Friday 26 April 2019

प्रलय-१९

प्रलय-१९


    जेव्हा आयुष्यमानचे डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो कोणाच्या तरी शय्याकक्षात होता . लुसलुशीत गादी त्याच्या शरीराला आरामदायी वाटत होती .  त्याने आजूबाजूला पहिले एका बाजूला ते दोन बुटके आपली मान खाली घालून उभे होते . दुसऱ्या बाजूला एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी  बसलेला होता . तो काही बोलणार त्याआधीच म्हातारा म्हणाला.....

" तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील सार्‍या प्रश्नांची उत्तरे तुला आता मिळणार नाहीत . पण काही प्रश्नांची उत्तरे मी तुला सांगेन .  ती म्हणजे तुझी सुरुकुने निवड केली आहे ......
ज्यावेळी प्रलयकारिका जागृत होते . त्यावेळी प्रलयकारिकेचा सामना करण्यासाठी प्रलयकारिकेला हरवण्यासाठी ,  किंवा प्रलयकारिकेला नष्ट करण्यासाठी सुरुकु एकाची निवड करतो.....
मारुतांचा मुख्य पुजारी आहे , त्याच्याकडे प्रलयकारिकेस जागृत करण्याची शक्ती आहे .  प्रलयकारिका  त्यांची सेवा करत राहिली आहे , पण प्रलयकारिका जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा प्रलय निश्चित असतो .....
  जो कोणी प्रलयकारिकेला जागृत करतो , ती त्यांची सेवा करते मात्र तिचा जन्मच प्रलयकाळ घेऊन होतो... या जगतात पहिल्यांदा जेव्हा प्रलयकारिकेला जागृत केलं गेलं होतं ,  त्यावेळी जो प्रलय आला त्यानंतर प्रलयकारिकेला जागृत करण्याच्या सर्व पद्धतीवरती बंदी घातली गेली होती . पण काही लोकांनी गपचूप तो अभ्यास सुरूच ठेवला . नंतर काही पूजाऱ्यांना मारुतांनी आपला राजआश्रत्र दिला . पण मारूत राजांनी कधीच प्रलयकारिकेला जागृत केलं नाही .  कारण त्यांना प्रलयाची माहिती होती .  मात्र काळ्या भिंतीच्या प्रकरणानंतर प्रलयाबाबत सर्वजण विसरले आहेत .  त्यामुळे त्यांनी कदाचित प्रलयकारी केला जागृत केलं असावं......
    त्या प्रलयकारिके चा सामना करण्यासाठी त्यावेळी काही गोष्टीची गरज होती. तिला हरवण्यासाठी किंवा तिच्या सोबत लढण्यासाठी सामान्य मनुष्य , त्याची सामान्य हत्यारे , सामान्य प्राणी काहीच करू शकत नाही...  त्याच्यासाठी सुरुकुची निर्मिती केली होती . सुरुकू हा एक प्रकारचा प्राणी आहे . पण पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्यापेक्षा तो सर्वस्वी वेगळा आहे . सुरुकु स्वतःहून त्याच्या वाहकास निवडतो आणि त्या सुरूकूने   तुझी निवड केलेली आहे .  तू आता प्रलयकारिकेचा सामना करणार आहेस .........

   " पण प्रलयकारी का कोण आहे ....? मला याबद्दल काही माहीत नाही . मी तिला कसं हरवणार....?  मला माझेच वैयक्तिक भरपूर प्रश्न आहेत ....? ज्यांची उत्तरे मी शोधत आहे.....?

" तुला एक गोष्ट माहित नसेल . ती मी सांगेन ....  प्रलयकारिका म्हणून एका स्त्रीचीच निवड केली जाते .  आणि तिला हरवण्यासाठी सुरूकच  स्वतःहून त्या स्त्रीच्या सर्वात जवळच्या पुरुषांचीच निवड करतो . तो तिचा भाऊ , वडील किंवा पती असतो....

" म्हणजे मोहिनी प्रलयकारिका आहे तर........
     आयुष्यमानला धक्काच बसला होता . कारण ज्या स्त्रीच्या शोधात निघाला होता , ती प्रलय घेऊन येणार होती .  आणि प्रसंग पडला तर तिला मारावे लागणार होतं.... त्याचं हृदय पिळवटून निघाले .  त्यांना आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा प्रेम केलं , तेही त्याच स्त्रीवर जी स्त्री प्रलयकारिका होती .  आणि त्याला स्वतःला आता तिच्या विनाशासाठी जावं लागणार होतं....

" पण मोहिनीच निवड प्रलयकारिका म्हणून का झाली.....?

" प्रलयकारिकेसाठी पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली स्त्रीचीच निवड केली जाते......

    आयुष्यमान पुढे काही बोलणार होता त्याआधीच तो म्हातारा म्हणाला ....

     "  हे बुटके माझे नोकर आहेत जंगलातील हा महाल आणि त्याच्या संरक्षणासाठी त्यांची निवड केली आहे .  त्यामुळे जो कोणी मनुष्य किंवा प्राणी इकडे येताना त्यांना दिसतो त्याबरोबर ते त्याला पकडतात . पण आम्हाला माहीत नव्हतं की तुझी निवड  होणार आहे . त्यामुळे त्यांनी बोट कापलं त्याबद्दल मी क्षमा मागतो......

    त्यावेळी पुन्हा एकदा तो मोठा आवाज आला . समोर असलेल्या खिडकीतून तो प्राणी आत आला  .  तो कक्ष भला मोठा होता त्यामुळे तो प्राणी सहजपणे आत येऊ शकला . घोड्यासारखे चार पाय ,   मोठे च्या मोठे पंख ,  लांब शेपटी व शेवटला वर्तुळाकार आणि एखाद्या पक्षाप्रमाणे लांब मान व चोच .....

" हाच सुरूकू ....
तो म्हातारा म्हणाला

    सुरुकु जवळ येत आपल्या चोचीने आयुष्यमानला डवचत होता . जणू काही आयुष्यमानला तो जन्मापासून ओळखत होता......


       उत्तरेच्या सैनिक दलाचे स्मशान झाले होते . 
        कोणाचा हात गेला होता , कोणाचे पाय जागेला नव्हते . ज्याचं सारं काही व्यवस्थित होतं तो बेशुद्धावस्थेत होता . जेव्हा एक दोघेजण शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी जे बेशुद्ध होते , पहिल्यांदा त्यांना उठवायला सुरुवात केली . नंतर त्या सर्वांनी मिळून जखमींच्या उपचारास सुरुवात केली . ते अंधभक्त एखाद्या महान योद्ध्यासारखे लढले होते  .  ते त्यांच्यासाठी काहीच अवघड नव्हतं . त्यांना सर्व प्रकारची युद्ध कौशल्य आत्मसात होती .  त्यामुळे त्यांच्यापुढे सामान्य सैनिकांचा टिकाव लागणे कधीच शक्य नव्हते .  मात्र ही सारी सामान्य माणसे त्यांच्या महाराणीसाठी , त्यांच्या राजकुमार साठी लढली होती . जखमी झाली होती . आणि हे सर्व निष्फळ ठरलं होतं . कारण राजकुमार त्याठिकाणी नव्हताच .  राजकुमाराला घेऊन जाण्यात भक्त यशस्वी झाले होते......

       जखमींना औषध पुरवले जात होते . जो तो ज्याच्या त्याच्या परीने उपचार करत होता .  पण सारे तंत्रज्ञ मंदाराविषयी विसरूनच गेले होते . तो काहीतरी सांगत होता , त्याच्याविषयी विसरून गेले होते .  तो जिवंत आहे की मृत , तो कुठे आहे याचेही त्यांना भान नव्हतं . मात्र तो तंत्रज्ञ मंदार जिवंत होता .  चाकू जरी त्याच्या हृदयाजवळ लागला असला तरी त्याच्या हृदयात गेला नव्हता.....

    भिल्लवाने मंदारला पाहिले .  सैनिकांच्या मदतीने त्याला उचलून बाजूला घेत त्याच्या वरती उपचार केला .  हृदयाच्या जवळ गेलेला चाकू काढून मलमपट्टी केली .  काही वेळ अजून गेला असता तर मंदार नक्कीच मृत्युमुखी पडला असता . एवढा मोठा तंत्रज्ञ इतके वर्ष जिवंत राहिला पण या साध्या गोष्टीने त्याला मरण येणार होतं....

" अश्वराज , अश्वराजाला पाहिले का ....? तो कोठे गेला.....?
    मंदार अडखळत अडखळत बोलत होता....
" नाही , आम्ही पाहिलं नाही ....... "
भिल्लव म्हणाला....
" माझी पिशवी , शिट्टी  महत्त्वाची आहे .... अश्वराजला माघारी पाठवले पाहिजे .....  आता लगेच आपण नाही जाऊ शकत विक्रमाला थांबवण्यासाठी ....
तर एका सैनिकाने शिट्टी आणून मंदारजवळ दिली .  त्याने शिट्टी वाजवली . अश्वराज धावत आला  .
" अश्वराज परत माघारी जा , शौनकचा शोध घे.... त्याच्यासोबत असलेल्या वारसदाराच्या सभेच्या प्रमुखा सोबत काळ्य विहिरीपासून पुढे निघालेल्या विक्रमाच्या सेनेकडे जा ..... शौनक जवळ दृश्य रूपांतरण कापड आहे .  त्याची मदत घेऊन तुम्ही सैनिकांना परावृत्त करू शकता......लवकर निघ......

   तेच दृश्य रूपांतर कापड ज्यामध्ये मंदारने तो प्रलय ,  त्याची काही झलक पाहिली होती .  ते कापड शौनक जवळ होते . अश्वराज वाऱ्याच्या वेगाने तिकडे निघाला.....
 
        महाराणी शकुंतला एका कोपर्‍यात बसली होती .  तिचा पहिला पुत्र तिच्यासमोर जिवंत जाळला गेला . दुसरा पुत्र ' त्याच्यापासून '  झाला होता . त्या पुत्राने आता संपूर्ण पृथ्वीतल विनाशाच्या वाटेवर आणून ठेवला होता . तिसरा मुलगा जो तिचा एकमेव आशेचा किरण होता ,  तोही आता '  त्यानेच '  नेला होता . होय तिला माहित होतं . तो आवाज तिच्या ओळखीचा होता . ती काळी सावली तिच्या ओळखीचे होती.....

    आज जो अंधभक्तांना घेऊन आला होता , तो तोच होता तोच होता , जो काही वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यात आला होता .  तो होता ज्याने तिच्यावरती भुरळ घातली होती  .  तो तोच होता ज्याच्या संमोहनाखाली येऊन तिने त्याला सर्वस्व अर्पण केले . तो तोच होता ज्याच्यापासून तिला विक्रमाची प्राप्ती झाली.....

    तिने त्याला ओळखले होते ,  पण ती काहीच बोलू शकली नाही . ती काहीच करू शकली नाही.   ती त्याला विरोध करू शकली नाही . तिला स्वतःचा मनस्वी राग येत होता . ज्यावेळी तिचा पहिला पुत्र जिवंत जाळला जात होता त्यावेळी ती गप्प राहिली .  ज्यावेळी तो तिच्या आयुष्यात आला त्यावेळी ती संमोहनाखाली होती .  मात्र आता तसं काहीही नसताना ती त्याला विरोध करू शकली नाही . ती त्याच्याशी लढू शकली नाही . तिचं काळीज पिळवटून निघत होतं .  तिला राग येत होता .  तिला राग येत होता स्वतःचा , तिला राग येत होता राजा सत्यवर्माचा , तिला राग येत होता  साऱ्या अंधभक्ताचा.....

पण ती काही करू शकत नव्हती .  तिला माहित नव्हतं तो कोण होता . तो कुणासाठी काम करत होता . तो कशासाठी हे सर्व करत होता .....? त्यांन रक्षक राज्याचा खरच निर्वंश केला होता......

     महाराज विश्वकर्मा जलधि राज्याची पाच हजारांची सैना घेऊन महाराज विक्रमाला थांबवण्यासाठी आले होते .  महाराज विक्रमाचा तळ आता त्यांच्या दृष्टिपथात होता .
" महाराज इथून पुढं गेलो तर त्यांना दिसू शकेल त्यामुळे आपल्याकडे युद्ध करण्यावाचून दुसरा पर्याय राहणार नाही......
महाराष्ट्र विश्वकर्मा बरोबर कौशिक चा विश्वासू हेर भार्गव आला होता......
" भार्गवा आपला तळ इथेच टाक . तू माझ्यातर्फे विक्रमासाठी संदेश घेऊन जा आपले सैन्य त्यांची शक्ती त्यांची शस्त्रे साऱ्यांचे वर्णन करा . मी जे पत्र लिहून देतोय ते त्याच्या पुढे जाऊन वाच.......

     जलधि राज्याच्या त्या पाच हजार सैन्य तुकडीचा तळ तिथेच पडला . महाराज विश्वकर्म्याने भार्गवा जवळ पत्र लिहून दिले . तो विक्रमाच्या तळाकडे रवाना झाला......

     दक्षिण-पूर्व समुद्रात असलेल्या बेटांना उडती बेटी म्हणून ओळखलं जायचं .  ज्यावेळी पहिल्यांदा प्रलय काळ आला होता . त्यावेळी या बेटावरील लोकांनी सर्व पृथ्वीतलावरील लोकांना प्रलय  थांबवण्यासाठी फार मदत केली होती . उडत्या बेटावरील लोक कधीच पृथ्वीच्या इतर राज्यांशी किंवा राजाशी संपर्कात नसत .  ते नेहमीच अलिप्त राहात आले होते .

जेव्हा राजमहर्षी सोमदत्तने उडत्या बेटांचा उल्लेख केला , त्यावेळी सर्वांमध्ये कुजबुज झाली . कारण उडत्या बेटांची आख्यायिका सर्वांनीच ऐकली होती . राजमहर्षी पुन्हा एकदा बोलू लागले......

" उडत्या बेटांनी त्यावेळी शपथ घेतली होती ज्यावेळी प्रलयसदृश्य स्थिती येईल त्यावेळी ते आपल्या मदतीला येतील..... आपल्याला फक्त तो अग्निस्तंभ पेटवायचा आहे जो आपल्या राज्यात आहे .  त्यानंतर काही प्रहारच्या अवधीतच त्यांची मदत आपल्याला पोहोच होईल.....

    ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली होती त्यावेळी पृथ्वीवरती शेकडो राजे होते . पण ज्या राज यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण लढले होते ते राज्य आपल्या राज्याच्या राजधानीचे ठिकाणच होतं .  त्यामुळेच तो अग्निस्तंभ आपल्या राजधानीच्या जवळच आहे . तो फक्त आपल्याला प्रज्वलीत करायचा आहे....।
त्यावेळेस महाराज म्हणाले...

 " महर्षी आता ही निकडाची वेळ आहे .  अशावेळी आपण अशा आख्यायिकावरती वेळ न घालवता .  खरे प्रयत्न करण्याची गरज आहे . मी काही सैनिकांना तो स्तंभ पेटवण्यासाठी पाठवून देतो . पण आपली खरी समस्या आहे ती म्हणजे हे लोक  त्रिशूळ सैनिकांमध्ये कसे परावर्तित झाले.....?

      राजमहर्षी सोमदत्ताने उडत्या बेटा विषयी माहिती सांगितली खरी ,  पण उडत्या बेटांची निव्वळ आख्यायिका होती , ती खरेच आहेत का .....? असली तर त्यावरील लोक मदत करतील का .....? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत होते . जर भिंती पलीकडील महालातील शस्त्रागारात असलेला त्रिशूळ आणायचा असेल तर इतरही काही मार्ग असू शकतील असं लोकांचं म्हणणं होतं . एका आख्यायिकेमागे धावत जाण्यापेक्षा काही शूरवीरांना भिंतीपलीकडे पाठवून तो त्रिशूळ आणावा असच बर्‍याच जणांचं म्हणणं होतं........

   या सर्वाच मूळ होतं  ,  ते म्हणजे त्रिशूळ सैन्यात असलेले सामान्य नागरिक . ते सामान्य लोक त्रिशूळाचे सैनिक कसे बनले हाच मोठा प्रश्न होता....

Saturday 13 April 2019

प्रलय-१८

प्रलय-१८

      भिती म्हणजे काय याचा खरा अर्थ आयुष्यमानला आता समजला होता . तो बुटका नक्कीच नरभक्षी होता .    त्यांनं जेवढे म्हणून सुटायचे प्रयत्न करता येतील तेवढे केले होते ,  पण त्या बेड्यामधून सुटणे अशक्य होतं . तो बुटका आता मोठ्या चाकुला धार लावत होता .  नक्कीच त्याचा मृत्यू त्याला जवळ दिसत होता .

       त्यावेळीच आजूबाजूने चित्रविचित्र आवाज येऊ लागले . कोणतातरी प्राणीही जोरजोरात ओरडत असल्यासारखे वाटत होते .  पण असा आवाज आयुष्यमान यापूर्वी कधीच ऐकला नव्हता . मात्र तो आवाज ऐकून ते बुटका व बुटकी जरा जरा घाबरल्यासारखे वाटले दोघेही पटकन तळघरातून वर निघाले . मात्र ते वर जाण्याआधीच तळघराचा दरवाजा तोडत काहीतरी आत आले .  खोलीत अंधार असल्यामुळे नक्की काय होतं ते कळत नव्हतं . ते तळघराच्या पायर्‍या उतरत होती खाली आले .  आयुष्यमान जवळ जात त्याने आयुष्यमान छातीवर काहीतरी टेकवले.....

       खाली आलेला प्राणी होता . त्यांन आयुष्यमानच्या छातीवरती आपल्या शेपटीचा टोक टेकवलं होतं . त्याच्या शेपटीच्या टोकाला वर्तुळाकार होता .  लोखंडासारखा तापलेला तो गोलाकार आयुष्यमान छातीवर टेकल्यानंतर आयुष्यमान वेदनेने जोरात किंचाळला . त्याच्या छातीवरती कसलीतरी चिन्ह तयार झालं होतं  . त्या प्राण्याने त्याला ज्या छळणी यंत्रावर ती बांधलं होतं ते तोडून  टाकलं .  आयुष्यमान आता जमिनीवरती पडला होता......

   ज्यावेळी त्या प्राण्याने आयुष्यमानच्या छातीवरती ते चिन्ह उमटलं .  त्यावेळी आयुष्यमान च्या डोक्यात आठवणींचा कल्लोळ माजला .  त्या आठवणी फक्त त्याच्या आयुष्यातील नव्हत्या , तर विचित्र होत्या . त्या कधी त्याने अनुभवल्या नव्हत्या . कितीतरी आठवणी होत्या ....एकामागून एक आठवणी त्याच्या डोक्यात नव्याने निर्माण झाल्या होत्या . अचानक आलेल्या या सार्‍या आठवणी मुळे तो चक्रावून गेला .  त्याचं डोकं भणभणू लागलं . डोळ्यासमोर चित्र विचित्र दृश्ये दिसू लागली . आठवणींच्या डोंगराखाली त्याचा जीव गुदमरून चालला होता.....

  ' त्याला  दिसत होती काळी भिंत .  तिथे विक्रम उभा होता . बाजूला त्याचे सैनिक , ती भिंत पडत होती......
' त्याला दिसत होते अंधभक्त ते सामान्य नागरिकांना मारत होते......
' त्याला त्रिशूळ ,  तलवार आणि धनुष्‍यबाण सैना दिसत होत्या...
' त्याला संपूर्ण पृथ्वीचा राजा दिसत होता . त्याचे तीन राजपुत्र दिसत होते...
' त्याला पहिला प्रलयकाळ दिसला . ज्यावेळी सर्व माणसे एकमेकांची शत्रू झाली होती .  पृथ्वीवरून माणूस ही प्रजाती नष्ट होणार होती .  सर्वत्र त्याचं साम्राज्य असणार होतं . सर्वत्र प्रलय माजला होता........

    ते दृश्य पाहून आयुष्यमानच्या  डोक्याच्या ठिकऱ्या उडायच्या बाकी राहिल्या होत्या .  तो वेदनेने बेशुद्ध झाला...........

   
     जंगली सेनेच्या प्रमुखाचा तळ त्याठिकाणी होता .  जंगली सेनेच्या अनेक टोळ्या संपूर्ण जंगलात विखुरलेल्या होत्या . त्या दोघींनी मुख्य तळावर   जाण्यासाठी असलेल्या पाहऱ्याच्या तीनही टोळ्या पार केल्या . पण जेव्हा त्या आत गेल्या तेव्हा तेथील सैनिकांनी त्यांना बंदी बनवलं .  दोघेही गुपचूप बंदी झाल्या.....

    जंगली सैन्याची आता सभा होणार होती .  त्यांना त्यांच्या प्रमुख समोर नेण्यात आले . आजूबाजूला सर्व नागरिक व सैनिक उपस्थित होते.....

" या दोघीसाठी तर कोणीही तयार होईल ........
बोला तुम्ही याठिकाणी कशासाठी आला आहात.....?
तुमच्या इकडे पुरुषांची कमी आहे काय.....?

त्या प्रमुखाच्या डोळ्यात वासना होती . बोलण्यात गर्व होता ...... आरुषीने सरळ  मुद्याला हात घालतात बोलायला सुरुवात केली...
" तुम्ही माझ्या आदेशा खाली माझे सैनिक होऊन माझ्यासाठी लढायला येणार आहात .  मी तुम्हाला आदेश देते ,  तुमचे सर्व सैनिक घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला......
आरुषीच्या वाक्याबरोबर त्याठिकाणी हास्याचे फवारे उडाले .  सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले.....
" आमच्या येथे बायका फक्त झोपण्यासाठी , पुढचा वारस देण्यासाठी आणि आणलेलं अन्न बनवून घालण्यासाठी असतात .  बाकी गोष्टी बोलायचा त्यांना अधिकार नसतो...... माझ्या राणीचा आदेश देखील येथील सैनिक मानत नाहीत ,  मग तू तर कोण कुठली......?
" मी शेवटचे सांगते आत्ताच्या आत्ता तुम्ही माझा राणी म्हणून स्वीकार करा  ......अन्यथा तुम्हाला तुमच्या मृत्यूला सामोरे जावे लागले....
" आमच्या येथे राणी होण्यासाठी प्रमुखा बरोबर एक रात्र झोपावे लागते........
त्याठिकाणी असलेल्या प्रमुखाच्या शेजारी उभा असलेला एक सैनिक निर्लज्जपणे बोलला .  त्याबरोबर पुन्हा एकदा सर्वजण हसू लागले . आरूषीने मोहिनी कडे बघितले .
" फक्त जो बोलला त्यालाच....
 मोहिनीने काही क्षणासाठी डोळे झाकले....
जो सैनिक ते वाक्य बोलला होता त्याचं शीर धडापासून वेगळे झालं होतं .
    जंगली सेनेकडे असलेल्या प्रमुख प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे जुगलू.... ते सामान्यता छोटे असतात आणि प्रत्येक जंगली कडे एक जुगलू असतोच.  ते सांगेल ते काम करतात . प्रत्येकाच्या पाठीवर असलेल्या दोरीला एक छोटीशी झोळी असते त्या झोळीमध्ये जुगलू असतोच ........

त्याचे शीर जेव्हा धडापासून वेगळे झाले आणि  रक्ताचे शिंतोडे उडाले ; त्यावेळी सर्वजण अवाक् झाले भीतीने घाबरले....
" म्हणून मी म्हणते , तुम्हाला अजून जीवितहानी नको असेल ; तर आत्ताच्या आत्ता माझा राणी म्हनून स्विकार करा..... परंपरेने चालत आलेल्या मारुती घराण्याची मी वंशज आहे . या संपूर्ण पृथ्वीतलावर माझा अधिकार आहे .  म्हणून मी तुम्हाला आदेश देण्यास पात्र आहे....

पण आरुषीचे हे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच आजूबाजूला उभे असलेले चार-पाच जंगली त्याच्यांवरती धावून आले  .  त्याबरोबर मोहिनी त्यांच्या त्यांच्या जुगुलुचा वापर करून त्या चारही जंगली लोकांची शीरे धडापासून वेगळी केली ......

त्याच वेळी आजूबाजूला असलेल्या सर्व चांगली लोकांनी संतापून आवाज काढायला सुरुवात केली . मोहिनीने तिचे डोळे झाकले . जंगली लोकांकडे प्रामुख्याने तीन प्रकारचे प्राणी होते . त्यातील एक म्हणजे जुगलू , दुसरे म्हणजे घोडे  ... हे दोन प्राणी जास्त प्रमाणात होते . जेव्हा जंगली बाहेर भेटायला जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर हे दोन प्राणी हमखास असायचे .  तिसरा प्राणी फक्त जंगलातच असायचा व जंगलातील तळाची सुरक्षा करण्यासाठी  वापरले जायचा...
 तिसरा प्राणी म्हणजे शिकारी कुत्रा . हे कुत्रे  नेहमीच्या कुत्र्यापेक्षा मोठे होते....

जंगली लोकांचे घोडे इतर सर्व घोड्यापेक्षा पेक्षा हुशार असत .  असे म्हणतात त्यांच्यावर ती लावून दिलेली लुट ते बरोबर त्यांच्या तळावर नेऊन सोडतात . त्यांना म्हणे ठिकाणांची नावे सांगितली की ती त्या ठिकाणी पोहोचवतात ......

  मोहिनीने जेव्हा डोळे उघडले , त्यावेळी प्रत्येक जंगलीच्या गळ्यावरती तलवार होते , ती तलवार त्याच्या जुगलूनेच धरली होती.....।।।

" जर तुम्हाला हे जीवन नकोसं वाटत असेल तर तुम्ही हालचाल कराल अन्यथा मी जे बोलत आहे ते ऐकाल मारुतांची बारावी वंशज , मी मोहिनी संपूर्ण पृथ्वीतलाची राणी तुम्हाला आदेश देत आहे ,  तुमच्या सर्व टोळ्यांना व त्यांच्या सैनिकांना एकत्र करा ....आपण संसाधन राज्यावर आक्रमण करणार आहोत.....

    त्यावेळी जंगली लोकांचा प्रमुख चालत पुढे येऊ लागला.....
" परंपरेने असलेले  राजा आणि राणी आम्ही जंगली लोक मानत नाही . आम्ही राजा व राणीची निवड करतो .  प्रत्येक टोळीचा प्रमुख प्रमुखाची निवड करतो  . ज्यावेळी जुना प्रमुख म्हातारा होतो , त्यावेळी ही निवड प्रक्रिया असते . निवडीसाठी प्रत्येक जंगलीला युद्ध खेळावं लागतं .  त्या युद्धात समोरच्याला हरवावे लागतं......
तेही नीतिमत्ता आणि नियमाने.....

    प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही
कुणापुढे स्वतःचं मस्तक झुकवत नाही......

पुढचं बोलल्या अगोदरच आरुषीने मोहनीला त्याचं मस्तक उडवायला सांगितलं . त्याच्या जुगुलूने तलवार चालवतात त्याचं मस्तक धडावेगळे केले.....
सर्व जंगली मध्ये संतापाची लाट पसरली.....
पण कोणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही . त्याच वेळी प्रमुखाची पत्नी पुढे येऊ लागली तिचाही मस्तक धडावेगळे केले .......

प्रमुखाला असलेली दोन लहान मुले पुढे येण्याची धडपड करत होती पण जंगली लोकांनी त्यांना थांबवून ठेवणार सर्वांची मस्तके आरुषी पुढे झुकले होते पण त्यांच्या नजरेत संताप होता .  संधी मिळताच ते आरुषीला मारायलाही मागेपुढे बघणार नव्हते .....

आरुषीने  रुद्राला पुढे बोलावलं त्याच्याकडे हात करत ती म्हणाली......
" हा तुमचा नवीन प्रमुख असेल .....
पण आरुषीचं हे वाक्य पूर्ण होण्याअगोदर कुणीतरी चाकू फेकून मारला .  आरुषीच्या खांद्याला जखम झाली..........

तो एक लहान मुलगा होता .  दहा वर्षाचा असेल .
" मारुन टाक त्याला......
   रागाने ओरडत आरुषी म्हणाली.......
" आरूषी नको..........
असं ओरडत रुद्र त्या मुलाकडे धावला तोपर्यंत एका जुगुलूने चाकू चालवत त्याचा गळा कापला होता . गळ्यातून पडणाऱ्या रक्ताबरोबर तोही जमीनीवर पडू लागला पण जमिनीवर पडण्या अगोदर रुद्राने त्याला त्याच्या मिठीत घेतले . रुद्रा रक्ताने भरून गेला . तो मोठ्याने रडत होता.
तो रुद्राचा मुलगा होता .  त्याला एका जंगली मुलीपासून पासून झाला होता.......

प्रलय-१७

प्रलय-१७

       ज्यावेळी आयुष्यमान हवेत उलटा लटकला .  त्याच्या मानेवरती काहीतरी टोचल्या सारखे वाटले .  हळूहळू त्याच्या सर्व जाणीवा व संवेदना बधीर होत गेल्या .  शेवटी डोळ्यापुढे संपूर्ण अंधार पसरला .  तो बेशुद्ध झाला .

       ज्या वेळी त्याला जाग आली तो जमिनीवरती पालथा झोपला होता .  हात वरच्या बाजूला केले होते व लोखंडी हात बेड्या ज्या जमिनीत रुतलेल्या होत्या त्याच्यात अडकवले होते .  पायांच्या बाबतीतही तसंच होतं . त्याचे हात व पाय दोन्ही  गुंतवले होते . जमिनीला असलेल्या त्या बेड्या  मध्ये त्याचा हात व पाय गुंतवले होते . त्याच्यातून निसटणे अशक्य होते .  त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती .  त्याने मान वळवून इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण काही नाही ,  सर्वत्र अंधार होता.......

     पण तेव्हाच त्याच्या कानी आवाजाची कुजबुज आली .  कोणीतरी त्याठिकाणी येत होतं . त्यांनं मान वळवून पाहिलं , अंधार असल्याने त्याला काही दिसले नाही . मात्र हळूहळू त्या माणसाबरोबर खोलीत उजेड  आला . त्यांच्याकडे मशाल असावी .  ती दोन लहान मुले  वाटत होती...

       हळूहळू खोलीतल्या गोंगाट वाढत होता .  ती दोन लहान मुले आपापसात वेगळ्याच भाषेत बोलत होती .  त्यांचं एकमेकात भांडण चाललं असल्यासारखं वाटत होतं.भांडता भांडता त्यातील एकाने कोणतीतरी साखळी ओढल्यासारखा आवाज आला . आयुष्यमान हळूहळू वर जात होता . त्याला इतका वेळ वाटत होतं की तो जमिनीवरती  आहे मात्र तो एका छळणीयंत्रावरती बांधलेला होता ...... त्याच्या हाता पाया वरील बेड्यांची य पकड सैल झाली .  त्याच्या समोर असलेली फळी काढून घेतली . त्याला आता खोलीतील सर्व देखावा दिसत होता.....

         जी दोन मुले भांडत होती ती दोन मुले नव्हती .  आयुष्यमानला आता कळलं की ते दोन बुटके होते .  ते दोघे नवरा-बायको असावेत असं वाटत होतं . त्या खोलीत एक दिवा व ते छळणी यंत्र सोडलं तर दुसरं काहीच नव्हतं .  एखाद्या तळघराच्या खोलीसारखी ती खोली वाटत होती .

    बुटक्यांची प्रजात ज्यावेळी पहिल्यांदा प्रलय आला होता त्या वेळीच नष्ट झाली होती असं म्हणतात .  पाच ते सहा वितांचे हे बुटके असायचे .  पण हे दोन बुटके जिवंत कसे राहिले ...?  या जंगलात काय करत होते....? आणि त्यांनी आयुष्यमानला का पकडलं होतं हे काही कळायला मार्ग नव्हता.....? आयुष्यमान ला मोहीनीची आठवण येत होती . तिला शोधण्यासाठी तो निघाला होता , मात्र वाटेत या बुटक्यांनी पकडला . त्याला त्या बुटक्यांचा भयानक राग आला . तो त्यांच्यावरती संतापला . त्याने सैल झालेल्या बेड्यातून सुटायचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला .  ते बुटके त्याच्यावरती जोर-जोरात हसू लागले.... त्यामुळे आयुष्यमानला अजूनच राग आला .  तो रागाच्या भरात बोलून गेला.....
" आयुष्याच्या घटका भरल्या आहेत . तुमचा दोघांचा मृत्यू फार दूर नाही......
हे ऐकून ते दोघे पुन्हा जोरजोरात हसू लागले . त्यातला बुटका त्याच्या बायकोला उद्देशून म्हणाला ....

  " याचं मांस खायला मज्जा येईल असं वाटतंय . खूप गर्मी आहे याच्यात . कितीतरी वर्ष झाला आपण असलं मांस खाल्लेले नाही.....
     म्हणजे त्यांनी त्याला भक्ष्य म्हणून पकडलं होतं .  त्याला त्याच्याबद्दल , त्यांच्या इतिहासाबद्दल फार काही माहिती नव्हती  . पण ते नरभक्षी नव्हते हे त्याला माहीत होतं . त्यामुळे त्याला वाटलं हे बुटके त्याला घाबरवण्यासाठी मुद्दामून अशा गोष्टी करत आहेत  . त्यामुळे तो म्हणाला...
" बुटके कधीच नरभक्षी नव्हते . तुम्ही मला घाबरवायचा प्रयत्न केला , पण मी घाबरणारात्याला नाही.....
     त्यावेळी त्या त्याला खूप राग आला .  त्याचा चेहरा रागाने फारच विचित्र दिसत होता . बाजूला पडलेला लखलखता चाकू घेत त्याने आयुष्यमानच्या डाव्या हाताची करंगळी कापून बाजूला काढली....
        आयुष्यमान वेदनेने जोराने ओरडला .  त्याचा डावा हात बधीर झाला.  त्यातून पडणारा रक्ताचा थांबवत बुटका  म्हणाला
" मग तुला हे ही माहीत असेल की बुटके कधी खोटं बोलत नसतात.......
    असं म्हणत त्याने ती करंगळी तोंडात टाकली व करकरून चावत तो करंगळी मजेने खाऊ लागला  . आयुष्यमानचि डावा हात बधीर झाला होता .  तो पुन्हा बेशुद्ध होतो की काय असे त्याला वाटत होतं , आणि समोरचे दृश्य पाहून त्याला पोटात मळमळू लागले . त्याला ओकारी आली .  त्याच्या डोळ्यापुढे सारकाही फिरत होतं . त्याला खूप भीती वाटली . आयुष्यात पहिल्यांदाच इतका घाबरला होता.....

     वारसदाराच्या सभेत जाण्यापूर्वी ही नि सभेत गेल्यानंतरही त्याने बरेच अनुभव घेतले होते .  बऱ्याच गोष्टींना सामोरे गेला होता . पण त्याला इतकी भीती कधीच वाटली नव्हती .  तो मृत्यूलाही कधी घाबरला नव्हता , पण आता त्याला मृत्युंहुन भयानक भीती समोर दिसत  होती.....

   
       उत्तरेला असलेल्या सैनिकी तळाभोवती अंध भक्तांचा गराडा पडला होता . सर्वजण मध्यभागी गोळा झाले होते . बाजूला उभे राहून अंधभक्त त्यांची घोषणा देत होते . कोणताही अंधभक्त पुढे सरत नव्हता .

" सिरकोडा इसाड कोते ....
फक्त हाच आवाज ऐकू येत होता .  शंभरच्या वर तरी अंधभक्त त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले असावेत....

    " दक्षिणेच्या देव जेव्हा जागृत होतो तेव्हा अंधभक्त तयार होतात पण दक्षिणेचा देव दक्षिणेकडे भक्त उत्तरेत काय करत आहेत .... "
सुरक्षा प्रमुख रघूराम म्हणाला....
" अंधभक्त आणि दक्षिणेचा देव यांचा काही संबंध नाही .  ज्यांना थोडस तंत्र माहीत आहे .  तो भक्तांना जागृत करु शकतो .  नक्कीच आपल्यातल्याच कोणाचातरी काम आहे ,  ज्यांना हा उत्तरेतील सैनिक तळ नको आहे , त्यांनी भक्तांना पाठवलं असावं .....
    त्यावेळी भिल्लव म्हणाला....
"  म्हणजे महाराज विक्रमांना भक्तांना जागृत करण्याची किवा महाराज विक्रमांचे एखाद्या विश्वासुला भक्तांना जागृत करण्याची पद्धत माहीत आहे का काय.....

"  तुला काय वाटतं भिल्लवा महाराज विक्रम  ते स्वतः भक्त अंधभक्त असू शकत नाहीत......

त्यावेळी अद्वैत म्हणाला ...
   " ते काहीही असो.  ते फक्त पंधराजन होते . त्यांनी आमच्या तीनशे जणांच्या तुकडेच हाल बेहाल केलं होतं..... आता तर शंभरच्या वर आहेत . आपण यांच्याशी लढा देऊ शकत नाही .  हे अनैसर्गिक आहे.......

  त्यावेळी मंदार म्हणाला " म्हणूनच मी मघाशी म्हणालो होतो निसर्गाच्या विरोधात गेलं की निसर्ग त्याचा  हिसका बरोबर दाखवतो ....
असं म्हणत त्याने आपल्या पिशवीतून पुन्हा एकदा शिट्टी काढली आणि मोठमोठ्याने वाजवायला सुरुवात केली....... शिट्टीचा आवाज सर्व पर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचावा म्हणून त्याने तिच्यासमोर ध्वनिवर्धक धरला होता . त्या ध्वनिवर्धकामुळे  शिट्टीचा आवाज फारच मोठा झाला होता .
त्या शिट्टीची धून बाटी समाजाच्या बासरी प्रमाणानेच होती .  फक्त थोडासा फरक होता . ती धून ऐकताच भक्तांची घोषणा बंद झाली व ते हळू हळू शांत होवू लागले . आणि  आल्या पावली परतू लागले......

    त्याच वेळी कोणीतरी झाडावरून  तंत्रज्ञ मंदाररावरती चाकू फेकून मारला . त्या चाकूचा घाव मंदारच्या हृदयाजवळ झाला . तो  खाली कोसळला . त्याबरोबर  आल्या पावली परत निघणारे अंधभक्त पुन्हा मोठ्या आवाजात घोषणा देत पुढे सरकू लागले......

    सर्व सैनिक त्या गोलाच्या बाहेरच्या बाजूला झाले व आत सामान्य नागरिक होते .  अंधभक्त आता पुढे सरकत होते . एक सैनिक त्वेषाने चालून गेला ,  त्याने तलवारीचे घाव केले . अंध भक्ताने चपळतेने सर्व गाव चुकवले व त्याचीच तलवार घेऊन त्या सैनिकांचे शिर धडापासून वेगळे केले......

    त्या सैनिकाचे धडावेगळे झालेले शरीर पाहून सर्व सैनिकांना  राग आला . अधिरथ तावातावाने आपली तलवार घेऊन पुढे चालत गेला . त्याने एका अंधभक्त वरती वार केला . तो भक्त त्याचे वार चपळतेने चुकवायचा प्रयत्न करत होता ,  पण अधिरथ सारखा पट्टीचा तलवारबाज संपूर्ण राज्यात नव्हता . बराच वेळ त्यांचं ते द्वंद्व चालू होतं . अधिरथ वार करायचा आणि तो भक्त चुकवायचा .  शेवटी अधिरतने  त्या भक्ताचे दोन्ही हात खांद्यापासून वेगळा केले . नंतर त्याने त्याचे शीर धडापासून वेगळे केले . काही मिनिटांसाठीच हे द्वंद्व चाललं होतं . इतरांना फक्त जलद हालचाली दिसल्या होत्या .फक्त एका अंधभक्ता बरोबर लढूनच अधिरथ ला थकवा आल्यासारखे वाटत होते .तो चक्कर आल्यासारखं होऊन खाली पडला . आता त्याच्या वरती एकदम चार ते पाच अंधभक्त चालून आले होते . भिल्लव , अद्वैत व इतर सैनिक अधिरताचा बचाव करण्यासाठी पुढे सरले... त्याचवेळी आवाज आला .....
   " थांबा आपल्याला कोणतीही जीवित हानी नको आहे.....
    त्यांच्यासमोर झाडावरती एक काळसर आकृती साकारली होती . ती काळसर  आकृती कसल्यातरी काळसर ढगावरती किंवा पक्ष्यावरती असल्यासारखे वाटत होते... तो आवाज खर्जातला होता.....
" महाराणीचा लहान पुत्र म्हणजेच  नवीन राजकुमार ,  फक्त त्यांना घ्या व माघारी फिरा .....इतर एकाचीही जीवितहानी आपल्याला नको आहे.......

    पुन्हा एकदा भक्त त्वेषाने पुढे सरले . वाटेत जो कोणी येत होता त्याला ते बाजूला सारत होते , नाही झाला तर बेशुद्ध करत होते आणि पुढे सरत होते . त्यांना आता कोणीच थांबवू शकत नव्हतं .  महाराणी शकुंतलेच्या कुशीत असलेल्या नवीन राजकुमारा वरती हे संकट आलं होतं......


   त्रिशूळांच्या सैन्याबरोबर सुरू असलेल्या जलधि राज्याचं युद्ध थांबलं होतं .  बऱ्याच सामान्य लोकांचे त्यात जीव गेले होते , जे सैनिक म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिले होते  .  काळ्या भिंतीपलीकडे असलेली त्रिशूळ सैना आणि त्यामध्ये असलेले सामान्य लोक .  त्यांना कसेही करून त्यांच्या सामान्य स्थितीत आणायला हवं होतं .   हे कसं शक्य झालं आणि ते लोक भिंतीपलीकडील  सैन्यात कसे गेले  हेही शोधायला हवं होतं . सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आले होते आणि काय करायचे याचा विचार करत होते .....? पलीकडे जाऊन एका  त्रिशूळ सैनिकाला धरून त्यांनी अलीकडे आणलं होतं . त्याला समोर उभा केलं होतं . पण तो पुन्हा पुन्हा बोललं तरीही शांतच राहत होता . तो बोलतच नव्हता जणू काही तो कोणाला ओळखतच नव्हता .  अलीकडे आणलेला तो सैनिक दुसरा दुसरा कोणी नव्हता तर राज्याच्या सेनापतीचा पुत्र होता , ज्याने अजून वयाची सोळावी ही ओलांडली नव्हती......

    त्याठिकाणी कोणाचीच काहीच बुद्धी चालत नव्हती .  सर्वांनी राजमहश्री सोमदत्तना काहीतरी बोलण्याची विनंती केली . त्यावेळी राजमहर्षी सोमदत्त उभारले व बोलू लागले......

    " कोणतीही गोष्ट नष्ट करण्यासाठी ती कशाची व कोणत्या गोष्टी पासून बनलेली आहे हे माहीत असणं गरजेचं असतं .  जर आपल्याला त्रिशूळाची सेना नष्ट करायची असेल किंवा आपल्या लोकांना आपल्या माणसात आणायचं असेल तर ते  त्रिशुळाचे सैनिक बनले कसे हे जाणून घ्यावे लागेल......
         त्रिशूळ तलवार व धनुष्यबाण या तिन्ही सेना भिंतीपलीकडे सम्राटाने बनवल्या होता । ज्यावेळी काळी भिंत बांधली ,  त्याच्याही आधी या अस्तित्वात होत्या . तो वेळोवेळी या सेना बनवायच्या नंतर तो या गरज संपल्यानंतर नष्टही करून टाकायचा.....
     
         तुम्ही त्या त्रिशूळ सैनिकाच्या पाठीवरती पहा ,  एक त्रिशूळाचा व्रण असेल .  "

   सर्वांनी त्या सेनापतीच्या मुलाच्या पाठीवरती पाहिलं .  एक तापलेला त्रिशूळ पाठीवर ठेवल्यानंतर जसा  व्रण होतो तसा भलामोठा व्रण त्याच्या पाठीवरती होता.....

" तो  कसा बनवला गेला तसाच नष्ट करता येऊ शकतो .  त्यासाठी फक्त आपल्याला काळ्या महालाच्या शस्त्रागारात असलेला तो त्रिशूळ आणावा लागेल......
तो त्रिशूळ आणण्यासाठी आपल्याला गती हवी आहे आणि गतीसाठी उडत्या बेटांच्या मदतीशिवाय आपल्याला पर्याय नाही .......

प्रलय-१६

प्रलय-१६

     उत्तरेचा सैनिक तळ हा सैनिक तळ कमी आणि देशद्रोह्यांचा अड्डा म्हणून जास्त ओळखला जायचा . ज्यावेळी महाराज सत्यवर्मांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला . त्यावेळी महाराज विश्वकर्मानी राज्याची सूत्रे सांभाळली .  त्यावेळी महाराज विश्वकर्माचे बरेच समर्थक होते .  पण ज्यावेळी दुसरा राजपुत्र जन्मला व त्याच्या नावे राज्याभिषेक करण्याचा प्रश्न आला , त्यावेळी महाराज विश्वकर्मा महाराज पदावरून बाजूला झाले . मात्र त्यांचे समर्थक अडून राहीले .. त्यामुळे त्या सर्वांना शिक्षा देण्याचे ठरले .   मात्र ते समर्थक पलायन करण्यात यशस्वी झाले व उत्तरेचा जंगलात स्थायी झाले . सैनिकांबरोबर बरेच सामान्य नागरिक ही त्याठिकाणी स्थायिक झाले होते......

       त्याच सैनिकाच्या तळावरती आज सर्व जण जमले होते. महाराणी शकुंतला ही त्या ठिकाणी उपस्थित होत्या .  ज्या लोकांनी महाराणीचं अपहरण केलं होतं ते तळावरील सैनिक होते . ज्या सैनिकांनी अपहरण केलं होतं त्यांना माहित नव्हतं त्या महाराणी आहेत .  नंतर तळावरती आल्यावर सुरक्षक प्रमुखाने महाराणीची सुटका केली  व नम्रता पुर्वक त्यांचा आदर सत्कार केला . महाराणी त्या ठिकाणाहून राज्याकडे जाऊ इच्छित होत्या .   महाराज विश्वकर्मा यांना फाशी झाली असा त्यांचा समज होता , पण सुरक्षा प्रमुख रघुरामाने तो समज काढून टाकला . त्याने महाराणींना सर्व हकीकत सांगितली व त्यांना तळावर राहण्यासाठी विनंती केली .  त्या विनंतीला मान देऊन महाराणी त्यांच्यासोबत असलेल्या छोट्या राजपुत्रासह तळावरती स्थायिक झाल्या .  जोपर्यंत महाराज विश्वकर्माचा पुढील आदेश येणार नव्हता तोपर्यंत त्या तिथेच राहणार होत्या . त्याठिकाणी अजूनही बरेच लोक होते .  भिल्लव होता , सरोज होती ,  अधिरथ होता , अद्वैत होता आणि त्या दोघांचे साथीदारही होते .  त्याचबरोबर उत्तरेच्या तळाचे सुरक्षा प्रमुख रघुराम आणि त्यांचे महत्त्वाचे साथीदार सैनिकही होते . सर्व लोक व सैनिक आजूबाजूला जमले होते , कारण त्या ठिकाणी तंत्रज्ञ मंदार काहीतरी बोलण्यासाठी उभारले होते . सर्वत्र शांतता होती . तंत्रज्ञ मंदारने बोलायला सुरुवात केली..........

"  येथील बरेच जण मला ओळखतात आणि बरेच जण नाहीत .  पण जे मला ओळखतात त्यांना माहित आहे मी सहसा बाहेर पडत नाही . प्रवासाला तर मुळीच नाही . पण आता अशी गोष्ट झाली आहे , ज्या गोष्टीमुळे मला बाहेर पडावे लागले. तुम्हाला प्रलयबाबतची काही कल्पना नसेल , या पृथ्वीतलावर असलेल्या वेगवेगळ्या संस्कृती प्रलयाची वेगवेगळी वर्णने आहेत . कोणी सांगतात ,  ज्यावेळी प्रलय येईल त्यावेळेस संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडून जाईल ,  कुणी सांगतात ज्यवेळी प्रलय येईल त्यावेळी आकाशातून आगीचा वर्षाव होईल व सर्व पृथ्वी जळून जाईल .  कुणी सांगतात ज्या वेळी प्रलय येईल त्यावेळी पाऊस पडणार नाही व सर्व पृथ्वी सुकून जाऊन पाण्यावाचून तडफडून मरेल . ज्या त्या संस्कृतीत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात .  प्रत्येकाच्या संस्कृतीत प्रलयाची वर्णने आहेत पण मी म्हणतो ती सारी वर्णने खोटी आहेत .  तसं काही होणार नाही , त्याहून भयंकर होणार आहे .......प्रलय येणार आहे आणि आपल्याला विळख्यात घेणार आहे , जर आपण लवकरच कृती केली नाही तर प्रलय कोणीच थांबवू शकणार नाही........

त्यावेळी बराच जणांच्या चेहऱ्यावर ती त्याला प्रश्न चिन्ह दिसले मंदारने अजून सविस्तर सांगायला सुरुवात केली......

" तुम्हाला जास्तीत जास्त वाईट काय माहित आहे ......तर ती माहित आहे काळी भिंत , भिंतीपलीकडील  महाल आणि त्यातील सम्राट ...।।त्याची खरी कथा कोणालाच माहित नाही .  ज्यावेळी भिंत बांधली होती .  त्यावेळी मी जिवंत होतो .  मला त्याची कहाणी माहित आहे . पण पण त्याहूनही भयानक काहीतरी आहे हे कुणाला माहीतच नाही , आणि त्याहूनही भयानक आहे तो म्हणजे प्रलय .....

    त्यावेळी सैन्याची तुकडी घेऊन काळी भिंत पाडण्यासाठी निघालेला अभिजीत अद्वैत म्हणाला.....

" तुम्हाला चूकीचं ठरवण्याचा माझा उद्देश नाही ,  पण मी स्वतः सैनिकांची तुकडी घेऊन काळी भिंत पाडण्यासाठी गेलो होतो . त्या ठिकाणी मी जे काही पाहिलं त्याच्याहून भयानक या जगात काहीच असू शकणार नाही....

   हा तोच अभिजीत अद्वैत होता . ज्याच्या तुकडीची संपूर्ण विल्हेवाट त्यां  अंवभक्तांनी लावली होती......

    " मला माहित आहे अभिजीत अद्वैत .....  तू काय पाहिलं असशील......? तंत्रज्ञ मंदार

" नाही , तुम्हाला कल्पना येऊ शकत नाही . त्या पंधरा लोकांनी , त्या फक्त पंधरा लोकांनी आमच्या तीनशे जणांच्या तुकडीचा संपूर्ण निकाल लावला . आमची तुकडी साधीसुधी नव्हती .  संपूर्ण पृथ्वीतलावर सर्वात पराक्रमी , अनुभवी असलेल्या आमची तुकडी , तुकडीतील 300 सैनिक , या साऱ्यांच्या बरोबर युद्ध करून त्यांना पराभूत केलं ,  फक्त पंधरा लोकांनी .....आणि त्यानंतर ते जे काही कृत्य करत होते ते तर कोणाही माणसाच्या अंगावरती काटा आणणारा होतं .   ही लोक जर भिंतीपलीकडे असतील तर भिंतीहून भयानक या जगात काहीच असू शकत नाही ......

" अद्वैता मला माहित आहे तू काही अंधभक्तांना पाहिलं असशील  पण अंधभक्त हे भिंतीचे नाहीत तर दक्षिणेकडील देवाची आपत्ये आहेत .  त्यांना बासरीचा ठराविक धुनीवरती आपल्या ताब्यात करता येते  . आणि पूर्वीप्रमाणे मनुष्यात  आणता येते ,  त्यात काही फारसं अवघड नाही ; पण त्याहून अवघड आहे ती म्हणजे काळी भिंत आणि  काळ या भिंतीहुन भयानक आहे तो म्हणजे प्रलय ........

यावेळी प्रथमच भिल्लव बोलत होता ,
तो म्हणाला  " अंधभक्त जर काहीच नसेल ,  तर भिंतीपलीकडे त्याहून भयानक असे काय आहे.....? 

" काळा भिंतीची खरी गोष्ट कुणालाच माहीत नाही ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्या ऐकिव आहेत . आज मी तुम्हाला कळ्या भिंतीची खरी गोष्ट सांगतो जी मी स्वतः  अनुभवलेली आहे.....
        मंदारने काळ्या भिंतीची गोष्ट सांगायला सुरुवात केली .  ज्यावेळी भिंत बांधली जात होती आणि त्या पूर्वी घडलेल्या बऱ्याच गोष्टी या साऱ्या गोष्टींचा जिवंत साक्षीदार फक्त मंदार होता , आणि तो आता  भिंतीची गोष्ट साऱ्यांना सांगत होता... त्याने बोलायला सुरुवात केली........

"  या पृथ्वीतलावरती अजूनही बऱ्याचशा जागा आहेत ज्या जागांवर ती मनुष्याला जाणे अशक्य आहे किंवा मनुष्याचे जाणे निषिद्ध आहे प. ण मनुष्य नेहमीच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक राहिलेला आहे . त्याची ही उत्सुकता बऱ्याच वेळा त्याच्या विनाशाचे कारण बनते . मनुष्याने उत्सुक असाल तरी निसर्गाच्या विरुद्ध ,  निसर्गनियमांच्या विरुद्ध जाणे त्याने टाळले पाहिजे .  ज्यावेळी चालत आलेल्या गोष्टींच्या विरोधात जाऊन त्यांना काही करायचा प्रयत्न केला त्यावेळी निसर्गाने त्याला धडा शिकवला आहे . काळ्या  भिंतीच्या गोष्टीचीही सुरुवात अशा गोष्टींनीच होते.....

     " मनुष्याला नेहमीच सत्ता व संपत्ती याची हाव राहिलेली आहे .  प्रत्येक मनुष्य या दोन गोष्टींच्या प्राप्तीसाठी संपूर्ण आयुष्यभर धडपडत असतो . प्रत्येकाला या गोष्टी हव्या असतात आणि या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबण्याचा तो प्रयत्न करत असतो . फार पूर्वी , पृथ्वीवर एकछत्री राज्य येण्यापूर्वी , ज्यावेळी पृथ्वीवर छोट्या छोट्या भूभागावर ,  गावागावात राज्य असायचे त्या काळी.....
        एका छोट्याश्या गावाचा राजा होता तो . त्यालाही संपत्तीची हाव होती .  त्यालाही सत्ता हवी होती . तो एका गावाचा अधिपती होता . त्याच्याकडे एका गावाची सत्ता होती .  पण त्याने त्याची हौस भागली नाही .  त्याने गावातील तरुणांना गोळा करून अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली .  त्याने स्वतःचे सैन्य बनवायला सुरुवात केली . सैन्य बनवून आजूबाजूची गावे त्याने जिंकायला सुरुवात केली....

     एकापाठोपाठ एक गावे तो जिंकत गेला . त्यांच्या आजूबाजूची जेवढी म्हणून मनुष्यवस्ती होती ती सर्व त्याने त्याच्या अधिपत्याखाली आणली तो त्या प्रदेशाचा राजा झाला .  जो गाव तो जिंकायचा त्या गावातील काही तरुणींबरोबर तो लग्न करायचा . असे करता करता त्याच्या शेकडो राण्या झाल्या  . त्याचे एक छोटेसे राज्य तयार झाले . मग त्याने त्या राज्यासाठी महाल बांधायला सुरुवात केली......

      तो राजा सुखी समाधानी झाला होता . त्याचे स्वतःचे छोटेसे राज्य होतं . त्याला वाटलं आपल्याला जे मिळवायचे होतं ते आपण मिळवले आहे...... त्याने राज महाल बांधला व त्याच्या राण्या बरोबर तो राजमहाला मध्ये राहू लागला .. तो राण्यांना  घेऊन समुद्रकिनारी जलक्रीडा करण्यासाठी जात असे .  त्या दिवशीही तसाच तो त्याच्या रिण्यांबरोबर समुद्रकिनारी गेला होता , पण समुद्रात दूरवर ती त्याला काहीतरी हालचाल दिसली .  समुद्रात कोणता तरी विचित्र प्राणी त्याला दिसला . त्यांनी त्याच्या सैनिकांना बोलावले व छोटीशी नाव काढून ते त्या ठिकाणी जायला निघाले . जेव्हा ते त्या प्राण्याच्या जवळ गेले तेव्हा त्याला जाणवले की तो कोणत्याही प्रकारचा प्राणी नव्हता तर भली मोठी नाव होती । त्याने इतकी मोठी नाव त्याच्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते तो ती नाव पाहून हबकून गेला .

      त्याला वाटलं होतं समुद्र किनाऱ्या पलीकडे देवांची वस्ती आहे  आणि साक्षात देवच त्याच्या भेटीसाठी आले आहेत . पण त्याला माहित नव्हतं ती ही माणसे होती आणि समुद्रकिनाऱ्या पलीकडे अजून जमीन होती , भली मोठी जमीन होती आणि त्या जमिनीवर तीही अनेक राज्ये होते , ज्यांचे अनेक राजे होते.... त्या मोठ्या जहाजावरील माणसांना, नि ह्या बेटावरील राजाला एकमेकांची भाषा समजत नव्हती . पण जहाजावरील माणसांनी या राजाला बंदी बनवले व याला घेऊन त्यांच्या राज्यात गेले....

    जेव्हा बेटाचा राजा त्यांच्या शहरात फिरत होता त्यावेळी तेथील गोष्टी पाहून तो वारंवार आश्चर्य करत होता .  तेथील इमारती , तेथील रस्ते  सर्वच त्याला नवीन होता. त्याच्या संपूर्ण जमाती मध्ये पहिल्यांदाच तो या भूमीवर ती आला होता . त्याला वाटलं होतं त्या बेटावरतीच तेवढे जग आहे , आणि मी संपूर्ण जगाचा राजा झालो आहे .  त्या लोकांना संपूर्ण जगाची माहिती नव्हती , पण याला आता संपूर्ण जगाची माहिती झाली होती . त्याला कळलं होतं जग खूप मोठा आहे , त्यात खूप राज्ये आहेत ,  खूप बेटे , आहेत खूप लोक आहेत.... आणि तरीही त्याला संपूर्ण जगावर राज्य करण्याची इच्छा झाली होती ......

      त्याला कैदी म्हणून त्या राज्याचा राजा समोर पेश केलं होतं ,  पण त्या राज्याला बेटावरील लोकांची भाषा येत होती.....
     तो राजा बेटावरील लोकांच्या भाषेत त्याला म्हणाला.....
" क्षमा करा ,  आमच्या सैनिकांकडून चूक झाली . त्यांना तुमची भाषा समजत नसल्यामुळे तुमच्यामध्ये गैरसमज झाला असावा .........
आणि त्या राजाने त्याच्या सैनिकांना बेटावरील लोकांना सोडण्याचे आदेश दिली...
" आपला परिचय .....
त्या राज्याच्या राज्याने बेटावरील राजाला विचारले..।
" मला तुमच्या राज्यांचे ते जहाज दिसेपर्यंत असेच वाटत होते कि मी या संपूर्ण जगताचा राजा आहे..... पण मला आता कळाले ला आहे मी फक्त त्या बेटाचाच राजा आहे....
" त्या बेटावरतीही आता एक राजा आहे म्हणायचा .  मागच्या दशकापासून त्या बेटा सोबत आमचा संपर्क तुटला आहे...... मागच्या वेळी मी जेव्हा भेटा वरती आलो होतो त्यावेळी एका टोळीकडून आम्हाला लागणारी खनिजे आम्ही उकरून घेतली होती.....
" सर्व टोळ्यांना एकत्र करून , काही जणांबरोबर युद्ध करून , काही जणांबरोबर नातं जोडून ,  काहीजणांना मुळापासून उपटून टाकून मी बेटावरती साम्राज्य प्रस्थापित केलेलं आहे आणि तुमच्या लोकांनी मला बंदी बनवून आणलं हे काही मला आवडलेला नाही....

" मी माझ्या लोकांच्या वागणुकी बद्दल क्षमा मागतो .  तुम्ही काही दिवस , तुम्हाला जेवढं वाटतं तेवढंच ,आमच्या राज्यात वास्तव्य करा , आमच्या पाहुणचाराचा लाभ घ्या ,  ज्यावेळी तुमचं समाधान होईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या राज्यात सोडू......

     तो राजा बरेच दिवस तेथे राहिला . तेथील भाषा , समाज , रूढी , परंपरा , प्रथा इतर शास्त्रे , युद्ध , युद्ध कला आणि त्यांची शस्त्रे ......। त्याने सर्व काही शिकून घेतलं बरेच दिवस राहिल्यानंतर त्याला त्या ठिकाणचे राजकारणही समजलं....... तुझ्या राज्यात राहत होता ते राज्य पृथ्वीतलावर फार मोठं नव्हतं पण त्याच्याकडे बरीच साधनसंपत्ती होती , पण सैन्याच्या बाबतीत ते राज्य मागं होतं . त्यामुळे त्या राज्याला बऱ्याच वेळा इतर राज्याकडून त्रास सहन करावा लागे व कर म्हणून त्याच्या जवळील बरीच साधनसंपत्ती इतर राज्यांना द्यावी लागे.  हे सर्व जाणून घेऊन तो राजा त्याच्या बेटावर आला....

      ज्यावेळी  तो बेटावरून माघारी आला , पुन्हा त्याच राज्यात . त्यावेळी त्याच्या जवळ बऱ्याच गोष्टी होत्या . ज्या शस्त्र म्हणून वापरता येण्यासारख्या होत्या .  ज्या राज्यात तो राहिला होता त्या राजाच्या मदतीने त्याने शेजारील राज्यांवर आक्रमण ठरवले . त्या राज्याचा राजा परस होता . आणि बेटावरील राज्याचे नाव वासुकी होते . वासुकी ने अशा काही गोष्टी आणल्या होत्या ज्या पाहून राजा परस हा वासुकीच्या परम मित्र झाला . वासुकी व परस राजा दोघांनी मिळून शेजारच्या राज्यावर आक्रमण केले . त्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी त्यांनी स्वतःची सैना वापरले नाही , ती सैना त्याच राज्याची होते . ज्या राज्यावर आक्रमण करणार होते त्यांची सैना त्यांच्याच विरुद्ध लढली . या साऱ्या मागे एक वाक्य होतं ते म्हणजे.....
    " सिरकोडा इसाड कोते.......
हे अंधभक्तांचं प्रकरण फार मागे जातं .  त्या भक्ताच्या प्रकरणाची सुरुवात त्या ठिकाणी झाली होती . आणि हे वाक्य त्या बेटावरील भाषेतील वाक्य आहे ........

      त्याच वेळी  त्या उत्तरेकडील सैन्यतळाच्या अवतीभोवती मोठ्या आवाजात
   " सिरकोडा इसाड कोते "
 या वाक्याचा पुनरुच्चार होत होता..........

    काळ्याभिंतीपाशी जलधि राज्याची सेना जमा झाली होती .  भिंती पलीकडे असलेल्या त्रिशूळ सेने वरती त्यांनी आक्रमण केलं होतं .  भिंतीवरती चढवलेल्या तोफा आग ओकत होत्या .  धनुष्यबाण एकापाठोपाठ एक त्यांच्या काळजाचा वेध घेत होते . एवढं सगळं होऊनही त्या सैनिकाकडून कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं  जणू त्यांना हल्ला करण्याचा आदेश मिळाला नव्हता......

त्याठिकाणी मृतदेहांचा खच पडला होता .  रिकामी झालेली जागा भरण्यासाठी दोन्ही बाजूने आणखी सैनिक येत होते .   तेही मृत पावल्यानंतर त्यांच्या वरती अजून सैनिक येतच राहिले . जिकडे तिकडे रक्ताचा चिखल झाला होता . कुठे तुटून पडलेला हात दिसायचा , कुठे पाय ....कुठे एखाद्याचे शीर ....कुठे एखाद्याचा राहिलेलं धड .  सर्वत्र तुकडे झालेले अवयव विखरून पडले होते..... पण येणारे सैनिक काही कमी होत नव्हते .एका पाठोपाठ एक एक रिकाम्या झालेल्या जागा भरून निघत होत्या इतकं अफाट सैन्य भिंतीपलीकडे जमा झालं होतं ......

     हल्ला करण्यापूर्वी राज्याच्या एका मंत्र्याने हल्ला न करण्याचा सुचवलं होतं .  त्याचं म्हणणं होतं की सैना जरी त्रिशूळाची असली , तरी त्यात असलेले लोक आपल्या सारखेच सामान्य होते .   त्यांना काहीही करून त्यांच्या सामान्य व्यवस्थित आणनं भाग होतं . पण ते कसे करायचे याचं मात्र उत्तर त्यांच्याकडे नव्हतं . त्यामुळे त्याची ही सूचना स्पष्टपणे धुडकावून लावली गेली .  आणि बऱ्याच जणांच्या मतानुसार आक्रमण करण्याचं ठरलं . मात्र सुरू झाल्यानंतर कितीतरी तास आक्रमण चालू होतं , पण सैनिकांची संख्या काही कमी होत नव्हती .  मढ्यांचा ढीग लागला होता तरीही सैनिक येत होते आणि जागा घेत होते.....

     पण अचानक हल्ला करणारा एक सैनिक जोरात ओरडला .  तोफांच्या आवाजात त्याचा आवाज कोणाला ऐकू गेला नाही..... पण एका पाठोपाठ एक बऱ्याच सैनिकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या , आणि तोफांचा आवाज थांबला . बऱ्याच सैनिकांचे नातेवाईक त्यांना समोर दिसत होते . कोणाची आई होती , कुणाचे वडील होते . कोणाचा भाऊ होता .  बरेच लोक त्यांच्या ओळखीचे त्यांना समोर दिसत होते .........

झालेला सर्व प्रकार कैरव महाराजांच्या कानावर गेला.।। आणि ही गोष्ट कानावर जाते न जाते तोच राज्यातून एक दुत संदेश घेऊन आला होता....

    " राज्यातील बरेच लोक बेपत्ता झाले होते.........

   याचा अर्थ त्यांच्या स्वतःच्या राज्यातीलच लोक त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भिंतीपलीकडे उभा होते . हे कसं झालं .....? काय झालं....?  हे महाराजांना काही कळत नव्हतं ........?

      आयुष्यमान घोडा चालवण्यात पटाईत होता . त्याने घोडा इतक्या जोरात पुढे आणला की भरत व शोनकला त्याचा पाठलाग करणे शक्य झाले नाही .  उत्तरेचे जंगल पूर्व-पश्चिमेला समांतरच संपूर्ण भूखंडावरती पसरला होतं  आयुष्यमानने मोहिनीला उत्तरेच्या  जंगलावर उंच उडत जाताना पाहिलं होतं . याचा अर्थ तीं उत्तरेच्या जंगलातच कुठेतरी असेल असा त्याने कयास बांधला....त्यामुळे उत्तरेच्या जंगलातच पूर्व-पश्चिम असा शोध घ्यायचा आयुष्यमान ठरवलं . तो लगेच पूर्वेकडे निघाला .

    आयुष्यमानने  कळ्या भिंतीपाशी त्याचा शोध सुरू केला होता , पण पूर्वेकडे जाईल तसं ते जंगल अधिक घनदाट होत होतं . जंगलातील झाडे झुडपे प्राणी व पक्षी सुद्धा वाढत होते. पुढे पुढे त्याला घोड्यावरुन जाणे अशक्य झाले . तो खाली उतरला व पायी जाऊ लागला . जंगल इतके होते कि त्याला पुढे जाण्यासाठी त्याच्या तलवारीने वाट करावी लागत होती . तो बराच वेळ चालत होता . चालून चालून त्याच्या पायाला फोड आले होते .   जंगलातील लहान लहान किटकामुळे संपूर्ण अंगावर ते लाल रेषा उमटल्या होत्या . जंगलात बरेच विषारी कीटक होते , त्याचा दंष झाल्यामुळे त्याला दरदरून घाम फुटला होता . तो कोणत्याही क्षणी बेशुद्ध होऊ शकत होता तरी तो चिकाटीने चालत होता. हळूहळू त्याची एकेक जाणीव कमी होत होती .  त्याच्या सर्व जाणिवा बधिर झाल्या होत्या . त्याला तहान लागली होती .  त्याच्या जवळील पाणी संपले होते .  तो आता बेशुद्ध होऊन पडणारच तोपर्यंत समोरच्याला एक लहानसा ओढा दिसला....

    त्याने कसेतरी  ओढ्या पर्यंतचे अंतर पार केले . ओढ्यापाशी पोहोचल्यावर त्याने त्याचे कपडे काढत ओढ्यामध्ये उडी घेतली .  त्यातील पाण्याचा स्पर्श होताच त्याच्या शरीराची जळजळ कमी झाली .  फुटणारा घाम थांबला .  हळू एक एक जाणीव येऊ लागली .  वरून पाझर फुटला होता , त्या दगडा जवळ जात त्याने वरून पडणारे थोडे पाणी प्याले तेव्हा त्याला हुशारी वाटली . सर्व शरीर स्वच्छ धुतले . नंतर तो त्यातून बाहेर आला पण त्याचवेळी हवेत उचलला गेला . त्याच्या पायाला दोर बांधला गेला होता .  तो हवेत उलटा लटकला होता . तो नक्कीच कोणत्यातरी सापळ्यात सापडला होता  ,  जे कोणीतरी हेतुपूर्वक त्या ठिकाणी ठेवले होते......

प्रलय-१५

प्रलय-१५

      आरुषी व मोहिनी जंगलात पोहोचल्या होत्या . काही अंतर चालल्यानंतर जंगली लोकांसारखी वेशभूषा केलेला माणूस त्यांच्याकडे येऊ लागला .  मोहिनी घाबरली पण आरुषी मात्र तिच्या जागी ठामपणे उभी होती . कारण त्या मनुष्याने जरी जंगली लोकांसारखी वेशभूषा केली असली तरीही तो मारुतांचा एक विशेष हेर होता . त्याला आरुषीनेच जंगली सैन्यात सहभागी व्हायला सांगितलं होतं . त्याप्रमाणे तो सहभागी झाला होता आणि आता तोच त्यांना जंगली सैन्याच्या ठिकाण्यावर ती घेऊन जाणार होता .

    "  आरुषी मला नाही वाटत तू हे योग्य करतेयस.....  तुम्ही दोघी त्याठिकाणी जाऊन काय करणार आहात ........?
तो माणूस जवळ येत बोलला......
" रुद्र हे सर्व अगोदरच ठरलं होतं . त्यासाठी त्यांच्यात तुला मिसळायला लावलं होतं....
" होय ते मला माहित आहे . पण तुला खात्री आहे का ही प्रलयकारिका काम करेल......?
" होय आता वेळ घालवायला नको लवकर चल......।
" ते सर्व ठीक आहे पण वाटेत पाहण्याच्या तीन टोळ्या आहेत त्यांचं काय......?
" ते आमचं आम्ही बघून घेऊ तू फक्त पुढे जात राहा....
" आरुषी ,  मी सांगतो तुझा विचार बदल . ही आत्महत्या आहे....
" रुद्रा तू माझी इतकी काळजी नको करत जावूस..... मी माझी काळजी घेऊ शकते .  आणि मला कोणी मारायला आलाच तर त्यांची काळजी घ्यायला तू आहेस ........
    तिने लाडीकपणे त्याचे गालगुच्चे घेतले व ते पुढे निघाले.

        रुद्रा पुढे घोड्यावर जात होता त्याच्या मागे दोघी चालत निघाल्या होत्या . ते तिघेही दोन उंच झाडापाशी आले . झाडावरती पहारा देण्यासाठी लाकडाने चौक्या बांधल्या होत्या . त्या ठिकाणी सैनिक होते . त्याबरोबर झाडाखाली आजूबाजूला सैनिकांचा पहारा होता. रुद्र त्या दोन झाडाखालून पुढे गेला पण जेव्हा या दोघी आत निघाल्या त्यावेळी त्यांच्यासमोर चार बाण येवून रुतले ...

     त्याठिकाणी  वर  उभारलेल्या एका  सैनिकाचा आवाज आला....
" सुंदरींनो तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी नाही......
      तो एक तगडा पैलवान गडी  होता . त्याच्या कमरेला फक्त वस्त्र होते , बाकी संपूर्ण उघडा होता . बाकी सैनिकही तसेच होते . सर्वात सैनिक बलदंड होते दंड व छखती फुललेली ,  मांड्याची पट फिरत असलेले .  एकुणात ते सर्वजण शक्तिशाली होते
" आत्ताच्या आत्ता माघारी फिरला अन्यथा .....
     त्या सैनिकाचे वाक्य पूर्ण होण्या अगोदर त्याला मागून कुणीतरी जोरात लाथ मारली तो सैनिक खाली आपटला . ज्यांना लाथ मारली , तो सैनिक पुढे येत बोलू लागला . तो बहुदा टोळीचा प्रमुख असावा

      "  मी याच्या वतीने माफी मागतो . तुमच्यासारख्या सुंदर स्त्रियांचा असा अपमान करणं हे कदापि उचित नाही...
     तो आता खाली उतरला होता .  त्या दोघींकडे सरकत होता .  त्याच्या नजरेत स्पष्टपणे वासना दिसत होती . 

       " तुमच्या सौंदर्याचा मान ठेवायला पाहिजे ....
      तो आता आरुषीच्या जवळ पोहोचला होता त्याने हात पुढे केला .  तो आरुषीच्या नको तिथे स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता.....
   
         डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच आरूषीने तिचा खंजीर काढला व एकदम जलद हालचाल केली .  जो हात पुढे आला होता , तो मनगटापासून कापला गेला .  हात कापल्याबरोबर तो जोरात ओरडत मागे सरला व त्या बाणाला थटून खाली पडला .  त्याच बरोबर बाकी सैनिक सावध झाले. आरूषीने मोहिनीकडे  हेतूपूर्वक पाहिले .            मोहिनीला समजले . तिने डोळे मिटले .  आरुषी पुढे सरली .  तो सैनिक अजूनही ओरडत होता . ज्या डोळ्यात वासना होती ते दोन्ही डोळे आरूषीने खंजीराने बाजूला काढले नंतर त्याच खंजीराने तिने त्याच्या काळजाचा वेध घेतला .

      त्याच्या पाठोपाठ इतर सैनिकांच्या थोड्याफार ओरडण्याचा आवाज येता येता बंद झाला . त्या ठिकाणी जे काही प्राणी होते ते सर्व सैनिकांवरती  तुटून पडले.... आणि काही क्षणात ती पहारा देण्यासाठी असलेली टोळी होत्याची नव्हती झाली .  तेथीलच दोन घोडे घेऊन त्या दोघी पुढे निघाल्या.....

         आयुष्यमान व भरत दोघांचे घोडे सुटून पळत गेले होते . ते जेवणासाठी थांबले असता त्यांचे घोडे शिट्टीचा आवाज ऐकून त्या दिशेने पळत गेल्याचा त्यांच्या लक्षात आलं . ते दोघेही त्या घोड्याच्या मागोमाग गेले आणि काही अंतर जातच त्यांचा एक घोडा परत येताना दिसला.   त्या घोड्याच्या मागून दुसरा घोडा होता ,  परंतु त्यावरती कोणी तरी मनुष्य बसलेला दिसत होता .  आयुष्यमानच्या तळपायाची आग मस्तकाला गेली . अगोदरच त्याला झालेल्या घटना बद्दल वैताग होता . मोहिनीचा विरह सहन होत नव्हता , आणि कुणीतरी त्यांची भलतीच टिंगल करत होते . त्यामुळे जो कोणी मनुष्य घोड्यावर होता त्याच्याकडे पळत जात आयुष्यमाने त्याला घोड्यावरून खाली खेचले . आयुष्यमानने त्याला काहीही न विचारता वैतागून त्याच्या दोन कानाखाली लगावल्या.....

      "   घोडा वरती उडालेल्या मुलीला शोधत आहात ना तुम्ही.....
     शौनक बोलला ...
     पण मोहिनीच्या उल्लेखाने आयुष्यमानला अजूनच राग आला . एक अनोळखी माणूस येतो काय ..आपले घोडे चोरतो काय , आणि मोहिनीच्या नाव घेऊन त्यांना फसवतो काय.....? त्याचा पारा अजूनच चढला , त्याने शोनकलख अजून दोन कानाखाली लगावात त्याच्या पोटात ही गुद्दे मारून दिले.....

     " अरे मला काय मारतोय , मी तुमची मदत करायला आलोय .....! काळी भिंत पडणार आहे ....प्रलय येणार आहे ....... सगळ्या पृथ्वीवरती संकट आहे आणि वारसदाराच्या सभेचा प्रमुख प्रेम आराधना करतोय.....

      आयुष्यमानला आता राग अनावर झाला होता . तो त्याला अजून मारणार होता ,  पण भरतने त्याला मागे ओढत शांत केले.....

  " तुला कसं माहित काय भिंत पडणार आहे ते.... आणि मोहिनी बद्दल तुला कसं माहित....।?  सांग लवकर नाहीतर तुझं काही खरं नाही .....भरतने शोनकला विचारले....

       त्याने त्याच्या कमरेला असलेला कापड बाहेर काढलं   .रुपांतरण कापडावरती असलेले दृश्य दिसण्यासाठी त्याने त्याच्या वरती काहीतरी रसायन टाकले व त्या दोघांना तो कपडा दाखवला.....

    त्यांनी जे काही पाहिलं त्यामुळे त्यांची बोलतीच बंद झाली . शोनक म्हणाला ,  माझे वडील मंदार तंत्रज्ञ आहेत . जेव्हा काळी भिंत बांधली त्या वेळी ते जिवंत होते . त्यांना इतका घाबरलेला मी कधीच पाहिले नाही .  ते उत्तरेला असलेल्या सैनिकी तळावरती गेलेले आहेत . त्यांनीच मला  तूमच्याकडे पाठवलेलं आहे . वारसदाराच्या सभेच्या प्रमुखाला तिकडे घेऊन येण्यासाठी सांगितला आहे......

   ती मरो काळी भिंत आणि मरो सगळे लोक . मला आता काही पर्वा नाही .  वारसदारांची सभा मी आता सोडून देत आहे .  भरत तु सभेचा पुढचा प्रमुख , मी आता चाललोय माझ्या  मोहिनीच्या शोधार्थ.....

   भरतने त्याला समजवायचा प्रयत्न केला , पण तो घोड्यावरती बसला आणि ज्या दिशेने मोहिनी उडत गेली होती त्या दिशेकडे घोडा दामटवत निघाला.....

      

प्रलय-१४

प्रलय-१४


    " मी कोण आहे......?
मोहिनी विचारत होती .
"  तू प्रलयकारिका आहेस.....?
आरुषी तिला सांगत म्हणाली..
"  पण मला इतक्या दिवस हे सारं आठवत नव्हतं ......आणि अचानक आठवायला का सुरुवात झाली.....?
" तुला संधी दिलेली होती , आतापर्यंत तुला तुझं जीवन जगण्यासाठी दिलं होतं । तू आतापर्यंत यासारखी बरीच आयुष्य जगली आहे . ती आयुष्य तुझ्या खऱ्या जीवनाचा भाग नाहीत . तुझे खरे जीवन आहे मारुत राज्याची सेवा .  मारूतांची सेवा .....त्यासाठीच तुला इथं बोलावले आहे .  आता तू आमच्या बरोबर येशील . माझ्या आदेशाचे पालन करणे तुला बंधनकारक असेल आणि तू ते न सांगता करशीलच   .तुझ्या रक्तातच आहे ते .
" पण माझे वडील त्या गावातील धर्मशाळेत एकटे आहेत.... आणि आयुष्यमान माझा शोध घेत असेल .....मला त्यांना सांगितलं पाहिजे...."
" पुरे ....आज जाऊन विश्रांती कर . उद्या पर्यंत तू हे सर्व विसरून जाशील .  तुला मागच्या आयुष्यातील काही आठवणार  नाही आणि तुझ्या पुढे फक्त एकच उद्देश असेल तर तो म्हणजे मारुत राज्याची सेवा . उद्या सूर्योदयाला आपण जंगली सेनेवरती आक्रमण करायला निघणार आहोत ......
" जंगली सेने बाबत एक खास गोष्ट सांगते . जंगली सेनेची सर्व बिषाद त्यांच्या प्राण्यांवर अवलंबून आहे . त्यांच्याकडे बरेच प्राणी आहेत .  त्याच प्राण्याचा उपयोग करून जंगली सेना आतापर्यंत प्रत्येक युद्ध जिंकता आलेली आहे .  त्याच प्राण्यांना तुला आता आपल्या बाजूने करून घ्यायचा आहे .  हे तुला काही नवीन नाही .  माहिती असावे म्हणून सांगितलं . त्यांचे प्राणी जरा फारच वेगळे आहेत ,  हे मात्र लक्षात ठेव . बाकी काही नाही...... जाऊन विश्रांती घे.... बाकीच्या गोष्टी आपण परत बोलू ......

   मोहिनीच्या मनामध्ये द्वंद्व चालू होतं . एक मन आरूषींने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करण्यासाठी धडपडत होतं , तर दुसर्‍या मन त्या आदेशांविरुद्ध जाऊन , आयुष्यमानला , तिच्या वडिलांना भेटायला जाण्यासाठी सांगत होतं .  तेच मन तिला सांगत होतं ,  हे सर्व खोटे आहे . खर आयुष्य आधी जे होतं तेच आहे.... तिला कळत नव्हतं खरं काय खोटं काय.......?

   तिनं एक निर्णय घेतला . तिने ठरवलं आत्ताच्या आत्ता या ठिकाणाहून बाहेर पडायचं , आणि आयुष्यमान भेटायचं .....ती एका उंच डोंगरातील गुहेमध्ये होती .  ज्या ठिकाणी उतरली होती , त्या ठिकाणी ती पोहोचली , तिथे गरुड नव्हता .  तिने आजूबाजूला पाहिले . तिथे कोणताच प्राणी किंवा पक्षी नव्हता .  तिने अंतःप्रेरणेने कोणता प्राणी दिसतो का हेही पाहण्याचा प्रयत्न केला.... पण तिच्या पदरी घोर निराशा पडली . तिला बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग माहीत नव्हता . ज्या मार्गाने जाता येत होतं ,  त्या मार्गाने जाता येणे शक्य नव्हते..... शेवटी नाइलाजाने ती आत गेली . ज्या ठिकाणी तिला विश्रांतीसाठी कक्ष देण्यात आला होता , त्या ठिकाणी गेली आणि निपचित पडून राहिली........

    मंदार त्या तंत्रज्ञानाचे नाव मंदार होतं . पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान त्याच्यापाशी होतं ,  त्याने स्वतः अभ्यास करून व प्रयत्न करून कमावलेले ज्ञानही त्याच्या जोडीला होतं .  त्याला या विश्वातल्या अशा बऱ्याच गोष्टी माहीत होत्या , ज्या कोणीही कधीच ऐकला नव्हत्या किंवा पाहिल्या नव्हत्या. भिंती बाबतच्या बऱ्याच गोष्टी बरेच जण सांगत असायचे . ती भिंत कधी बांधली गेली ....? का बांधली गेली....?  आणि कशी बांधली .....?  भिंत बांधण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले गेले ....? 
    प्रत्येक जण आपापल्या परीने भिंतीची गोष्ट सांगायचा .  पण ज्यावेळी भिंत बांधली गेली त्यावेळचा एक मंदार सोडला तर आज कोणीही जिवंत नव्हतं .  त्याला माहित होतं की भिंत का बांधली गेली होती... कशासाठी बांधली गेली होती .....कुणी बांधली होती .....कधी बांधली होती आणि भिंत पडल्यानंतर काय होईल.........?

   मंदार उत्तरेच्या सैनिक तळाकडे निघाला होता . ते सैनिक तळ चालत जाण्यासाठी फार दूर होते . त्यामुळे त्याला घोडा शोधणे भाग होते . त्याने त्याच्या पिशवीतून एक बासरी सारखी दिसणारी गोष्ट बाहेर काढली .  त्याने बासरी जोरात शिट्टी सारखी वाजवली . त्यानंतर त्याच्या आजूबाजूला बरेच प्राणी गोळा होऊ लागले . लहानातल्या लहान मुंगीपासून मोठ्या  प्राण्यापर्यंत सर्व प्राणी आले जे बासरीचा आवाज ऐकू शकत होते  . त्याच बरोबर त्या ठिकाणी तो अश्वराज पवनही आला होता .
   त्या अश्वराज पवनच्या जवळ जात , मंदारने पुन्हा एकदा शिट्टी वाजवली . बाकी सर्व प्राणी आल्या वाटेने निघून गेले . पण आज मात्र तिथेच होता....

    " मला वाटलं तुझा बळी दिला असेल कोणीतरी.....?  त्यामुळेच तू दिसला नव्हतास इतकी वर्षे.....
   " बळी जाताजाताच वाचलो ,  हाताच्या मुठीत जीव धरून पळत होतो  , तेव्हाच तुझी शिट्टी ऐकली वाटलं कोणीतरी सापडला  आपला मित्र .....
  " कोणापासून पळत होतास एवढं जीवाच्या आकांताने.....
" मंदार तुला कळालंच असेल ....प्रलयकारिकेचा चा जन्म झालेला आहे.....? अरे ती माझी जुनी मैत्रीण होती रे...... मोहिनी नावाची .....प्राण्यांच्या मनात पाहू शकणारी ,  त्यांच्याशी बोलू शकणारी , त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागूवू शकणारी..... तीच प्रलयकारिका असेल असं मला वाटलं नव्हतं...।
 " अरे बऱ्याच गोष्टी असतात अशा..... मलाही वाटलं नव्हतं की मी जिवंत असेपर्यंत कधी प्रलय येईल ....पण येत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा एकत्र व्हावे लागणार आहे.........
" तुला म्हणायचे आहे का कि भिंतीपलीकडे सम्राट जागृत झाला आहे....
" अरे भिंतीपलीकडे सम्राटाला कसेही करून आपण पराभूत करू शकतो , पण प्रलयाचं काय करणार आहे......?  सुरू होणारी जी शृंखला आहे , ती जर तोडली नाही तर आपलं वाचणं सर्वथैव अशक्य होऊन बसेल......
" त्यासाठीच मी उत्तरे कडे चाललोय , उत्तरेकडे असलेल्या सैनिक तळावरती आणि तू मला मदत करणार आहेस .....।
      मंदार अश्वराजावरती स्वार झाला व उत्तरेकडे निघाला......

      इकडे मंदारचा मुलगा शौनक , आयुष्यमान व भरतला शोधण्यासाठी फिरत होता . त्याच्या वडिलांनी रूपांतरणकापडा वरती त्याचे चित्र दिलं होतं .  तो जंगलात चालून चालून थकला होता .  त्याने त्याच्या वडिलांकडून एक शिट्टी चोरली होती .  ती शिट्टी त्याने काढली व वाजवली . एक एक करत सगळ्या प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी जमा झाले . काही क्षण थांबल्यानंतर दोन घोडेही त्या ठिकाणी आले.....

      त्या घोड्यावरती बरेच सामान लादलेले होते .  याचा अर्थ हे घोडे कोणातरी यात्रेकरूचे होते . उत्तरेच्या जंगलात सहसा यात्रेकरू नसतात आणि असलेच तर ती माणसे साधी नसतात . त्याला कळून चुकले की  ते दोन घोडे आयुष्यमान व भरतचेच होते . त्यामुळे तो पटकन एका घोड्या जवळ गेला व त्यावर ती बसला . त्याने पुन्हा शिट्टी वाजवली . आलेले सर्व प्राणी आल्या मार्गाने निघून गेले . दुसरा घोडा हे ही आलेल्या मार्गाने निघाला .  शौनक ही त्या घोड्या मागोमाग आपला घोडा दामटवत निघाला . काही अंतर गेल्यानंतर त्याला आयुष्यमान दिसला........

   जंगली सैना संसाधन राज्याच्या उत्तरेस असलेल्या जंगलात वास्तव्याला होती .  त्यांचा निश्चित ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता . आतापर्यंत कोणीही त्या जंगलात गेलेला जिवंत बाहेर आलेला नव्हता . त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा माहीत असलेला माणूस या पृथ्वीतलावरती नाही असं म्हटलं जायचं . जंगली सेनेचा संख्या फार मोठी नव्हती आणि कमीही नव्हती . चार ते पाच हजारांच्या आसपास त्यांची सैना होती .  जंगलामध्ये ते टोळ्याटोळ्यांनी राहायचे , आणि ज्यावेळी एखादं शहर किंवा गाव लुटायचं असेल त्यावेळी ते मिळून हल्ला करायचे . त्यांना जे काही हवं असायचं ते सर्व काही लुटून पुन्हा जंगलात जायचे . त्यामुळे जंगली सेनेच्याबद्दल भीती सर्वांच्या मनात होती . जंगली सेनेचे नाव ऐकल्यावर ती मोठ-मोठे राजेही घाबरायचे .  त्यांच्याकडे असलेले प्राणी आणि  योद्धे संपूर्ण जगातील महान योद्ध्यांना सहज राहू शकतील इतके शक्तिमान होते...

      जंगली सैना प्रसिद्ध होती की त्यांच्या गतीसाठी  ,  त्यांच्या व्युक्तीसाठी , त्यांच्या शक्तीसाठी आणि मुख्यत्वेकरून त्यांच्याकडे असलेल्या प्राण्यांसाठी.... ज्या कोणी जंगली सेनेच्या प्राण्यांना पाहिले तो माणूस एकतर जिवंत राहत नसे आणि जर एखादा जिवंत राहिला तर लोक त्याला वेड्यात काढत .  त्यांच्या प्राण्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या सर्व ऐकिव होत्या . कुणी म्हणायचं त्यांच्याकडे फार मोठे हत्ती सारखे प्राणी आहेत जे हरणाच्या गतीने धावू शकतात , कुणी म्हणायचं त्यांच्याकडे लहान मुंग्यासारखे प्राणी आहेत ज्यांच्याकडे हत्ती एवढी शक्ती आहे . कोणीही काही म्हणायचं पण कोणालाच त्यांच्याकडे खरंच काय आहे हे माहीत नव्हतं .

       आरुषी व मोहिनी आता त्यांच्यच शोधात निघाले होते ......

Wednesday 3 April 2019

प्रलय-१३

प्रलय-१३

      मोहिनी त्या गरुडावरती बसून हवेत उंच उडत होती .  वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच तिचे केसही हवेत उडत होते .  ती कुठे चालली होती .....? तिलाही माहित नव्हतं .  तिची संवेदना जणू नष्ट झाली होती .  पूर्वीची मोहिनी आता राहिली नव्हती .  जणू तिचा नुकताच जन्म झाला होता .  बऱ्याच नवीन गोष्टी तिला आठवत होत्या . ज्या गोष्टी तिने कधीच अनुभवल्या नव्हत्या ,  त्या गोष्टी तिला आठवत होत्या.  आठवणी नव्याने लिहिल्या जात होत्या .
   कोऱ्या पुसलेल्या पाटीवरती कोणीतरी अक्षरे लिहावीत त्या प्रमाणे तिच्या संपूर्ण  रिकाम्या झालेल्या मेंदू वरती आठवणीच्या आठवणी कोरल्या जात होत्या . तिला काहीच माहित नव्हते ,  पण आता सारं काही अचानक तिच्या डोक्यात घुसत होतं . तिला हव्या असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तिने गरुडाला हाक दिली .

     उंचच्या उंच डोंगरावरती काळ्या दगडाने बनलेली एक कपारी दिसत होत्या .  एके ठिकाणी आत गुहा होती .  त्या गुहेच्या समोरच्या बाजूला गरुड थांबवत त्यावरून ती खाली उतरली . त्या गुहेच्या आत संपूर्ण अंधार होता . त्या अंधारात कुठेतरी एक छोटीशी मशाल चमकली . मोहिनी निघाली , त्या मशालीच्या दिशेने.....

काही पाऊले अंधारात चालल्यानंतर तिचे डोळे अंधाराला सरावले . अंधारातच एक पायवाट सापडली व त्या पायवाटेने काही अंतर गेल्यावरती मशालींचा लख्ख उजेड पसरला होता . त्या मशालींच्या उजेडात बरेच लोक जमले होते.  ते सर्व लोक जणू तिचीच वाट पाहत त्या ठिकाणी उभे होते . त्या सर्व लोकांच्या समोर असलेल्या उंचवट्यावरती उभी होती . ती आत गेल्याबरोबर सर्वांनी एकच जल्लोष करत आरडाओरडा सुरू केला .

ती काहीच न कळल्याने त्याच ठिकाणी उभी राहिली . नंतर तिच्या बाजूने , एक तिच्या सारखी  मुलगी आली .  तिच्याच वयाची असावी . ती आरूषी होती . तिने सर्वांना शांत करत बोलायला सुरुवात केली.....

" आता आपल्या सर्वांच्या समोर उभी आहे ती म्हणजे प्रलयकारिका . आपल्या सर्वांना युद्धात मदत करून ,  पुन्हा एकदा पृथ्वीतलावरती आपली सत्ता आणण्यासाठी ,  मारूतांची सत्ता आणण्यासाठी , ती आपली मदत करणार आहे......
प्रलयकारिकेची मदत घेऊन आपण सर्वप्रथम जंगली सेनेवरती आपले स्वामित्व प्रस्थापित करणार आहोत .  त्यानंतर जंगली सेना घेऊन आपण एकापाठोपाठ एक  राज्य जिंकत जाणार आहोत . ज्या ज्या लोकांनी वरती अन्याय अत्याचार केला त्या लोकांना आता हा प्रलय झेलावा लागणार आहे ........

दूर कुठे तरी .  तोच भिकारी पुन्हा एकदा तारस्वरात त्याचं गाण्याची आवर्तने करत होता . तो म्हणत होता....।

    जन्म तिचा झाला आहे
      प्रलय काळ आला आहे
      मृत्यू आता तांडव करेल
     गिधाडांसाठी मेजवानी उडेल
     खरेखोटे सारे मरतील
    हवेचे राजे फक्त उरतील.......


     जलधि राज्याची सेना अजून त्याच ठिकाणी होती . संपूर्ण दिवसभर ते त्याच ठिकाणी थांबले होते . भिंती अलीकडे जलधि राज्याची सेना व भिंती पलीकडे त्रिशूळाची . त्रिशुळांची सेना दिवसभर आरोळ्या मारत होती , पण जसा सूर्यास्त झाला तसं त्या आरोळ्या बंद झाल्या . भिंतीपलीकडे कोणी आहे की नाही असा शुकशुकाट पसरला . ती सेना तिथेच होती , मात्र कोणावरही आक्रमण करत नव्हती . त्यामुळे जलधि राज्याची सेना संदिग्ध अवस्थेत होती .  महाराज कैरव व बाकी युद्धकुशल नेते पुढे काय कृती करावी यावर ती चर्चा करत होते . चर्चे अंतिम एक गोष्ट निष्पन्न झाली .  ती म्हणजे ज्या अर्थी त्रिशूळांची सैना आक्रमण करत नव्हती ,  त्याअर्थी भिंती अलीकडे येऊ शकत नव्हती . याचा अर्थ ते त्या सैन्यावर आक्रमण करू शकत होते बदल्यात ती  त्रिशुळांची सैना काहीही करणार नव्हती.....

  याचा अर्थ भिंत पडेपर्यंत ते सर्व सुरक्षित होते .  भिंत पडल्यानंतर पलीकडे असलेली विराट सैना आक्रमण करणार होती . त्यामुळे भिंत पाडायला तर थांबवायलाच हवी होती . त्या बरोबरच कसेही करून ती सैना नष्ट करायला हवी होती . महाराजांनी एक दहा हजारी तुकडी महाराज विश्वकर्मा यांच्या मागे पाठवली ,  जेणेकरून त्यांना महाराज विक्रमांना थांबवायला सोपे जावे . बाकी दहा हजारांची तुकडी घेऊन ते त्या त्रिशूळांच्या सैन्याविरुद्ध लढणार होते .

     सर्व सैनिक भिंतीवरती चढून धनुष्यबाण घेऊन उभारले . ज्या काही तोफा होत्या त्याही भिंतीवरती चढवल्या . मोठे दगडी गोळे टाकायची यंत्रे भिंती अलीकडे उभा होती . त्यावर ती खनिज तेल टाकून तीही तयार करण्यात आली .  जलदी राज्याकडे दारूगोळा विपुल प्रमाणात होता . सर्व तोफांमध्ये गोळे भरण्यात आले . भिंतीपलीकडे जरी विराट सेना असली तरी भिंत असेपर्यंत अलीकडील सैनिकांना काहीच धोका नव्हता . कारण आतापर्यंत तरी परिस्थिती तशीच राहिली होती.......

       मोहिनी व त्या लहान मुलघबाबत झालेल्या गोष्टीवरती विचार करत आयुष्यमान व भरत उत्तरेच्या जंगलात फिरत होते .  त्यांना कसेही करून लवकरात लवकर दक्षिणेकडे पोहोचायला हवं होतं . महाराज विक्रमांच्या आदेशाला कसंही करून थांबवायला हवं होतं .  जरी त्यांनी बिया टाकून पुढची व्यवस्था केली असली , तरीही काळी भिंत पाडण्यापासून महाराज विक्रमांना थांबवायलाच हवं होतं . त्यासाठी दक्षिणेकडे निघाले होते . मात्र राहून राहून त्या लहान मुलीचा विचार आयुष्यमान च्या डोक्यात होता . ती लहान मुलगी नक्की हवेत कशामुळे उडाली ....? तिच्यासोबत इतका क्रूर प्रकार का झाला असावा......?  या सर्व गोष्टींचं त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा स्पष्टीकरण नव्हतं .....? एका लहान व निष्पाप मुलवरती दैवाने इतके अन्याय अत्याचार का करावेत.....?  याचा त्याला मनस्ताप होत होता . त्याच्यासमोर एक लहान मुलीचा जीव गेला होता व त्याची प्रेयसी मोहिनी गरुडावर बसून दूर कुठेतरी निघून गेली होती . मोहिनी स्वतःहून त्याच्यापासून दूर जाणार नाही ,  याची त्याला खात्री होती ....मग ती दूर का गेले हा प्रश्न त्याला छळत होता . तो आतून चिडला होता .  त्याला खूप राग आला होता .....?  जे काही होतं , ज्याने कोणी त्याला मोहिनीपासून दूर केलं होतं व ज्याने कोणी त्या लहान मुलीचा जीव घेतला होता ; त्याला आयुष्यमान आता सोडणार नव्हता ......! तो आतून होरपळत होता...... प्रतिशोधाची ज्वाला त्याच्या अंतरात जळत होती.........

    त्या दृश्यरूपांतरण कापडावरती शौनक ने त्याच्या वडिलांना जे काही दाखवलं , त्याच्यामुळे त्या तंत्रज्ञाची झोप उडाली . भिंत पडल्यामुळे शृंखला सुरू होणार होती . त्या शृंखलेचा शेवट प्रलयाने होणार होता .  जरी शृंखला थांबवली नाही तर प्रलय काळाला सुरूवात होणार होती . जर भिंत पाडायचे थांबवले नाही तर पृथ्वीतलावरील सर्व जीवन धोक्यात येणार होते .  पृथ्वीतल पूर्वी हे बऱ्याच वेळा भिंती पलीकडील सम्राटाच्या छत्रछायेखाली आले होते आणि पुन्हा त्याच्या छत्रछायेखालून बाजूला होत त्याला भिंतीपलीकडे ही डांबले होते . पण  प्रलय हा भिंतीपलीकडील सम्राटाहूनही क्रूर होता .  तो प्रलय होता आणि प्रलय कुणाची कदर करणार नव्हता......

          आणि तो शोनकचा वडील असलेला तंत्रज्ञ हा साधासुधा नव्हता .  कैक पिढ्यांपासून त्यांने ही कला जोपासली होती . त्याचं आयुष्य आता पृथ्वीतलावरती असलेल्या कोणत्याही व्यक्ती पेक्षा मोठं होतं . सर्वात अनुभवी असलेला असा तो तंत्रज्ञ होता. त्याने त्याच्या आयुष्यात बऱ्याच युगाची सुरुवात बऱ्याच युगाचा अंत पाहिला होता आणि तोही या प्रलय काळाला पाहून अंतरातून घाबरला होता . भितीने त्याला भक्ष्य केले होते....

        त्या तंत्रज्ञाने आपल्याबरोबर बऱ्याच गोष्टी घेतल्या व उत्तरेच्या जंगलात असलेल्या सैनिकी तळाकडे निघाला . हेच ते सैनिकी तळ होते ज्या सैनिकी तळाकडे भिल्लव  सार्थक व त्याचे साथीदार आणि अधिरथ , अद्वैत , सरोज आणि त्यांचे साथीदार निघाले होते .  त्या तंत्रज्ञाचे हे छोटासे खोपटेही उत्तरेच्या जंगलातच होतं  . त्यातच तो तंत्रज्ञ व त्याचा मुलगा राहत होते.  तंत्रज्ञाला बऱ्याच गोष्टी अवगत होत्या . त्याने त्याला माहीत असलेल्या विज्ञानाच्या व तंत्राच्या साह्याने बऱ्याच गोष्टी माहीत करून घेतल्या .  व फटाफट निर्णय घेतले . तो स्वतः उत्तरेच्या जंगलात असलेल्या सैनिकी तळावर जाणार होता ,  आणि त्याने त्याच्या मुलाला त्याच जंगलात फिरत असलेल्या वारसदाराच्या सभेच्या प्रमुखाला शोधून त्या सैनिक तळावर आणण्याचा आदेश दिला........

Tuesday 2 April 2019

प्रलय-१२

प्रलय-१२

    ज्यावेळी भिंत बांधली नव्हती आणि भिंतीपलीकडील सम्राट जागृत झाला होता .  त्यावेळी त्याने तीन प्रकारच्या सैना बनवल्या होत्या . एक म्हणजे त्रिशूळाची सेना दुसरी म्हणजे तलवारीची सेना व तिसरी म्हणजे धनुष्यबाणाची सेना...... त्यावेळी भिंतीपलीकडे जे काही लोक होते ते , त्या सर्वांना त्यांने सैनिक बनवून पृथ्वीतलावरील प्रत्येक राज्य जिंकायला पाठवलं होतं . प्रत्येक सैन्यात जरी सामान्य लोक  असले तरी त्यांच्याकडे असणारी हत्यारे म्हणजेच ,  तलवार सैन्यात असलेल्या तलवारी , धनुष्यबाण सैन्यात असलेले धनुष्यबाण व त्रिशूळ सैन्यात असलेले त्रिशूळ हे चमत्कारिक होते.....

      त्रिशूळ सैन्याकडे असलेला त्रिशूळ जर एखाद्या व्यक्तीला , प्राण्याला किंवा सजीवला मारला असता त्या व्यक्तीचे अथवा सजीवाचे जागेला मातीत रूपांतरण व्हायचे . त्रिशुळाच्या  बळावर त्रिशूळ सैना संपूर्ण विश्व पादाक्रांत करत भिंतीपलीकडील सम्राटाच्या छत्रछायेखाली आणत होती . मात्र त्यावेळी असलेल्या जलधि राज्याच्या महाराजांनी त्या संपूर्ण सेनेला एकट्याने हरवलं होतं असं म्हणतात . त्रिशुळ सैन्याच्या शेवटच्या युद्धाबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध होत्या . त्रिशुळाच्या सैन्याची मुख्य शक्ती त्रिशूळ होता व त्रिशूळ हे कोणत्याही सजीव गोष्टीचं रूपांतर मातीत करत असायचा .  त्यामुळे त्याविरुद्ध लढण्यासाठी जलधिच्या त्यावेळच्या महाराजांनी पाण्याची मदत घेतली . असं म्हणतात त्यावेळचे कैरव महाराज पाण्याला स्वतःच्या बळावर ती नियंत्रित करु शकायचे .  त्यांनी  समुद्रातले पाणी आणून संपूर्ण त्रिशूळ सैना त्याखाली बुडवून मारली . मात्र ती सेना शापित असल्यामुळे मुक्त न होता त्याच  भागावरती भटकत राहू लागली . ती सैना तो भूभाग सोडून दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्यानंतर ती काळी भिंत बांधली गेली .  पण काळी भिंत  त्रिशूळांच्या सैन्याला कधीच अडवू शकली नाही .

    .अशा वेगवेगळ्या दंतकथा जरी सांगितल्या जात असल्या तरी खरं काय आणि खोटं काय हे कुणालाच माहीत नव्हतं .  समोरून त्रिशूळाच्या सैन्याची आरोळी ऐकू येत होती हे मात्र खरं .  इतक्या वर्षात भिंतीपलीकडे एकही  सैनिक दिसला नव्हता तरीही आता त्यांची आरोळी कशी काय ऐकू येत होती हाच मोठा प्रश्न होता .  त्रिशूळांची सैना पुन्हा जागृत करू शकेल असं या पृथ्वीतलावर कोणीही जिवंत नव्हतं .  याचा अर्थ एकच होता ,भिंतीपलीकडचा सम्राट पुन्हा जागृत झाला होता........

    त्रिशूळांच्या सेनेबरोबर लढण्याचा कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडे अनुभव नव्हता .  गोष्टीतल्या प्रमाणे लढायचं म्हटलं तरीही गोष्टीतही वेगवेगळे प्रकार सांगितले होते . त्यामुळे त्यांच्याकडे आता कोणताच उपाय नव्हता....

    एवढे सगळे होऊनही जलधि राज्याचा एकही सैनिक घाबरला नव्हता .  प्रत्येक सैनिक लढाईच्या तयारीत उभा होता . कोणत्याही क्षणी भिंत पार करून त्रिशूळांची सेना अलीकडे येऊ शकत होती . प्रत्येक जण आपापल्या जागा घेऊन लढण्यासाठी उभे राहिले .  ती वीस हजाराची सेना त्रिशूळाच्या सैन्या विरुद्ध लढण्यासाठी आता तयार होती...........

      ते सैनिक बराच वेळ त्या ठिकाणी थांबले .  पलीकडे  त्रिशूळांचे सैन्य होते .  फक्त आरोळ्यांचा आवाज ऐकू येत होता .   कोशिकाने भिंतीवरती चढून पाहिले .   पलीकडे जिवंत लोकांची मोठीच्या मोठी फोज दिसत होती . प्रत्येकाच्या हातात त्रिशूळ होता आणि सर्व विचित्र आवाजात आरोळ्या देत होते .  भिंतीपासून काही पावलांच्या अंतरावर सर्वजण थांबले होते व  मोठमोठ्या विचित्र आवाजात ओरडत होते  . जणू काही ते कुणाच्या तरी आदेशाची वाट बघत होते .  उत्तरेकडून दक्षिणेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे जितक्या दूर नजर जावी तितक्या दूर ती त्रिशूळांची सैना दिसत होती .......

" बाबा , तुम्हाला माहित आहे ना.... त्या विक्रमाने काळी भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे ती......
" अरे शौनक तुला किती वेळा सांगू असल्या राजकारणाच्या फंदात पडत जाऊ नकोस ......आपण भलं आणि आपलं काम भलं .....तसेही लोक आपल्याला घाबरतात .  चेटूक करतो म्हणून तर आपल्या गावा बाहेर काढलय....।
" बाबा पण आपण समाजात राहतो आपली जबाबदारी आहे की नाही......
" अरे बाबा अजून तुला जग समजत नाही .  जगातील राजकारण समजत नाही , नाही पडणार ती भिंत .मी शपथेवर  सांगायला तयार आहे
" बाबा मी पाहिलं भिंत पडताना , निळ्या गोलात ....
" तुला कितीवेळा सांगितलं शौनक ,  माझ्या कोणत्याही गोष्टीला न विचारता हात लावत जाऊ नकोस....
"  पण बाबा मी हात नाही लावला.....
" मग.....
" गोलावरील कापड जळाले आणि गोलाचा रंग बदलला आहे . अर्धा लाल आणि काळा झाला आहे . ज्यावेळी ते कापड जळत होतं त्यावेळी मी त्या ठिकाणी होतो.  ते जाळणारं कापड बाजूला सारलं ,  त्यावेळी त्या गोला मध्ये फार भयानक गोष्टी दिसल्या ,  म्हणून मी त्यावरती दृश्य रूपांतर कापड  टाकलं ......
हे बघा त्या दृश्य रूपांतर कापडावरती काय काय दिसतंय......?
    असं म्हणत त्याने ते कापड दाखवलं .  आणि त्या कापडावर जे काही दिसलं त्याने कोणाच्याही अंगावर काटा आला असता.......

   आयुष्यमान व भरत या दोघांचे अश्व अश्वराज पवन यांच्या पेक्षा फार धीम्या गतीने चालत होते . अश्वराज पवन यांची गती फार  होती .  त्यामुळे अश्वराज पवन व मोहिनी नेहमी पुढे असायचे . भरत आणि आयुष्यमान मागुन जायचे . अश्वराज पवन हा त्यांच्या जमातीचा एकच होता . पृथ्वीतलावरती त्याच्या सारखा तो एकच होता . कमरेपर्यंत मनुष्याचे शरीर व तिथून पुढे संपूर्ण घोड्याचं शरीर असा तो अश्वराज पवन होता . त्याला मानवी भाषांचे ज्ञान होतं . तो माणसासारखा बोलू शकत होता .  माणसासारखं विचार करू शकत होता .  तो चांगली करमणूकही होता . त्याला विविध गाणी येत होती .  तो पळत पळत  गाणीही म्हणायचा . त्यामुळे आयुष्यमान भारत व मोहिनी यांचा वेळ जात होता .  ते भराभर एका खड्ड्या मागोमाग दुसऱ्या खड्याकडे जात होते व प्रत्येक ठिकाणी बी टाकत होते . मोहिनीच्या बरोबर ती लहान मुलगीही होती . मोहिनीने  मोहिनी करून त्यांना  अंतःप्रेरणेने धावण्याची प्रेरणा दिली . त्यामुळे त्यांची यात्रा फार गतीने चालली होती .  आता काहीच खड्डे शिल्लक राहिले होते . ते उत्तरेकडे आले होते ,  ज्या ठिकाणी ती भिंत संपत होती .



      ज्यावेळी आयुष्यमाननज शेवटच्या खड्ड्यात बी टाकला त्यावेळी सोसाट्याचा वारा सुटु लागला .  मोहिनीच्या मागे बांधलेल्या झोळीत जी लहान मुलगी होती ती हवेत उडाली .  तिच्या शरीराचे तुकडे झाले .  निम्मा भाग भिंती पलीकडे  पडला तर निम्मख भाग भिंती अलीकडे पडला . आकाशात चित्र-विचित्र रंगाचे ढग जमले . ढगांचा गडगडाट वाढू लागला .  विजा चमकू लागल्या ....थोडा थोडा धरणीकंप जाणवत होता . काही काळानंतर आकाशातील वेगवेगळ्या रंगाचे ढग जाऊन त्या ठिकाणी फक्त दोनच रंगाचे ढग उरले .  भिंतीकडच्या बाजुला काळ्या रंगाचे व भिंती अलीकडे लाल रंगाचे ढग . संपूर्ण आकाश लाल व काळ्या रंगात विभागले होता .  विजांचा कडकडाट थांबला होता .  सोसाट्याचा वारा अजूनही चालू होता . धरणीकंप थांबला होता .
      आयुष्यमानला एक गोष्ट जाणवली . मोहिनी आणि अश्वराज आता त्या ठिकाणी नव्हते .  अश्वराज जंगलात पळून गेला होता . हवेतून एक मोठा गरुड खाली आला   होता . मोहिनी त्यावर  आरूढ झाली व गरुड पुन्हा हवेत उडाला आयुष्यमान व भरत ते दृश्य पाहतच राहिले......

       तो गरुड उंच उडून दक्षिणेकडे निघाला .

      जन्म तिचा झाला आहे
      प्रलय काळ आला आहे
      मृत्यू आता तांडव करेल
     गिधाडांसाठी मेजवानी उडेल
     खरेखोटे सारे मरतील
    हवेचे राजे फक्त उरतील.......

   तो भिकारी हे गाणं मोठमोठ्या आवाजात ओरडत घरासमोरून फिरत होता . एकापाठोपाठ एक आवर्तने करत होता  . त्याचा तारस्वर ऐकून कोणीही त्याला भीक देत नव्हतं . शेवटी तो एका तळ्याकाठी गेला  . अगोदरच ज्या काही शिळ्या भाकऱ्या होत्या .  त्या काढल्या व   पाण्यात बुडवून खाऊ लागला .....

      आयुष्यमान व भरत दोघांनी ही त्या अश्वराज पवनच्या मागे घोडे पळवले  .  तो अश्वराज जंगलात जाऊन लपून बसला होता . तो घाबरल्यासारखा वाटत होता . तो सहजासहजी कोणालाही दिसला नसता ,  पण आयुष्यमानची नजर तीक्ष्ण होती .  त्याच्या तीक्ष्ण नजरेने त्याचे लपणे टिपले . आयुष्यमान जर सरळ सरळ जाऊन त्याला बोलला असता तर त्याने त्याचे ऐकले नसते . त्यामुळे आयुष्यामानने पहिल्यांदा दावे काढले   . त्याला गाठ मारत त्याने ते दावे नकळत त्याच्या पायाभोवती फेकले व जोरात ओढून त्याचे दोन्ही पाय एकमेकात गुंतवून बांधून टाकले ......
    त्याने ओरडत सुटायचा प्रयत्न केला ,  पण तो निष्फळ ठरला .  त्याने हातात लाकूड उचलून त्यांच्या अंगावरती फेकायला सुरुवात केली . बराच वेळ त्याचा हा कालवा चालला होता . शेवटी त्याला शांत करत बोलण्याच्या स्थितीत आणत  आयुष्यमान त्याच्याशी बोलू लागला .....

    " मोहिनीला काय झालं ......? अश्वराज पवन ती कुठे गेले ......? तुला काही जाणवलं का.....?
    " ती मोहिनी नव्हती . ज्यावेळी ते लहान मूल हवेत उडाले , मोहिनी त्यावेळीच गेली .  त्यामुळे तर घाबरून मी जंगलाकडे पळालो .   ती मोहिनी नव्हती . तिचे विचार फारच हिंस्त्र होते .......

    " पण हे सर्व कशामुळे झाला.....?  कसं झालं.....?

" मला काही माहित नाही......!  मला जाऊद्या..... सर्वजण माझ्या मृत्यूवरती टपलेले आहेत . मला जाऊ द्या..... मला सोडा , मला अजून जगायचे आहे ......
त्या अश्वराजाने पुन्हा एकदा सुटायची धडपड केली .  यावेळी तो यशस्वी झाला व चौखूर उधळत तो दिसेनासा झाला .....

Monday 1 April 2019

प्रलय-११

 प्रलय-११


       कितीतरी शतके अगोदर , काळी भिंत सुद्धा बांधण्याच्या अगोदर , संपूर्ण पृथ्वीवरती फक्त एकच राजा राज्य करत होता . संपूर्ण पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली सुखाने नांदत होती .  पृथ्वीवरचा तो पहिला राजा होता ज्या राजानं देवाच्या आशीर्वादाने संपूर्ण पृथ्वीवरती आपले आधिपत्य आणून सगळीकडे सुख शांती व समृद्धी पसरवली होती....

       असं म्हणतात राजा साक्षात ईश्वर होता आणि राणी साक्षात देवी .  त्या राणीकडून राजाला तिळं झालं . एकाच वेळी  तीन राजपुत्र राजमहालात रांगू लागले .
एकाचं नाव होतं कैरव , दुसऱ्याचं सोचिकेशा आणि तिसऱ्याच मारुत .तिन्ही राजपुत्र एकत्र शिकू लागले .  सर्व काही समजून घेऊ लागले ,  युद्ध कलेपासून नीतिशास्त्र पर्यंत सर्व काही त्यांना शिकवले जात होतं . तिन्ही राजपुत्र एकमेकांना वरचढ होते..... अशी वेळ आली की  तिन्ही राजपुत्रांनी पृथ्वीतलावरच्या असलेल्या सर्व प्रकारच्या युद्धकला निपुण केल्या .  नीतिशास्त्राचे धडे त्यांना मुखोद्गत झाले .  आता वेळ होती त्यांच्या विवाहाची त्यांच्यासाठी सर्वत्र राण्यांचा शोध सुरू झाला ज्याला त्याला योग्य ती राणी सापडली व तिघांचाही एकाच वेळी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला . असं म्हणतात ज्यावेळी  तीन राजांचा विवाह सोहळा होता ,  त्यावेळी संपूर्ण पृथ्वीतलास पुरेल इतकं इतकं अन्न त्याठिकाणी बनलं होतं....

        पण जेव्हा राजा वृद्ध होऊ लागला त्यावेळी वारसदार निवडायची वेळ आली .  तेव्हा इतक्या दिवस गुण्यागोविंदाने राहणाऱ्या या तीन राजपुतांमध्ये वादावादी होते की काय असे साऱ्यांना वाटत होतं . पण त्या वृद्ध राजाने आपल्या राज्याचे तीन विभाग करून तीन राजपुत्रांना त्यांचे त्यांचे राज्य सोपवले व उत्तरे च्या जंगलात निघून गेला.......

तेव्हापासून या पृथ्वीला त्रिखंडी पृथ्वी असं म्हणायचा प्रघात पडला . एका खंडावर मारुत राज्यांचं मारुती हे राज्य दुसऱ्या खंडावर ती सोचिकेशा राजांचं अग्नेय हे राज्य आणि तिसरं कैरवांच जलधि हे राज्य......

   पुढची कैक शतके या तीन राजांच्या पिढ्यान् पिढ्याया संपूर्ण पृथ्वीतलावर , त्रिखंडी पृथ्वीवरती राज्य करत होत्या. मात्र जशा पिढ्या पुढे सरकत होत्या तसे राजे अधिक अधिक विलासि बनत गेले . ते नेहमी राजमहालात असायचे , बाहेर निघाले तर फक्त शिकारीला किंवा पर्यटनासाठी निघायचे . त्यांना प्रजेची मुळीच चिंता नसायची . आपल्या  ऐषो-आरामासाठी प्रजेची पिळवणूक करायलाही मागे-पुढे बघायचे नाहीत .  त्यामुळे राज्यातील प्रजा या राजांच्या विरोधात उभी राहू लागली .  याला अपवाद होता तो म्हणजे जलधि राज्याचे कैरव राजे ,  त्यांनी कधीच प्रजेला उघडे पडू दिले नाही .  दुष्काळ असो वा सुकाळ असो ,  वर्षा होवो अथवा न होवो त्यांनी नेहमी प्रजेची काळजी घेतली . त्यामुळे जलधि राज्याने सुख-समृद्धी च्या सर्व रेखा पार केल्या .  उलट मारुत व अग्नेय राज्यांमध्ये गरिबी , भुक , बेरोजगारी ,  यासारख्या अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या .  जनता संतापली होती . त्यामुळे वेळोवेळी जनतेतून उठाव होऊ लागले .

   नेहमी चालणाऱ्या अशा उठावातून मारुत व अग्नेय राज्यातून फुटून , छोटी-छोटी राज्य बनू लागली  . मारूत व अग्नेय राज्यांचे विघटन झाले व त्यातून अनेक राज्य बनली पण जेव्हा विघटन झाले त्याच वेळी मारुत व अग्नेय या वंशांचाही निर्वंश झाला  . क्रांतिकारी गटांनी सर्व राजवंशी लोकांना शोधून शोधून मारले .  तेच क्रांतिकारी गट नवीन राजे झाले व पुढे त्यांच्याच पिढ्यानपिढ्या त्या राजसत्ता उपभोगू लागल्या.....

       पण या साऱ्यातून मारुत राजाचे काही वंशज जिवंत होते .  त्यांनी पृथ्वीतलावर असलेल्या एका गुप्त ठिकाणी आसरा घेतला होता . कित्येक पिढ्या ते त्याच ठिकाणी लपून होते . त्यांनी जगाला आपल्या अस्तित्वाची चाहूल लागू दिली नव्हती . मात्र त्यांना जगाच्या अस्तित्वाची चाहूल होती .  त्यांच्या मनात संपूर्ण जगाची सत्ता घ्यायची महत्त्वाकांक्षा होती . अजूनही ते सत्तेसाठी सत्ताकारण करायला विसरले नव्हते . नवीन जन्मलेल्या मारुताला सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवल्या जात होत्या . सर्व प्रकारची शस्त्रांची शिकवणी त्याला दिली जात  होती . मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण युद्धकलेत निपुण होता . 

     मारूत परिवारांचा एक छोटंसं गाव वसलेलं होतं .  त्या गावाचा सर्व कारभार अकरावा मारुत राजा पाहत होता . सध्या तो अंथरुणाला खिळून होता . पुढचा वारस निवडून त्याच्याकडे सर्व सूत्रे  द्यायची ती वेळ होती . राजाच्या शेजारी त्याचे सर्व पुत्र बसले होते . आजूबाजूला प्रमुख लोक उभे होते . एका बाजूला पत्नी व मुलगी आरूषी  उभी होती. लहान आवाजात थांबत थांबत राजा बोलत होता....
" हीच ती वेळ आहे . मूर्ख विक्रमाने भिंत पाडण्याची आज्ञा दिली आहे .  मातीतल्या लोकांनी संसाधन राज्ये ताब्यात घेतली आहेत . भिंत पडल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजेल . हीच ती वेळ आहे . पुन्हा पृथ्वीवरती मारूतांची सत्ता प्रस्थापित करण्याची . आपल्या पूर्वजांचा प्रतिशोध घेण्याची  .  "
आरुषीला जवळ बोलून तिचा हात हातात घेत राजा म्हणाला
" आरुषी तू आता सर्व मारूतांचे नेतृत्व करशील .  आपल्या पूर्वजांचा प्रतिशोध घेशील . आपल्या पूर्वजांना ज्यांनी मारले , आपल्या राजस्त्रियांचा ज्यांनी बलात्कार केला ,  आपल्या लहान मुलांच्या ज्यांनी कत्तली केल्या त्या सर्वांच्या वंशजांना   नरकयातना देऊन मृत्यू दारी पोहोचवायचं आहे तुला...... त्या सर्वांच्या पिढ्यांचा निर्वंश तुला करायचा आहे .   आणि आपले बंधू राजे कैरव यांनाही सोडू नकोस . ज्यावेळी आपला निर्वंश होत  होता त्यावेळी षंढासारखे हे गप्प बसले . त्यांचाही प्रतिशोध घ्यायचा आहे तुला...... त्या सार्‍या लोकांना  नरकयातना द्यायच्या , जे लोक एकेकाळी मारुताच्या निर्वंशसाठी  , अपमानासाठी कारणीभूत ठरले.......

   आणि आरुषीच्या हातात हात असताना अकराव्या मारुत महाराज यांनी प्राण सोडले आता आरुषी ही बारावी मारुत महाराणी होती. तिच्या नजरेतून जणू ज्वाला निघत होत्या . प्रतिशोध हेच तिच्या जन्माचं उद्दिष्ट होतं आणि आता ती मारूतांची महाराणी झाली होती........

           महाराज विक्रम त्यांच्या फौजफाट्यासह काळा विहिरीपाशी पोहोचले . काळी विहीर कित्येक शतके त्या ठिकाणी होती . असं म्हणतात जर खरा सैनिक मृत्यू दारी असेल व त्यांनं जर का विहिरीचे पाणी प्यायला तर तो मरणाच्या दारातून सुद्धा परत येऊ शकतो . अशा काळ्या विहिरीपाशी दहा हजारांचा फौजफाटा घेऊन महाराज विक्रम उभे होते .  सर्व सैनिकांच्या पुढं एकच उद्दिष्ट होतं .  ते म्हणजे तिथून काही कोसावर ते असलेली काळी भिंत पाडायची . काळी भिंत पडल्यानंतर पलीकडे जाऊन  देशद्रोह यांच्या अड्ड्यावर छापा मारून देशद्रोह्यांना कंठस्नान घालायचं.......

     महाराज विक्रम सैनिकांसमोर उभे होते . सैनिका समोर उभा राहून ते भाषण करत होते . त्यांचा आवाज वाढवण्यासाठी त्यांनी समोर ध्वनिवर्धक धरला होता. दहा हजारांच्या सैन्यासमोर महाराज विक्रम जोश पूर्वक मोठ्या आवाजात बोलत होते.....

"  माझे सख्खे काका व राज्याचे प्रधान हे आपल्या राज्याच्या विरोधात जाऊन देशद्रोह यांच्या टोळीला सामील झाले .  राजा बनण्याची त्यांची वासना इतकी मोठी होती की  ;  ते राज्याशी , राज्यातील जनतेची ही द्रोह करून बसले .  भिंतीपलीकडे असलेल्या देशद्रोह्यांची टोळीला त्यांनी शस्त्र साठा पुरवला .  वेळोवेळी त्यांना ते सर्व प्रकारच्या सोयीसुविधा सुविधा पुरवत आले .     पलीकडे असलेली देशद्रोह्यांची टोळी वेळोवेळी आपल्या राज्यात येते .  आपल्या राज्याला लुटते ,  आपल्या राज्यातील स्त्रियांचा बलात्कार करते , लहान मुलांना पळवून नेते .  या सर्व गोष्टी साठी कारणीभूत आहे ती म्हणजे काळी भिंत . त्याआख्यायिका जाणून-बुजून पसरवले गेल्या आहेत . कारण तिकडे सर्व राज्यांना त्रास देणारी देशद्रोह्यांची टोळी असते . बरीच राज्य त्या देशद्रोह यांच्या टोळी मुळे त्रस्त आहेत पण त्या देशद्रोह यांच्या टोळीला सर्व राज्यातील काही लोक सहाय्य करतात कारण त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची असते . आत्ताच ती वेळ आहे आपल्या देशासाठी लढण्याची आत्ताच वेळ आहे आपल्या देशातील स्त्रियांच्या सन्मानासाठी लढण्याची , आत्ताच वेळ आहे स्वतःच्या संरक्षणासाठी आक्रमण  करण्याची..... रक्षक राज्यांनी नेहमी रक्षण केलेला आहे .  पण आता रक्षक राजे आक्रमण करतील आणि ज्यावेळी रक्षक आक्रमण करतात त्यावेळी साक्षात मृत्यू ही घाबरतो......
तुम्ही सर्वजण तयार आहात ना मृत्यूला घाबरवायला..... रक्षण करणं आता बास झालं आता वेळ आहे आक्रमण करण्याची..... काळ्या भिंतीकडे .....
असं म्हणून महाराजांनी घोषणा दिली .  त्यांच्या पाठोपाठ सर्वजन ओरडले " काळ्या भिंतीकडे ....
 महाराज विक्रमांच्या जयघोषात सर्व सैनिक भिंतीकडे रवाना झाले.......

       आयुष्यमान भारत व मोहिनी या तिघांच्या समोर त्या मनुष्याने प्राण सोडला .  जाता जाता तो एकच वाक्य बोलू शकला होता
" उत्तरेला न्या , माझ्या मुलीला . उत्तरेला न्या , माझ्या मुलीला.....।

    ती छोटीशी लहान मुलगी होती .  जिला त्यांनी त्या रेड्याच्या झोळीतून काढलं होतं .  तिचे डोळे काळे कुट्ट होते . डोळ्याभोवती असलेल्या काळ्या व्रणामुळे ती फार विचित्र दिसत होती . ती मोहिनीच्या हातात होती .  आयुष्यमान म्हणाला
  " मोहिनी तू या मुलीना घेऊन माघारी जा ...आम्हाला लवकरात लवकर उत्तर कडे जात सर्व बिया टाकल्या पाहिजेत . कोणत्याही क्षणी महाराज विक्रम ती भिंत पाडू शकतात . त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला आमचं काम केलं पाहिजे....
" आयुष्यमान मी तुझ्याबरोबर येण्यासाठी इतक्या दूर आले आणि तू मला माघारी पाठव . या मुलीचा वडीलही म्हणत होता मुलीला उत्तरेकडे घेवून जा , मी या मुलीला घेऊन तुमच्याबरोबर येणार आहे....
आयुष्यमान ला मोहिनीला नकार देण्याचं जीवावर आलं  .
" पण तुझा हा घोडा फार अंतर चालू शकणार नाही .  माझ्या मते या घोड्यावर फार तर तू अजून काही कोस येऊ शकते . त्यामुळे मी तुला सांगू इच्छितो की या घोड्याबरोबर आमच्याबरोबर येणार असशील तर तू घरी माघारी गेलेलं बरं होईल , कारण काही अंतर गेल्यानंतर हा घोडा दमून जागेला बसल्याशिवाय राहणार नाही....

" असं म्हणतोस........
         असं म्हणत मोहिनीने डोळे झाकले काही क्षणात तिच्या मागे असलेला तिचा जुना घोडा चौखूर उधळत निघून गेला व जंगलातून एक विचित्र प्राणी बाहेर येताना दिसला . तू घोडाच होता पण त्याला घोड्यासारखे तोंड नव्हतं ते तोंड मानवा सारखं होतं.....

" हा माझा जुना मित्र अश्वराज पवन.......
तू स्वराज भवन लांब उड्या मारत त्यांच्यापाशी पोहोचला होता .
    "  वारसदारांचा सभा प्रमुख आयुष्यमान याला माझा नमस्कार......
तो अश्व प्रमुख पवन म्हणाला .
     आयुष्यमान आश्चर्यचकित झाला . त्यावेळी मोहिनी म्हणाली

"  अश्वराज पवन हा त्यांच्या प्रजातीचा उरलेला शेवटचा अश्व आहे .  ज्यावेळी भिंती पलीकडील सम्राटाने काळी भिंत बांधण्याचा अगोदर पृथ्वीतलावरती आक्रमण केलं होतं ,त्यावेळी अश्वराजांची संपूर्ण प्रजात नष्ट झाली होती .  पण हा तेव्हा लहान होता . त्या वेळेपासून तो या जंगलात लपून छपून राहत आहे . मी लहान असताना एकदा जंगलात गेल्यानंतर मला याची जाणीव झाली होती आणि त्यानेही माझ्यातले गुण ओळखले .  तेव्हापासून तो माझा मित्र आहे . अश्वराजांचे जीवन फार दीर्घकालीन असते .  आत्ता कुठे त्याने तारुण्यात पदार्पण केले आहे.....।

अश्वराजावरती स्वार होऊन त्या मुलीला घेउन मोहिनीही  आयुष्यमान व भरताबरोबर  उत्तरेकडे निघाली .  त्यांना आता बडबड करायला हवी होती , कारण काळी भिंत बांधण्यासाठी महाराज विक्रम सर्व सैन्य घेऊन निघाले होते....

    जलधि राज्याचे वीस हजाराची सैना रक्षक राज्याकडे निघाली होती . सैन्याच्या पहिल्या रांगेत महाराज स्वतः त्यांच्याबरोबर युवराज देवव्रत , महाराज विश्वकर्मा व राजकुमारी अन्वी ,   हेर प्रमुख कौशिक आणि जलधि राज्यातील इतर मंत्रीगण होते . 20000 घोडेस्वारांची सैना रक्षक राज्यशरती चालून निघाली होती .  त्यांचे उद्दिष्ट फक्त एकच होतं ,  ते म्हणजे महाराज विक्रमांना त्यांच्या महाराज पदावरून पदच्युत करून विश्वकर्मां रक्षक राज्याचा महाराज बनवायचं . त्यासाठी युद्ध करायला लागलं तरीही ते तयार होते . कारण काळी भिंत पाण्याची जी आज्ञा महाराज विक्रमांनी दिली होती ती युद्धापेक्षा भयंकर होती.....

     त्यांनी जलधि राज्याची सीमा त्यांनी कधीच ओलांडली होती . काळ्या भिंतीच्या समांतर ते निघाले होते . त्यांना महाराज विक्रमांची सैना काळ्या भिंतीपर्यंत जाण्याच्या अगोदर अडवायची होती .

 सर्वत्र फक्त घोड्यांच्या टापा व वाऱ्याच्या वाहण्याचा आवाज पुरून उरला होता . मात्र अचानक भिंती पलीकडून उंच उंच आवाजात चित्र-विचित्र घोषणा ऐकू येऊ लागल्या . त्या घोषणांचा आवाज इतका मोठा होता की घोडेही घाबरून खिंकाळू......

" ही तर त्रिशूळांच्या सैन्याची घोषणा आहे .....
महाराज कैरव म्हणाले.......

" काय ....... त्रिशूळांच्या सैन्याची घोषणा ........?
त्रिशूळांचे सैन्य ही एक काल्पनिक कथा आहे ना ......? "  युवराज देवव्रत महाराज कैरवांना  म्हणाले...

"  बऱ्याच गोष्टींचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही जोपर्यंत त्या गोष्टी आपल्या समोर येऊन उभा टाकत नाहीत ती स्त्री शिवरायांचे नाही जरी कल्पना असली मात्र आता ते आपल्यासमोर उभा आहे आणि आतापर्यंत जो दुसऱ्यांच्या सैन्यासमोर टाकले आहे त्याचा त्याचा नायनाट झाल्याशिवाय राहिला नाही......
महाराज कैरवांच्या चेहऱ्यावर जन्मजात भीती दिसत होती . महाराज कैरव घाबरल्याचे आतापर्यंत त्यांच्या कोणत्याच मंत्र्याने कधीच पाहिलं नव्हतं .....

" महाराज विश्वकर्मा तुम्ही सैनिकांची एक तुकडी घेऊन जा व कसेही करून महाराज विक्रमांना भिंत पडण्यापासून थांबवा .  आम्ही या त्रिशळांच्या सैन्याबरोबर काही काळ काढतो......

महाराज विश्वकर्मा काही  घोडस्वार स्वार घेऊन निघाले ..........