Saturday 28 September 2019

प्रलय-२८

प्रलय-२८

" मी म्हटलं होतं माझी गरज पडेल तुम्हाला ,  पडली की नाही......."  वेडा आबाजी म्हणजेच विश्वनाथ म्हणाला .
भेटीच्या संरक्षणासाठी वारसदारांची सभा होती             कधीकाळी वेडा आबाजी आयुष्यमान प्रमाणेच सभा प्रमुख होता . पण त्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्याला सभेतून काढून टाकलं होतं . त्याने भैरव  बरोबर हात मिळवणी केली होती . काळी भिंत पाडून देण्यासाठी.  काळी भिंत पाडण्याचा अधिकार फक्त रक्षक राज्यातील राजाला , त्याच्या सैन्याला किंवा वारसदारांच्या सभेला होता . इतर कोणीही त्या भिंतीला पडायला गेले तर त्याचा मृत्यू नक्की असायचा . म्हणूनच भैरवने (मारुतांचा पुजारी ) विक्रमा सोबत लांब पल्ल्याची चाल खेळली होती . मात्र तंत्रज्ञ मंदारच्या मुलांनी ऐनवेळी घोळ घातला होता .
त्यामुळे भैरव आणि पार्थ विश्वनाथ कडे आले होते . ज्या बियांची थैली आयुष्यमान भरत कनिष्क आणि चैतन्य उत्तर-दक्षिण टाकत गेले होते .  ती बियांची थैली वारसदारांच्या सभेतील एका अत्यंत ज्येष्ठ व जुन्या सदस्याने बनवून मोहिनी च्या घरी ठेवण्यासाठी दिली होती . त्याला म्हणे भविष्यातील काही घटना दिसायच्या . त्यामुळेच मोहिनीला सांगतानाच  सांगितलं होतं की ' एके दिवशी योध्या प्रमाणे वेश परिधान केलेल्या युवक येऊन तुला स्वतःहून त्याची मदत देऊ करेल त्यावेळी ही थैली त्याच्या हवाली करायची . पण विश्वनाथने त्यातही मध्ये भेसळ केली होती . बियांमध्ये भेसळ करून त्या बियांचा वापर करून त्याला भिंत पडता येईल अशी व्यवस्था त्याने केली होती . एकदा का त्या बीया वारसदारांच्या हस्ते योग्य जागी पडल्या ,  की भिंत पाडणं  त्याला सहज शक्य होतं .

   विश्वनाथने भैरव बरोबर करार केला होता . त्यावेळी त्यांने एक अट घातली होती . वारसदारांच्या सभेतील सर्व ज्येष्ठांना मारून टाकायचं .  साऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे तरूणांना कोणी मार्गदर्शन करणारा शिल्लक राहिला नाही . ठरल्याप्रमाणे भैरवाने सर्व जेष्ठांचा खात्मा केला .  याच मोक्याचा फायदा घेत विश्वनाथने वेडा आबाजी बनत आयुष्यमान ची गाठ घेतली .  बियांची पिशवी पश्चिमेकडील काळ्या भिंतीच्या जवळच्या गावातील एका घरांमध्ये असल्याचे सांगितले...

मग ती बियांची पिशवी शोधण्यासाठी ते चार वारसदार काळ्या भिंतीत जवळील सर्व गावांमध्ये फिरू लागले .  मात्र बियांची पिशवी मोहिनी कडे होती हे कोणालाच माहीत नव्हतं . जेव्हा आयुष्यमान स्वतःहून त्या ठिकाणी गेला व मोहिनीच्या वडिलांना मदत केली . त्यावेळी त्याला बियांची पिशवी मिळाली .  पण त्या बियांच्या पिशवीमध्ये विश्वनाथने भेसळ केली होती .

   " चल लवकर आमच्या पुढच्या योजना भिंतीच्या पडण्यावरती अवलंबून आहेत .....
    भैरव म्हणाला आणि ते तिघेही काळ्या भिंतीकडे निघाले.....

     बाटी जमातीच्या टोळ्या मारूतांच्या जुन्या महालाकडे निघाल्या होत्या . काही दिवसांच्या प्रवासानंतर त्याठिकाणी पोहचल्याही .  पण तिथे ना भैरव ( म्हणजेच  मुख्य पुजारी ) होता ना पार्थ होता .  तरीही बरेच दिवस त्या तिथेच राहिल्या .  ज्या टोळीने मारूतांची मदत केली होती ती टोळी फक्त पुरुषांची होती . ज्यांना इतर टोळ्यांमधून काही ना काही करण्यासाठी काढून टाकलं होतं .  आता तेच  इतर सर्व टोळ्यांवरती हुकूमशाही गाजवत होते  . सुरुवातीला इतर टोळ्या त्यांच्या गोड बोलण्याला फसल्या....
    " जलधि राज्याने आपल्याला आश्रय दिला आहे खरा पण आपल्याला  नागरिकांची वागणूक मिळते का...?  त्यांचे लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात....
      असाच त्यांचा युक्तिवाद असायचा . आणि ते काही प्रमाणात खरेही होतं . पण बाटी जमत पूर्णपणे जलधि राज्यांमध्ये मिसळण्यासाठी काही काळ जाणार होता हे त्यांनाही लक्षात यायला हवं होतं . पण या उग्र वादामुळे बऱ्याच टोळ्या त्यांच्या पाठोपाठ आल्या .  मात्र जुन्या महालात पोचल्यावर ती त्या टोळ्यांमध्ये विरोधाचे सूर उमटू लागले . बऱ्याच टोळ्या गुपचूप   सोडून निघून गेल्या होत्या व काही जाण्याच्या मार्गात होता .
      मात्र आता जुन्या महाला भोवती महाराज विश्वकर्मा व इतर तुकडीने घेराव टाकला होता . पण त्यांना सुरुवातीला स्वतःच्याच राज्यातील लोकांसोबत लढावे लागणार होतं . कारण महालातून टोळ्यांनी जलधि राज्यातील काही नागरिकांना अंधभक्त बनवून त्यांच्यासोबत आणलं होतं . जेव्हा त्यांचा वेढा पडला त्याच वेळी " सिरकोडा इसाड कोते " असे ओरडत भक्तांचा हल्ला झाला .  एकेक अंधभक्त चार चार सैनिकांसोबत लढत होता .

   मात्र जलधि राज्या सोबतही एक बाटी जमातीची टोळी होती . बासरी वाजवून भक्तांना शांत करण्याची कला या टोळीला अवगत होती . मग महाराज विश्वकर्मा नि तिची युक्ती वापरत जलधि राज्यातील त्या अंध भक्तांना शांत करत पकडलं....

आता मात्र महालातील टोळ्यांना समर्पण करण्यावाचून पर्याय नव्हता . तरीही त्या हरप्रकारे लढण्याचा प्रयत्न करत होत्या.  सरतेशेवटी सर्वांना पकडण्यात यश आले . त्यांना पकडून महाराज विश्वकर्मा चा ताफा जलधि  राज्याकडे निघाला.....

तंत्रज्ञ मंदार , म्हातारा मांत्रिक , आयुष्यमान व ते दोन बुटके यांचा अग्नेय राज्यातील काम झालं होतं . जाताजाता महाराजांकडे  ते भेटायला गेले...
 " महाराज तुमच्या  अतिथ्याबद्दल मनापासून धन्यवाद .  पण अजून एक विनंती आहे .....
तंत्रज्ञ मंदार त्यांना म्हणाला
    "  प्रलय  जागृत करण्यासाठी लागणारी एक गोष्ट जी तुमच्या सुरक्षेत आहे ती एकदा तपासावी म्हणतो.....

   " ठीक आहे चला माझ्याबरोबर.....  अग्नेय महाराजांबरोबर सर्व निघाले...
      अग्नेयांच्या वारसदाराविना त्या वास्तुत प्रवेश करता येत नसे .  अग्नेय महाराज पुढे उभारले त्यावेळी ते प्रवेश द्वार उघडले . अग्नेय महाराज आणि पाठोपाठ सर्वजण आत गेले .   त्या वर्तुळाकार वास्तूच्या केंद्रस्थानी वर व खाली समान अंतर ठेवून एक पेटी तरंगत होती . महाराज त्या पेटीचा इतिहास सांगत होते . पेटीच्या संरक्षणार्थ केलेल्या गोष्टी , गेलेली जीव या साऱ्या गोष्टी ऐकवीत होते .  पण प्रवेशद्वार अजूनही उघडे होते . त्या विशाल प्रवेशद्वारातून सुरुकु सहजपणे आता आला . उडत आलेल्या सुरूकुने   पेटी तोंडात पकडली . आयुष्यमान तोपर्यंत गुपचूप बाहेर जाऊन थांबला होता .  सुरुकु बाहेर येताच तो सुरुकु बरोबर उडाला . ते दोघेही पेटी घेऊन प्रलयकारिकेकडे निघाले होते

    ती पेटी चोरीला जाताच उडत्या बेटांवरती एकच गोंधळ माजला . सर्व सैनिकांना सूचना देण्यात आल्या . सुरुकु वरती नगरातील सर्व तोफा धडाडू लागल्या . पण सुरुकु हा  सुरुकुच होता . प्रत्येक तोफेचा मारा चुकवत तो पुढे जात राहिला व शेवटी  बेटावरून बाहेर पडला .  पण संपूर्ण नगरात आगीचा तांडव मागे राहिला .

" आयुष्यमान का म्हणून असं करेल ..... म्हातारा मांत्रिक म्हणाला
  " त्यावर ती नक्कीच प्रलयकारिकेचं  नियंत्रण असणार.....   महाराज म्हणाले
   " पण ते शक्य तरी आहे का ....? पुन्हा एकदा म्हातारा मांत्रिक म्हणाला
   " प्रलयकारीकेच शरीर हे मोहिनीचं आहे . ती प्राण्यांना नियंत्रण करू शकत होती . आत्मबलिदानाचा विधी झाल्यानंतर तिच्या शक्तीमध्ये नक्कीच वाढ होऊन ती माणसांनाही नियंत्रण करू शकत असणार . आपल्याला फक्त एवढेच माहिती पाहिजे की आत्मा बलिदानाच्या विधीनंतर तो तिच्यासमोर गेलाय का ......?     तंत्रज्ञ मंदार म्हणाला
  " हो गेलाय तो . तिला ठार करायला गेला होता .  त्यावेळी तो तिच्या  नियंत्रणाखाली गेला असावा . पण आता काय करायचं .....? " तो म्हातारा मंत्री काळजीच्या स्वरात म्हणाला .
   " आता प्रलय जागृत करण्यासाठी लागणारी गोष्ट तिच्या हाती लागली आहे म्हटल्यावर प्रलय केव्हाही जागृत होऊ शकतो  . एकदा का तो जागृत झाला की हळूहळू त्याची शक्ती वाढत जाणार .  एकदा तो संपूर्ण शक्तिशाली झाला की मानव संपलाच म्हणून समजायचे .  म्हणून तो संपूर्ण शक्तिशाली होण्याअगोदर तीन राजांनी एकत्र यायला हवे , अन्यथा विनाश नक्की आहे ........." तंत्रज्ञ मंदार बोलत होता

राजा अग्नेय  अग्नी कक्षात गेला .
  " घडलेली घटना अनपेक्षित होती पण अशक्य नव्हती .  प्रलयकारीकेला काहीही अशक्य नाही . तीन बहिणी काहीतरी करतीलच पण आपल्यालाही हालचाली कराव्या लागतील .  तीन राजांचे एकत्र येणे आता कधी नव्हे ते अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे  .....
     ज्वालेतून आवाज येत राहिला
      प्रलय जागृत होण्यासाठी आता फार काळ शिल्लक राहिला नव्हता .  एकदा प्रलय जागृत झाला की हळूहळू मानवाची मानवता संपणार होती नि एकदा का मानवता संपली की मानव संपणारच....

क्रमःश

प्रलय-२७

प्रलय-२७
    त्या  तीन माया होत्या . म्हटल्यातर तीन होत्या . म्हटल्यातर एक होत्या .  एक माया तीन प्रकारची किंवा तीन माया एक प्रकारच्या .  एकाच वेळी तिघींचा जन्म झाला होता . तीन बहिणी भलत्याच प्रसिद्ध होत्या . त्यांची माया कोणालाही मोहित करणारी होती  . ते सुंदर रूप .  तो महाल . महालातील प्रत्येक गोष्टीला त्यांचा मायावी स्पर्श होता .  साक्षात भगवंताला ही त्यांच्या मायेचा हेवा वाटतो असे म्हणतात . त्या तिघींचा संवाद चालला होता .
 पहिली माया
" प्रत्येक राजाकडून बीज आलेलं आवश्यक होतं प्रत्येकीने आणलंय ना....."
" हो मी मारूत राजाकडून . मारुतांचा राजा खरा प्रमुख आहे जंगली लोकांचा . एका जंगली स्त्रीचं रूप घ्यावे लागले मला . ....."  दुसरी माया
" जलधिच्या राजकुमाराची आवड आणि निवड छान आहे . साधारण मानव आहे ती , मात्र सौंदर्य अगदी ओसंडून भरलय तिच्यात . रक्षक  राज्याची राजकुमारी झाली होते मी , देवाव्रतासोबत....." तिसरी माया
" अरे फारच आनंदी दिसतेस तू..... दुसरी माया
" अरे  जुन्या आठवणी जाग्या केल्या त्याने . मला खूप आवडला तो . मी बक्षीस म्हणून त्याला घ्यावं म्हणते...." तिसरी माया
" काहीही बोलू नकोस , मुर्खासारखं.... पहिली माया
" हो हो मला माहित आहे . म्हणूनच त्याला खुश करण्यासाठी काळ्या महालातील त्रिशूळ आणून दिला .  त्याला हे सारं कळल्यावर स्वखुषीने येईल माझ्याकडे....... तिसरी माया
" आमच्या दोघीच सोड ,  तू आग्नेयेकडून जाऊन आले का नाही.... दुसरी माया
" हो माझंही काम झाले आता आपल्याकडे तिन्ही राज्यांची बिजे आहेत . आता फक्त योग्य वेळेची वाट पाहायची आहे... पहिली माया
" तंत्रज्ञ मंदार , म्हातारा मांत्रिक , आणि सुरूकुचालक आपल्याला शोधायला आलेले आहेत . त्यांना सांगायला हवा ..... दुसरी माया

   तंत्रज्ञ मंदार , तो म्हातारा मांत्रिक ,  आयुष्यमान नि ते दोन बुटके अचानक त्या मायावी महालांमध्ये बोलवले गेले . त्या तीन मायावतींनी त्यांना भेटण्यासाठी बोलवलं होतं . तो महाल काय आलिशान होता . आग्नेय राजांच्या महाला पेक्षाही त्याची भव्यता दिव्य होती .  समोर  रत्नखचित सुवर्ण मंडित आसणे होती .  त्यावर ती त्या तिघीही बसल्या होत्या .
"  प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे .  सुरुकुचालक तिला थांबवू शकला नाही आणि तुम्हा दोघांनाही ते शक्य नाही .  म्हणून तुम्ही आमच्या कडे आलात ....
   देवव्रताला त्रिशुळ ,  देणारी तिसरी माया म्हणाली...
  "  तू गप्प बस ग.....  दुसरी माया म्हणाली ....
    " तिला अजून थोडा मोठा बोलण्याचा अनुभव नाही तुमचं येण्याचं कारण आम्हाला ज्ञात आहे , तुम्हाला अजूनही काही सांगायचं आहे का .......
  " काही नाही . प्रलय  थांबवण्यासाठी आम्ही काही तुमची मदत करू शकतो का.... तंत्रज्ञ म्हणाला ...
  "  आमची पद्धत फक्त आम्हालाच माहित आहे . फक्त आम्हीच कार्यान्वित करू शकतो . तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा .  योग्य वेळ आली की आम्ही कार्यवाही करू.... पहिली माया
 आणि पुन्हा एकदा ते सारे  महला बाहेर फेकले गेले.....

जेव्हा रुद्राला काल रात्री भलताच घोळ घातला ,  त्यावेळेस त्याची अवस्था फार विचित्र झाली होती . त्याला अजूनही आठवत होतं कि ती मीराच होती , पण त्याला कळालं होतं की ती मीरा नव्हती . मीरा सारखी दिसणारी दुसरी कोणती तरी येऊन त्याच्यासोबत हा खेळ खेळून गेली होती.
" स्वतःवरती शिव कर्ण बंद कर या जगासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत आणि केव्हाही जागृत होऊ शकतो त्याला थांबवण्यासाठी तुझी गरज आहे या जगाला ......
    अचानक खोलीतून आवाज येऊ लागला . आग्नेयांचे  पूर्वज मारुतांच्या राजाला बोलवण्यासाठी आले होते...
" जास्त काळजी करू नकोस आम्ही काही शत्रू नाही ना मित्र आहोत गरज आहे मार्गांच्या खऱ्या वारसाची म्हणून तुझ्याकडे आलोय.......
    त्यांनं आजूबाजूला पाहत आवाज कुठून येते बघायचा प्रयत्न केला , पण त्याला कळालं नाही . पुन्हा एकदा मारूतांचे नाव ऐकताच रुद्राच्या तळपायाची आग मस्तकाला गेली .  त्याने तिथेच असलेल्या एका एक पाण्याने भरलेला जग उचलून जोरात फेकला .
" कितीही आदळआपट केली तरी सत्य काही बदलणार नाही . तु मारूत होतास , मारुत आहेस आणि मारूत राहणार आहेस . तू मारूतांचा   खरा बारावा  राजा आहेस....
" मारुतांचा नि माझा संबंध केव्हाच संपला आहे . सगळे मारूत  मला मृतासमान समान आहेत . मारुत माझ्यासाठी तेव्हाच मेले त्यावेळी न केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांनी माझ्या आईला शिक्षा दिली . नंतर मलाही त्यांनी बहिष्कृत केलं.......
" तरीही तू त्यांना मदत केलीस ना . ज्या लोकांनी तुला साथ दिली त्यांना धोका दिलास ना.....
" तिथेच चुकलो मी . मला वाटलं ते घर आहे।   आरुषी मुळे मी जरा गाफील झालो . पण आता मला माझं खरं घर आणि माझं खरं कुटुंब कुठे आहे हे चांगलेच समजलेला आहे..... आणि जोपर्यंत हे माझं घर आणि हे माझं कुटुंब सुरक्षित आहे तोपर्यंत मला बाहेरच्या जगाची अजिबात काळजी नाही . एकदा फसलो होतो आता पुन्हा फसणार नाही . मी मारूत नाही . मी या जंगलातील रहिवाशी आहे आणि हे जंगलच माझं घर आहे . बाहेरचं जग जळून खाक झाला तरी चालेल जोपर्यंत हे जंगल व माझी लोक सुरक्षित आहेत तोपर्यंत मला बाकीची काळजी नाही.....

जलधि राज्याचे राजमहार्षी व इतर जाणकार लोकांनी तो काळ्या महालातील  त्रिशुळ वापरून त्रिशूळ सैनिकांना माणसात आणण्याचा उपाय शोधून काढला होता .     त्यासाठी लागणारे सर्व साहित्यही गोळा झालं होतं।   होमकुंड पेटला  . सर्व बाबी पूर्ण झाल्या होत्या.  इतर सर्व विधिही पूर्ण झाल्यानंतर राज महर्षींनी  तो त्रिशुळ उचलला व होमकुंडाकडे जावू लागले .  तो त्रिशुळ  एकदा होमकुंडात पडला की सर्व संपणार होते .  पण त्याच वेळी भिंती पलीकडून त्रिशूळ सैनिकातून एक त्रिशूळ फेकला गेला व तो राजमहर्षींना  लागला . राज महर्षींची जागेलाच माती झाली .
       त्रिशूळ सैन्य यासाठीच प्रसिद्ध होतं त्यांच्यात त्रिशूळचा स्पर्श नि मानवाचं अस्तित्वच नष्ट व्हायचं .  राजमहर्षी होत्याचे नव्हते झाले आणि एकापाठोपाठ त्रिशुळ  येऊ लागले . बरेच सैनिक बेसावध होते।   ते जागीच मृत्यू पावले . त्यांची झालेली माहिती वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर उडू लागली . काहींनी सावध होत ढाली आडव्या धरल्या पण साध्या ढालींचं त्या त्रिशुळापुढे काही टिकाव लागत नव्हता .  त्या ढालीसकट त्या सैनिकांची माती झाली .
     "  अभिमंत्रित ढाली घ्या अभिमंत्रित ढाली ....." महाराज कैरव बोलले .
मात्र त्याचवेळी एक त्रिशूळाने  त्यांच्या छातीचा वेध घेतला . तेही जागेल्याच नष्ट झाले . महाराज कैरवांना या दिवसाची अपेक्षा होतीच . त्यामुळे ज्या दिवशी त्यांनी  त्रिशूळ सैनिकाची आरोळी ऐकली होती त्याच दिवसापासून त्यांनी अभिमंत्रित ढाली तयार करण्याची आज्ञा दिली होती .

     अभिमंत्रित ढाली प्रत्येकाच्या हाती जाईपर्यंत निम्म्याहून अधिक सैन्य नाहिसे झाले होते . शेवटी कसेबसे युवराज देवव्रताने तो त्रिशुळ घेत अग्निकुंडात टाकला . त्याबरोबर ते त्रिशुळ येणं बंद झाले .  त्रिशुळ सैनिक नाहीसे झाले होते . तिथे आता जलधि राज्याचे सामान्य नागरिक होते . पण अर्धे सैन्य त्यासाठी बळी गेले होते . युवराज देवव्रताच्या डोळ्यात प्रतिशोधाचा अग्नी पेटला होता . ....
क्रमःश....

प्रलय-२६

प्रलय-२६

     देवव्रत त्रिशूळ घेऊन जलधि सैन्य तळावरती आला होता . आल्या आल्या महाराज कैरवांनी त्याला बोलावलं .
     " युवराज असं मुर्खासारखं काळा महालातील त्रिशुळ आणायला जाणं तुम्हाला शोभत का ...? जलधि राज्याचे बारावे महाराज आहात तुम्ही , आणि तुम्हीच असे मूर्खपणाचे निर्णय घ्यायला लागल्यावर ती संपूर्ण राज्यानं काय करावं ......."
      " पण बाबा मी जर गेलो नसतो तर आपलं म्हणायला राज्याच राहिलं नसतं .  सारी जनता त्रिशुळ सैनिक बनून आपल्यापुढे उभा होती . काळी भिंत पडणार नव्हती त्यामुळे मला हातावरती हात ठेवून बसणे नको वाटलं .  म्हणूनच मी त्रिशूळ आणायला निघालो . तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही कधीच जाऊ दिलं नसतं .  म्हणूनच गपचूप निघालो आणि महत्त्वाचं म्हणजे त्रिशुळ आला आहे . आता आपली माणसे परत आणुया....
   महाराज केरवानी राज महर्षींना बोलून ईश्वर त्यांच्या स्वाधीन केला की शिवसैनिकांना माणसात आणण्याची तयारी चालू झाली......

   बारावे अग्नेय महाराज तरुण होते . वयाची तीस वर्षे देखील पूर्ण झाली नव्हती . त्यांनीच तंत्रज्ञ मंदार ,  म्हातारा मांत्रिक आयुष्यमान व त्या दोन बुटक्यांचे राजमहालात स्वागत केले .
    " काय आश्चर्य तंत्रज्ञ मंदार ,  मांत्रिक आणि सुरूकुचालक स्वतः उडत्या बेटावरती .....? आम्ही तुमचे कोणत्या प्रकारे आदरातिथ्य करू ....।.
     " महाराज प्रलयकारिका जन्मली आहे ,  हे तर तुम्हाला माहीतच असेल.  प्रलयकारीकेला थांबवण्यात यश आलेलं नाही . तीन बहिणीकडून काही मदत मिळेल या अपेक्षेने त्यांच्या शोधार्थ या ठिकाणी आलोय ..."
      तंत्रज्ञ मंदार म्हणाला ....
    " तुम्हाला वाटतंय का की त्या तीन बहिणी उडत्या बेटांवरती  असतील...
     "   या शिवाय इतकी प्रशस्त समृद्ध आणि सर्वकाही उपलब्ध असणारी जागा दुसरीकडे थोडीच आहे.....
    तो म्हातारा मांत्रिक म्हणाला
" पण तुम्ही त्यांना शोधणार कसे ...? त्यांची इच्छा असल्याशिवाय त्या कोणालाही सापडत नाहीत हे तर सर्वज्ञात आहे..... महाराज
   " पण प्रयत्न तर करावा लागणारच पहिले हा फार गंभीर विषय आहे हे तर त्यांनाही माहीत आहे .....
     तो तंत्रज्ञ बोलला .  त्याच वेळी एक सैनिक आत आला . महारजांकडे पाहत  बोलू कि नको म्हणत उभारला . महाराजांनी नथरेनचं विचारलं , तेव्हा बोलला...
   "  जलदी राज्याच्या कैरव महाराजांचा एक दूत आपले दर्शन मागत आहे...
     " चला तर मग तुमचा शोधायला शुभेच्छा आणि महाराज निघून गेले
    " मला कोणीतरी सांगेल का की या तीन बहिणी कोण आहेत आणि त्यांच्या शोध कशासाठी घ्यायचा आहे ....." आयुष्यमान वैतागून म्हणाला...

    " त्या तिघी नसत्या तर मानवजातीचे भविष्य काहीतरी वेगळं असतं . पहिल प्रलय थांबवण्यात या तिघींचा मोठा वाटा आहे.  त्यांच्या मदतीविना तो परिपूर्ण जागृत झाला असता आणि मानव जमात काही वेगळ्याच दुनियेत असली असती..... तंत्रज्ञ मदार बोलून गेला .

   महाराज आग्नेयांपुढे तो दूत उभा होता व त्याच्या हातातील पत्रा  वाचत होता ...
    " मागच्या प्रलयापासून अग्नेया यांनी या जगताशी संपर्क तोडला.  सर्व काही त्यांनी स्वतःच्या स्वतः उत्पादन करायला सुरुवात केली .  सर्व गोष्टी निर्माण केल्या  . या जगात गोष्ट आहे व ती उडत्या बेटांवरती नाही असे होत नाही . या घडीला अतिशय सुख समृद्धीने युक्त असलेले राज्य म्हणजे अग्नेय .
       मात्र पुन्हा एकदा प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे .  मारुतांच्या पुजार्‍याने हे सारे षड्यंत्र मांडले आहे .  तो स्वतःचं राज्य निर्माण करू इच्छित आहे त्यासाठी प्रलयकारी केला तो शास्त्र म्हणून वापरत आहे . पण प्रलय हा कोणाच्या अंकुश  खाली राहत नाही हे तो विसरला आहे . काही क्षणांचा अवधी आहे आता प्रलयाच्या जागृतीला....
     तुम्ही पलय जागृत करण्यासाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट कडेकोट सुरक्षेत इतकी वर्षे सांभाळली आहे . मात्र प्रलयकारीकेला काहीच अशक्य नाही .  जर तिला नष्ट करावयाचे असेल तर बाराव्या पिढीने एकत्र यायलाच हवं.  त्यासाठी बैठकीचं हे निमंत्रण पाठवत आहोत.....
         पुढेही बऱ्याच गोष्टी त्या दूताने वाचून दाखवल्या व नंतर तो  निघून गेला .   महाराज अग्नेय अग्नी कक्षात गेले . एक ज्वाला प्रकाशित झाली व आवाज येऊ लागला...
" सध्यातरी प्रलयकारिका त्या भैरवच्या ताब्यात आहे पण फार काळ राहणार नाही .  कैरव महाराजांनी रास्त सुचवलेलं आहे .  बाराव्या पिढीने एकत्र यायलाच हवं .  पण बारावीला पिढीचा मारुत राजा मारुतांमधे  नाही .  त्यांना वाटत आहे तो मृत आहे .   मात्र बाराव्या पिढीचा राजा जंगलातील लोकांचा प्रमुख झालाय .... त्याला आम्ही बोलू . तू जाण्याच्या तयारीला लाग..."

  रुद्राला सकाळी जाग आली . त्याचं डोकं भयंकर दुखत होतं . झोप नीट लागली नव्हती .  रात्री झालेला फारसं काही आठवत नव्हतं . एवढंच माहीत होतं की तो मीराच्या कुशीत रडला होता .  सारेच लोक आज उशिरा उठले होते .  रात्रीच्या उत्सवाचा पसारा आजूबाजूला पडलेला होता . मोकळ्या हवेसाठी आणि अंघोळीसाठी तो तलावाकडे निघाला . वाटेत मीरा परत येताना दिसली .
" मीरा.... मीरा....  रुद्रा तिला पहात म्हणाला .... त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती तशीच पुढे चालत राहीली .  तिला थांबवण्यासाठी त्याने तिचा हात धरून ओढला....
" सोड मला.....  त्याच्या हातातून हात सोडून घेत तिने रुद्राच्या कानशिलात भडकावून दिली ...  " परत हात लावलास तर याद राख....
" काय झालं तरी काय .....?"
    रुद्रा काही न समजून बोलला
" वा रे वा ... मलाच विचार अजून काय झालं...  अगोदरपासूनच असा होतास का ....? एवढं काही बोलला आणि परत घाण केली सगळी....
" काय बोलतेस तरी काय ...? काय घाण केली मी..."
" तुझा तूच आठव काय घाण केली काल रात्री .....
    आणि ती निघून गेली . रुद्राला आता अधिकच प्रश्न पडले . काल रात्री नशेत  काही केलं का आपण ?  तसे अजून एकदाही त्याने नशेत काही उलटेसुलटे केले नव्हते .  मग काल रात्री त्यानं काय केलं असावं ...? पटकन सारे काही आवरुण तो माघारी वळला . त्याच्या कक्षात  आल्यावर त्याचा सेवक त्याची खोली व्यवस्थित करताना दिसला.
  "  अरे काल रात्री काय झालं ...? मी काय केलं सांगशील का.....?
     त्यानं  सारेकाही  सांगितलं त्यात काही वेगळं नव्हतंच.  फक्त शेवटी म्हणाला 
    " आणि काल रात्री खोलीत कोणीतरी होतं तुमच्या  झोपायला ,  मिराबाई साहेब सोडून....
     आता त्याला कळलं मीरा एवढी का भडकली होती तो मीरा समजून दुसऱ्याच बाईसोबत झोपला होता....

Wednesday 25 September 2019

प्रलय-२५

प्रलय-२५

    सुवर्णनगर , लोहगड , रत्नागिरी अग्नी आणि ज्वाला ही पाच संसाधनं राज्य होती . पाच राज्यात नावाप्रमाणेच विविध खनिजे व संपत्ती होती .  त्या पाच राज्यांवर ती इतर सर्व राज्यांची मिळून सत्ता होती . स्थानिक लोकांना म्हणजेच मातील्या लोकांना तिथे बळजबरीने कामाला लावले जात होते . मात्र त्या लोकांनी उठाव करून पाचही राज्य ताब्यात घेतली होती .  मातीतल्या लोकांचा नेता अंकित होता . पाच राज्यांमध्ये आता त्याच्या नेतृत्वाखाली बरेच बदल झाले होते . त्यांच्याकडून जनावरासारखे काम करून घेतले जायचे आणि पुरेसे अन्नही नाही दिले जायचे .  पूर्वी इतर राज्यांची  सत्ता असल्याने व्यापार नावाची गोष्टच नव्हती.  जे ते राज्य लागेल त्या गोष्टी ज्यांच्या त्यांच्या हिश्यातून घेऊन जायचे.  त्यामध्ये हाल व्हायचे तिथे स्थानिक लोकांचे. इतर लोक त्यांना मातीतले लोक म्हणायचे खरे मात्र ते स्वतःला पहिले मानव म्हणायचे . तसे पाहता आता संसाधन राज्ये पूर्णपणे प्रथम मानवांच्या ताब्यात होते . त्यांनी स्वतःच सैन्यही तयार केलं होतं . उपलब्ध खनिजांपासून वेगवेगळी शस्त्रेही तयार केली होती .  जरी बाहेरून कोणी आक्रमण केलं तरी तरीही त्यांना सहजासहजी राज्य हस्तगत करता येणार नव्हतं .

    पूर्वी  पाच नामधारी राजे होते त्यांना दररोज आठ तास काम काम करायला लावलं जात होतं , आणि पूर्वी जे इतर लोकांना खायलख जे अन्न दिलं जात असे तेच  त्यांनाही दिलं जात होतं . पूर्वी त्या लोकांना त्रास होत होता तो आता बंद झाला होता . अंकित पाच राज्याचा प्रमुख असला तरी प्रत्येक राज्यात पाच जणांचं विश्वस्त मंडळ असे  25 जण त्याने सर्व कारभार चालवण्यासाठी निवडले होते .   त्याला वाटलं होतं सर्व राज्य आपल्या लोकांकडे आल्यावरती पहिल्यांदा विरोध होईल तो बाहेरील राज्यांचा , ज्यांनी त्यांच्यावरती गुलामगिरी लादली होती त्यांचा . मात्र ज्या विश्वस्त मंडळाच्या ताब्यात त्याने लोहगड हे राज्य सांभाळण्यासाठी दिलं होतं त्यांनी त्याच्या विरुद्ध उठाव केला . त्यांच्याशी हर प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न करून पाहिल्यानंतर शेवटी सैनिक घेऊन स्वारी करण्याचे ठरवले .  त्याची युद्धनीती भयानक होती .  फार काही रक्त न सांडता लोहगड त्याच्या ताब्यात आले . त्या पाच गद्दार नेत्यांना व त्याच्या विश्वासू नि खास निवडक लोकांना त्याच्यापुढे उपस्थित केले होते ......
" पिढ्यानपिढ्या आपण आपलं जीवन गुलामगिरीत जगत होतो .  आपण या पृथ्वीतलावरील प्रथम मानव ,  मुक्तपणे पृथ्वीतलावरती  विहार करण्याऐवजी या खाणीत काम करण्याची गुलामी त्यांनी आपल्यावरती लादली . आपल्याला आपले सण-उत्सवही साजरे करता येत नव्हते .  आपली परंपरा पुढे चालवता येत नव्हती .  आपण फक्त जनावरासारखे काम करत होतो . आता उठावानंतर परिस्थिती बदललेली आहे .  पाचही राज्यावरती आपली सत्ता आहे . आता आपण एकत्र यायचं सोडून याच्यांसारखे लोक आपल्या आपल्यात फूट पाडत आहेत .  आता तर कधी नव्हे ते अधिक एकत्र येण्याची गरज आहे .  या पृथ्वीतलावरील खनिज संपत्ती आपल्या ताब्यात आहे .  आपण काहीही शक्य करू शकतो . फक्त गरज आहे ती एकत्र येण्याची . आपापसात मतभेद नकोत . कुणाला काही बोलायचे असेल तर त्यांनं समोर येऊन बोलावं , प्रत्येकाच्या मताचा आदर केला जाईल . पण पाठीमागे असले धंदे करू नयेत . ......."
      असं म्हणत त्याने त्याची तलवार काढली व पाच जणांचा प्रमुख ज्यानं सर्वांच्या डोक्यात विश पेरलं होतं त्याचं शीर धडावेगळे केले....
    " हा आपलाच माणूस होता , पण या एका माणसामुळे आपली १७ माणसे मृत्युमुखी पडली .  त्यामुळे त्याला शिक्षा होणं आवश्यक होतं.......
              अंकितच्या अशा धडाडीच्या निर्णयामुळे प्रथम मानवांचा प्रमुख झाला होता त्याच्या प्रत्येक निर्णयाला सामान्य जनतेचा पाठिंबा असायचा.....

    मारूतांच्या जुन्या महालात  मुख्य पुजारी भैरव त्याचा मुलगा पार्थव आणि प्रलयकारिका  उभे होते . तो महाल  मारूतांच्या गतवैभवाची साक्ष देत होता .  मात्र आता त्याची अवस्था दयनीय झाली होती . 
   " आपल्याला जर सार्‍या पृथ्वीवरती साम्राज्य पसरवायचं असेल तर पहिल्यांदा संसाधन राज्य ताब्यात घ्यावी लागतील एकदा का संसाधन राज्यांवर की सत्ता आली की बाकीच्या राज्यांवर ती सत्ता मिळविण्याचा मार्ग मोकळा होतो ......"  भैरव बोलत होता .
       संपूर्ण पृथ्वीवरती साम्राज्य प्रस्थापित करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती . प्रलयकारी केला जागृत करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरून तो आगीशी खेळत होता . त्याने प्रत्येक विधीमध्ये थोडाफार बदल केला होता जेणेकरून प्रलयकारीका त्याच्या ताब्यात राहील . 
" पण उडत्या बेटांवरती असलेलं  प्रलयाला जागृत करण्यासाठी लागणारे........
      प्रलयकारी का भैरवाला तोडत मध्येच बोलू लागली ।  पण तिचं वाक्य पूर्ण होण्याअगोदर ही भैरवाने त्याच्या हाताची मूठ वळताच  ती तडफडून खाली पडली व भयंकर वेदनांमुळे विव्हळू लागली.....
" मी सांगतो तेच करायचं बाकीचं बोलायचं नाही.....
भैरव बोलला . भैरवने केलेल्या विधींमुळे  तिची शक्ती भैरव आणि त्याचा मुलगा पार्थव या दोघांवरतीही चालत नव्हती....
  " संसाधन राज्यात मध्यंतरी उठाव होऊन नवीन राजा उदयाला आला आहे . मला त्याचं मस्तक हवं आहे . आणि सार्‍यांना कामाला लाव . खनिज तेल , कोळसा लोखंड आता भरपूर लागणार आहे .  त्याने प्रलयकारिकेला  आदेश दिला .  ती गपचूप तिथून निघून गेली .
" पार्थ तुला तू विश्वनाथ माहित आहे ना रे .....
   भैरव तो मुख्य पुजारी त्याच्या मुलाला म्हणाला
" हो माहित आहे ....
" तो कुठे आहे हे जरा माहिती कर....  त्याची भेट घ्यायची आहे .  आपल्या नियोजनाप्रमाणे काळी भिंत पडायला हवी होती .  मात्र त्या तंत्रज्ञ मंदारच्या मुलाने मध्येच घोळ घातला . आपल्याला लवकरात लवकर भिंतीपलीकडील सम्राटाची गरज आहे . कारण मारुत आग्नेय आणि जलधि राजे एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत .  त्यांच्यासोबत तंत्रज्ञ मंदारही  आहे . त्यामुळे निव्वळ प्रलयकारीका असून भागणार नाही....
       त्याचा आज्ञाकारी पुत्र पाठव लगेच निघून गेला.   मारुतांचा मुख्य पुजारी म्हणजेच भैरव कितीतरी वर्षांपासून नियोजन करून , प्रत्येक घटना त्यावर ती येणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया यांचा अभ्यास करून त्याने अतिशय कलाकुसरीने विजयासाठी असणारा हा सारा साचा तयार केला होता . लहानपणी तो मारूतांच्या आश्रयाला होता . त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणतं राज्य होतं ना कसाची सत्ता होती तरीही त्यांच्याकडे किती गर्व असायचा . भैरवाची लहानपणी  फार हुडतूड व्हायची .  त्यामुळे त्याच्या मनात त्यांच्याविरुद्ध द्वेष भरला होता .    अकराव्या मारूत राजाच्या पत्नीला जेव्हा प्रसुती वेदना चालू झाल्या त्यावेळी दुसऱ्या एका दासीलाही प्रसूतिवेदना सुरू होत्या . भैरव हा बऱ्याच शास्त्रांमध्ये निपुण होता.  वैद्यकीय शिक्षणातही त्याचा कोणी हात धरू शकत नसे .  अकरावा राजा मारुत कितीतरी वर्षापासून मुलासाठी प्रयत्न करत होता . मात्र अजूनही त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले नव्हते . मात्र यावेळी राणी गरोदर राहिली होती आणि मुलही सुदृढ जन्माला आले. पण भैरवाने राणीचा मुलगा दासीच्या मुलीबरोबर बदलला . ती मुलगी म्हणजे आरुषी होती व तो मुलगा म्हणजे रुद्र होता . भैरवाच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. जर रुद्राचा मृत्यु झाला तर तीन राजे एकत्र येणारच नाहीत आणि प्रलयकरिकेला कोणीच अडवू शकणार नाही .

क्रमःश

Saturday 21 September 2019

प्रलय-२४

प्रलय-२४

    ज्यावेळी भगीरथ जलधि राज्याच्या सैनिक तळावरती पोहोचला त्यावेळी सर्वत्र शांतता होती . कौशिका कडे जात त्याने महाराज व मंत्रीगणाला बोलवण्याची विनंती केली . सारे जमल्यावरती तो बोलू लागल
     "  रक्षक राज्याच्या सैनिकांनी विक्रमाचा वध करून त्याला भिंतीपलीकडे फेकून दिले आहे . महाराज विश्वकर्माच्या नियंत्रणाखाली जलधि आणि रक्षक राज्याची सैना बाटी जमातीच्या टोळी मागे त्यांच्या जुन्या महालाकडे गेली आहे .  तंत्रज्ञ मंदारचा मुलगा , शौनकचा या सार्‍यात फार मोठा वाटा आहे . त्यानेच उघड केले की विक्रम हा मारुतांच्या अंमलाखाली होता . आता भिंत तर पडणार नाही ,  त्यामुळे त्रिशुळ सैनिकांना माणसात आणण्यासाठी आपल्याला बराच वेळ मिळेल ....
      हे ऐकल्यावर ती जरा तणावपूर्ण असलेलं वातावरण मोकळे झाले....
       त्रिशूळ सैनिकांना माणसात आणण्यासाठी काळ्या भिंती पलीकडील असलेल्या काळ्या महालातील त्रिशूळ आणणं आवश्यक होतं . भिंत पडली असती तर ते शक्य नव्हतं .  पण आता भिंत पडणार नव्हती , त्यामुळे राजकार राजकुमार देवव्रत या मोहिमेसाठी झटकन निघाला.....
आता केवळ महाराज कैरव , काही मंत्रीगण राजमहर्षी यांची बैठक जमली होती . भागिरथ बोलत होता ...
     " तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक कडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार - प्रलय येणार हे तेव्हाच निश्चित झालेल्या वेळी महाराज सत्यवर्मांनी त्यांच्या राजकुमारासकट महाल पेटवून दिला . तो पुढे बोलला की  ' प्रलयकारिकेचा जन्म झाला आहे .  आत्म बलिदानाचा विधीही पूर्ण झालेला आहे . त्या विधीसाठी महाराणी शकुंतलेच्या तिसरा पुत्राचा बळी देण्यात आलेला आहे . प्रलयकारीकेला रोखण्यासाठी सुरूक ने वारसदारच्या सभेच्या प्रमुखाची निवड केली आहे . मात्र अजून त्याला यश आलेले नाही .  प्रलयकारीकेला जर खरच थांबवायचं असेल तर जलधि मारुत आणि आग्नेय राजांना एकत्र यावे लागेल ...... "
    एवढं बोलून भगिरथ थांबला . त्यानंतर राज महर्षी बोलू लागले....
      " पहिल्या प्रलयाच्या वेळी जलधि अग्नेय आणि मारुत ही राज्ये वेगळी नव्हती , एकाच राज्याचे भाग होते .  तरीही त्यांना एकत्रपणे लढता आले नाही .  आता तरीही तीन राज्य आहेत .  एकत्र लढायचे असेल तर काहीतरी समानता असायला हवी .  शत्रू एक आहे म्हणून एकत्र येणे ऐवजी कोणत्या तरी चांगल्या करण्यासाठी एकत्र होणं केव्हाही चांगलं .  त्यापैकी एक कारण म्हणजे जलधि मारुत आणि अग्नेय हे भाऊ भाऊ होते . एकमेकांचे सख्खे भाऊ होते  . ....."
    नंतर महाराज कैरवाकडे पाहत राजर्षी बोलले....       "  महाराज आपण तिन्ही राज्यांची बैठक लवकरात लवकर बोलवायला  हवी....."
     त्याबरोबर महाराज कैरवांनी  उडत्या बेटावरील आग्नेयांसाठी आणि लपून राहणार या मारुतांसाठी बैठकीचे निमंत्रण पाठवले...

    उडत्या बेटावरती अग्नेय राज्यांचं राजांचं राज्य होतं .  उडत्या बेटांना उडती बेटे हे नाव का पडलं कोणालाच माहित नव्हतं. फक्त ती समुद्रातील बेटे होती .  फार छोटी नव्हती ना अती मोठी होती . आग्नेय राजांची सत्ता फक्त तिथेच होती .  त्या बेटांचा बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध नव्हता . त्या ठिकाणचे लोक बाहेर जायचे नाहीत .  सारकाही त्यांना त्या ठिकाणीच उपलब्ध करून दिलं जात होतं . मात्र बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या बऱ्याच प्रमाणात होती .  मात्र साऱ्यांनाच आत प्रवेश मिळेल अशातला भाग नव्हता .  प्रवेशदार फारच वेगळं होतं . त्या ठिकाणी एकही सैनिक उपस्थित नसायचा .  ते दार ओलांडून जाणे अशक्य होतं . लपूनछपून आत प्रवेश करणाऱ्याला जागीच मृत्यू दंड दिला जात असे . त्या ठिकाणी आत प्रवेश करण्यासाठी काही प्रश्न विचारले जायचे . खरी उत्तरे दिली तर ठरवलं जायचं की आत सोडायचं की बेटा बाहेर फेकून द्यायचं .  खोटी उत्तरे दिली की आगीचा लोळ यायचा आणि त्या माणसाची जागेला राख व्हायची....

    ज्यावेळी पहिला प्रलय आला त्यावेळी अग्नेय राजे सर्वांसोबत उभे राहिले . मात्र जलधि व मारूतांमध्ये असलेल्या भांडणामुळे प्रलयकारीकेला हरवणं अशक्य  झाले . त्यामुळे प्रलयकारिकेपासून पासून दूर ,  बेटांवरती अग्नेय राजे त्यांच्या प्रजेसोबत स्थायिक झाले . उडत्या बैठण भोवती विशिष्ट प्रकारचं कवच होतं .    प्रलयकारीकेला त्या ठिकाणी प्रवेश मिळणं सर्वथैव अशक्य होते . त्या ठिकाणी असलेली एक गोष्ट जर प्रलयकारिकेच्या हाती लागली तर प्रलय जागृत करण्यापासून कोणी थांबवु शकत नव्हतं . त्यासाठी अग्नेयांच्या  पूर्वजांनी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन ते कवच निर्माण केलं होतं .  आग्नेय बेटांवर वृद्ध अजिबातच नव्हते . ठराविक वयानंतर ते अग्नित सामील व्हायचे , आणि तो अग्नी म्हणजेच उडत्या बेटांचा कवच होता .  तो अग्नी म्हणजेच उडत्या बेटांचे ज्ञान-विज्ञान  युद्धनीती तज्ञ सारकाही होता .  त्यां अग्नीकडून आग्नेय राजे सल्ला घ्यायचे .  पूर्वजांचे ज्ञान त्यांच्या पाठीशी होतं .  तोच अग्नि प्रश्न विचारायचा . तोच अग्नी ठरवायचा कुणाला प्रवेश द्यायचा व कोणाला नाही .  न्यायनिवाडाही तोच अग्नि करायचा . कोणताही निर्णय अग्नीला न विचारता घेतला जायचा नाही.....
    उडत्या बेटाच्या प्रवेशद्वारावर वरती सुरुकु सोबत आयुष्यमान तंत्रज्ञ मंदार म्हातारा आणि ते दोन बुटके उभे होते ...
    " अरे तंत्रज्ञ मंदार नि म्हातारा मांत्रिक दोघेही एक साथ..... "  असा आवाज आला आणि ते प्रवेश दार उघडलं गेलं . ते सारे आत निघाले  त्याच वेळी आवाज आला....
   "  नसत्या करामती करू नका . जे करायला आला आहे ते करा व गुपचूप निघा .....
    आणि ते दार बंद झाले

   काळ्या महालातील शस्त्रागारात असणारा त्रिशूळ आणण्यासाठी देवव्रत निघाला . प्रवास खूप मोठा होता .  काही दिवस पुरेल एवढेच अन्न पाणी त्याने घेतले होते .  मात्र काही तासाच्या प्रवासानंतर त्याचा घोडा दमला .  एक उत्तम प्रजातीचे जनावर कितीतरी दिवसाचा प्रवास न थकता करणारे ,  भिंतीच्या पलीकडे असल्याने काही तासाच्या प्रवासात फारच दमले .  देवव्रत घोड्यावरून उतरला . त्याला तिथेच सोडला , आणि तो चालत पुढे निघाला . संपूर्ण जमीन उजाड होती . एकही हिरवे झुडूप  नव्हते .  उन्हाच्या झळा लागून त्यांची त्वचा जळत होती .  काही तास चालल्यानंतर त्याला थकवा जाणवू लागला .  त्याची पावले जड झाली . डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली .  आणि तो बेशुद्ध झाला....
        गार वार्‍याने त्याला जाग आली . थंडगार पाण्याने भरलेल्या तळ्याकाठी गार लुसलुशीत गवतावरती मखमली कापडावरती तो विवस्त्र पडला होता .  दुरून एक अतिसुंदर नारी येताना दिसत होती . तिला पाहताच राजकुमार देवव्रत मोहित झाला , पण अन्विची आठवण होताच त्याला अपराधीपणा वाटला . महाराज विश्वकर्माची मुलगी अन्वी व राजकुमार देवव्रत यांचं निस्सिंम प्रेम होतं . त्याने त्या सुंदर नारीकडे बघायचे टाळले .  ती जवळ आली....
    " देवव्रत माझ्याकडे बघणार देखील नाहीस का....
    तो अन्वीचा आवाज होता . त्याने तिच्याकडे पाहिलं  . ती  अन्वीच होती . त्याला वाटलं हे स्वप्न असावं . त्याने तिला त्याच्या बाहुपाशात घेतले .  ओठला ओठ स्पर्श होताच दोघांचेही शरीरे थरथरुन निघाली . त्याचे हात तिच्या शरीराभोवती मुक्तपणे फिरू लागले . ती सुखाची उसासे टाकत होती.  श्वासोच्छवास वाढत गेले . एकमेकांची शरीरे कितीही अनुभवली तरी त्यांची मने तृप्त होतच नव्हती .  बराच वेळ त्यांची प्रणयक्रिडा चालू राहिली. त्या कोवळ्या उन्हातही ते घामाने नाहून निघाले . शेवटी एकमेकांच्या बाहुपाशात तिथेच झोपी गेले.

    उन्हाच्या झळ्याने त्याला जाग आली .  देवव्रत जागा झाला .  संपूर्ण शरीर घामाने भिजले होते .  त्याच्या शरीराला अत्तराचा वास येत होता . बाजूला तो सोनेरी त्रिशूळ पडला होता . ज्या ठिकाणी त्याने घोडा सोडला होता तिथेच त्याला जाग आली होती . घोडा अजूनही तिथेच होता . काय झालं हे त्यालाही माहीत नव्हतं . पण ज्या त्रिशुळासाठी तो आला होता ते त्रिशूळ मात्र त्याला मिळालं होतं . त्रिशुळ घेऊन घोड्यावरती बसत तो जलधि  राज्याच्या सैन्यतळाकडे निघाला.....
क्रमःश.....

प्रलय-२३

प्रलय-२३

    " मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार , म्हणूनच हे बुटके पाठवली होते तुझ्यासोबत , त्यांनाही त्याचं काम पूर्ण करून दिलेलं नाहीस .  अरे तुझ्या एकट्याच्या स्वार्थासाठी संपूर्ण जगाचा विनाश केलास की तू...."  तो म्हातारा वैतागून आयुष्यमानला बोलत होता ...
   "  आता आत्मबलिदानाचा विधी पूर्ण झाला म्हटल्यावर ,  ती संपूर्ण शक्तिशाली झाली . तिला आडवणे आता सर्वथैव अशक्य आहे . ... आता तो म्हातारा पुढे आयुष्यमान आहे हेही विसरला व स्वतःशीच बडबडत सुटला....
  "  आता काही खरं नाही . तिला कोण थांबवणार...?  विनाश कोण रोखणार ....? याचे उत्तर कोणाला माहित आहे.....?  कोण ..? कोण ..? कोण...?
     तो वेड्यासारखा पळत सुटला...
    " हा सापडला.....  तंत्रज्ञ मंदार रक्षक राज्यातील उत्तरेच्या जंगलात असलेल्या गुप्त तळावरती आहे तो......  चल लवकर आपल्याला तिथे जायचं आहे.... सुरुकुला  बोलव..... लवकर ....प्रलयकारीका कुठे गेली काय माहित......
भिल्लव सार्थक सरोज व उत्तरेच्या तळावरती असलेले सैनिक रक्षक राज्याच्या महाला वरती चालून निघाले होते .  सर्व सैनिक काळी भिंत पाडण्यात व्यस्त असल्याने महालाच्या संरक्षणासाठी कमी सैनिक होते .  त्याच संधीचा फायदा घेऊन सर्वांनी आक्रमण करण्याचे ठरवले होतं . महाराणी शकुंतलेला याबाबतीत सांगितलं होतं पण त्यांचं कुठेच लक्ष नव्हतं . त्यांचा मुलगा साऱ्यांच्या नजरेदेखत भरदिवसा पळवला होता व कोणीच काही करू शकलं नव्हतं .  त्यात अधिक भर म्हणून तंत्रज्ञ मंदार यांनी आत्म बलिदानाचा विधी व त्यासाठी बळी म्हणून राजकुमाराना पळवलं असावं असं सांगितल्यावर तर महाराणी अधिकच निराश झाल्या . सर्व सैनिक दक्षिणेकडे कूच करायला तयार असतानाच आयुष्यमान तो म्हातारा व दोन बुटके त्याठिकाणी सुरुकु सोबत आले .  त्यांना व सुरुकु ला पाहून सार्‍यांनी शस्त्रे उगारली . तंत्रज्ञ मंदारची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती . तोही घोड्यावरती स्वार झालेला होता .  सुरुकुला पाहिल्यावर  तो बोलला ...
   " अरे हे आपल्या बाजूने आहेत .  प्रलयकारिकेला थांबवायचं असेल तर सुरुकु आणि त्याचा मालक लागणारच ना....
  " अरे मंदार अगदी तसाच दिसतोय , अजिबात फरक नाही ....." तो म्हातारा मंदारला म्हणाला
"  मग तंत्रज्ञ उगाच म्हणतात का लोक मला .... तू मात्र दिवसेंदिवस अधिकच म्हातारा होत आहेस.....
" अरे हा आयुष्यमान , वारसदारांच्या सभेचा प्रमुख .  प्रलयकारिकेचा प्रियकर . त्याला जमले नाही .  आत्म बलिदानाचा विधी पूर्ण झालाय....
" वाटलं होतं आता त्या तिघींना शोधावे लागेल . मारुत आग्नेय आणि जलधि जरी एकत्र आले तरी फार काळ ती एकी टिकत नाही . त्यामुळे त्यांना एकत्र आणण्यासाठी त्या तिघी शिवाय आपल्याला पर्याय नाही....
" कोण तिघी ..? काय बोलताय तुम्ही ....? " आयुष्यमान म्हणाला . 
" कळेल तुला ....  मग येतोय ना तिघांना शोधायला...  तुला माहिती असेल त्या कुठे आहेत ....."  तो म्हातारा  मंदारला  बोलला
" चला मागच्यावेळी मी ज्यांना पाहिलं होतं त्यावेळी त्या उडत्या बेटावरती स्थायिक होत्या . सुरुवात तिथूनच करूया......"  मंदार सुरुकु वरती चढत म्हणाला .  पुन्हा एकदा सुरुकु आकाशात उडाला आणि सैन्य दक्षिणेकडे रवाना झाले......
 
     रक्षक राज्यातील आणि जलधि राज्यातील सैनिकांमध्ये युद्ध सुरू झालं होतं . मध्यरात्रीच्या आसपास सुरू झालेले युद्ध अजूनही चालू होतं . तोफा धडाडत होत्या . धनुष्यातून बाण सुटत होते . तलवारी रक्ताने माखलेल्या होत्या .  सूर्योदय झाला होता .  रक्ताच्या चिखलात अजूनही युद्ध चालूच होतं .  एका साध्या करण्यासाठी हजारो सैनिकांचे प्राण जात होते .  हळूहळू सूर्य अधिकच तळपू लागला . दोन्ही बाजूकडून नव्या दमाचे सैनिक रणांगणात उतरले .  पण अचानक विजेचा कडकडाट झाला . भरदिवसा सूर्यास्त होऊन अंधार पडला . वारे शांत झाले . वातावरण शांत झालं . अचानक झालेला बदल पाहून सैनिकही स्तब्ध झाले...
  " पहिल्या प्रलय पाहिला आणि जिवंत राहिले अशा काही मोजक्या लोकांपैकी माझे वडील म्हणजेच तंत्रज्ञ मंदार ........
     सर्वत्र आवाज घुमत होता तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक बोलत होता .
    " प्रलय काही एका दिवसात येत नाही . एक-एक घटना त्याला कारणीभूत ठरते . प्रलय येणार हे तेव्हाच नक्की झालं ज्यावेळी महाराज सत्यवर्मानी त्यांच्या राजपुत्राला राजमहालात जाळून दिलं .  पण महाराज विक्रमांनी काळ्या भिंतीला पाडण्याचा आदेश देऊन प्रलयकाळ फारच जवळ आणला . तुम्हाला पाहायचंय का प्रलयकाळ काय असेल ......? "
    आणि आकाशात चित्रे उमटू लागली . सर्व सैनिक ती  दृश्य पाहून  घाबरून गेले....
    " काळी भिंत पाडल्यानंतर या गोष्टी होणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या ..... आणखी एक गोष्ट . आपल्या साऱ्यांना माहित आहे । महाराज विक्रम त्यांच्यासाठी खास बनवलेल्या सुवर्ण पात्रात त्यांच्यासाठी खास बनवलेली विशिष्ट अशी मदिरा घेत असतात .  ते पात्र व ती मदिरा मारुतांच्या पुजाऱ्यांनी बनवलेली आहे .  त्यामुळे महाराज विक्रमांवरती मारूतांचे नियंत्रण आहे .  तुमच्या राज्याचे खरे महाराज विश्वकर्मा हेच आहेत...."
          हे ऐकताच रक्षक राज्याच्या सैनिकांची तळपायाची आग मस्तकाला गेली . सारे सैनिक विक्रमावरती धावून गेले .  काही क्षणातच विक्रमाचे निपचित पडलेले शरीर त्यांनी भिंतीपलीकडे फेकून दिले . महाराज विश्वकर्माच्या नावाचा जयजयकार सुरु केला .  सैनिकांनी केलेल्या कृतीची महाराज विश्वकर्मा ना जरी गृना वाटत असली तरी आता मात्र आता ते बोलण्याची वेळ नव्हती....
   " जलधी राज्याची सैनात त्रिशुळ सैनिकांसोबत लढण्यासाठी दक्षिणेकडे उभी आहे .  हे त्रिशुळसैनिक दुसरे-तिसरे कुणी नसून जलधि राज्याचे नागरिकच आहेत . बाटी जमातीच्या काही टोळ्यांनी ते सैनिक बनवण्यासाठी मारूतांची मदत केली असावी . त्या टोळ्या मारतांच्या जुन्या महालाकडे जात आहेत . आपल्याला कसेही करून त्या टोळ्यांना पकडायलाच हवं .  प्रलयकात्र थांबवायचा असल्यास हे करायलाच हवं... "
     रक्षक व जलधि राज्याच्या सैनिकांना घेत महाराज विश्वकर्मा जुन्या महलाकडे निघाले . विक्रमाच्या वधाची आणि इतर बातम्या घेऊन महाराज विश्वकर्मानी महाराज कैरव  व महाराणी शकुंतले कडे दूत पाठवले....

Friday 20 September 2019

प्रलय-२२

प्रलय-२२

      महाराज विश्वकर्मा जलधि राज्याकडून जी पाच हजारांची सैन्य तुकडी घेऊन आले होते त्या तुकडीच्या तळावरती स्मशान शांतता पसरली होती . काही वेळापूर्वी एक जळता तीर येऊन जमिनीत घुसला .  त्याच्यावरती असलेल्या संदेशपत्रांमध्ये एक मजकूर लिहिला होता .             " गपचूप ,  जिथून आला तिकडे माघारी जा , अन्यथा तुमच्या महाराज विश्वकर्मासहीत इतर सातही जणांच्या बलिदानासाठी तयार राहा..... "
विक्रमाने रितिरिवाज व परंपरा बाजूला सारत बोलण्यासाठी ,  संधी करण्यासाठी आलेल्यांवरती पाठीमागून वार केला होता . त्याच्यांबरोबर आलेले सैनिक मारून टाकत उरलेल्यांना कैद करून आणलं होतं .  ज्या लोकांना त्याने कैद केलं होतं ते सामान्य सैनिक नव्हते . कसलेली योद्धे , राज्यसभेतील मंत्री ,  मुत्सद्दी होते . त्यांच्या मृत्यूमुळे जलधि राज्याची सैन्याला कधीच न भरून निघणारी हानी होणार होती . सारेजण विक्रमाच्या ताब्यात असल्याने सेनेची धुरा भगीरथाच्या खांद्यावर होती . त्या स्मशानात शांततेला तोडत तो  बोलू लागला....
" जेव्हा जेव्हा शत्रू कूटनीती किंवा कपटकारस्थान करतो त्या त्या वेळी समजून जा कि समोरासमोर युद्ध करायला तो घाबरलेला आहे .  याचाच अर्थ विक्रम आपल्या बरोबर युद्ध करायला घाबरत आहे . आपण जरी त्याला घाबरत नसलो तरी आपणही हे त्याच्याशी समोरासमोर युद्ध करू शकत नाही ,  कारण महाराज विश्वकर्मा सोबत इतर सात मंत्री व मुत्सद्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.... आपण  युद्ध करणार हे तर नक्की पण जरा हुशारीने .  विक्रमाला आपण दाखवून देऊ आपण जेव्हा कट-कारस्थान करतो त्यावेळी शत्रूची कशी नाकाबंदी होते .  उद्या उगवत्या सूर्याबरोबर आपण आपला तळ उठवणार आणि जलधि राज्याच्या दिशेने निघणार ,  मात्र आपण अगदी मुंगीच्या गतीने हळूहळू निघणार . तेही रात्रीपर्यंत...   एकदा का विक्रमाची खात्री पटली की आपण निघून चाललो आहोत ,  तेव्हा एक तुकडी विक्रमाच्या तळावर जाऊन विश्वकर्मा ना सोडवणार व परत आणणार .  तोवर आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा आपण तयार करून ठेवायच्या व आपले मंत्री आपल्या गोटात आले की तोफा डागायला सुरुवात करायची...."      भगीरथाच्या या भाषणाने सेनेमध्ये जोश पसरला .  पण या योजनेसाठी ते सात जण नक्की कोठे ठेवले आहेत हे माहीत असणे गरजेचे होते ,  आणि ते शोधून काढण्याची जबाबदारी भगिरथाने घेतली . "  ज्या ठिकाणी त्यांना बंदिस्त ठेवले असेल त्या ठिकाणाहून मी काहीना काहीतरी खून करेन की जेणेकरून तुम्हाला ती अंधारातही दिसेल..."  असं म्हणत भगीरथ त्याची हेरगिरी करायला तयार झाला...
    विक्रमाच्या सैन्य तळापासून काही अंतरावरती एक नगर होतं . त्यांत भगीरथाने व्यापारी होत प्रवेश केला .  मदिरेच्या दुकानातून त्याने मदिरा घेतली . नंतर वैद्याकडून काहीतरी औषधे व सुगंधी द्रव्ये घेतली .  बराच वेळ तो सारकाही मिसळत होता .  त्याने एक प्रकारची सुगंधित मदिरा तयार केली . त्याच्या व्यापारी मित्राला त्याने एक प्यायला दिला , तो जागीच जिंगल आणि बेशुद्ध झाला .  ती मदिरा घेऊन तो विक्रमाच्या सैनिकी त्यावर जाण्यासाठी निघाला .  रात्र होण्याची वाट पाहत तो बराच वेळ थांबला .  इतके दिवस काही न करता बसून असलेल्या असलेल्या सैनिकांसाठी करमणूक म्हणून वेश्या घेऊन जाण्याचा त्याच्या डोक्यात विचार आला .  त्याला विश्वकर्मा व इतर जणांना बंदिस्त केल्याचे ठिकाण तर माहीत झाले होते . त्याच ठिकाणी त्याने वेश्यालयातून काही वेश्या नाचण्याच्या कार्यक्रमासाठी आणल्या .  नाचगाण्याच्या कार्यक्रमात गुंग झालेल्या सैनिकाला त्याने सुरुवातीला साध्या मदिरीचे वाटप केलं . नंतर जरा नशा चढल्यावरती ,  त्याने बनवलेली मदिरा   सर्वांना वाटली .  एकापाठोपाठ एक सर्व सैनिक बेशुद्ध झाले .  आलेल्या वेश्या आल्या वाटेने निघून गेल्या .  भगीरथाने एक मोठा टेंबा घेवून लांब बाबूवर बांधून हवेत उंचावला व  वाट बघत राहिला.....
     ठरल्याप्रमाणे घोडेस्वारांची एक जलद तुकडे विक्रमाच्या सैनिकी तळापासून काही अंतरावर ती थांबली होती . ज्या वेळी हवेत तरंगता टेंबा दिसला त्या वेळी 50 सैनिकांची तुकडी हळूहळू पुढे सरकू लागली . टेहाळणी पथकाचे सैनिक अधून मधून येत होते . त्यांचा तिथेच निकाल लावला जात होता .  शेवटी ते अपेक्षित ठिकाणी पोहोचले . सर्व सैनिक बेशुद्ध होते .  ज्या ठिकाणी विश्वकर्मा व त्यात सात जणांना बंदिस्त करून ठेवले होतं ते भुयार होतं . " आत  फार काही सैनिक नाहीत वरच्या सैनिकांचा तर निकाल लावलाच आहे . " भगीरथ त्यांना म्हणाला . ते सर्व कारागृहात पोचले . सर्वांना सोडून ते बाहेर पडू लागले.  पण समोरच एक सैनिक चालत येताना दिसला .  त्याला बेशुद्ध पडलेले सैनिक दिसले .  त्याचा हात कमरेच्या शंखाला गेला . तोवरच त्याच्या गळ्याचा एका भाल्याने वेध  घेतला .   तळातून बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच त्या रात्रीच्या शांततेत शंखाचा आवाज घुमला . बाहेर पडले खरे त्यांच्या मागे सैनिक लागले . भगीरथाने गडबडीत जळता तीर  त्यांच्या   स्वतःच्या तळावरती  सोडला ,  आणि ठरल्याप्रमाणे विक्रमाच्या सैनिकांवर तोफा दहाडून बरसू लागल्या . आता युद्धाला सुरुवात झाली होती....
    रुद्रा त्या जंगलातील जमातीचा प्रमुख झाला .  त्याला त्याच्या पदावर ती बसवण्यासाठी विशेष कार्यक्रम ठेवलेला होता . नाचगाणे मदिरा स्वादिष्ट जेवण सारं काही होतं . पण रूद्राचे मन थाऱ्यावर ती नव्हतं . मीरा अजूनही त्याला टाळत होती । सारा प्रसंग झाल्यापासून त्यांचं बोलणं झालं नव्हतं.  प्रमुखाच्या खोलीत तो समारंभासाठी तयार होत होता . मीरा काहीतरी ठेवण्यासाठी त्याठिकाणी आली . पण त्याला पाहताच ती गडबडीने निघुन जाऊ लागली .
   "  मीरा माझं म्हणणं ऐकून घे ..." तिला अडवत तो बोलला .
 "  काय ऐकून घ्यायचं आहे , ज्या लोकांनी तुला घर दिलं , परिवार दिला ,  प्रेम दिलं . त्यांचा कसा घात केला हे ऐकून घ्यायचं ; की स्वतःच्या फायद्यासाठी पोटच्या पोराचा ही बळी दिला हे ऐकून घ्यायचं ... "
   रुद्राला काहीच बोलता आलं नाही .
  " मला कळत नाही लोकांनी तुला का म्हणून प्रमुख केलं...?  लोक फसतील तुझ्यात चालीला . आरुषीला मारलं म्हणून तुझी पापं धुतली जाणार नाहीत , आणि एक लक्षात ठेव कोणताही निर्णय घेताना विचार करून घे .  नाहीतर तुझ्या मृत्यूची गुढ साक्षात देवालाही उघडता येणार नाही . "
    त्याचा हात बाजूला सारत रागारागात मीरा निघून गेली . रुद्र अधिकच खचला .  केलेल्या कृत्यांचा त्याला पश्चाताप होत होता . आता त्याला स्वतःचाच राग येऊ लागला . कोणत्या क्षणी त्यांना मदत करण्यासाठी तयार झालं असं त्याला वाटू लागलं . रागारागाने त्याने  वस्तूंची तोडफोड सुरू केली . शेवटी वैतागून त्याच्या डोळ्यातून पाणी आले.  त्याचा पश्चाताप खरा होता पण तो ते कसे सिद्ध करणार...  मीराच्या प्रमाणे ते लहान मुल त्याचेही होतं .  तो मुलगा त्याचाही होताच......
     समारंभ सुरू झाला सुरुवातीला नाचगाण्याचे करामतिचे ,  आणि नंतर नंतर मोठ्या योद्ध्यांच्या द्वंद्वाचे कार्यक्रम झाले . नंतर त्याच्याकडून शपथ घेण्यात आली      " हे जंगल ,  जंगलातील वृक्ष, वेली , पशुपक्षी  , प्राणी ,  कीटक ,  माती ,  हवा ,पाणी या सार्‍यांची सुरक्षा करण्याची माझी जबाबदारी आहे ...."
   त्यानंतर बराच वेळ कार्यक्रम चालत राहिले .  रुद्राने भरपूर मदिरा घेतल्यामुळे तो धुंदीत होता .  तो धुंदीतच त्याच्या खोलीत आला .  त्याठिकाणी मीरा बसली होती.... "  मीरा... मीरा ....
     तो रडत रडत तिच्याकडे गेला . तो रडत रडतच बोलत होता . पण त्याला बोलू न देता तिने त्याला झोपवले . त्याचे कपडे काढून बाजूला टाकत स्वतः विवस्त्र झाली .  रुद्र अजूनही धुंदीत होता . त्याच्या वरती आरुढ होत ती हालचाल करू लागली . काही वेळानंतर रुद्राचे बीज तिच्या गर्भाशयात जातात ती बाजूला झाली .  कपडे घालत मागील दाराने निघून गेली . ती मीरा नव्हती .  मात्र तेव्हाच पुढील दारा समोर उभी असलेली खरी मीरा रागारागाने तिथून निघून गेली ......

प्रलय-२१

प्रलय-२१

      काळोख होता .  घन काळा कातळ काळोख .  स्पर्श रूप रस गंध काहीच नव्हते . फक्त शब्द होते .  तेही मनात . मन तरी होतं का...? काहीच जाणीव नव्हती. कोण होता तो ?  काय होता तो ? फक्त शब्द होते . नि प्रश्न होते . बाकी काहीच नव्हतं . किती वेळ ..? वेळ तरी होती का..?  असेल तर कशाला सापेक्ष धरून मोजणार..?  निर्विकार अवस्था म्हणतात ती हीच का...? हळू हळू जाणीव आली .  त्याला स्पर्श जाणवला .  प्रकाशाला जणू त्याने स्पर्श केला होता .  नंतर दिसू लागला तो दिव्य सोनेरी प्रकाश , आणि येऊ लागला सुमधुर सुगंध . त्याला त्याच्या शरीराची जाणीव झाली .  नंतर सर्व आठवलं . तो आयुष्यमान होता . त्याला आश्चर्य वाटलं . आजूबाजूला फक्त प्रकाश होता .  तो स्पर्शू शकत होता पाहू शकत होता .  काय स्वर्गात आहोत की काय असा विचार त्याच्या मनात आला...
" नाही,  पुन्हा एकदा जन्माच्या मार्गावरती आहेस तू . "  चहुबाजूने आवाज आला . त्याने काही बोलायचे अगोदरच तो आवाज बोलू लागला
" होय तुझा मृत्यू झाला होता . पण तुझी निवड झाली आहे . तूच एक आहेस जो तिचा सामना करू शकतोस ,  तिला थांबवू शकतोस . तू जर फार उशीर केलास तर तुझी मोहिनी त्याच काळोखात असेल जिथे तू होतास .  तेव्हा फार उशीर झाला असेल . तुझ्यासाठी , मोहिनी साठी किंबहुना संपूर्ण जगतासाठी ... उठ जागा हो आणि हा अनर्थ होण्याअगोदरच थांबव....
    त्याच्या कानात आवाज घुमत गेला आणि त्याने हळुवारपणे डोळे उघडले .  तो पुन्हा एकदा त्या म्हातार्‍याच्याच महालात होता . त्याने उठायचा प्रयत्न केला पण त्याच्या छातीत भयंकर वेदना झाल्या.  त्याच्या छातीतुन सोनेरी प्रकाश बाहेर पडत होता . सुरकूच्या शेपटीला जो आकार होता ,  तो त्याच्या छातीत होता .  त्यांने त्याला स्पर्शुन पाहिले . त्याच प्रकाशाची संवेदन होती जी त्याला अगोदर जाणवली होती .
    " थोडक्यात वाचलास किंवा वाचवला गेलायस . तूर्तास तरी ... तो म्हातारा बोलत होता . " प्रलयकारीकिने स्वतः केलेल्या घावातून वाचणारा तू इतिहासात पहिला असशील . ......
    " पण ती मोहिनी होती , अचानक तिच्या डोळ्यातील भाव बदलले...
  "  बहुदा आत्म बलिदानाचा विधी त्यांनी सुरू केला असेल , मग मात्र चिंतेची बाब आहे..."  तो म्हातारा त्याच्या लांब पांढऱ्या दाढीवर बोटे फिरवत कपाळावर आठ्या आणित  तो म्हणाला . आता त्याचा आवाज फारच गंभीर झाला होता ... " जर आपण तिला लवकरच वाचवलं नाही तर , तिच्यावरती किंबहुना संपूर्ण पृथ्वीवरती काळोखाचे साम्राज्य असेल..."
      काळोख शब्द ऐकताच त्याच्या अंगावर शहरे आले .  चेहऱ्यावरती भीती दाटून आली . त्याची अवस्था पाहून तो म्हातारा म्हणाला ... " तू अनुभवलाय काळोख ,  त्याच्या बोलण्यासाठी तो थांबलाच नाही.."  तीच अवस्था असेल प्रत्येकाची , पण तीही सुरुवातीला नंतर जाणवेल , दिसेल ।  पण त्याचं काही चालणार नाही . जनु शरीरावरती दुसऱ्याचा नियंत्रण . त्यातही बर्‍याच पातळी आहेत . हे सर्वकाही  थांबवायचं असेल तर तिला थांबवायलाच हवं . जर तिला तू परत आणू शकत नसशील तर प्रसंगी तिचे बलिदान द्यावे लागेल.  हे इथेच संपलं नाही तर ....."
    तो म्हातारा खरच घाबरला होता . भीती त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती ...
" नाही नाही हे थांबायलाच पाहिजे . ...
   तो बाहेर गेला काहीतरी आवाज येत राहिले . येताना त्याच्या हातात एक काचेची कुपी होती । त्यात सोनेरी कांतीचे कसलंतरी जल होतं .  ते त्याने आयुष्यमानला पाजले. 
त्याच्या संपूर्ण शरीरात वेदनेचा कल्लोळ माजला . रक्त हाडे जनु साऱ्याचा चुराडा होत होता. काही काळानंतर त्याला नव्याने जन्मलेल्या सारखं वाटू लागलं . तो सुरुकूच्या शेपटीचा भाग त्याच्या छातीत सामावला होता .     
     " जा गडबड कर .  सांगितलेले लक्षात ठेव .  वाचवणं शक्य नसेल तर  ...... 
     आयुष्यमान च्या संवेदना तीक्ष्ण झाल्या होत्या .  सुरुकू बरोबर जणू मनातल्या मनात बोलू शकत होता .  सुरुकूच्या आठवणी बरोबर सुरूकू तिथे हजर झाला।   आयुष्यमान त्यावर ती स्वार झाला . त्याच्या मागे ते दोन बुटकेही स्वार झाले...


असाहय्यता अगतिकता या शब्दांचा गर्भित अर्थ त्याला कधी कळालाच नव्हता . आता मात्र त्याला या शब्दांची महती कळली होती . आयुष्मानसमोर प्रलयकारिक उभी होती . होय प्रलयकारिकाच मोहिनी नव्हे  . काळेकुट्ट डोळे त्यात कोणताच भाव नव्हता  . शरीर जरी तिचं असलं तरी दुसरंच  कोणीतरी त्याच्यामध्ये वावरत होतं . जणू मोहिनीच शरीर पांघरून काहीतरी अघोरी या जगात अवतरलं होतं . त्याला उशीर झाला होता . मोहिनीला वाचवण्यासाठी , प्रलयकारीकेला रोखण्यासाठी , त्याच्या प्रेमाची जी छोटीशी जळती ज्योत होती , ती टिकवण्यासाठी उशीर झाला . नि आता अधिक उशीर न होऊ देता , त्या मोहिनीसदृश्य दिसणाऱ्या आकाराला संपवायला हवं होतं . अन्यथा  फार मोठा अनर्थ होणार होता .
                                                             तो त्या म्हाताऱ्याच्या घरातून निघाला नि  तो मोहिनीच्या  शोधार्थ विचारांच्या प्रवाहात बुडून गेला .  एरवी विचारात इतर  मळवटे यायची तसे ती आली नाहीत . विचार स्पष्ट होते . त्याला बऱ्याच गोष्टी दिसत होत्या , जाणवत  होत्या ज्या त्याने कधी पहिल्याच नव्हत्या , अनुभवल्याचं नव्हत्या . त्याला आरुषी मोहिनी आणि जंगलातला तो प्रसंग दिसला . रुद्राचा लहान मुलगा मोहिनीच्या हाती मृत्यमुखी जाणं ,तिचं उदास होणं  . नंतर  झालेली त्यांची भेट . तो प्रणयाचा आवेग . त्याला सारे काही आठवले आणि नव्याने जाणवले . ज्यावेळी तिचा खंजीर त्याच्या हृदयाचा वेध घेत होता  , त्यावेळी तिचे डोळे जणू पांढरेशुभ्रच झाले होते . जणू पाटी  पुसून कोरी केली असावी  . त्यावेळी त्याला पार्थव दिसला , ते लहान मूळ दिसलं आत्मबलिदानाचा विधी ,  मारुतांचे जुने मंदिर , त्यांचा मुख्य पुजारी आणि त्याठिकानी उभी असलेली मोहिनी .  त्याचवेळी सुरुकु नि बुटक्यांसोबत तो मारुतांच्या  जुन्या  मंदिराकडे जायला वळला  . तिथे पोहचला खरा पण त्याला उशीर झाला होता . मधोमध असलेल्या आगीच्या डोहात ,  त्या प्रज्वलित ज्वालामुखीत मोहिनी आता उडी मारत होती . त्याने ओरडत तिला थांबवण्याचा  प्रयत्न  केला पण तिच्या  संवेदना जणू बधिर झाल्या होत्या . एखादा मृतदेह पडावा त्याप्रमाणे  तिने आपला देह ज्वालामुखीच्या डोहात फेकून दिला . आयुषमानला राग अनावर झाला . तो त्वेषाने  पार्थव आणि त्याच्या वडिलांवरती धावून गेला . दोघेही निष्णात तालवारबाज पण त्याच्यापुढे त्या दोघांचे काहीच चालले नाही . दोनचार डावपेचात त्यांना हरवत कड्यावरून खाली ढकलून दिले .
                                                                      तोवर इकडे   चित्रविचित्र आवाज येऊ लागले . ते लहान मूल कुठेच दिसत  नव्हते . त्या ज्वालामुखीवरती लाल तुफान आले होते रक्ताचे. हळू हळू ते तुफान जमिनीवरती आकार घेत होते .  पायापासून सुरु होत डोक्यापर्यंत तो मानवी आकार तयार झाला . ते शरीर मोहिनीचंच होतं  पण ती मोहिनी नव्हती ,  ती प्रलयकारिका होती . डोळ्यात  थंडपणा होता .  मोहिनीला वाचवणे आता कधीच शक्य नव्हते . आयुष्यमानला आता प्रलयकारीकेला   मारणे  भाग होते . ती जरी प्रलयकारिक असली तरी आयुष्मान साठी अजूनही ती मोहिनीच होती . मोहिनीचा मृत्यू त्याला कधीच  शक्य  नव्हता . त्याला मोहिनी आठवत होती . तो जागीच स्तब्ध झाला . पण त्याच्याबरोबर आलेले ते बुटके सावध होते . ते दोन बुटके  मोहिनीवरती धावून गेले . तिने  क्षणभरासाठी डोळे  मिटले नि पुन्हा उघडले . त्या काळ्याकुट्ट डोळ्याची कुणालाही भीती वाटली असती पण आयुष्यमान अजूनही तिथे मोहिनीलाच शोधत होता .  प्रलकारिकेवरती  धावत निघालेले बुटके उलटून आयुष्यमान वरतीच धावून आले . तिकडे प्रलयाकरिका पसार झाली नि इकडे आयुष्यमान त्या बुटक्यांसोबत लढत राहिला .


    भीती फार परिणामकारक ठरू शकते , फक्त युक्तीने तिचा वापर व्यवस्थित करता  हवा . एकदा भीती बसली  सांगितलेल्या आज्ञा आपोआप पाळल्या जातात .  त्याच भीतीचा अम्मल आता जंगलातील लोकांवरती होता . आरुषी व मोहिनी दोघीनी थोडे रक्त सांडले  व विरोध करायला असमर्थ आहेत हे दाखवून दिले नि ते गपचूप त्यांच्या आज्ञा पाळू लागले .  पण सर्वच घाबरत नव्हते . सर्व टोळ्यांच्या प्रमुखांना संदेश पाठवले होते . सर्व जंगली जमातीच्या प्रमुखाची निवड उद्या खुल्या मैदानात आव्हानाने केली जाणार होती . भीतीचा अंमल जरी असला  असला तरी परंपरेला  पूर्णपणे बाजूला सुरू शकत नव्हते कारण परंपरेविना असलेल्या पदाचा आदेश हे लोक फार काळ मानणारे नव्हते . आरुषीच्या बाजूने रुद्र लढणार होता .   एकेक प्रमुख  येत होता . प्रतेय्काला परस्तितीची जाणीव होती . इतकी वर्षे रुद्र त्या लोकात राहिला होता तो त्याच्याहून  फार वेगळा नव्हता  . जेव्हा त्याला त्याच्याच लोकांनी तडीपार केलं होत , मरणासन्न अवस्थेत तो जंगलात पडला होता . त्यावेळी याच लोकांनी त्याला  स्वीकारलं होत . त्याला त्यांच्यात मिसळायला वेळ लागला होता पण मीरा सुरवातीपासून त्याच्यासोबत होती कणाकणाने काळ सरत गेला नि तो त्यांच्यातलाच एक झाला . प्रत्येक गोष्टीसाठी त्याला संघर्ष करावा लागला होता पण त्या संघर्षातही मिराचे प्रेम  त्याच्यासोबत होते . त्या दोघांच्या प्रेमाला  सुरवातीला साऱ्यांनी  विरोध केला पण नंतर सारे काही  सुरळीत   झाले . दोघांचाही लाडका मुलगा राजकीय संघर्षासाठी हकनाक बळी गेला होता . इतकी वर्षे रुद्रा जिवंत आहे की मेलाय हेही ढुंकून न पाहणाऱ्या मारूतांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्याच्याशी संपर्क साधला .  त्याच्याशी गोडीगुलाबीने चार शब्द बोलले आणि न जाने कशामुळे रूद्राही त्यांच्या त्या गोड शब्दाला भुलला आणि मदत करण्यासाठी तयार झाला . इतकी वर्षे या लोकांमध्ये राहून , ज्या लोकांनी त्याला घर दिली त्यांच्याशी गद्दारी करायला निघाला होता . त्याला वाटलं नव्हतं की गोष्टी इतक्या खालच्या थराला जातील . मात्र आता त्याला पश्चाताप होत होता . ज्या मारूतांनी त्याला हाकलून लावलं होतं ,  त त्यांची मदत करत ज्या जंगलातील लोकांनी त्याला स्विकारलं होतं त्यांच्या विरोधात उभा राहणं त्याला पटत नव्हतं . पश्चातापाने तो जळत होता . मीराने त्याच्याशी बोलणं टाळलं होतं त्याचे जे मित्र होते तेही त्याच्याशी बोलेनासे झाले होते . तो एक गद्दार झाला होता आणि प्रत्येकाच्या नजरेत त्याच्याबद्दल द्वेष होता . जे घर त्यानं मिळवलं होतं तेही आता हरवलं होतं . आव्हानाचा दिवस उजाडला होता महाराणी असल्याप्रमाणे आरुषी उच्चासनावरती बसली होती .  मध्यभागीलढायची जागा आणि आजूबाजूला त्‍यांचे दंद्व बघण्यासाठी गर्दी जमली होती . रुद्रा उभा होता त्याच्यातर्फे आव्हान देण्यात आलं होतं . एक एक जण येत होता .  त्याच्या सोबत लढत होता .  प्रत्येकाची वेगवेगळी शास्त्रे आणि वेगवेगळ्या पद्धती .  कितीतरी डाव-प्रतिडाव टाकले जात होते । घाम आणि रक्त मातीत पडत होतं . रुद्रा साऱ्यांना वरचढ ठरत होता  . त्याने प्रत्येकाला हरवलं पण एकालाही जीवे मारले नाही त्यांच्यामध्ये पद्धत होती आव्हाना मध्ये एक तरी जिंकायचं किंवा मारायचं . पण रूद्रा प्रत्येक आव्हान जिंकत होता आणि हरलेल्या व्यक्तीला  जीवनदान देत होता .  ज्याचा स्वाभिमान खूप होता असा एखाद-दुसरा स्वतःहून मरत  होता . जेव्हा शेवटचं आव्हान रुद्राने जिंकलं त्यावेळी  तो विजयी म्हणून घोषित झाला . पण जल्लोष कोणीच केला नाही ना कोणी आनंद व्यक्त केला .
    "  तुमच्या नवीन प्रमुखाचा जय जय कार करणार नाही का....?  आरुषी म्हणाली रुद्राच्या काना तप्त लाव्हा यासारखे हे वाक्य गेले .  त्याच्या डोक्यात संतापाची आग पसरली . रागाच्या भरात त्यांनी तिथेच असलेला भाला घेतला आणि आरुषीच्या दिशेने फेकला .  गेल्याने काही क्षणात आरुषीची प्राणज्योत मावळली . मीराचा वडील , ज्याने कधीच त्याला जंगली मानलं नाही त्यांनीच रुद्राच्या नावाचा जयजयकार सुरु केला....
     

प्रलय-२०

प्रलय-२०

 
    महाराणी शकुंतलेपासून भक्तांनी   राजकुमारास घेतले .  तो राजकुमार त्यांनी ' त्याच्या '  ताब्यात दिला .  तो  तोच होता .  संपूर्ण शरीराभोवती काळे वस्त्र परिधान केलेला , विचित्र काळ्या पक्षावरती बसलेला .  त्याच्याभोवती सदैव काळ्या ढगांचे विचित्र आवरण असायचे .  बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना त्याचा चेहरा माहीत होता .  त्यामध्ये महाराणी शंकूतलेचाही समावेश होता .  ज्यावेळी राजकुमार त्याच्या ताब्यात दिला . त्यावेळी भक्त त्याच्या मागोमाग निघाले .  मात्र त्या भक्तांमध्ये मिसळून उत्तरेच्या सैनिक तळ्यावरती उपस्थित असलेला अभिजीत अद्वैतही निघाला .  हा तोच अद्वैत होता ,  जो तीनशेजनांच्या तुकडीचा प्रमुख होता .  ज्या तुकडीला भक्तांनी काही दिवसांपूर्वी नष्ट केले होते . त्याच्या हृदयात प्रतिशोधाची आग धडधडत होती .  त्यामुळे तो भक्तात मिसळून त्यांना नष्ट कसे करता येईल याचा शोध घेण्यासाठी त्याच्या मागोमाग निघाला होता..... मात्र काही अंतर चालत गेल्यानंतर तो काळा आकार म्हणजे ' तो ' थांबला .  त्याने काहीतरी हालचाल केली   .  ती कोणाला दिसली नाही ,  मात्र ते अंधभक्त आता आपापल्या वाटेने चालले होते . जणू त्यांच्यावरच नियंत्रण कुणीतरी काढून घेतलं होतं . आणि ' तो ' आता वेगाने निघाला होता ; ज्या ठिकाणी त्याला जाणं गरजेचं होतं......

       मारूत राजे जितकी वर्षे लपून होते तितकी वर्ष त्यांचे अस्तित्व टिकून होते.  तेही  फक्त लपून राहून .  मात्र आता ते खुल्या मैदानात आले होते . त्यांनी प्रलयकारिकेला जन्म दिला होता .  प्रलयकारिका संपूर्णपणे आरुषीच्या आज्ञेत होती .  ज्यावेळी मारुत राजांनी प्रलयकारिकेला निर्माण करणाऱ्या पुजाऱ्यांना आश्रय दिला , त्यावेळी त्यांना पुढील संकटाची जाणीव नव्हती .  मात्र त्या पुजाऱ्यांकडून जन्मोजन्मी सेवा करण्याची शपथ मारुत राजे घ्यायला विसरले नव्हते .  त्यामुळे ते पुजारी मारुती राजांसाठी बांधले गेले होते .  अशाच एका पुजाऱ्याच्या एक मुलगा म्हणजे तो होता.....

 त्याचं नाव पार्थव होतं . मारूत राजांचा मुख्य पुजारी ज्याने मारुत राज्यांसाठी प्रलयकारिकेला निर्माण केलं .  त्या पुजाऱ्याचा मुलगा म्हणजे तो पार्थव होता....

तो त्या लहानग्या राजकुमाराला घेऊन त्याच्या वडिलांसमोर उभा होता .
" बाबा आता ती वेळ जवळ आली आहे . प्रलयकारिकेची शक्ती वाढवण्याची .  प्राणिमात्रांवर चालत असलेली तिची शक्ती आता वाढवायला हवी .  मनुष्यांवर नियंत्रण करणे तिला फारशे अवघड जाणार नाही . आपण लवकरात लवकर या प्रक्रियेसाठी सुरुवात करायला हवी.....
" पार्थ तू खरच भोळा आहेस . तू मी सांगितलेलं सर्वकाही ऐकतोस . एकही प्रश्न न विचारता सर्वकाही करतोस . तुला वाटतं की मी हे जे सर्व काही करतो आहे ते मारुत राजांसाठी करतो आहे.....
" म्हणजे आपण हे त्यांच्यासाठी करत नाही का...?
" किती आणि काय काय नाही केलं आपण  ,   इतकं सर्व आपण दुसऱ्यासाठी करायचं काय गरज आहे ......?  महाराज सत्यवर्माच्या महर्षीची हत्या करून , त्याची त्वचा चोरून तू जे काही बोललास , राजाला ते खरं वाटलं . त्याने स्वतःच्या राजपुत्राला राजमहालासकट जाळून टाकलं .  ते आपण मारूतांसाठी नाही स्वतःसाठी केलं . नंतर महाराणी शकुंतलेला तुझ्या जाळ्यात ओढून घेऊन तिच्या पोटी गर्भ ठेवला तेही आपण मारुतासाठी नाही केलं . विक्रम जन्मल्यानंतर त्याला रक्षक राज्याचा महाराज बनवण्याचा  जो खटाटोप केला तो मारुतांसाठी नाही केला . जेव्हा त्याला सत्याची जाणीव झाली तेव्हा आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुवर्ण पात्र व त्यामधील मदिरा आपण मारुतांसाठी नाही निर्माण केली......

    आपण महाराज विक्रमांना आपल्या ताब्यात ठेवलं त्यांच्याकरवी आपण भिंत पाडण्याची आज्ञा दिली . मी स्वतः  बाटी जमातीच्या लोकांबरोबर समजूत करून त्यांच्या बासरीची शक्ती वापरून सामान्य जनतेला त्रिशूळ सैनिक बनवलं आणि जलधिंच्या सैनिका विरुद्ध उभा केले .  मी जलधि आणि रक्षक राज्यांमध्ये युद्ध लावले .  मी सर्वत्र कोलाहल माजवला . हे सर्व मारुरतासाठी नाही केले...... तर हे सर्व मी माझ्यासाठी केलं .  आता त्या लहान मुलाचा वापर करून , प्रलयकारिकेची शक्ती वाढवून तिला माझ्या नियंत्रणाखाली घेऊन मी संपूर्ण पृथ्वीतलावरती राज्य करणार . काळ्या भिंतीचे भय दाखवून मी माझा हेतू साध्य केला आहे . काळ्या भिंतीपलीकडील सम्राट कधी जागृत झालाच नव्हता . सर्व काही मीच केलंय. ते अंधभक्त , ते त्रिशूळ सैनिक ही सर्व माझीच कारस्थाने आहेत .  एकदा भिंत पडल्यानंतर सम्राटाला जाग येईल , तेव्हा त्या सम्राटाचा वापर करून  संपूर्ण पृथ्वीतलावरती माझे एकछत्री साम्राज्य असेल......

" पण बाबा तुम्ही तुम्ही असं कसं करू शकता .....
   पार्थव  खरच खूप साधा भोळा होता . त्याला त्याच्या वडिलांचा हा अवतार पाहून काहीच कळेना.....
" तू काही काळ काही काळ विश्रांती घे पार्थव .....
    असं म्हणत त्या पुजार्‍याने हवेत हात फिरवला . पार्थव त्या लहान मुलाला घेऊन त्याच्या कक्षात निघाला....

   राजमहर्षी  सोमदत्तांनी सांगितल्याप्रमाणे राजमहाला नजीक असलेला दीपस्तंभ पेटवून उडता बेटांच्या मदतीसाठी संदेश पाठवला होता , पण ती मदत येईल तेव्हा खरे...... त्रिशूळ सैनिकांवर ती कोणता उपाय  करावा यासाठी सर्वजण विचार-विमर्श , चर्चा करत होते .  आपल्याच लोकांना मारणे कुणालाही शक्य नव्हते , आणि त्यांना न मारावे तर त्यांचा स्वतःचा मृत्यू अटळ होता .  एका बाजूला विहीर तर एका बाजूला आड अशी त्यांची परिस्थिती झाली होती .  त्रिशूळ सैनिकांना मारावे तर सामान्य नागरिक मरत होते ,   सैनिकांना न मारावे तर त्यांना स्वतःला मरावे लागणार होते .  आपल्याच राज्यातील सामान्य नागरिक त्रिशूळ सैनिक कसे झाले हे त्यांना माहीत नव्हते .  त्यांना त्यांना माणसात कसे आणायचे याबद्दल त्यांचा याबद्दल त्यांची चर्चा चालू होते......
राज्यात जाऊन आलेल्या हेरांनी हेरप्रमुख कौशिकला बाजूला घेत काहीतरी सांगितले . कौशिकच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव आले होते .  तो समोर येत बोलू लागला.....
" महाराज आपण ज्या काही बाटी जमातीच्या टोळ्यांना आश्रय दिला होता , त्यातील बऱ्याच टोळ्या निघून गेल्या आहेत . आपल्या विश्वासू हेरांनी आणलेल्या बातमीनुसार बाटी जमातीच्या काही लोकांनी बासरी वाजवत आपल्या सामान्य जनतेला नियंत्रित करून त्यांच्या मागोमाग नेलं आहे....
      "  म्हणजे आपल्या लोकांना त्रिशूळ  सैनिक बनवण्यामागे बाटी जमातीच्या लोकांचा हात होता तर........"     महाराज कैरव रागाने बाटी जमातीच्या नायकाकडे बोट करत म्हणाले
"  ताबडतोब त्याला अटक करा.....
" नाही महाराज माझा यात काही दोष नाही ....मी फक्त एका टोळीचा प्रमुख आहे . अशा अनेक टोळ्या आहेत .  आमच्या टोळीतील लोक अजूनही तुमच्या आश्रयात आहेत . महाराज ज्या इतर टोळ्यांना तुम्ही आश्रय दिला होता त्यातील एक टोळी नेहमीच मारूतांच्या संपर्कात राहिलेली आहे .  त्या टोळीतील लोकांचा हा उपद्व्याप असावा असा मला संशय आहे.....
     तो बाटी जमातीचा नायक कळवळून बोलला.....
" आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. जर तुमचे लोक त्रिशूळ सैनिक बनवू शकतात , तर त्या सैनिकांना सामान्य माणूसही बनवू शकतात .  आत्ताच्या आत्ता मला माझे लोक माणसात आणायचे आहेत .  तुम्ही तयारी करा अन्यथा शिक्षा भोगायला तयार राहा......
महाराज कैरव संतापाने बोलले...
" क्षमा करा महाराज क्षमा करा ... त्रिशूळाचे सैनिक बनवण्याची शक्ती , बासरी ती धुन बाटी जमातीतील नाही... मारूतांच्या पुजाऱ्यांची ती प्रक्रिया आहे . आमच्या काही टोळ्या मारुताच्या पुजाऱ्यांच्या संपर्कात आहेत , त्या टोळ्यांचे हे कारस्थान असावे ......
     तो नायक रडकुंडीला आला होता
  " आत्ताच्या आत्ता सांगा आपण त्या लोकांना कुठे शोधू शकतो ...... तुम्हाला इतके सारा माहित असून तुम्ही इतका वेळ गप्प राहिला.... तुम्हाला आता शिक्षा नक्की होणार आहे....
सैनिकांकडे पाहत महाराज कैरव म्हणाले त्यांना बंदिस्त करून टाका...

    बाटी जमातीच्या  त्या टोळीच्या नायकाला एका खांबाला बांधले होते .  कौशिक त्याच्यासमोर उभा होता...
" मला सांग त्यात त्रिशूळ सैनिकांना सामान्य माणसात कसं आणायचं...?   तुम्ही त्यांचं वशीकरण कसं केलं..? त्यांच्यावरील नियंत्रण कसं काढायचं....?
कौशिक त्याला त्वेषाने प्रश्न विचारत होता...

     " मला खरच माहित नाही आमच्या टोळीचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही ....आणि मला त्याबद्दल माहिती असतं तर मी आधीच सांगितलं असतं.  मला फक्त एवढच माहीती आहे की आमच्या काही टोळ्यांचा मारुतांशी संबंध आहे ; पण मला माहीत नव्हतं की या त्रिशूळ सैनिकाच्या प्रकरणामागे त्यांचा हात असेल.  म्हणून मी बोललो नाही .....
तो नायक खरा बोलत होता
 "मला सांग कोणत्या टोळ्यांचा यामध्ये समावेश आहे आणि आता आपण त्यांना कुठे शोधू शकतो....

" मी खरं बोलत आहे मला काहीच माहित नाही . माहित असतं तर मी सांगितलं असतं ,  मी पहिल्यापासूनच तुमची मदत करत आलेलो आहे . मी खोटं का बोलेन...?

   " तुला काहीतरी सांगितलं पाहिजे .....!
       कौशिक वैतागला होता . रागाला जाऊन त्याने त्या त्याच्या श्रीमुखात भडकवली.....

    " मी खरं बोलत आहे याच्याहुण अधिक मला काही माहीत नाही . मी एवढी तुम्हाला मदत केली मी तुम्ही मलाच आरोपी समजत आहात ......"
तो नायक आता मुसमुसून रडत होता
तेवढ्यात एक हेर  सैनिक त्या ठिकाणी आला .  त्याने कौशिकला काहीतरी सांगितलं . कौशिकने ताबडतोब महाराजांचा कक्ष गाठला....
 " महाराज व्यत्ययाबद्दल क्षमा असावी . बाटी जमातीच्या काही टोळ्या मारूतांच्या जुन्या महालाकडे कडे जाताना दिसल्या आहेत.... महाराज या त्याच टोळ्या आहेत ज्यांनी आपल्या सामान्य नागरिकाला त्रिशूळ सैनिक बनवले .   आपल्या राज्यातील थोडेफार लोक या टोळ्यांच्या मागोमाग जाताना दिसत आहेत......
"  म्हणजे या टोळीतील लोकांना जर आपण पकडून आणलं तर आपल्या समोरील त्रिशूळ सैनिकाचं आव्हान संपुष्टात येऊ शकते. आपले लोक पुन्हा व्यवस्थित होऊ शकतात....
" होय महाराज..... पण त्यांनी काही लोकांना त्यांच्या बरोबर नेले आहे . वेळ पडली तर ते लोक आपल्या सैनिकांना विरुद्ध लढू शकतात . त्यामुळे आपण सरळ सरळ युद्ध करू शकत नाही.....
" भिंती पलीकडील त्रिशूळ सैनिक भिंत पडल्याशिवाय लढू शकणार नाहीत . त्यामुळे याठिकाणी थांबण्यात अर्थ नाही . सर्व सैनिकांना सामान्य माणसात आणायचा असेल तर त्या टोळीला कसेही करून पकडायला पाहिजे .  आणि त्यां टोळीला पकडण्याच्या अगोदर भिंत पाण्यापासून थांबवलं पाहिजे..... म्हणून काही सैनिक याठिकाणी थांबतील . बाकीचे सैनिक महाराज विक्रमावरती आक्रमण करायला जातील व उरलेले बाटी जमातीची ती टोळी पकडण्यासाठी........

    महाराज विक्रम आणि महाराज विश्वकर्मा ,  रक्षक राज्याचे जुने प्रधान हे दोघेही वाटाघाटीसाठी जमले होते . एका बाजूला विक्रमाची छावणी होती तर ददुसऱ्या बाजुला महाराज विश्वकर्माचे जलधि राज्याकडून आणलेली सेना होती....
महाराज विशश्वकर्मा बोलले...
" विक्रमा तु माझा पुतण्या आहेस आणि तू हे जे काही चालवले आहेस ते योग्य नाही . माझ्यामागे जलधि राज्याची सुसज्ज पाच हजारांची सेना आहे .  उरलेली सेना कोणत्याही क्षणी या ठिकाणी येऊन पोचू शकते .  तुझ्याकडे फक्त पाच हजाराची सेना आहे , आणि ते सैनिकही आपल्याच राज्याचे आहेत . आपल्या राज्यातील लोकांचा निष्कारण बळी देण्याचा माझा मुळीच हेतू नाही . म्हणून मी तुला सांगायला आलो आहे.   आत्ताच्या आत्ता आम्हाला शरण ये  आणि भिंत पाडण्याचा तुझा आदेश मागे घे , अन्यथा युद्धा वाचून आम्हाला पर्याय राहणार नाही...

" देशद्रोही आणि विश्वासघातकी माणसाला राज्याच्या हिताचे बोलण्याची काही गरज नाही . माझ्या राज्याचे हित कशात आहे हे मला माहीत आहे . भिंतीपलीकडे कोणाकोणाचे काय धंदे चालतात हे मला चांगलंच माहित आहे . भिंत पडल्यानंतर कुणाचं नुकसान होणार आहे हेही मला माहीत आहे . राजाने काय करायचं काय नाही हे तुम्ही शिकवण्याची मला गरज नाही....
" तू म्हणतो तसे असुदे .  भिंतीपलीकडे काही चालत असुदे , पण भिंतीवरून पलीकडे जाऊन तू त्या लोकांचा समाचार घेऊ शकतोस . त्यासाठी भिंत पाडण्याची गरज नाही . हे तुझ्या स्वतःचे विचार नाहीत . तुझ्यावरती कोणाचा तरी नियंत्रण आहे . तू कोणाच्या तरी नियंत्रणाखाली हे सारं करतोयस ...तू असा नाहीस...
       प्रधानजीच्या या वाक्यानंतर विक्रम क्षणभरासाठी थांबला . त्याच्या डोळ्यात निरागसतेची एक छटा दिसून गेली .  पण काही क्षणांतच तो बोलू लागला ....
    " कोण कोणाच्या नियंत्रणाखाली आहे , हे सारं जग पाहत आहे . राजसत्तेच्या हव्यासापोटी दुसऱ्या राज्याची सेना घेऊन स्वतःच्या राज्यावर आक्रमण करणारा राजा जगाने पूर्वी कधीच पाहिला नसेल....
" विक्रमा मी तुला कसं सांगू .  तु हे सर्व का करतोय ,  ते मला कळत नाही . भिंतीच्या कितीतरी गोष्टी तू लहानपणापासून ऐकत आला असशील . भिंत पडल्यानंतर होणारा मृत्यूचा तांडव तुला माहित नाही काय......?
" आता गपचूप तुम्ही तुमच्या सैन्यातळावरती जा .  नाही तरी या ठिकाणी मृत्यूचा तांडव व्हायला वेळ लागणार नाही.... हेच बोलण्यासाठी तुम्ही इतक्या सैनिकांनिशी आला आहात का ....? गपचूप माघारी जा अन्यथा तुमचा मृत्यू फार दूर नाही.....
महाराज विक्रम घोड्यावरती बसत म्हणाले
" विक्रमा तु आम्हाला युद्ध करण्यावाचून पर्याय ठेवलेला नाही....
  " कोण युद्ध करणार , तुम्ही....? महाराज विक्रमाने कुत्सित हास्य केले . त्याबरोबर महाराज विक्रमा बरोबर आलेल्या सैनिकांनी महाराज विश्वकर्मा बरोबर आलेल्या सैनिकांवर ती एकाच वेळी धावा बोलला . अचानक झालेल्या हल्ल्याने गडबडून गेले महाराज  विश्वकर्माचे सैनिक जागीच ठार झाले . वाटाघाटी करण्यासाठी सर्व प्रमुख लोक आले होते .  सर्व प्रमुखांना महाराज विक्रमाने बंदी बनवलं . जलधि राज्याची सेना आता नायकाविना पोरकी होती . त्यांना आदेश देणारा कोणीच नव्हतं....

   " जलधि राज्याच्या सैन्याकडे एक दूत पाठवा .  त्यांना म्हणावं तुमच्या सर्व प्रमुखांना जिवंत पाहायचं असेल तर आत्ताच्या आत्ता उलट्या दिशेने कूच करून जलधि राज्याकडे निघा....
   महाराज विक्रम त्या  बंधकांना घेऊन त्यांच्या सैन्यतळाकडे निघाले...

      तंत्रज्ञ मंदारचा मुलगा शौनक आणि वारसदाराच्या सभेचा भरत दोघे मिळून उत्तरेकडील सैनिकी तळाकडे निघाले होते . पण वाटेतच त्यांना अश्वराज पवन गाठ पडला .  त्याने उत्तरेच्या तळावर घडलेला सर्व किस्सा शौनकला सांगितला....

" मग आता काय करायचं....? भरत म्हणाला .
"  मंदारने तुम्हा दोघांना कसेही करून भिंत पाडण्यापासून रोखण्याची आज्ञा दिली आहे . त्याने हे दृश्यरूपांतरण कापड दिले आहे . त्याचा वापर करून सैनिकांना काहीतरी दाखवण्या बाबत मंदार बोलत होता..... अश्वराज पवन म्हणाला....
" बरोबर आहे भिंत पडल्यानंतर जे काही होईल तर सामान्य माणसाला कळलं म्हणजे सैनिकांना कळलं तर भिंत पाडायला कोणी धजावणार नाही .  एकदा भिंत पडण्यापासून रोखलं तर पुढच्या बऱ्याच गोष्टी टळतील .  बाबांचं म्हणणं बरोबर होतं . आपण लवकरात लवकर विक्रमाच्या सैनिकी तळाकडे निघायला हवं .  त्या ठिकाणी आपण सैनिकांना  काय होणार आहे ते सांगू.... परिणाम कळाल्यानंतर कोणीच भिंत पाडायला धजावणार नाही....
भरत व शौनक बरोबर अश्वराजही विक्रमाच्या सैनिकतळाकडे निघाले . त्या सैनिकांना सर्व काही सांगून भिंत पडण्यापासून थांबवायचा त्यांचा हेतू होता......
 
    आयुष्यमान आता पूर्णपणे बरा झाला होता .  त्याच्या समोर तो म्हातारा बसला होता बाजूला दोन बुटके आज्ञाधारकपणे उभे होते . सुरुकु आता त्याच्या चांगल्या सवयीचा झाला होता .  सुरुकु वरती बसून त्याच्यासोबत त्याने एक दोन छोटे प्रवासही केले होते .  आता त्याची प्रलयकारिकेला थांबवण्यासाठी प्रलयकारिकेला रोखण्यासाठी जाण्याची वेळ आली होती .
   " तू जाण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे.....
 तो म्हातारा बोलू लागला
" तू मला बरेच प्रश्न विचारले .  काही प्रश्नांची उत्तरे तुला मिळाली आहेत . काहींची तुला शोधावी लागतील ...आणि आता एका प्रश्नाचे उत्तर सांगतो ते म्हणजे प्रलय म्हणजे नक्की काय आहे.... तुझी निवड फक्त प्रलयकारिकेला थांबवण्यासाठीच नाही तर इतरही बऱ्याच गोष्टींसाठी झाली आहे . प्रलय नक्की कशामुळे येतो आणि का येतो हे मी आता तुला सांगणार आहे....
कितीतरी हजारो वर्षांपूर्वी देव आणि मानव एकत्र हसायचे एकत्र राहायचे . ईश्वराने कितीतरी प्रकारचे प्राणी निर्माण केले .  वनस्पती निर्माण केल्या .  वेगवेगळे जीव निर्माण केले . त्यातील बरीच जीव मानवा हून बुद्धिमान होते .  मानवाहुन संवेदनशील होते . मात्र मानव हा नेहमीच ईश्वराचा लाडका प्राणी राहिला आहे....
जरी मानव हा विश्वाचा सर्वात लाडका असला तरी मानवानेच ईश्वराला सर्वात जास्त त्रास दिला आहे मानवाला नेहमीच शक्तीचा मोहर राहिलेला आहे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी कोणतेही कृत्य करायला मागेपुढे पाहिले नाही फार पूर्वी ज्या वेळी देव आणि मानव एकत्र राहायचे . त्या वेळी एका मानवाने एक घोर पापकर्म केले . आणि त्याचे फळ म्हणूनच त्या ईश्वराने संपूर्ण पृथ्वीला श्राप दिला . आणि तो श्राप म्हणजेच प्रलय होय....
" कोणते पाप कर्म केले , आणि श्राप म्हणजे नक्की कशा प्रकारचा दिला ......" आयुष्यमान विचारले . पण तेव्हाच सुरुकु  जोरजोराने ओरडू लागला . त्या म्हाताऱ्याला   आणि आयुष्यमानलाही त्या ओरडण्याचा अर्थ समजला .   आयुष्यमानला आता निघावे लागणार होतो .  सुरूकुला प्रलयकारिकेची जाणीव झाली होती . तिचा सामना करण्यासाठी आयुष्यमान सुरूकुवरती स्वार होत हवेत उडाला.....

      सुरुकुची गती प्रचंड होती . काही काळ उडाल्यानंतर त्याने गती कमी करत सुरुकु  खाली उतरला . आयुष्यमान ला एका बाजूला मोहिनी बसलेली दिसली तिच्या डोळ्यात आसवे जमा झाले होते ज्या वेळी तिने रुद्राचा तो लहान मुलगा मारला त्यावेळी तिला काहीतरी वेगळीच जाणीव झाली .  आपलं जीवन हे नाही . आपले जीवन काहीतरी वेगळा आहे .  त्या ठिकाणाहून बाजूला होत गरुडावर बसून ती  दूर आली होती . तिला त्रास होत होता .  तिला काहीच आठवत नव्हतं.....

    ज्यावेळी तिला आयुष्यमान दिसला त्यावेळी तिला सारं काही आठवलं .  तिने पळत येत आयुष्यमानला मिठी मारली . दोघेही एकमेकांच्या सहवासाचे भुकेले होते..... वस्त्रांचा अडसर बाजूला झाला .  ते दोघे एकमेकांचे शरीर अनुभवत होते.... ओठाला ओठ मिळाले . दोघे सुखाच्या गर्तेत बुडून गेले.... ती मोहिनी होती आणि तो आयुष्यमान होता आणि दोघेही एकरूप झाले होते .  सुखाच्या परमोच्च क्षणी मोहिनीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली .  तिच्या हातात खंजीर होता आणि त्या खंजीराने आयुष्यमानच्या  वेग घेतला.....

    "   प्रलय येणार आहे  मनुष्यजात नष्ट करण्यासाठी ....  एकही मनुष्य प्राणी या पृथ्वीतलावर जिवंत राहणार नाही . पण जो कोणी माझं अनुकरण करेल आणि जो कोणी माझा अनुयायी होईल .  त्याला या पृथ्वीतलावर कशा पासूनच धोका नाही .  जो कोणी माझा अनुग्रह नाकारेल , जो कोणी माझा अनन्वय  नाकारेल त्याला प्रलयाची भीती आहे .   माझ्या अनुयायांना प्रलयापासून संरक्षित करण्याची माझी जबाबदारी आहे ......

       माझा अनुयायी होण्यासाठी तुम्हाला फार काही करायचे नाही . हे पवित्र जल तुम्ही प्राशन करा .  जे माझे पवित्र पाय धुऊन काढलेले आहे  , आणि माझ्या सर्व आज्ञांचे पालन करा ...... "

    मोठ्या जनसमुदायासमोर उभारून तो भाषण करत होता . तो स्वतःला देव म्हणत असे . प्रलयानंतर येणाऱ्या नवीन जगाचा जणू तो स्वामी असणार होता .

" तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पहा .....

    असं म्हणत त्याने त्याच्या अनुयाकडे हेतुपूर्वक पाहिले .   त्याच्या अनुयायांनी हवेत दोन गोळे फेकले .  हवेत गेल्यानंतर ते फुटले . त्याच्यातून धूर बाहेर निघाला .  व  त्यांच्यासमोरील संपूर्ण आकाश एक काळ्या छायेखाली भरून गेलं . हळूहळू त्यामध्ये दृश्ये दिसू लागली . ती दृश्ये पाहून जनसमुदायाचा थरकाप उडाला .  सर्वजण त्याच्या पुढे गुढगे टेकून पवित्र जल पिऊ लागले.....