Saturday 23 June 2018

शोध एक मराठी THRILLER कादंबरी

ह्या अशा पुस्तकांवर मराठी चित्रपट का बनत नाहीत....?
शोध हे मुरलीधर खैरनार यांनी लिहिलेलं अस्सल मराठी थ्रिलर .......
एकदा वाचायला घेतलं की संपूर्ण झाल्याशिवाय खाली ठेववत नाही .......
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा जेव्हा सुरत लुटली तेव्हा चा हरवलेला खजिना , त्याचा सुरू असलेला शोध , एका व्यापारी घराण्याचा हरवलेला शिवमंथक नावाचा मानिक आणि त्यामुळे येणारी समृद्धता त्यामुळे तो मिळवण्यासाठी असणारा खोजनार ,  विरुद्ध उद्धारक समाज ,  आणि या सर्वांबरोबर रयतेच्या   भल्यासाठी कटिबद्ध असलेले स्वराज्याचे शिलेदार ,त्यांच्यात रंगत जाणारा संघर्ष कडेपर्यंत वाचकाला खिळवून ठेवतो....।

       सारांश छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत तुटली आणि खजिना घेऊन स्वराज्याकडे येऊ लागले त्यावेळेस शत्रूला चकवा देण्यासाठी खजाना चे दोन भाग करून दोन वेगवेगळ्या मार्गांनी रायगडाकडे रवाना केली त्यातल्या एकच भाग रायगडाकडे पोचला दुसरा भाग रायगडाकडे पोहोचण्या अगोदरच तो मोगलांच्या हाती सापडण्याची शक्यता दिसू लागल्या त्यामुळे दुसर्‍या गटाचे नेतृत्व करणारा गोंदा जी नारो याने शिताफीने खजाना एका डोंगरात लपवून ठेवला व त्या खजान याचा नकाशा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवून ठेवला मात्र मोगलांच्या हाती लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र मृत्यूपूर्वी त्याने त्या नकाशा विषयीची माहिती एका संदेशात लिहून तो संदेश एका इंग्रज अधिकार्‍याच्या हाती केला मात्र काही कारणाने तो इंग्रज अधिकारी इंग्लंडला रवाना झाला व तिथेच मृत्यू पावला कादंबरीची सुरुवात होते ती त्या इंग्रज अधिकार्‍याच्या नातीने तो दिलेला संदेशाचा तुकडा पाहिल्यावर आणि ती भारतात यायला निघते तिथून सुरू होतो शोध त्या खजाण्याचा ....