्गिक आहे . त्यात काही चुकीचं नाही .
' हस्तमैथुन करायला मी कुठे नको म्हणतोय पण मग तो पोर्न बघायची काय गरज आहे...? '

    त्याने स्वतःला प्रश्न विचारला आणि स्वतः त्याचे उत्तर दिलं .
     ' पोर्न बघ ना कुठे चुकीचा आहे पूर्ण बघितला म्हणून काही होत  नाही '  त्यांना स्वतःच्या कृतीचं समर्थन करायचा प्रयत्न केला , पण नकळत त्यालाही जाणवत होतं , त्यानं सीमा ओलांडली होती .

      बारावीच्या वर्षातली नीटची परीक्षा रिपीट करत होता .  मागच्या वेळी हवा तसा स्कोर न मिळाल्याने त्याला चांगलं कॉलेज मिळालं नव्हतं . घरची परिस्थितीही बऱ्यापैकी होती , त्यामुळे त्याने परीक्षा रिपीट करायचं ठरवलं होतं .  घरच्यांची ही त्याला साथ होती . पण नव्या शैक्षणिक वर्षाची कुठे सुरुवात झाली नव्हती , आणि आताच त्याला निराशेने ग्रासलं होतं . चांगलं नसलं तरी मिळालं होतं ते कॉलेज बरं होतं . त्याचे सर्व मित्र मिळाले त्या कॉलेजला गेले होते . तो एकटाच मागे राहिला होता .  त्याच्या वडिलांची इच्छा होती चांगलं कॉलेज मिळावं आणि त्याचाही चांगलं कॉलेज मिळावं असाच हट्ट होता .  म्हणून त्याने परीक्षा रिपीट करण्याचं ठरवलं होतं , पण आपण घेतलेला निर्णय चुकला तर नाही ना याची त्याला चिंता सतावत होती .

        त्यामुळेच की काय आताशा त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं .  बराच वेळ त्याचा मोबाईल वरती जात होता . व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ,  मूव्हीज आणि वेब सिरीज . पण काही दिवसानंतर त्याचाही कंटाळा येऊ लागला .  सर्वकाही नीरस वाटत होतं .  आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे ,  आपण कॉलेजला जायला हवं होतं . सर्वकाही असताना , सर्व काही सुख त्याच्या पदरी असताना त्याला स्वतःचा आयुष्य नीरस वाटत होतं .

' यावेळी देखील स्कोर हवा तसा आला नाही तर काय करायचं...?  '
       त्याला ही चिंता सतत सतवाची .  यामुळे अभ्यास ही व्हायचा नाही आणि ती चिंता सतावू नये म्हणून तो काही ना काही करण्यात  व्यस्त राहाण्यचा प्रयत्न करयायचा . त्यामुळेच की काय त्याचं मोबाइलचं व्यसन भयंकर वाढलं होतं .  मोबाईलच्या  बरोबरच तो पॉर्नच्या देखील आहारी गेला होता , सतत पॉर्न पाहनं आणि हस्तमैथुन करना हे त्याच्या सवयीचा झाला होतं . आताशा त्याला काळवेळ काही समजत नव्हती .  स्वतःची वेगळी खोली होती त्यामुळे प्रायव्हसी असायचीच . मात्र वेगळी खोली असूनही दार लावणं देखील त्याच्या डोक्यात येत नव्हतं . थोडं फार काही झालं ,  कुठे काही पाहिलं की लगेच erectionजाणवायचं आणि मग लगेच पॉर्न उघडायचा आणि हस्तमैथुन करायचा .

     मागच्या दोन तीन आठवड्यापासून तर त्याचं व्यसनच झालं होतं .  त्यामुळेच या आठवड्याभरात तो तीन वेळा त्याच्या आईला हस्तमैथुन करताना सापडला होता . एकदा बाथरूममध्ये आणि दोन वेळा त्याच्या खोलीत . त्यालाही आईचा सामना करताना मेल्याहून मेल्यासारखे व्हायचं पण काही इलाज नव्हता .
' तिने अजून बाबांना सांगितलं नव्हतं म्हणून बरं ' तू विचार करायचा आणि आतापासून काही करायचं नाही असं मनाशी निर्धार करायचा .

     टिकेल तो निश्चय कसला एका वेळी ठरवलं तासाभराच्या आतच त्याचा निश्चय मोडायचा आणि पुन्हा एकदा तो दृढनिश्चय करायचा . दिवसातून सहा सात  वेळा त्याचं चालायचं . रात्रंदिवस त्याच्या डोक्यात हाच विषय रेंगाळत असल्यामुळे एकदा दोनदा त्याला स्वप्नदोषही झाला होता .
'  हे वागणं बरोबर नाही लवकरात लवकर सुधारायला हवं '   तो स्वतःशीच म्हणायचा आणि मग लगेच दुसरं मन जोरात ओरडायचं
'  काय चूक आहे या वागण्यात सर्वकाही नैसर्गिक तर आहे....'
' काही नैसर्गिक नाही यात ', दुसरं उत्तर तयार असायचं .

     त्याने त्याच्या मित्रांसोबत बोलायचा प्रयत्न केला होता पण जो तो त्याच्या कॉलेजच्या जीवनात व्यस्त असायचा .  पूर्वीसारखा बोलायला त्यांना वेळच मिळायचा नाही . तो एकटा पडत चालला होता  . ट्युशन ही असायची पण ट्युशन मधील सर्व चेहरे नवे . स्वतः सोबत काय होतेय याचं वैचारिक विश्लेषण बराच वेळ केलं आणि संध्याकाळ होत आल्यानंतर तो घराकडे परतला .

       त्याचे वडील सरकारी कर्मचारी  ते घरी आले होते .  मोठी बहीण शहरातीलच कॉलेजला इंजिनिअरिंग करत होती .  तिघेही त्याची वाट पाहत बसले होते . त्याला नको ती शंका आली
'  आईने बाबांना सांगितलं की काय...? '

     तो त्यांना पाहिलं न पाहिल्यासारखं करत त्याच्या खोलीकडे जायला निघाला , तेव्हाच त्याच्या वडिलांचा आवाज आला.
" विराज इकडे ये तुझ्याशी बोलायचं आहे ...."

          शरमेने महिने त्याची मान खाली झुकली होती .  आता पुढे काय होणार याची त्याला बऱ्यापैकी कल्पना होती .  असं व्हायला नको होतं ,  स्वतःच्या अब्रूचे काढले जाणारी धिंडवडे त्याला नको होते ,  पण वडिलांपुढे त्याचं काही चालायचं नाही . तो गुपचुप गेला आणि त्यांच्या समोर जाऊन बसला .

" तो मोबाईल काढून ठेव , तुला खरंच काही कळत नाही का ...?
    वडील जरा रागात होते आई आणि त्याची बहीण किचन मध्ये गेल्या होत्या .

" एवढा कसा वासनेच्या आहारी गेला आहेस तू , निदान दार लावायचे तरी भान ठेवत जा...! मान्य आहे हस्तमैथुन अयोग्य नाही पण करताना आजूबाजूच्या परिसराचं तरी ध्यान ठेवत जा... आणि तुला जर हस्तमैथुन करायचं असेल ,  तर ते पोर्न वगैरे पूर्णपणे बंद कर . व्हायचं असेल तर सर्वकाही नैसर्गिकरित्या होऊ द्या

      त्याला वडिलांकडून हे अपेक्षित नव्हतं . त्याला वाटलं होतं वडील त्याला भरपुर रागावतील , पण ते तर त्यांना रागात उपदेशाचे डोस देत होते . त्याच्या चेह-यावरील आश्चर्य त्याच्या वडिलांना पासून लपले नाही .

" हस्तमैथुन अयोग्य नाही पण त्यामुळे जर तुझ्यि दैनंदिन आयुष्यात अडचणी येत असतील तर ते कितपत योग्य आहे तूच ठरव   . तुला खरच कळतय का पॉर्न पाहून तुझं किती नुकसान होतंय ते....

      तो शांतपणे ऐकून घेत होता .  काही बोलण्याचा त्याला धाडस होत नव्हतं .

" तू आईला तीनवेळा सापडला आहे , म्हणजे एकांतात तू हे सर्व किती वेळा करत असतील याची कल्पनाच न केलेली बरी .  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही... अलीकडे होणाऱ्या टेस्टची निकालही चांगले नाहीत ,  मी तुला बोलणार होतो पण उगाच कशाला तुला ताण द्या म्हणून मी बोललो नाही... यामुळेच निकाल कमी झाले असतील  ..

     त्याने गुपचूप मान हलवली .

" मोबाईल जप्त करणे योग्य नाही , मोबाईल तर तुला लागतोच . पण तुझं इंटरनेट मात्र बंद राहील आणि एक लक्षात ठेव पॉर्न पूर्णपणे बंद , तू जर मला किंवा घरातील कोणाला बघताना सापडला मग पुढच्यावेळी  शिक्षा असेल....

        तो गुपचूप उठून खोलीत गेला . बरोबर मोबाईल होताच . वडीलांनी इंटरनेट असलेलं  सिम कार्ड काढून घेतलं होतं आणि मोबाईल त्याच्याजवळ दिला होता .  तो आत गेला त्याने दार लावून घेतलं . पुन्हा एकदा निराशेची   भावना त्याच्या मनात दाटून आली .  हृदयात खोल कुठेतरी एक मोठं भोक असल्यासारखं वाटू लागलं . हृदय जोरजोरात धडकु लागतं . त्याने त्याच्या बॅगमध्ये असलेला पेन ड्राइव काढला . Otg मार्फत त्याने मोबाईलला जोडला . पेन ड्राईव्ह मध्ये असलेली क्लिप त्याने उघडली .  हेडफोन घातला . एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात त्याचं अर्धवट ताठरलेलं  लिंग होतं ,  आणि तू पुन्हा एकदा हस्तमैथुन करू लागला .


मर्यादा

मर्यादा

       पुष्पा ,  पुष्पा बद्दल काय सांगावे ..? जेवढं बोलावं तेवढं कमीच . तिचा गोरा रंग ,  तिचे आंब्या एवढे स्तन   जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत . गोल गरगरीत भरीव नितंब ,  खोल नाभी आणि गोरागोमटा रंग... सौंदर्याची खाण , कुणीही पुरुषाने पाहीले की त्याची वासना जागी होणार हे नक्कीच . पण हक्काने ती माझी नाही , कारण ती माझी बायको नाही . माझं लग्न झालेले आहे . सोन्यासारखी बायको आहे . दोन मुलं आहेत .  एक सहावी आणि दुसरा चौथीला . पुण्यात एका मोठ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर नि चांगल्या पगारावर कामाला असतो . गावाकडे शेत आहे .  शेतात सखाराम नावाचा पन्नाशी गाठलेला गडी आहे आणि त्याची बायको आहे पुष्पा . दोघांच्या वयात साधारणपणे पंधरा- सोळा वर्षाचा अंतर असावं . पुष्पा तीस असावी . माझ्याहून चार ते पाच वर्षांनी लहान

           मी अगोदरच सांगून ठेवतो ,  मी नालायक व नीच माणूस आहे  . मला लाज वाटते , मी  जे काही करतो त्याची मला लाज वाटते पण मी स्वतःला रोखू शकत नाही. याची सुरुवात साधारणपणे दोन-तीन वर्षापूर्वी झाली असावी . माझं गावाकडे नियमितपणे येणं व्हायचं पण अलीकडे मला शेतातला सर्व काही काम होत नव्हतं .  त्यामुळे मी सालगडी ठेवण्याचे ठरवले आणि सखारामला 80 हजार रुपये सालाने ठेउन टाकलं . सखाराम त्याच्या परिवारासोबत बंगल्याबाहेर असलेल्या छोट्या खोलीत राहायला आला आणि तेव्हाच मला ती पहिल्यांदा दिसली .  मी माझी नजर तिच्यावरून  हटवू शकत नव्हतो . माझ्या तोंडातून टपकणारी लाळ तिने पाहिले असावी .  तिलाही कोणीतरी तिच्याकडे लक्ष देत होतं ,  तिच्या सौंदर्याचं निरीक्षण करत होतं आणि दाद देत होतं याचा अभिमान वाटत होता .

         सखाराम गडी ठेवल्यानंतर मी पुण्याला निघून गेलो , पण महिना होण्याअगोदरच मला पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागली . काय सांगावं मौका मिळाला तर मिळाला , प्रयत्न करायला हवा होता .

         रविवारची सुट्टी आणि एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी काढून मी विकेंडला गावाकडे आलो . शुक्रवारी रात्री मी गावात पोहोचलो . मी एकदम बहाणा करून हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचे ठरवले , तेव्हा पुष्पाने त्यांच्यात  जेवणाचा आग्रह केला . मला ही तेवढेच हवं होतं , मी लगेच होकार दिला . मी जेवायला होतो म्हटल्यानंतर सखाराम खास जाऊन चिकन घेऊन आला  .  मी बंगल्यात वाट पाहत बसलो होतो . मला वाटलं जेवण बनल्या नंतर ती मला जेवायला बोलवेल , पण बराच वेळ झाला ती मला बोलवत नव्हती .  माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली , मला वाटलं  सखारामला संशय तर आला नसेल ना...

       रात्रीचा साडेनऊ वाजले असतील , मला माझी लाज वाटत होती , वाटत होता आताच्या आता इथून निघावं  पुण्याला जावं .  कुठेतरी थोडीफार आशा शिल्लक होती वाटत होतं पुष्प बोलावेल जेवायला म्हणून मी निर्लज्जासारखा तिथेच बसून राहिलो . साडे नऊ वाजून गेले ,  तेव्हा बंगल्याच्या दारावर टक टक झाली .  मी दार उघडलं तर दारात पुष्पा उभी होती . क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिलो , मी काही बोलत नाही हे तिच्या  लक्षात आल्यावर ती ताट पुढे करत म्हणाली

" भुक्याजला आसाल ,   जेवायला आणलंय...

    मी बाजुला होत दार उघडलं आणि तिला आत घेतलं .  दार लावावं कि नाही  याचा मला प्रश्न पडला .  तिने ताट किती  टिपॉयवर ठेवले.  मी दारापासून काही अंतरावर उभा राहिलो होतो .

" थंडी हाय नवं ,  दार करा की पुढं , कशाला उगं गारवा आत यवु देताय ....

         मी लगेच दार बंद केलं आणि विचारलं

" सखाराम कुठाय...?

" त्यनी झोपलं डाराडूर ,  जेवण झालं की त्याश्नी लगेच झोप लागती . आवरतच न्हाय.  रात्रीची पाळी असल्यावर दारी मीच धरत असती...

" आणि पोर...!  मीही मुद्दाम विचारलं

" पोरबी कवाच झोपली... आज रात पाळी हाय ना लाईटची ,  दारी धरायची हायती म्हणून मी जागी हाय....
 घ्या जिवून काय लागले तर सांगा मी घरनं जाऊन आणती...

       आणि तिथल्या सोपासेट वर बसली .  मला आता सहन होत नव्हतं , तिनं शंभर पावले टाकली होती ,  मला एक तरी पाऊल टाकायला हवं होतं...

" तुला झोपायचं असेल तर झोप आजचा दिवस दारी धरीन मी , तेवढाच तुम्हा दोघालाबी विश्रांती मिळंल.

" सगळी विश्रांतीच अस्ती मला , लेकरं शाळेला गेली आणि घरची काम झालं कि मी रिकामी अस्ते ... शेतातलं थोड फार काम असतंय ,  पण तुम्ही बी हजरीनं ज्यादा मजुर लावायला पैसं देता त्यामुळे टेन्शन नसतं...

    मी आता तिच्या समोरील खुर्चीवरती बसलो होतो .  जेवणावरून माझं लक्ष केव्हाच उडालं होतं .  पुढे काय करावं याचा विचार करत होतो.

" जेवा कि , कशापाय थांबलाय...?

        मी तिच्याकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि विषयाला हात घालण्याचे ठरवले .  काय होईल ते होईल ,  होऊन होऊन काय होणार आहे ...? असं म्हणून मी बोलायचे ठरवलं

" माझी भूक गेली आता ..

    मी जागेवरून उठलो आणि त्याच्या शेजारी जाऊन बसलो . तू काहीच बोलली नाही . माझा एक पाय जमिनीवर ती तर एक पाय आमच्या दोघांच्या मधोमध होता . माझा गुडघा तिच्या गुढग्याला थटथ होता , मी हळूच माझा एक हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला माझ्याकडे ओढलं. माझा श्वास वाढला होता , तिचीही धपापणारी छाती मला दिसत होती .  मी तिला जवळ ओढूनही तिने तोंडातून एक चकार शब्द काढला नव्हता .  मला एवढा सिग्नल पुरेसा होता...

        मी तिला माझ्याकडे ओढले व माझे दोन्ही हात तिच्या उरोजावरती नेले व जोरात कुस्कुरू लागलो , तिच्या तोंडून एक उसासा निघाला . तिच्या घट्ट ब्लाऊजचे हुक काढून तिचे उरोज मी मोकळे केले . तिची स्तनाग्रे तट्ट  फुगलेली होती . मी वेड्यासारखा त्यांच्यासोबत चाळा करू लागलो . साधारणपणे दोन वर्षानंतर हे सुख मी अनुभवत होतो. हळू हळू तीही मला साथ देऊ लागली .  आमची दोघांची शरीरे एकमेकांसाठी भुकेली होती .  वस्त्रांचा अडसर दूर होत गेला आणि त्या रात्री मी स्वर्ग अनुभवला .

          दोन वर्षापूर्वी त्या रात्री आमच्या संबंधांना सुरुवात झाली आणि दर महिन्याला ते संबंध अधिकच गहिरे होत गेले . पुष्पा सोळा वर्षाची असताना तिचं लग्न तीस वर्षाच्या सखाराम बरोबर झालं होतं . दोन लेकर झाल्यानंतर त्यांच्यातला शरीर संबंध संपला होता . विवाहबाह्य संबंध तिने कधीच ठेवले नव्हते . तिला वेळोवेळी बऱ्याच पुरुषांकडून तशा नजरा मिळायच्या ,  बऱ्याच पुरुषांकडून पावलेही उचलली जायची पण तिने कधीच कोणाला प्रतिसाद दिला नव्हता. मी तिला बऱ्याच वेळा म्हणायचो

"  मीच भाग्यवान आहे ,  कशी काय तू मला मिळाली काय माहित ....?
      ती शांतपणे हसायची .

           आमचे शारीरिक संबंध जसजसे वाढत गेले तसतशी आमची मनी देखील जळु लागली . पहिला जोर ओसरल्यानंतर दुसरा सुरू होण्याअगोदर आमच्या बर्‍याच गोष्टी व्हायच्या .  मी तिला काही सांगायचं ती मला काही सांगायची . तिची दहावीची परीक्षा देखील तिला पूर्ण करू दिली नव्हती . तिच्या वडिलांनी घाईघाईतच लग्न उरकून टाकलं होतं .  तिच्या घरात त्या दोघी बहिणी आणि दोन भाऊ अशी चार भावंडे होती .  तिला शिकायचं होतं . स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं . आईवडिलांकडे तिला शिकवण्या पुरता पैसा होता ,  पण मुलगी दुसऱ्या घरचं धन म्हणून लगेच लग्न उरकून टाकलं  . सखाराम त्यावेळी सरकारी ड्रायव्हर होता ,  नोकरीवाला मुलगा म्हणून दिलं पण नंतर काल की ती नोकरी तात्पुरती होती .  ज्याचा त्याला दारूचे व्यसन नाही होतं जेजुरीला जाऊ नको पैसे कमवून आणायचा आणि दारूच्या घालवायचा  . तिची लग्नातील सुरुवातीची वर्ष फारच त्रासात गेली होती . अलीकडे दारूचे व्यसन कमी झालं होतं आणि शेतातलं कामही मिळालं होतं त्यामुळे त्यांचा घर संसार बऱ्यापैकी सुखात चालला होता. तिचाही मुलगा दहावीत होता आणि मुलगी चौथीत , माझ्या मुलांच्या वर्गातच .

        तिचा छोटा मुलगा झाल्यानंतर काही वर्षे त्यांच्यात शरीरसंबंध व्हायचा पण नंतर मुले मोठी होत गेली तसतसा त्यांच्यातील संबंध बिलकुलच कमी झाला दोन वर्षांपूर्वी माझ्या बरोबर सुरुवात करण्या अगोदर ती आठ वर्षे उपाशी होती . माझी हालत काही वेगळी नव्हती .  माझी माझी बायको बरोबरचे संबंध लहान मुलगा जन्मल्यानंतर काही वर्ष चालले पण नंतर कमी झाले आणि आता तर होतच नाहीत . पुष्पा माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी मी दोन-तीन वर्ष कोणत्याच प्रकारचं शारीरिक सुख मिळवलेलन नव्हता हस्तमैथुन ना  संभोग...

            मी जेव्हा केव्हा पुढाकार घ्यायचा तेव्हा तिची कारणं तयार असायची ,  जबरदस्ती करणे मला पटायचं नाही . पुष्पा आणि माझ्यात मला बऱ्याच प्रकारचे साम्य वाटायचं ,  आम्ही दोघे भुकेले जीव होतो जे एकमेकांची भूक भागवत होतो . आणि कुणालाही आमच्या संबंधाचा दोन वर्षात सुगावा लागला नव्हता सखारामलाही आणि माझ्या बायकोलाही .

           सुगावा लागू नये म्हणून आम्ही दोघेही बरोबर काळजी घेत होतो मी ही वारंवार पुढाकार घ्यायचा प्रयत्न करायचो आणि पुष्पा असेल ती तिची दैनंदिन कामे करायची . आम्ही दोघे चकोराप्रमाणज महिन्याच्या चांदण्याची वाट पाहायचो . दर महिन्याला आम्ही वेड्यासारखा एकमेकांचे शरीर अनुभवायचो .  ती एक नशा होती .

    बऱ्याच वेळा आम्ही दोघांनी हे थांबवायचा प्रयत्न केला . कधी तिचा अंतरात्मा जागृत व्हायचा आणि हे चुकीच आहे म्हणून ती मला या महिन्यात येऊ नका असा फोन करायची . मी जाण्याचं कॅन्सल करणारच तेव्हा परत तिचा फोन यायचा आणि मला बोलवायची. कधीकधी मी निश्चय करायचो या महिन्यात जायचं नाही पण महिन्याच्या शेवट येताच माझा निश्चय डळमळायचा.

          हे सगळं आता सांगण्यामागे कारण आहे मागच्या काही महिन्या पुर्वी मी , माझी बायको व मुले असा संपुर्ण परिवार गावाकडे आलो .  ज्या गावात आमचा बंगला आहे त्या गावापासून  काही किलोमीटरच्या अंतरावर , शेजारच्या गावात तिचं माहेर आहे .    तिला संशय आला की नाही हे मला माहीत नाही , पण रात्र होताच ती  कारमधे मुलांना घेउन माहेरला जायला निघाली . मलाही बरोबर चला म्हणत होती पण मी टाळून दिलं .

        ती बाहेर पडताच , मी मोकळा झालो .  रात्री दहाच्या सुमाराला पुष्प बंगल्यात आली . आमच्या दोघांची रतिक्रीडा सुरू झाली . पहिला भर ओसरला नंतर आम्ही गप्पा मारत बसलो होतो . त्याच वेळी दार वाजलं . मी पुष्पाला मागील दाराने पाठवणार होतो पण तेव्हाच दार उघडलं . माझी बायको चालतात आली   मी कडी लावायचं विसरलो होतो . पुष्पा साडी व्यवस्थित करत होती .  मीदेखील कपडे नीट करत होतो . तिने आम्हा दोघांना रंगेहाथ पकडलं होतं . तिचा चेहरा शांत होता , डोळे देखील . चचेहऱ्यावरची एक रेषदेखील बदलली नव्हती.

 " यासाठी प्रत्येक महिन्याला गावाकडे येण्याची ओढ असते होय...

       ती थंडपणे म्हणाली आणि बाहेर जाऊन झोपली . ती मुलांना मामाकडे सोडून आली होती . दुसरा दिवशी संध्याकाळी आम्ही तिथून निघालो .  पुष्पा घाबरलेली होती ती नंतर  आमच्या दोघांत पुढे आलेच नाही. ते एक वाक्य सोडलं तर पुष्पा मला काहीच बोलली नाही तिने म्हणून विचारलं नाही , आणि काही रागही व्यक्त केला नाही .

        पुढच्या महिन्यात गावाकडे जाऊ की नको असा माझ्या मनात प्रश्न पडला होता . माझ्या बायकोच्या वागण्यावरून तरी तिला काही फरक पडला आहे असं वाटत नव्हतं पण एक वेगळाच थंडपणा तिच्या बोलण्यात जाणवत होता . मी त्या महिन्या पुरता गावाकडे जाण्याचे टाळलं . मी माझ्या बायको बरोबर जवळीक करण्याचा प्रयत्न केला , तिला जवळ घेत स्पर्षण्याचा प्रयत्न केला .  तिने मला झिडकारलं आणि नंतर अशा नजरेने पाहिलं की परत माझे तिला स्पर्श करण्याची हिंमतच झाली नाही .

         मी गावाकडून आल्यानंतर तिच्याबरोबर त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तिने तो विषय बंद पडला.  दुसऱ्या महिन्यात मात्र मी काहीही विचार न करता सरळ गावाकडे गेलो पुष्पा च मनही निवडला होतं आणि आमच्यात जे काही व्हायचं ते झालं   आता बायकोला माहीत होतं त्यामुळे मनावर एक जो ताण असायचा तो ही नव्हता . शरीराची भूक मिळाल्यानंतर आम्ही काही वेळ बोलत होतो पुष्पाने मला घरातलं वातावरण विचारलं , तिला मी जे काही होतं ते सर्व काही सांगून टाकलं. तिला जरा काळजी वाटली

" बघा तुमच्या घरात माझ्यामुळे भांडण व्हायला नको...! दुसऱ्याचा संसार तुटायला नगच बाबा माझ्यामुळं

    ती म्हणाली तिचा स्वर खरंच काळजीचा होता .  तिला जाणीव होती ,पण मी तिला खात्री दिली तसं काही होणार नाही.

        कारण मला खात्री होती तसं काही होणार नाही ,  माझी बायको मला कधीच घटस्फोट देऊ शकणार नाही .  कारण तिची तेवढी हिम्मतच नव्हती  . तिची हिंमत असती ती मला त्यावेळीच भांडली असती . मी मर्यादा ओलांडली होती   चुक माझी होती कारण काही का असेना ...! मला माझी स्त्री असताना देखील मी दुसऱ्याच्या ताटावरती ताव मारत होतो . मर्यादा ओलांडल्यानंतर मर्यादेची जाणीव करून देण्यासाठी कोणीतरी असावं लागतं  . मर्यादा आहे हे सांगण्यासाठी देखील कोणीतरी असावं लागतं . माणसाच्या अंतरात्मा वेळोवेळी त्याला मर्यादांची जाणीव करून देतो पण अंतरात्म्याचा आवाज माणसाला कधीच ऐकू येत नाही .

                 पुष्पा पण मी एकाच गोष्टीसाठी जवळ आलो होतो ते म्हणजे एकमेकांची शारीरिक गरज भागवणे गरज भागवणे बरोबर आम्ही एकमेकांचे सुखदुःखे देखील वाटून घेत होतो पण तेवढेच तिथपर्यंतच आमचा संबंध मर्यादित होता पुष्पाला तिचा संसार होता मला माझा संसार होता . मुळात आम्ही ही मर्यादांच्या  रेषा ओलांडायला नको होत्या पण आम्ही दोघांनीही  ओलांडल्या होत्या. जे आम्हाला आमच्या आखून दिलेल्या मर्यादेत मिळत नव्हतं ते आम्ही बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला पण आखून दिलेल्या मर्यादेत ते का मिळत नाही हे विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही .

      अजूनही जर महिन्याला मी गावाकडे जातो ,  जर महिन्याला मी मर्यादा ओलांडतो आणि नंतर महिनाभर पूर्णपणे माझ्या मर्यादित राहतो . माझी धर्मपत्नी मला त्याबद्दल एक शब्दही विचारत नाही किंवा बोलत नाही . मला तिचा राग येतो . मला वाटतं तिने भांडाव पण ती भांडत नाही .  मला वाटतं तिने माझा राग करावा मला शिव्या द्याव्या पण ती देत नाही . उलट पुष्पा जर एखाद्या महिन्याला गेलो नाही तर रागावते , रुसते , बोलत नाही . सखारामला अजूनही आमच्या संबंधाची कल्पना नाही . या सर्व गोष्टी मला पुष्पाला आणि माझ्या धर्मपत्नीलाच माहीत आहेत .


        समाप्त