Monday 23 December 2019

अनंत प्रेमचक्र अर्थात The Infinite Loop Of Love

1

I love you .... प्रीती

रवीच्या  मोबाईलची नोटिफिकेशन रिंग वाजली . तो मोबाईल घ्यायला जाणार तेव्हा ती म्हणाली .
" मी काय म्हणतेय ....
रवीने मोबाईल काढला .  त्याच्या मित्राचा मेसेज होता .
' Come tonight , project work  ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. 
" I love you too ....
" मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती चढ्या आवाजात म्हणाली ...
तो मोबाईलवर टाईप करत करत म्हणाला ' ok cu then "
" मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली  डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....." रवि तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला .  त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला . या आठवड्यात लग्नावरती होणारा हा तिसरा वाद होता . तो तिच्यावरती प्रेम करायचा .  अगदी मनापासून . दोघांनीही त्यांच्या पुढच्या आयुष्याची स्वप्ने रंगवली होती .  लग्न ,  मूले , घर संसार . पण अजून त्याला थोडा कालावधी होता . प्रीतीने  अचानकच का विषय काढला हे त्याला समजत नव्हतं . अजून  वर्ष होतं डीग्री कम्प्लीट व्हायला . डिग्री झाल्यावरती लग्नाचं नक्कीच होतं....

" डिग्री झाल्यावरतीही करायचंच आहे , आणि आताही करायचंच आहे ......" प्रीती अजून जोराने ओरडत म्हणाली , " तू करणार आहेस की नाही....?  त्यावेळीच शेजारच्या रूम मध्ये होम थियटरवरती जुनं ' क्या हुवा तेरा वादा ' गाणं लागलं होतं ...

" Shit  यार ..... प्रीती  तिसऱ्यांदा वाद घालतेय  तू या विषयावरती......  " रवि चिढून म्हणाला . त्याच वेळी स्टडी रूम मधील खिडकी वाऱ्याने जोरात आदळली . रवीने  स्टडी रूम मध्ये जात खिडकी लावली . त्याच्यापाठोपाठ प्रीतीही  रूममध्ये आली

" मी वाद घालतेय ,  मी......? "  प्रीती कपाटातल्या वह्या खोलीत इकडे तिकडे फेकत म्हणाली .

" प्रीती माझी प्रोजेक्ट बुक आहे तिथं ,  ते फेकू नकोस..... "  रवी अधिकच ओरडत म्हणाला . त्याच वेळी रवीचा फोन वाजला त्याच्या प्रोजेक्ट गाइडीचा फोन होता . एक मिनिट थांबा जरा सरांचा फोन आहे...

" प्रोजेक्ट बुक महत्त्वाचं आहे , तुझं फोनवरती बोलणं महत्वाचं आहे आणि मी बोलते ते नाही .... "  प्रीतीने ते प्रोजेक्ट बुक घेत फाडून टाकले .  रवीने  फोन बाजूला ठेवत रागाच्या भरात तिच्या गालावर चापट मारली....

" काय लावलय लग्न लग्न आं .... करायचं तर आहेच ना...  मी काही कुठे पळून चाललोय का .... "  तो रागारागात बोलून गेला . तो फोन उचलला गेला पण तो पर्यंत फोन बंद झाला होता .  प्रीतीच्या डोळ्यात खळकन पाणी आले . ती रडू लागली . डोळ्यातून टपकणाऱ्या आसवांमुळे समोरचे सारे काही धुसर झालं होतं . ती खाली बसून ओक्साबोक्शी रडत होती . रवीला आता अधिकच वाईट वाटू लागलं . तेव्हाच दारावर ती थाप पडली . दोघांनी पिझ्झा मागवला होता . पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा देऊन गेला.   तो तिला मिठीत घेऊन शांत करू लागला .

"  का ...? का..... ?  तू सारखा सारखा लग्नाचा विषय काढतेस ,  सांग बर मला..... "  तो शांतपणे तिला म्हणाला .

प्रीती रडत रडत हुंदके देत म्हणाली  ...
" कारण मी pregnant आहे रवि  , मी  pregnant आहे ...

"  काय ....? कसं शक्य आहे हे .....?  " रवी आश्चर्य करीत  म्हणाला....

" मला वाटलंच होतं तू अशी रिएक्शन देशील म्हणून ......"  ती रडत रडत त्याला मारत बोलू लागली...... " मला माहित होतं , मला माहित होतं ......"
ती त्याला बराच वेळ मारत राहिली . रवी काही न समजून तसाच बसून राहिला .

  " मी घरी चाललेय .  मला कोणा पुरुषाची गरज नाही .  मी माझी माझी काळजी घेऊ शकते ....."  तिने तिची बॅग भरायला सुरुवात केली .

 " प्रीती ऐक ना , माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता .  गडबडीत तसं बोलून गेलो..... आपण पिझ्झा खात शांतपणे बोलू ना...."

" कसा नव्हता , हां ,  कसा नव्हता  अर्थ ,  करताना मज्जा येते . जबाबदारी घ्यायची वेळ आली की कसं शक्य आहे .....? मला काय माहित कसं झालं ते .  आपण प्रिकॉशन तर घ्यायचो ना ...  झालं ते झालं...  मी जबाबदारी स्वीकारली आहे . मला कोणाच्या आधाराची गरज नाही.....

" पण प्रीती आपल्याकडे अजूनही ऑप्शन्स आहेत की......

" ऑप्शन्स म्हणजे.....  सरळ सरळ अबॉर्शन का म्हणत नाहीस . मला एक मिनिट थांबायचं नाही इथे .  प्रीती रागाने निघून गेली . रवीने हरप्रकारे तिला थांबवण्याचा प्रयत्न केला . पण शेवटी ती निघून गेली .

    जेव्हा कॉलेज लाइफला सुरुवात झाली तेव्हापासून त्यांचं प्रेम होतं . डिग्रीलाही दोघांनी एकाच ठिकाणी ऍडमिशन घेतले . ते प्रेम वाढतच गेलं .  दीड वर्ष झाला ते दोघेही एकत्र राहत होते.  दोघांचेही एकमेकांवर भरपूर प्रेम होतं.  पण एवढा मोठं भांडण त्यांच्या कधीच झालं नव्हतं . रवीने कधीच प्रीतीवरती हात उगारला नव्हता , ना  कधी आवाज चढवुन बोलला होता . वादा वादी व्हायची पण इतक्या टोकाची कधीच नाही .... रवीला  अपराधीपणा वाटू लागला त्याची रिॲक्शन चुकीची होती .  ज्यावेळी तिला सपोर्ट करायची गरज होती त्यावेळी तो भलतच बोलून गेला होता .   तो तसं का बोलला असेल याचाच विचार करत बसला . त्याला स्वतःचाच राग येऊ लागला .

      प्रीती जाऊन आता बघत बराच वेळ झाला होता .  तो लगेच निघाला , पण त्याला तिच्या घरी पोहचायला उशीर झाला होता . ज्यावेळी तो तिच्या घरी पोहोचला होता त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता . का ? कसा ?   कशामुळे ?  या गोष्टी तर होत्याच . पण नाकात कापूस घातलेल्या मृत प्रीतीला बघून त्याच्या पोटात खड्डाच पडला . सारे जग त्याच्या भोवती फिरू लागलो . तो चक्कर येऊन खाली पडला . पण खाली जमीन नव्हतीच .  अमर्याद खोल असलेल्या पाताळात तो कोसळत चालला होता . आणि तो अचानक थांबला .
त्याने डोळे उघडले समोर प्रीती  जिवंत होती  . ते त्या दोघांच्या एकत्र राहत असलेल्या खोलीत होते  .
 
प्रती बोलत होती .....
" I love you
रवीच्या मोबाईलची नोटिफिकेशन रिंग पुन्हा एकदा वाचली .  त्याच्या मित्राचा मेसेज होता ' Come tonight , project work  ' मेसेज वाचत वाचतच रवी म्हणाला. 
" I love you too ....


रवी चक्रावूनच गेला . म्हणजे त्यांनं जे काही पाहिलं ते भविष्य होतं का ...?  स्वप्न होतं ...?  ते घडलं होतं का घडलं नव्हतं ....? का पुन्हा तसेच घडणार होतं ..... त्याला काहीच कळेना.....

" मग लग्न करायला काय हरकत आहे तुझी .... " प्रीती   पुन्हा म्हणाली ...    . त्याच्या हातात मोबाईल होता त्याने मेसेज टाईप केला ' c u then '

रवीला पुढे काय बोलायचं ते कळेना .  तो नकळत बोलून गेला ..." मी नाही म्हणत नाही पण आत्ताच नको , आपली  डिग्री तर कम्प्लीट होऊ दे....."   त्याने मोबाइल बाजूला ठेवला .

आतापर्यंत त्याने जे काही पाहिलं होतं अगदी तसंच्या तसं झालं होतं . नक्की काय चाललं होतं हे त्याला कळेना...... ?

 " डिग्री झाल्यावरतीही करायचंच आहे , आणि आताही करायचंच आहे ......" प्रीती पुन्हा तेच म्हणाली , " तू करणार आहेस की नाही....?  शेजारच्या रूम मध्ये पुन्हा एकदा गाणं वाजलं ' क्या हुवा तेरा वादा.... '

मग तर त्याची खात्रीच पटली . सारं काही पुन्हा एकदा घडत होतं . मागच्यावेळी रागाच्या भरात काय झालं होतं हे आता त्याला माहीत होतं . तो शांतपणे तिला म्हणाला
 "  प्रीति पिझ्झा येउदे आपण पिझ्झा खात शांतपणे बोलू..... "  सारं काही तसेच घडत असल्यामुळे रवी जरा बावरला होता .  त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं .
    त्याच वेळी स्टडी रूम मधील खिडकी जोरात आपटली ...  रवी खिडकी लावायला स्टडी रुम मध्ये गेला त्याच्यापाठोपाठ प्रीती ही आली .  कपाटातल्या वह्या इकडे तिकडे फेकत ती म्हणाली .

" काय बोलतेय मी ...... लक्ष तरी आहे का तुझं .....? "
यावेळी तो काहीच न बोलता शांत राहिला त्याच वेळी फोन वाजला .  त्याने फोन उचलून पाहिला फोन प्रोजेक्ट गाइडचाच होता . त्याने फोन उचलला नाही तो तसाच शांतपणे उभा राहिला . त्याला काय करावं कळत नव्हतं आश्चर्य भीती  सार्‍या भावनांचा मेळ झाला होता .

  " काय उभा आहेस ढिम्मासारखा .... कोणाचा फोन आहे बघ तरी....?  प्रती

रवीला काय बोलावं कळत नव्हतं . त्याच्या चेहर्‍यावरचे भाव विचित्र होते . तो अस्वस्थपणे हालचाल करत होता .
  " मी काय बोलतेय तुझं काय भलतच चाललय....?
      त्याचवेळी दारावरची थाप पडली तो पिझ्झा डिलिव्हरी बॉय होता . रवीने दार उघडत पिझ्झा घेतला .
पिझ्झा ठेवत त्याने प्रितीला खाली बसवले .

   " प्रीती माझं ऐकून घे प्लीज .... मला माहित आहे तू प्रेग्नेंट आहेस म्हणून . आपण लग्नही करूया ... पण तू घरी जाउ नकोस घरी गेलीस तर तुझा मृत्यू होईल मी पाहिलय....

   " तुला कसं माहित आणि काहीही काय बोलतोयस ....?  प्रेग्नेंट आहे म्हणून मला लग्न करायचं आहे असं वाटतंय का तुला.....? तुला वाटते का मी तुझ्या गळ्यात जबरदस्ती पडतेय.....

"  तसं नाही म्हणायचं मला हे सारं अगोदर घडलंय आणि पुन्हा एकदा घडतय....

" तुला जबाबदारी नको असेल तर तसं सांग मला कोणा पुरुषाची गरज नाही.....

"  प्रीती जबाबदारीचा विषय नाही . उगाच काहीही बोलू नकोस . माझं एकूण तरी घेशील का....?

" काय ऐकून घ्यायचा आहे अजून.....?

" माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुझ्यासोबत लग्न करायचं आहे . पण दोन दिवस थांब फक्त दोन दिवस .  तू आज जर घरी गेलीस तर तुझा मृत्यू होणार आहे.....

" मी घरी जायचं नावही काढलेले नाही... काहीही काय बोलतोयस ? नको असेल तर सरळ नाही म्हणून सांग...  उगाच अभद्र बोलू नकोस . सरळ सरळ सांग निघून जा म्हणून.....

आणि पुन्हा एकदा प्रीती बॅग भरून घरी निघाली .  यावेळीही रवीला तिला थांबवणे शक्य झाले नाही  . मात्र यावेळी तो तिच्या पाठोपाठ घरी गेला . पण यावेळीही त्याला वेळेवर पोहोचता आले नाही . पुन्हा एकदा त्याला मृत प्रीती दिसली .  पुन्हा एकदा तो जमिनीवर कोसळला आणि पातळाच्या खोल गर्तेत कोसळतच गेला . यावेळीही तो अचानक थांबला.  त्याने डोळे उघडले समोर प्रीती होती . ती बोलत होती

" I love you .....

     रवीला आता कळालं होतं तो एका टाईम लुपमध्ये फसला होता . ठराविक वेळ तो पुन्हा-पुन्हा जगत होता . यावेळी त्याने कसेही करून प्रीतीला थांबवण्याचे ठरवले .


2

   ही तिसरी वेळ होती . यावेळी त्याला सारा घटनाक्रम पाठ झाला होता . मोबाईल वर येणारा त्याच्या मित्राचा मेसेज . नंतर वाजणारे क्या हुआ तेरा वादा हे गाणे . नंतर आदळणारी खिडकी . नंतर दारावर पडणारी थाप नि येणारा पिझ्झा डिलिव्हरी बॉय.  नंतर निघून जाणारी प्रीती .  नंतर होणारा तिचा मृत्यू . आणि पुन्हा एकदा होणारी सुरुवात .  यावेळी तो सावध होता तिला अजिबात दुःखी करायचं नाही असं त्याने ठरवलं .

    त्याने प्रीतीला सोफ्यावरती बसवलं .  तिच्या समोर बसत तिचे दोन्ही हात हातात घेत तो म्हणाला...
   "  I love you too प्रीती .... लग्न करूया म्हणतेस ना , चल  आजच्या आज आपण कोर्ट मॅरेज करून टाकू.... माझ्या दोन मित्रांना साक्षीदार होण्यासाठी आत्ता बोलावतो.....  त्याचा मोबाईल वाजला . त्याने तो स्विच ऑफ करून बाजूला ठेवला .

    " खरं म्हणतोस ......" प्रीतीला अगदी आभाळ ठेंगणं झालं .

"  हो खरंच....  पण आधी आपण कोर्ट मॅरेज करू या मग तू घरी सांग..... "  रवीला माहित होतं ती आज घरी गेली तर काय होणार होतं ....

" तसं कशाला ....? मी आज घरी जाते .  सारं काही सांगते . मग तू भेटायला ये . मग आपण पद्धतशीरपणे सारकाही ठरवूया...."  त्याच वेळी शेजारच्या रूम मध्ये क्या हुआ तेरा वादा हे गाणं वाजू लागलं .

" नको नको . तू एकट्यानं जायचं नाहीस . मी येतो तुझ्याबरोबर . आपण दोघे मिळून सांगू ....  रवी म्हणाला ...

" नको रे..... मला माहित आहे माझे बाबा कसे आहेत ते....  माझं ऐक .  मी जाते आधी सांगते . वातावरण शांत करते .  मग तू भेटायला ये.....  प्रीती म्हणाली . त्याच वेळी स्टडी रूम मधील खिडकी आदळली . तरीही रवी तिथेच बसला .

"  नाही मी तुला एकटीला जाऊ देणार नाही .... "  तो लाडीकपणे तिला जवळ घेत बोलला . " आता काळजी घ्यायला पाहिजे तू ... "  तिच्या पोटावरती हात फिरवत तो म्हणाला .

" म्हणजे इतके दिवस तुला माहीत होतं...."  प्रीती

" काय माहित होतं काय बोलतेस तू...." रवी गडबडून म्हणाला . त्याला माहीत होतं हा विषय निघाला की ती रागाला जाणार पण नकळत तो बोलून गेला .

" तू म्हणालास ना आता काळजी घ्यायला पाहिजे तू .... "  प्रती

"  हो कारण आता तू माझी पत्नी होणार आहेस...."  हसण्यावारी नेत , विषय बदलत तो  म्हणाला .
"  तू काय म्हणतेस काय माहित होतं....? " 

त्याच वेळी दारावरती थाप पडली . पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला होता .  रवीने पिझ्झा घेतला .
" काय म्हणत होतीस तू ...?

" काही नाही रे परत सांगेन तुला ... "  प्रीती विषय टाळत म्हणाली ....
"  सांग ना ... पिझ्झाचा घास तिला भरवताना रवी लाडिकपणे म्हणाला
"  अरे मी प्रेग्नेंट आहे....
" काय....! यावेळी हा उद्गार आनंददायक होता
" ही तर आनंदाची बातमी आहे की ...
   रवीच्या चेहऱ्यावरती आनंद बघून प्रीतीला अधिकच आनंद झाला .....
"  मला वाटलं होतं घाबरशील म्हणून मी सांगितलं नव्हतं आय एम सॉरी ...    प्रीती चेहरा पाडून त्याला बिलगली .
" वेडी कुठली मी कशाला घाबरू , घाबरायला तर तू पाहिजे . उलट तू तर खंबीर आहे , मग मला कशाची काळजी ....
" अरे पण मला abortion करू वाटत नाही....
 " तुला कोण कर म्हटलंय का ...?
  "  अरे पण मग माझं ग्रॅज्युएशन  कसं होणार....? मुलाकडे कोण लक्ष देणार आणि साऱ्या खर्चाचं काय करायचं....? 
" तू नको टेन्शन घेऊ . मी माझ्या घरी आपल्या दोघांबद्दल  सांगितले आहे . आमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही....
" खरं....  " प्रीतीला खूप आनंद झाला होता .
" तू तुझ्या घरी सांगितले .  मी अजून काही सांगितले नाही . आईला फक्त माहित आहे . म्हणून म्हणते मी आज जाऊन घरी सांगते .  मग तू भेटायला ये . मग पुढच्या गोष्टी ठरवू ....
" काय काही गरज नाही घरी सांगायची . आपण दोघेही कायदेशीरपणे बालिका आहोत त्यामुळे आपण संमतीने लग्न करू शकतो .
" असं कसं म्हणतोस रे .  हे मुलं वाढवायचा असेल तर दोन्ही घरी माहित असणं आवश्यक नाही का... एक माझं मी जाते...
" तू एकटीने जायचं नाही मी ही  तुझ्या बरोबर येतो ...

आणि दोघेही प्रीतीच्या घरी जाण्यास निघाले . ह्यावेळी रवीला विश्वास होता .  प्रीतीचा मृत्यू होणार नाही . कारण तो तिच्या बरोबर चालला होता .  प्रीतीचा मृत्यू होण्याअगोदर तो स्वतःचा जीवही द्यायला मागेपुढे बघणार नव्हता .


दोघेही रेल्वेमध्ये बसले .  एकमेकांच्या कुशीत  दोघेही आनंदात होते . ते दोघेही त्यांच्या जगात होते बाहेरच्या जगाचा त्यांना पूर्णपणे विसर पडला होता .  रेल्वेमध्ये अधून-मधून फेरीवाले येत होते . काही ना काही सामान विकण्यासाठी ओरडत होते . त्यांच्या समोरच्या बाकावरती एक वृद्ध माणूस बसला होता . डोक्यावरती  cowboy टोपी होती . मोठा भिंगाचा चष्मा होता .  पाढरी दाढी बोटभर वाढलेली होते . समोर त्याने पेपर धरला होता . पण त्याची नजर त्या दोघांवर स्थित होती .  त्या दोघांना आनंदी पाहून जणु काही त्याचा जळफळाट होत होता . प्रीतीच्या गावी पोहोचता पोहोचता संध्याकाळ झाली . उतरल्यावरती ते एका हॉटेलमध्ये चहा प्यायले . त्यावेळी हॉटेलमध्ये रेल्वे मधील तो वृद्धही होता . दोघांकडे टकमक बघत होता . पण त्या दोघांचं अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हतं .  स्टेशन पासून तिचं गाव बरच लांब होतं .  त्यांना भाड्याच्या गाडीने जावे लागणार होते .

" माझं ऐक तू . येथेच हॉटेलमध्ये राहा उद्या सकाळी ये...
प्रीती
" नाही म्हटलं ना मी ,  काय व्हायचं ते होऊ दे ....

शेवटी दोघेही तिच्या घरी पोहोचले . वडील  घरी नव्हते . आईने व मोठ्या भावाने त्यांचं स्वागत केलं . मोठा भाऊ त्याच्याकडे मारक्या बैला सारखेच बघत होता .  आईला माहीत होतं . तिने त्याच्या भावाला ही सांगितलं .  मग तर भाउ त्याच्यावरती धावूनच गेला . त्याला आडवत प्रीती म्हणाली
" आम्ही दोघं लग्न करणार आहोत ....  आणि मी pregnent आहे .... "  मग तर तिचा भाउ अधिकच चवताळून अभद्र शिव्या रवी च्या अंगावर धावून गेला . प्रीती ची आई मध्ये आली तिलाही त्याने बाजूला ढकलून लावले .  प्रती मध्ये आली तिलाही बाजूला ढकलून लावले व रवी वरती धावून आला ....

प्रीतीला ढकलून दिल्यावरती ती भिंतीला धडकली .  थोडंसं रक्त आलं व ती बेशुद्ध झाली . बेशुद्ध प्रीतीला बघून आई घाबरली . तिने प्रीतीला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला पण ती काही जागी होण्याचं नाव घेईना ... तिकडेही रवीला चांगला चोप मिळाला होता पण प्रीतीला बेशुद्ध पडलेला पाहून तोही घाबरुन गेला . सरतेशेवटी तिचा भाऊ भानावर आला .  तिघांनीही तिला दवाखान्यात नेलं . फारसं रक्त वाहत नव्हतं तरीही दवाखान्यात जाईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता . पुन्हा एकदा रवीला चक्कर येऊ लागली .  पाताळाचा खोल गर्तेत तो कोसळू लागला . आणि पुन्हा एकदा त्याला जाग आली .  समोर प्रीती होती आणि तो त्याच्या खोलीत होता..... Time loop  पुन्हा एकदा रीवाइंड झाला होता . रवीला कळून चुकलं होतं प्रीतीचा मृत्यू हा time loop rewind करत होता. 



3

       चौथी वेळ होती ही . तीन वेळा प्रीतीचा मृत्यू रवीने पाहिला होता . कसं सांगावं त्याला कळत नव्हतं . या वेळेला त्याने मनाशी निर्धार केला .  ज्यावेळी त्याला जाग आली , तो पुन्हा एकदा प्रीती समोर होता ....
   व ती त्याला त्याला I love you म्हणत होती ....
त्याने तिला तिथेच थांबवलं .
 " I love you priti and I want to marry with you ....  त्यावेळी त्याच्या मोबाइलची नोटिफिकेशन रिंग वाजली . त्याच्या मित्राचा मेसेज होता .   त्याने त्याला लगेच माघारी फोन केला व  बोलावून घेतले .
" कोणाला बोलवतोयस ... " प्रीती
" प्रीती मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे .  आपल्यापुढे एक फार मोठी अडचण आहे . ती कशी सोडवायची हे मला कळत नाही  .
" काय बोलतोयस काय...? एवढा कशाला घाबरतोयस.....?  नक्की अडचण तरी काय आहे सांगशील का मला....?  आधी मला सांगण्याच्या अगोदर कोणाला फोन करून बोलावून घेतलय....? "
           तो अस्वस्थ होत होता.  झालेल्या सर्व घटना ह्या दोघांनाही कशा सांगायच्या हा विचार त्याच्या मनात चालू होता .  पुढे घडणाऱ्या घटनांमुळे त्याला घाम फुटला होता . अस्वस्थपणे तो इकडे तिकडे फेर्‍या मारत होता

     " काय चाललय रवी तुझं ...?  प्रती
" प्रीती तुला कसं सांगु हे कळत नाही , आणि तुला खरं वाटणार नाही .  त्याच त्या घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत .  आणि पुन्हा पुन्हा तुझा मृत्यू होत आहे...।
" काहीही काय बोलतोयस वेड्यासारखा....
काहीही नाही बोलत Time loop असतो ना त्या Time loop मध्ये आपण अडकलोय .
" काहीही काय बोलतोय हा काय hollywood  चित्रपट आहे का. ...
" प्रीती मी खोटं कशाला बोलेन .  तीन वेळा , तीन वेळा या सर्व घटना घडल्या आहेत .  या वेळेला फक्त मी जरा वेगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत ....
" म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टी घडत आहेत . मग मला का काही आठवत  नाही .  फक्त तुझ्याच कसं लक्षात आहे सारकाही....?
" ते मलाही माहीत नाही पण मागच्या तिन्ही वेळेस ,  ज्यावेळी तुझा मृत्यू झाला त्या वेळी सर्व काही घटना पुन्हा सुरू झाल्या ....
" रवी काहीही  बोलू नकोस बास झाली चेष्टा ....
" प्रीती मी खोटं का बोलू आणि तेही तुझ्या मृत्यूच्या बाबतीत .... तुला माहित आहे ना माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे ते....
" बरं  , मला व्यवस्थितपणे सांग काय झालं ते...?
   
     तोपर्यंत नेहमीप्रमाणे घडणाऱ्या न घटना घडतच होत्या .  बाजूच्या खोलीत क्या हुआ तेरा वादा हे गाणं वाजून गेलो होतं .  स्टडी रूम मधील खिडकीच दार जोरात आपटला होतं आणि आता दारावरती थाप पडली होती आणि पिझ्झा बॉय डिलीव्हरीसाठी आला होता . रवीने पिझ्झा घेतला व दार लावणार तेवढ्यातच संकेत त्या ठिकाणी आला . संकेतला आत घेत रवीने दार लावले . संकेतला पाहताच प्रीतीचा पारा वर चढला . ती रागाने पाय आपटत आतल्या खोलीत गेली . संकेत ओशाळून बाजूला होत बसला .  रवी प्रतीची मनधरणी करायला तिच्या मागोमाग गेला . संकेतला बाहेरून त्यांचे संवाद तुटकपणे ऐकू येत होते....
" तो काय करतोय येथे , तू त्याला कशाला बोलावलं ....?
" तो माझा मित्र आहे आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे . तो आपल्याला मदत करू शकतो .
" पण तुला माहित आहे त्याने काय केलं होतं .... त्याला बघितलं की मला सारं काही आठवतं .... अजूनही मी त्या गोष्टी पूर्णपणे विसरू शकले नाही ....
" जुन्या गोष्टी आहेत त्या . आणि त्यामुळेच मी त्याला बोलावाले .  काहीही केलं तरी त्याचं तुझ्यावरती प्रेम होतं  ,  कधीकाळी  .   अजूनही तो माझा जवळचा मित्र आहे . माझं ऐक जुन्या गोष्टी विसरून जा आणि खरच मोठ्या अडचणीची वेळ आहे ....
       अजूनही बऱ्याच वेळ ते दोघे काहीबाही बोलत होते .  संकेत बाहेर बसून नाही ऐकण्याचा प्रयत्न करत होता . पुन्हा एकदा तो भूतकाळात जाऊन आला .  भूतकाळात झालेल्या त्या जखमा अजूनही ताज्या होत्या . तिच्या बोलण्याने त्या जखमांवर मीठ चोळलं गेलं  . नकळत  त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने ते हळूच टिपले  .  त्याने काही झालं नाही असं दर्शवत शांतपणे बसून .  काही वेळानंतर ते दोघेही बाहेर आले .  प्रीती त्याच्याकडे बघण्याचे टाळत होती .  ज्यावेळी तिची नजर त्याच्यावरती पडली त्या नजरेतला तिरस्कार बघून त्याच्या काळजाचं पाणी झालं . तोही तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळू लागला .
    "  ही चौथी वेळ आहे ...... रवी बोलू लागला . तो दोघांनाही सर्व काही समजावून सांगत होता .
   " पहिल्या वेळेला ज्यावळ हे सर्व काही झालं ,  त्या वेळेसही प्रीतीचा मृत्यू झाला होता पण जोपर्यंत मी तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत हा घटनाक्रम पुन्हा सुरू झालं नाही .  दुसऱ्या वेळेलाही तिचा मृत्यू झाला पण जोपर्यंत मी तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत हा घटनाक्रम पुन्हा सुरू झाला  नाही .  दोन्ही वेळेस मी तिच्याबरोबर नव्हतो मात्र तिसऱ्या वेळेस मी पूर्णवेळ तिच्याबरोबर होतो . आणि तिसऱ्या वेळेस ज्यावेळी तिचा मृत्यू झाला त्यावेळी मी तिच्याबरोबर होतो आणि त्यावेळी लगेच हा घटनाक्रम पुन्हा सुरू झाला ....
     आणि रवीने घडलेल्या घटना संकेतला सांगितल्या त्यावर ती संकेत म्हणाला
   " म्हणजे हा Time loop आहे आणि ज्या ज्या वेळेस तिचा मृत्यू होतो त्या वेळेस reset होतो ... Edge of tomorrow  या चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे टॉम क्रूझच्या  मृत्यूनंतर time loop reset  होतो त्याप्रमाणे प्रीतीचा मृत्यूनंतर हा time loop रिसेट होत असावा ....
     पण तू हे खरंच सांगतोय ना उगाच आमची चेष्टा करायचो म्हणून सांगतोय. ...  " संकेत रवीला म्हणाला
" प्रीती शपथ नि तुझ्या शपथ ... तुमच्या दोघांची शपथ घेऊन सांगतो...  मी खोटं का बोलेन....
      "  पण माझाच मृत्यू का होतोय ...? आणि माझ्याच मृत्यूनंतर टाईम लुप रिसेट का होतोय आणि बाकीचं कोणाला काही आठवत नाही , फक्त तुलाच का आठवत आहे....? " इतका वेळ शांत असलेली प्रीती म्हणाली .

   " एक मिनिट , पहिल्या दोन वेळेस प्रीतीचा मृत्यू अगोदर झाला होता पण जोपर्यंत तू तिचं शव पाहिलं नाही तोपर्यंत टाईम लूप रीसेट झाला नाही , बरोबर...
संकेत विचार करत म्हणाला....
 " बरोबर ....  रवी म्हणाला
" म्हणजे जोपर्यंत तुला जाणवत नाही तिचा मृत्यू झाला तोपर्यंत हा time loop   चालू राहील ... पण ज्यावेळी तुला जाणवेल त्यावेळी तो पुन्हा एकदा याठिकाणी चालू होईल ....
" पण मला एक कळत नाही प्रितीचाच का मृत्यु होतोय....?  आणि प्रीतीच्या मृत्युनंतरच हा time loop का  reset होतोय ....
"  टाइम ट्रॅव्हल करण्याच्या बऱ्याच संकल्पना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत आणि त्याचे होणारे परिणाम आणि तयार होणारे  paradox यांची ही बरीच वर्णने आहेत .  आईन्स्टाईनच्या मतानुसार टाईम हे आपले फोर्थ डायमेन्शन आहे . आपण जसं लांबी रुंदी आणि उंची हे म्हणतो त्याप्रमाणे टाईम हे चौथे डायमेन्शन आहे जे फक्त एकाच दिशेने प्रवास करते ते म्हणजे भविष्याच्या ....  पण टाइम ट्रॅव्हल जर शक्य असेल तर कोणीतरी भविष्याततून भूतकाळात किंवा भूतकाळातून भविष्यात जाऊ शकते . पण टाइम ट्रॅव्हल करणे हे वैश्विक शक्तीशी खेळण्यासारखे आहे .... संपूर्ण विश्व हे स्पेस आणि टाईम याभोवती केंद्रित आहे . स्पेस टाइम चा अभ्यास म्हणजे या विश्वाचा अभ्यास आहे ज्यावेळी आपण स्पेस टाईम मध्ये  निपुन्य मिळवू त्यावेळी आपण विश्वातील प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करू शकतो....
" संकेत मला माहित आहे तुला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि म्हणूनच मी तुला बोलवल पण सरळ सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांग काय चाललं आहे ते...? रवी त्याच्या शास्त्रीय बोलण्याला वैतागून म्हणाला ...
"  सांगतो सांगतो...  अशी कल्पना कर की तुला टाइम ट्रॅव्हल करणे शक्य आहे , आणि तो भूतकाळात गेला .  तुझ्या वडिलांचा जन्म होण्याअगोदर तू तुझ्या आजोबाला मारून टाकलं तर काय होईल....   
   रवी म्हणाला "  मग माझे वडील जन्मणार नाहीत आणि वडील जर जन्मले नाहीत ,  तर मीही जमणार नाही आणि मी जर जन्मलो नाही तर मी भूतकाळात कसा जाईन ....
   "  तेच म्हणतोय मी .  हाच grandfather paradox आहे आणि याची वेगवेगळी उत्तरे दिली जातात   त्यातले एक उत्तर आपल्या सिच्युएशनला लागू पडतय ..  ते उत्तर म्हणजे सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल ( self consistency principle ) .  साध्या सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे ज्यावेळी तु भूतकाळात गेला आणि तू तुझ्या आजोबाला मारलं त्याअगोदरच तुझ्या वडिलांचा जन्म झाला असेल ,  किंवा तू आजोबा  म्हणून दुसऱ्यालाच मारलं असेल किंवा अशी काहीतरी घटना घडेल की जेणेकरून तू तुझ्या खऱ्या अजोबाला मारूच शकणार नाही....
" म्हणजे नक्की काय म्हणाचय तुला... " रवी म्हणाला
" मला हेच म्हणायचं आहे की सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल मुळेच हा टाइम लूप वारंवार रिसेट होत आहे .   तिच्या मृत्यूला कोणीतरी भविष्यातील व्यक्ती कारणीभूत असावी .  नैसर्गिक रित्या प्रीतीच्या मृत्यूची अजून वेळ आली नसावी .  त्यामुळे हा टाइम लूप  प्रीतीच्या मृत्यूनंतर रिसेट होतोय जेणेकरून आपण त्या मारेकऱ्याला शोधू शकू व  त्याला थांबवू शकू....
" मी काही टर्मिनेटर मधील सारा कॉर्नर नाही जिचा मुलगा जॉन कॉर्नर आहे व तो टर्मिनेटर विरुद्ध युद्ध लढत आहे . मला कोण येणार आहे भविष्याततून मारायला....  तुम्ही दोघेही वेढपसारखे बोलत आहात ....
      त्याचवेळी दारातून एक गोळी सुसाट वेगात आलु व प्रीतीच्या मस्तकातुन बाहेर निघाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला . रवीला काही कळण्याअगोदर तो टाईम लूप पुन्हा एकदा सुरू झाला होता . त्याच्यासमोर प्रीती होती व ती I love you  म्हणत होती ...

4

   त्याने डोळे उघडले.   त्याच्यासमोर प्रीती होती .  ही पाचवी वेळ होती . मागच्या चारही वेळेस त्याने प्रयत्न करूनही त्याला यश आले नव्हते . चौथ्या वेळेस त्याला आशा होती , मात्र चौथ्या वेळेस प्रीतीचा  सरळ सोट खून झाला होता .  ते सर्वजण बेसावध असताना येऊन लागलेल्या गोळी मुळे प्रीतीचा मृत्यू झाला होता . आता त्याला कल्पना आली होती ,  कोणीतरी नक्कीच प्रीतीचा जीव घेण्यासाठी उतावळं होतं . आता बेसावध राहून चालणार नव्हतं . आतापर्यंत हा टाईम लूप  रिसेट होत होता .  पण कधीपर्यंत होईल आणि कधीपर्यंत त्याला घडलेल्या गोष्टी आठवत राहतीलल हे काही सांगता येत नव्हतं . त्याने लगेच फोन करून संकेतला सांगितले . मागच्यावेळी प्रीतीचा अचानक झालेला खून आठवला .  त्यामुळे अधिक सुरक्षा म्हणून  ते दोघेही संकेतच्या खोली वरती गेले. दोघांनीही मागच्या वेळेस सारख्याच प्रतिक्रिया दिल्या . प्रीती रागाने रुसून आत गेली .  रवीने तिला समजावून बाहेर आणलं . दोघांचा संवाद ऐकून संकेतला वाईट वाटले .  नकळत त्याचे अश्रू पुन्हा एकदा टपकले .   .पुन्हा एकदा रवीने दोघांना घडलेल्या सर्व घटना सांगितल्या . मागच्या वेळेस संकेतने सांगितलेली स्पष्टीकरणे व टाईम लूप रिसेट होण्यामागची कारणे रवीने पुन्हा एकदा सांगितली . सारं काही ऐकून झाल्यावरती संकेत बोलू लागला  ..
" तुझ्या म्हणण्याप्रमाणे मागच्या वेळेस तुमच्या खोली वरती तिचा खून झाला होता म्हणजे जो कोणी खूनी आहे त्याला तुमच्या बाबतीत सारी माहिती आहे याचा अर्थ त्याला हे घर ही माहित असणार .  त्यामुळे ही जागा ही सुरक्षित नाही . आपल्याला अशी जागा हवी आहे जी अजून आपल्यालाही माहीत नाही त्यामुळे जो कोणी कोणी असेल त्यालाही ती कधी सापडणार नाही . बाकीच्या गोष्टींची चर्चा आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर करूया , आणि जर खून करणारा भविष्यातून येत असेल तर त्याला घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी माहीत असतील ,  त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट विचार करून करावी लागेल . आणखी एक गोष्ट म्हणजे जर सेल्फ कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल मुळे हा लुप रिसेट होत असेल तर जो कोणी प्रीतीला मारायला भविष्यातून आलाय  त्याच्या बाबतीतही हा लूप रिसेट होतच असणार . ज्यावेळी तो भविष्यतून आपल्या वेळेत येतोय आणि प्रीतीला मारण्याची वेळ ,  यामध्ये जेवढा कालावधी आहे तेवढ्याच कालावधी साठी हा लूप  रिसेट होतेय .   ज्या वेळी तुमच्या दोघांचा संवाद चालू होता त्यावेळी पहिल्यांदा तो भविष्यातून आला . पहिल्यांदा भविष्यातून आल्यानंतर त्याने प्रीतीला मारण्याचे प्रयत्न चालू केले .  पहिल्या दोन्ही वेळेस तो यशस्वी झाला पण लगेच लूप रिसेट झाला नाही कारण रवीला प्रीतीच्या मृत्यूची जाणीव नव्हती .  याचा अर्थ मृत्यू थांबवण्यासाठी कोणीच नव्हते .  पण ज्यावेळी रवीला कळले की प्रीतीचा मृत्यू झाला आहे त्यावेळी तो मृत्यू टाळता यावा यासाठी हा टाईम लूप रिसेट झाला . या साऱ्यातून एक गोष्ट नक्की जो कोणी आहे तो प्रीतीला मारण्यासाठी येत आहे आणि जोपर्यंत त्या मारेकऱ्याला आपण मारत नाही किंवा थांबवत नाही तोपर्यंत हा टाईम लूप रिसेट होतच राहणार  .  त्यामुळे तर आपल्याला हा टाईम लूप थांबवायचा असेल तर त्या मारेकऱ्याला शोधून त्याचा निकाल लावणे आवश्यक आहे .... 

      त्यानंतर संकेतने त्याच्या दोन-तीन मित्रांना फोन केले .  आणि एक नवीन जागा शोधून काढली . तिघेही गपचूप त्या जागेकडे निघाले .  ते तिघेही त्या ठिकाणी पोहोचले . एक छोटीशी रूम होती . रूम मध्ये गेल्या गेल्या संकेतने दार लावून घेतले .
"  आपल्याला जर त्या व्यक्तीला पकडायचं असेल तर आपल्याला ती व्यक्ती माहीत असणं गरजेचे आहे . प्रीतीला भविष्यतून मारायला कोण येऊ शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे ....
" तूच आला असशील भविष्यातून  मला मारण्यासाठी ,  तसेही मला मारण्यासाठी तुझ्याकडे भरपूर कारणे आहेत...
" प्रीती काहीही काय बोलतेस तो मदत करतोय आपली ....
" It's ok ravi , बोलू दे तिला तुला दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता पण तुला वाईट वाटलं असेल तर मी काय करू ... आणि तू काहीही केलं तरी तुझ्या सुखाची अपेक्षा करणारा मी माणूस आहे . तू सुखी राहावं हेच मला वाटतं . तू रवी बरोबर आनंदी होतेस हे जेव्हा मला कळले तेव्हा मी आनंदाने रवीला परवानगी दिली....
" तू कोण रवीला परवानगी देणारा .... प्रीती पुढे काहीतरी बोलणार होती पण रवीने तिला शांत करत एका बाजूला बसवले ....
" असं कोणी आहे का ज्याला प्रीतीचा खरंच राग आला असावा आणि तो इतका हुशार असावा की तो टाईम मशीन बनवू शकत असावा किंवा इतका चतुरा असावा बनवलेले टाईम मशीन वापरू शकत असावा.....
संकेत विचार करत म्हणाला .
" तूच आठव यार ,  तुम्ही दोघे लहानपणापासून सोबत आहात . तुला माहित असेल कोणाबरोबर तिचे भांडण वगैरे झाले आणि इतका हुशार कोण आहे...

" तसे एक किस्सा लक्षात राहण्यासारखा आहे .  अजूनही माझ्या लक्षात आहे . तो किस्सा आठवला की अजूनही मी हसत सुटतो .         आम्ही बहुतेक तिसरीला असू , लहानपणी प्रीती खूप जाड होती .  तिला बरेच जण चिडवायचे आणि रागीटही फार होती आताही आहेच म्हणा .   पण त्यावेळी तर फारच रागीट  होती .  पण तिला कोणी चिडवले की त्याच्या अंगावर धावून जायची . त्यावर्षी सातवीत असताना एक नवीन मुलगा आमच्या शाळेत आला होता .  त्याला फारसं काही महत्त्व माहीत नव्हतं .  पण बाकीच्या मित्राने त्याला फुस घातली .  त्यामुळे तो प्रीतीला चिडवून गेला . प्रीती त्याच्या अंगावर धावून गेली आणि त्याला चांगलाच मार दिला . त्याची तब्येत फारशी नव्हती .  तब्येतीने साधाच होता .  त्यामुळे त्याने तिच्या हातचा मार खाल्ला .  त्याची शाळेत भलतीच नाचक्की झाली .  तो हुशारही होता भरपूर पण एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी तो असं काही करेल असं वाटत नाही . ....
" नाव काय त्याच तो सध्या काय करतो ....
" मला माहित नाही त्याचा संपर्क राहिला नाही त्याचं नाव काहीतरी होत वेगळंच ,  मला काही नाव आठवत नाही .  प्रीतीला आठवत असेल एखाद्यावेळेस...
रवीने प्रीतीला विचारलं की तिने त्याचं नाव सांगितलं ...
" महेंद्र स्वामीनाथन ... त्याचे वडील सरकारी कामगार त्यावर्षी बदली होऊन नवीनच आले होते . त्यामुळे तो आमच्या शाळेत आला होता . नंतर तो निघूनही गेला....
     रवी ने लगेच मोबाईल काढला फेसबुक वरती त्याचं नाव सर्च केलं . नेहमीप्रमाणे फेसबुक वरती हजारो नावे आली .  त्यातून पाहिजे त्या महेंद्र स्वामीनाथ शला शोधणं सोपं नव्हतं . इकडे संकेतने गुगल वर ती त्याचं नाव सर्च केलं आणि पहिल्याच सर्च रिझल्टला त्याचा फोटो झळकला . संकेत ने त्याला बरोबर ओळखलं .
तो मोठ्याने वाचू लागला ...
" Mahendra Swaminathan is youngest person in the world to become CEO of company like Futuristic Technology pvt ..    आणखीही बरंच काही वाचल्यानंतर शेवटी तो म्हणाला ... 
" महेंद्रने कंपनीचा सीईओ झाल्यानंतर बोललेले वाक्य
' I have faced humiliation in my whole life but now I can answer those losers with my success....
" म्हणजे तो विसरणारा नाही हे मात्र आपल्याला कळलेले आहे...  रवी म्हणाला .
   संकेत मात्र काहीतरी वाचण्यात गुंग होता .
"  अरे ही फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी कंपनी  ही काही शुल्लक नाही . जगभरात त्यांच्या ब्रांच आहेत आणि हो हा त्या कंपनीचा सीईओ आहे म्हटल्यानंतर त्याला काहीही शक्य . भविष्यात या कंपनीला काहीही शक्य आहे आत्ताच जगातील सर्वात प्रॉडक्टिव कंपनी म्हणून तिची नोंद आहे .... पण एवढ्या शुल्लक कारणासाठी तो प्रीतीच्या मागं लागेल हे काही पटत नाही ...
संकेत म्हणाला .
" अरे लहानपणाच्या गोष्टी लोक खुप लावून धरतात .  काही काही महाभाग असतात असे .. 
" तरीही ती काही फार मोठी गोष्ट नव्हती रे , तिच्या गोष्टीसाठी त्यांना टाईम मशीन चा शोध लावा आणि प्रीतीला मारायला माघारी याव तेही या वेळेला न की बालपणी.....
" मग तो आला नसेल तर दुसरं कोणीतरी आला असेल आणि त्याची मदत त्याने घेतली असेल.....  आठवण प्रीती तुझ्या हातून कोणाचा चुकून अपमान वगैरे झाला असेल तर केव्हा इतर काही गोष्टी झाल्या असतील तर.....
" माझ्याकडून सगळ्यात जास्त अपमान तर फक्त संकेतचा झाला आहे .... झाला आहे म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त तापमान तर मी फक्त संकेतच केला आहे ... मला तर अजूनही वाटते की त्यानेच हे षडयंत्र रचलं असावा . आपल्या दोघांचं लग्न करायचं ठरलं होतं आणि आपलं भविष्यात लग्न झाला असेल आपण दोघे सुखाने राहत असणार  .  आपल्या दोघा विषयी इतकी माहिती इतर कोणाला माहित आहे ...? त्यामुळेच भविष्यातला संकेत नेमका याच वेळी भूतकाळात आला असावा ,  ज्यावेळी आपल्या दोघांची लग्नाविषयी चर्चा चालू आहे .....
    प्रीतीच ऐकून रवीही संकेतकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला . त्याचवेळी खोलीच्या दारावर ती जोरजोरात थापा पडू लागल्या एक जोरात हिसका बसून धार मागे तूटून पडले . दारातून एक तोंडावरती रुमाल बांधलेली व्यक्ती  आत आली .
 संकेत कडे पाहत ती म्हणाली ...
" Thanx for your help ...
तो आवाज मानवी नव्हता .  कोणत्यातरी रोबोटने बोलल्याप्रमाणे येत होता .  त्यामुळे तो आवाज पुरुषाचा आहे की स्त्रीचा हे ओळखणे अवघड होते . त्याने बंदूक काढत प्रीतीवरती निशाणा धरला .  रवी वाटेत आढावा येण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याने रवीला लाथाडत  मागे ढकलून दिलं व प्रीतीवरती गोळ्या झाडल्या ....
Time loop पुन्हा एकदा रिसेट झाला होता . मात्र या वेळेस फक्त रवीच नाही तर अजून एकालाही मागील time loop  मधील  गोष्टी आठवत होत्या ...

5

          संकेत त्याच्या घरीच होता . तो रवीला मेसेज करणारच होता . पण मागच्या दोन वेळेस काय झालं हे त्यालाही आठवलं . पहिल्या वेळेस जेव्हा रवीने त्याला बोलून घेतलं व सांगितलं त्यावेळेस त्यावेळेस ही प्रीतीचा मृत्यू झाला .  दुसऱ्या वेळेस त्याने प्रितीला वाचवायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या वेळेसही प्रीतीचा मृत्यू झाला आणि त्याच वेळी जो कोणी प्रीतीला मारायला आला होता त्याने रवीचा गैरसमज करून दिला की त्याला संकेत ने मदत केली होती . पण रवीला माहीत नव्हतं की संकेतला सर्वकाही आठवले आहे . म्हणून संकेतने पुन्हा एकदा रवीला मेसेज केला .
   '  Come tonight , project work '
    रवीचा काही रिप्लाय आला नाही . संकेतला काय करावे कळेना . बिन बोलवता जावे तर रवीचा संशय अधिकच दाट होईल व तोच प्रीतीचा मारेकऱ्याला मदत करतो आहे असे वाटून तो संकेतलाच मारायचा प्रयत्न करेल . पण संकेतला माहित होतं त्याने कोणत्या मारेकर्‍यांना मदत केली नव्हती  . जो कोणी मारेकरी होता तो भलताच हुशार होता त्याने दोन मित्रांमध्ये संशयाचे बीज पेरलं होतं जेणेकरून ते एकमेकांची मदत घेऊ शकणार नाहीत आणि त्याचं प्रीतीला मारण्याचं काम अधिकच सोपं होणार होतं . 
       संकेतला शांतपणे बसून प्रीतीचा मृत्यू पाहणे सहन होत नव्हतं . त्याने गपचूप त्या दोघांचा पाठलाग करण्याचे ठरवले . जो कोणी मारेकरी होता त्याला पकडण्याचे त्याने मनाशी निश्चित केले . त्याला तर रघुवीर सांगितलेल्या सर्व गोष्टी आठवल्या होत्या पहिल्या दोन वेळेस प्रीती तिच्या घरी गेली होती त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता तिसऱ्यावेळेस रवी तिच्या सोबत असूनही तिचा मृत्यू झाला होता . पहिल्या तीन वेळेस मृत्यू कसा झाला हे त्याला माहीत नव्हतं . पण शेवटच्या दोन्ही वेळेस पण बंदूकच वापरली होती . पहिल्या तीन वेळेस त्याने समोर न येता गपचूप  खून केला होता . पण शेवटच्या दोन्ही वेळेस तो उघडपणे समोर आला होता कारण त्याला गुपचुपपणे काम करता येणे शक्य होते . कारण शेवटच्या दोन्ही वेळेस ते दोघेही प्रीती बरोबर उपस्थित होते त्यामुळे त्याला गुपचूपपणे काही करता येणे शक्य नव्हते . मात्र आता रवी एकटाच होता आणि तो काय करेल काही सांगता येत नव्हतं .   त्यामुळे संकेतने त्यांचा पाठलाग करण्याचे ठरवले   .

             संकेत ने गाडी घेतली व रवीच्या बिल्डिंग समोर घेऊन उभारला . त्याने कपडे वेगळे घातले होते तोंडाला रुमाल ही बांधला होता . साधारणपणे कोणालाही दिसणार नाही अशा जागी तो लपला होता . तो बिल्डिंगच्या गेट वरती येणाऱ्या-जाणाऱ्या कडे लक्ष देत होता  . तो आल्यापासून कन्ही संशयित व्यक्ती आत आली होतं किंवा गेली नव्हती . तो बराच वेळ तिथे उभा होता . नेहमीच्या वेळी पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा घेऊन आला . तो आत जात असताना कोणीतरी त्याला बेशुद्ध केलं . त्याच्याकडून पिझ्झा घेत तो माणूस आत जाऊ लागला.त्याच्या मागोमाग संकेतही जाऊ लागला . मधेच थांबत त्याने पिझ्झ्यामध्ये काहीतरी मिसळले .  तो रवीच्या दाराची बेल वाजवणार तेवढ्यात संकेत ने त्याला मागून पकडले . त्याने दार वाजवत रवीला हाक मारली .
"  रवी पटकन बाहेर ये मी त्याला पकडले आहे .....
     दार उघडत रवी बाहेर आला . संकेत संकेत तू काय करतोयस इथे ....
"  रवी हाच आहे प्रीतीचा खुनी ....
" तुला कसं माहित म्हणजे तुला आठवतंय का काय सगळं....
" होय रवी मला मागच्या दोन्ही वेळेस घडलेल्या घटना आठवत आहेत.....
" ही तुझीच चाल आहे ,  तुला पहिल्यापासून सारं काही आठवत होतं , तूच आहे खूनी .....
" मी का करू प्रीतीचा खुन मी तिच्यावरती प्रेम केलं होतं आणि अजूनही करतो ....  हा माणूस खरा पिझ्झा डिलिव्हरी बॉय नाही . त्यांने खऱ्या डिलिव्हरी बॉयला बेशुद्ध केलं . त्याच्याकडून पिझ्झा घेऊन तो तुम्हाला द्यायला येत होता .  त्याने त्याच्यामध्ये काहीतरी मिसळलही होतं . मी त्याला पकडलं नसतं पुन्हा एकदा  तिचा जीव गेला असता ....
      त्याने पकडलेल्या माणसाला मारत बोलू लागला ...
" बोल बोल काय मिसळलं पिझ्झ्यात .....
" काही नाही काही नाही साहेब मला एका माणसाने भरपूर पैसे दिले होते हे काम करण्यासाठी . तो म्हणाला की जर मी पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेशुद्ध केलं आणि त्यामध्ये काहीतरी मिसळल्याचं नाटक केलं तर अजूनही तेवढेच पैसे देईल...... 
        तेव्हाच आतल्या खोलीत गोळी झाडल्याचा आवाज आला . त्या पाठोपाठ एक किंकाळी हवेत विरून गेली .  पुन्हा एकदा त्या माणसांने  प्रीतीचा खून केला होता .....
            पुन्हा एकदा तो टाईम लुप रिसेट झाला होता .  संकेतच्या हातात पुन्हा एकदा मोबाईल होता . तो रवीला मेसेज करणार होता पण या वेळेस त्याने मेसेज करण्याचे टाळले . सहावी वेळ होती .  महेंद्र स्वामीनाथनला संपर्क साधण्याचे त्याने ठरवले . त्यांनी बरीच धडपड करून महेंद्र स्वामीनाथचा प्रायवेट नंबर मिळवला .
" Hello... Mahendra speaking..
"  तू मला ओळखत नसशील  . पण मला एक फार महत्त्वाचं बोलायचं आहे ....
" Who is this....?
" Do you remember priti , who punched you in seventh standard....? , I am her friend sanket ....
" Ohh priti.... अरे प्रीती प्रीतीला मी कसा विसरेन...?
" म्हणजे तू विसरला नाही तर तुझ्या लक्षात आहे सारं काही ...
" मग अरे सारं काही लक्षात आहे तिथून तर माझं सारं आयुष्य बदललं....
" म्हणजे तू अजूनही राग धरून आहे मनात..
" राग कशाचा राग... राग नाही अरे प्रीतीला मला थँक्यू म्हणायचंय...
महिंद्र स्वामीनाथन हा त्या टाईम ट्रॅव्हलरला मदत करत नाही किंवा त्याच्या मनात प्रीती बद्दल राग नाही हे ऐकून संकेत उत्साहाच्या भरात बोलून गेला
" म्हणजे तू पुढे जाऊन टाईम मशीन बनवून भूतकाळात येऊन प्रीतीला मारणार नाही तर ....
" काय काय बोलतोस काय तू.....
     भलतेच बोलून गेल्याची सारवा सरव करतो म्हणाला
" काही नाही काही नाही असंच म्हणालो चेष्टेने....
" पण माझ्याशी तू टाइम ट्रॅव्हलची चेष्टा का करशील....?  तुला माहीत नसेल पण टाईम ट्रॅव्हल हा माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे...
" मी तुला काही सांगितलं तर तू मला वेड्यात तर काढणार नाही ना.....
" बोल बोल काय म्हणतोस तू.....
      संकेत ने त्याला झालेले सर्व किस्से सांगितले...
" This is fascinating ,  not only time travel is possible but also some one is already doing it ....! पण प्रीतीला मारण्यासाठी एवढ कष्ट कुणी घेतला असावं....
" आम्हालाही तेच कळत नाही प्रीतीला मारण्यासाठी कोणी टाईम मशीन बनवली असावी..? किंवा ज्याने कोणी टाईम मशीन बनवली त्याच्याकडून जो कोणी मारू इच्छित आहे त्याने चोरली असावी... पण तो आहे कोण हेच कळत नाही ....
"  सोपं आहे .  साधारणपणे पुढच्या वीस ते तीस तीस वर्षात कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट आणि कुठले कुठले शास्त्रज्ञ टाईम मशीन बनवू शकतात हे आपल्याला शोधून काढावे लागेल .... 
" ठरलं तर मग तू यादी तयार कर तोपर्यंत मी प्रीतीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करेन....
    आणि संकेत रवीच्या खोलीकडे निघाला...

6

संकेत रवीच्या बिल्डींगपाशी पोहोचला . रवी आणि प्रीती दोघेही कोठेतरी निघाले होते .
 " रवी कोठे चाललाय तुम्ही ...?
" संकेत तू आमच्या पासुन दुर रहा  ,  आम्हाला नको आहे तुझी मदत .... रवी म्हणाला
"  माझं ऐकून तर घे ,  मी महेंद्र स्वामीनाथनशी संपर्क साधला आहे , त्याच्या मनात प्रीती बद्दल अजिबात राग नाहीये....  दुसरेच कोणीतरी तिच्या माग आहे ......" संकेत त्यांच्याजवळ जात म्हणाला
" तू तिथेच थांब जवळ येऊ नकोस
" रवी तुला माहित आहे मी कधीच तिला दुखणार नाही , you know yaar I still love her ... " 
    पुढेही या दोघांची वादावादी सुरूच राहिली पण संकेतच्या त्या वाक्याने प्रीतीच्या ह्रुदयाचा वेध घेतला .
   "  येऊ दे त्याला , मारायचं असतं तर त्याने मला अगोदरच मारलं असतं ... प्रीती रवीला म्हणाली
यावेळी ते प्रीतीची मैत्रीण अंजलीच्या घरी जमले होते .  अंजलीच्या घरी तिचे आई-वडील नव्हते . घरी एकटीच असल्याने रवी ,  संकेत ,  प्रीती नि अंजली त्या ठिकाणी गोळा झाले होते . अंजलीच्या घरी म्हटल्यावरती संकेत ने जरा का - कू करायचा प्रयत्न केला . कारण अंजलीचे त्याच्यावरती क्रश होतं . तिला बोलायची फार सवय .  कोणत्याही विषयावरती  बोलू शकत असायची .  तिला वाचायची ,  चित्रपट पाहायची कविता करायची आवड .  ती नेहमी संकेत बरोबर बोलायचा प्रयत्न करायची ,  पण संकेत शक्यतो तिला नम्रतापूर्वक फाटा द्यायचा . तिला जेव्हा टाईम लूप , प्रीतीचा खून , भविष्यातला माणूस या गोष्टी सांगितल्या तेव्हा तर ती हबकलीच . 
" This is freaking exciting ... ते उत्साहाच्या भरात बोलून गेली पण बाकीच्या तिघांची गंभीर चेहरे पाहून सर्वांकडे बघत ती सॉरी म्हणाली... "  पण मला एक सांगा तुम्ही म्हणता येतो भविष्यातून आला आहे , मग त्याच्याकडे कोणती फ्युचर टेक्नॉलॉजी आहे का.?"
" अगं अजून त्याचा चेहरा पण पाहिला नाही आम्ही त्याचा आवाज मात्र रोबोटिक आहे म्हणे ....प्रीती म्हणाली
     "  पण मला एक कळत नाही,  प्रीती मृत्यू तुझा होतोय ,  तुझ्यामुळे loop reset होतोय आणि तुलाच आठवत नाही....  हे जरा विचित्र वाटत नाही का ....?म्हणजे फक्त रवी आणि संकेतला का आठवतय...  इतर कोणाला आठवत नाही....? "
" काय माहित कशामुळे होते...."  प्रीती म्हणाली
     तेव्हाच संकेतने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत बोलायला सुरुवात केली
    " इकडे लक्ष द्या , आपल्याला कसेही करून त्याला पकडला पाहिजे...
    " तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही सातवी वेळ आहे  , मागच्या सहाही वेळेस तुम्ही फेल झालाय ... आता माझं ऐका ..
     अंजलीने संकेतला गप्प करत बोलायला सुरुवात केली " तुम्हाला माहीत नसेल तर सांगते घरामध्ये entry  करण्यासाठी फक्त एकच गेत आहे तिथून तो आला तर आपल्याला कळेलच आणि दुसरीकडून आला तरीही कळेल . कारण घराच्या चारी बाजूला सीसीटीव्ही आहेत . Dad  जरा जास्तच ओव्हरप्रोटेक्टिव आहेत . आपण वरच्या गेस्ट रूम मधे थांबूया . तिथून सीसीटीव्ही फुटेज या  टॅबलेटवरून पाहता येईल .... पण तो आल्यावर त्या आपल्याला रेडी राहावे लागेल....

   अंजली उत्साहात होती . तिने पेपर स्प्रे बॅट आणि घरा जी एकुलती एक रिवाल्वर होतं ते आणि इतर साहित्या जे शस्त्र म्हणून वापरता येईल ते गोळा केलं . ते सर्वजण गेस्ट रूम मध्ये गोळा झाले .
"  आणखी एक गोष्ट मागच्या वेळेस आपण पिझ्झा डिलिव्हरी बॉयला पकडायला गेलो पण तो खरा खुनी नव्हता . त्याला खऱ्याने पैसे दिले होते ..."संकेत म्हणाला  " मग याही वेळेस त्याने दुसऱ्या कोणाला पाठवले तर..."  रविने शंका काढत स्वतःलाच विचारले ...
    " कितीही येऊ दे मी आहे तोवर प्रीतीला काही होणार नाही... तसेही Nature doesn't want her dead that's why we are getting chances to save her .....  अंजली म्हणाली
    "  It might not be natural;  it might be happening due to some setting in time machine ,  आपल्याला नक्की माहीत नाही हा loop कितीवेळा  reset होणार ते  ,  त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर हा निकाल लावावा लागेल...
" You are so talented अंजली संकेतला बिलगत म्हणाली ....
     " बघा बघा भिंतीवरून उडी मारून कोणीतरी आत येतोय....  प्रीती टॅबलेट वरती पहात म्हणाली .  तो भिंतीवरून आत आला व मागील दाराने आत शिरायचा प्रयत्न करू लागला.  मात्र या चौघांनी सारी दारे व खिडक्या pack करून टाकल्या होत्या . घरातील खुर्च्या सोफा व जाड वस्तू सर्व काही दारा व खिडक्या मागे लावून टाकल्या होत्या .  त्यामुळे आत  येता येणे सहजासहजी शक्य नव्हते . त्याच्या पायात विटकरी रंगाचे बूट होते .  काळी पॅंट , पांढरा शर्ट , गुडघ्यापर्यंत येणारा व पूर्ण हात झाकणारा काळा कोट घातलेला .  हातात पांढरे हातमोजे व तोंडावरती काळा मास्क आणि डोक्यावर गोल काळी टोपी असा विचित्र पोषाक होता त्याचा...
     दारातून आत जाता येईना त्यामुळे तो वैतागला .  त्याने दारावर वैतागून लाथा घातल्या पण नंतर त्याला सीसीटीव्ही दिसला .  सीसीटीवी पुढे जात त्याने त्याच्या कोटमधून छोटेसे ग्रेनेड काढले व विचित्र हातवारे करत तो नाचू लागला .  त्याने ग्रेनेडची   पिन काढली व ते दारापुढे फेकून दिले .  तो थोडावेळ लांब जाऊन उभारला .  काही क्षणातच एक मोठा विस्फोट झाला व ज्या कॅमेरातून त्यांना दिसत होते तो कॅमेरा बंद झाला .  संपूर्ण घर हादरुन निघाले .  सर्वत्र धुळीचे लोट उडाले .  चौघांचेही कान वाजू लागले . त्यांना काही कळायच्या अगोदरच त्यांच्या खोलीत एक ग्रेनेड आले  . ते बाहेर फेकण्यासाठी संकेत धावला पण त्यातून अगोदरच धूर निघू लागला . संकेत जागेला बेशुद्ध झाला त्याच्यापाठोपाठ ते तिघेही बेशुद्ध झाले .

7

      जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांचे हात-पाय खुर्चीला बांधले होते . तोंडावरती पट्टी होती . चौघेही अंजलीच्या घरी कैद झाले होते .  त्यांचे नियोजन पुन्हा एकदा फसले होते . त्यांच्यासमोर तो विक्षिप्त माणुस उभा होता . त्याला पाहून प्रीती बोलायचा प्रयत्न करू लागली . पण तिच्या तोंडावरती पट्टी असल्याने तिला नीट बोलता येईना . 
  " थांब थांब आत्ताच काढतो तुझ्या तोंडावरची पट्टी .  आणि त्यांने प्रीतीच्या तोंडावरची पट्टी काढली.... 
    " का मला मारायच्या मागे लागलायास तू ..... अजून किती वेळा मारणार आहेस .....?   कोण आहेस तरी कोण तू .....?  आणि मी काय वाईट केलय तुझं....? "
 " बास बास भरपूर बोलून झालं तुझं " आणि त्यांने पुन्हा एकदा तिच्या तोंडावर ती पट्टी बांधली . 
" तू माझ्या आयुष्याच वाटोळ केलस तू नसतीस तर माझं आयुष्य काही वेगळं झालं असतं म्हणूनच तुला मारायला मी भूतकाळात झाले आत्ताच जर तू मेलीस तर माझं आयुष्य पूर्ण बदलेल....
     अजूनही बराच वेळ प्रीतीने त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलं याचाच गाणं गात बसला . कसं केलं कधी केलं  हे मात्र त्यांना सांगितले नाही .  स्वतःला महान समजत तो उपदेशाचे डोस पाजत होता...
" चला जास्त वेळ न घालवता काम करून टाकलेलं बरं....   त्याने बंदुक काढली आणि प्रीतीला तीन चार गोळ्या घातल्या . प्रीतीची तिची हालचाल बंद झाली.
    "  चला  काम तर पुर्ण झालं  .... मागच्या वेळी जो आला होता त्याला करता आले नाही पण मी करून दाखवलं ..... " त्याच्या  आवाजातून आनंद ओसंडून वाहत होता .  जणू काही हे अशक्य शक्य झाल्याप्रमाणे ओरडत   तो निघूनही गेला . 

     यावेळेस तिचा मृत्यू होऊनही लूप रीसेट झाला नव्हता .  ते तिघेही जागेलाच होते .  रवी संकेत आणि अंजली अजूनही खुर्च्यांना बांधलेले होते .  तिचा मृत्यू यावेळेस झाला होता आणि तो  कायमसाठी झाला होता .  संकेतच्या डोळ्यातून अश्रू नकळत वाहून गेले , पण त्यांची जागा लगेच प्रतिशोधाने घेतली .  ते त्यांचं जीवन जगत होते . सुखात असो दुःखात असो ,  एकत्र असो वेगळं असो . प्रीती भलेही त्याचा राग राग करत असो पण लपून का असेना तिचा आनंदी चेहरा त्याला बघता येत होता . तिच्या सुखात तो सुख मानत होता . आता होतं ते थोडेफार सुखही कोणा भविष्यातल्या माणसाने येऊन हिरावून घेतलं .  त्याचं मन पूर्णपणे रागाने भरले .  तो  खुर्चीची  जोरात आदळआपट करू लागला .  तो कसेतरी करून सुटला . पहिल्यांदा प्रीतीला सोडून तिला झोपवून ,  त्याने रवि व अंजलीला सोडवले.  नंतर तो त्या माणसाच्या मागे गेला . 


   रविला तर काहीच कळत नव्हते .  प्रीती विना आयुष्याची  कल्पनाच करू शकत नव्हता .  त्याने तिचे शीर त्याच्या मांडीवरती घेत तिच्या केसांवरून हात फिरवत तो रडत होता . " रवी रवी.... प्रीती अडळखत बोलली .... प्रीती अजून जिवंत होती .  अंजलीचा एक विचित्र फॅशनेबल ड्रेस मेटल थ्रेडसने बनवलेला होता .  तो तिने घातलेला असल्यामुळे गोळ्यांचा वेग कमी झाला होता ;पण गोळ्या लागल्या होत्या . " माझं ऐक ...." ती अडखळत अडखळत हळुवारपणे बोलत होती " मला नाही वाटत यावेळी लूप reset होईल ,  आय लव यु रवी...  आणि संकेतला सॉरी म्हणून सांग . मी खूपच harsh वागले रे त्याच्याशी....  बोलताना  तोंडातून रक्त येत होतं आणि शेवटी ती शांत झाली . आणि लूप पुन्हा एकदा रिसेट झाला ...

          रवी आणि प्रीती त्यांच्या रूममध्ये होते . संकेत त्याच्या त्याच्या खोली शवरती होता .  साऱ्यांना वाटलं होतं यावेळी लूप काही रीसेट होणार नाही , पण झाला होता . रवी आणि संकेतला सारं काही आठवत होतं .  प्रीतीला अजूनही काही आठवत नव्हतं.  रवीने तिला नेहमीप्रमाणे समजावून सांगितले . आतापर्यंत तिचा सात वेळा मृत्यू झाला होता . तोपर्यंत रवीला संकेतचा फोन आला .. 
" हेलो , रवी मी मागच्यावेळेस त्याच्या मागोमाग गेलो होतो .  त्याची टाईम मशीन , टाईम मशीन म्हणण्यापेक्षा टाईम पोर्टल पाहिले मी . जुना पूल आहे ना तिथं आहे .  तुम्ही दोघेही अंजलीच्या तिथे या  .  आपण काय करायचं ते ठरवू तिथे . 
 ते सारे पुन्हा एकदा अंजलीच्या घरी जमले . 
  "  मला वाटत आपण पोलिसात जाऊया..." अंजली म्हणाली 
  " वेडी आहेस का..?  पोलिसांना काय सांगणार ?  टाइम ट्रॅव्हल करून प्रीतीला मारायला भविष्यात अजून कोणीतरी आले आहे म्हणून ...." संकेत म्हणाला 
  " नाही , नाही ,  बरोबर बोलतेय ती , आपण सारं काही सांगायचं नाही . फक्त सांगायचं कोणीतरी मारायला मागे लागलाय आणि त्याचं वर्णन करायचं .   जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच थांबू .....
   " ठरलं तर मग तुम्ही दोघी पोलीस स्टेशनला जा आणि आम्ही दोघे त्या पोर्टल कडे जातो ...." रवी म्हणाला . त्या दोघीही पोलीस स्टेशन कडे जाण्यासाठी निघाल्या  आणि रवी व संकेत त्या पोर्टलकडे कडे निघाले . 

त्या दोघीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या . दोघीही जरा दबकत दबकतच आत गेल्या . 
  "  काय गं पोरींनो इकडे कुठे ...?
   " काही नाही साहेब कंप्लेंट करायची होती ....."
 अंजली म्हणाली 
    " कशाची कंप्लेंट करायची तुम्हाला ...? बापमाणूस  नाही का बरोबर....? 
"  कंप्लेट आम्हाला करायचीय , फक्त आम्हाला करता येत नाही का ...? पुन्हा अंजली म्हणाली 
  " या या ... इकडे या..  बसा असं खुर्चीवर . सगळं खरं हाय , पण उठ सूट कंम्प्लीट करायला ही काय मोबाईल कंपनीचा ऑफिस नाही....  तुमची कुणी छेड काढली असेल तर सांगा . त्याला चांगलाच चोप देऊ.  पुन्हा कोणी बघायची हिंमत पण करणार नाही....  
  " तसं काही नाही साहेब मला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतोय...  प्रीती म्हणाली ... 
     नंतर तिने ममागच्यावेळी अंजलीच्या घरात घडलेल्या घटनातून काही घटना वगळून जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या सांगितल्या . 
    "  बरं बरं लिहू तुमची कंप्लेंट . दोन मिनीटं बसा जरा त्या बाकड्यावर . माझं हातातलं काम आटपल लिहून टाकू तुमची कंप्लेंट ....
    त्या दोघीही बाकांवरती बसल्या तो बाक खिडकीला लागून होता  . प्रीती व अंजली त्या ठिकाणी बसल्या .  त्यांची पाठ खिडकीकडे होती .  बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अशा घडतात की त्यांना स्पष्टीकरणे नसतात . प्रीतीला जो मारायला आला होता , तो हुशार तर होताच पण अजून त्याला प्रीतीला मारता आले  नव्हते .  आताही त्यांचा पाठलाग करत तो पोलीस स्टेशन पर्यंत आला होता .  पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूने आत शिरत ज्या खिडकीपाशी त्या दोघी बसल्या होत्या तिथे आला .  सायलेन्सर बसवलेल्या बंदुकीने त्याने गोळी झाडली .      त्याला वाटलं की गोळी तिला लागली म्हणून तो लगेचच पळाला .  पण ती गोळी लागली एका पोलिसाला .  जेव्हा त्याने गोळी झाडली त्याचवेळी प्रीती बाजुला झाली व ती गोळी त्या पोलिसाला लागली . पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ माजला . मारेकरी पळून जाताना प्रीती व अंजलीने पाहिला  . त्याच्यापाठोपाठ दोन-चार पोलिसही गेले . 
   "  कोणाची एवढी हिंमत झाली रे पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोळी झाडायची...  
   "  साहेब तोच होता , जो आमच्या मागे लागलाय... प्रीती म्हणाली 
" अगं पोरींनो तुम्ही केलंय तरी काय एवढं गुंड माग लागण्यासारखं ..... तो हवालदार म्हणाला . 
  "  तेच सांगत होतो आम्ही , आम्ही काहीच केलं नाही आणि तो आमच्या का मागे लागलाय तेच आम्हाला कळत नाहीये...  अंजली तावातावात म्हणाली 
     तोपर्यंत ॲम्बुलन्स आली होती जखमी पोलिसाला हलवलं होतं . त्याचं रक्त सर्वत्र पसरलं होतं . 
    " बर मला सांगा तुम्हाला मारायला जो कोणी मागे लागला त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का..?  म्हणजे तो कोण आहे...?  कोण असू शकतो ...? तुमचं कोणा बरोबर भांडण वगैरे झाले का ....?
  " साहेब प्रीतीचं कोणा बरोबर भांडण नाही ...? तिला मारायच्या मागे कोण लागले तेच आम्हाला कळेना....  
    तोवर तिथली वॉकी-टॉकी वाजली . त्या मारेकऱ्यालग पकडण्यात यश आलं होतं . त्याला घेऊन स्टेशन कडेच येत होते .
   " तुम्ही थांबा थोडा वेळ इथेच... 
  पोलीस त्याला घेऊन आत आले .  आल्या आल्या त्याला साहेबांनी पट्ट्याने चांगलाच चोप दिला . त्याचा कोट टोपी काढून बाजूला टाकले . जेव्हा त्याचा मास्क काढायला गेले , तेव्हा तो वेड्यासारखा करू लागला .  पण सगळ्या पोलिसांपुढे त्याचा काही निभाव लागेना .  शेवटी त्याचा मास्क काढलाच .  त्याखालचा चेहरा पाहून प्रीती जागीच स्थिर झाली . तिच्या डोक्यात विचार येण्या अगोदर त्यानं पोलिसांच्या  कमरेची पिस्तुल काढून प्रीती वरती गोळ्या झाडल्या .  हा तिचा आठवा मृत्यू होता .  आणि लूप पुन्हा एकदा रीसेट झाला ....

8

   ते दोघे त्या टाईम पोर्टलकडे निघाले होते . संकेतने ते हे पोर्टल पाहिले होते . पोर्टल चालू करून आत कसे जायचे हे त्याला माहित होते . 
" पोर्टल उघडून आपण आत जाऊया , मग कळेलच आपल्याला तो कोण आहे ते....? " संकेत म्हणाला 
   " ते ठीक आहे ,  पण तो अगोदरच आला तर....  रवी म्हणाला ...
   " टेंशन नको घेऊ , मी अंजलीच्या घरचं रिवॉल्वर आणलंय एमर्जन्सीला...."
      काही वेळातच ते त्या जुन्या पुलाजवळ पोहोचले .  जुना पूल आडबाजूच्या ठिकाणी होता .  फार पूर्वी शहरात येण्याचा तो मुख्य रस्ता होता . पण कालांतराने तो बंद झाला होता .  बांधकाम बऱ्यापैकी . 
    " कुठे आहे रे ते पोर्टल... रवि 
   " अरे मी पाहिलय, त्याने इथेच कुठेतरी पाय देत पोर्टल उघडलं होतं..... "  संकेत इकडेतिकडे जमिनीवरती पाय दाबत म्हणाला .  बराच वेळ तो पोर्टल उघडण्याचा प्रयत्न करत होता , पण त्याला न पोर्टल सापडत होतं , न पोर्टल उघडत होतं . 
" नसेल रे इथे पोर्टल तू काहीतरी वेगळं पाहिलं असशील.... "
   "  नाही रे मी पाहिलं होतं....
   "  सोड रे संकेत , आपण जाऊ या माघारी . प्रीतीच्या जीवाचा प्रश्न आहे ....."
    " तेच म्हणतोय मी . प्रितीच्या जीवाचा प्रश्न आहे . तुला काही काळजी आहे का नाही.... पोर्टल  शोधणं किती महत्त्वाचं आहे हेही कळत नाही का तुला....? "
 "  पोर्टल शोधायला हरकत नाही पण ते असायला तरी पाहिजे . मला तर अजूनही तुझ्यावरच कधी कधी शंका येते  . जेव्हापासून तुला बोलवले मदतीसाठी , तेव्हापासून तर प्रीतीचा लवकरच मृत्यू होतोय. मला तर वाटतंय तूच मदत करतोयस जो कोणी खुनी आहे त्याला ....
     रवीच्या या वाक्याने संकेतच्या तळपायाची आग मस्तकाला गेली .  त्याने रवीला जोरात कानाखाली बजावली .  आणि त्यांची मारामारी सुरू झाली . ते दोघेही जोराने भांडत होते एकमेकांना मारत होते पडत होते उठत होते पण त्यांच्या भांडणात कोणाचा तरी पाय त्या बटनावरती पडला असावा ,  कारण त्यांच्य भांडण चालू असतानाच ते पोर्टल उघडले . पोर्टल उघडल्यावर ते दोघे आत गेले .  निळसर ज्वाला , गोलाकार. एका बाजूला भूतकाळ तर दुसरीकडे भविष्यकाळ . ते दोघे आत गेले पण तिथेच महेंद्र स्वामीनाथन होता .  
    " तू मला वाटलंच होतं , तुझा हात आहे या साऱ्या मागे.... "  रवी तावातावाने महेंद्राच्या अंगावर धावून गेला . संकेतने आजूबाजूला पाहिले . रवि कुठेच दिसत नव्हता . कोणीतरी महेंद्रच्या अंगावर धावून गेलं होतं . पुढे होत त्याने त्या मनुष्याला महेंद्र पासून सोडून बाजूला केले .  पण करताना त्याने तिथे चकाकणाऱ्या काचेत स्वतःचे प्रतिबिंब पाहिलं . तो मोठा झाला  होता .  त्याचं वय शरीर आवाज सारकाही बदललं होतं . 
    " तर तुम्ही भूतकाळातले रवी आणि संकेत आहात तर ...  महेंद्र स्थिर होत म्हणाला 
    " आम्ही वेगळा का दिसतोय ...." 
संकेत ने विचारले
  " म्हणजे "  संकेत म्हणाला 
   " होय ,  तुम्ही तुमच्या भविष्यात होणाऱ्या शरीरात आहात किंवा तुमचे शरीर भविष्यात असं होणार आहे .....
    " अरे संकेत बोलत काय बसलायस , हाच आहे , याला मारलं की टाईम लूप थांबेल...."  रवी म्हणाला .
अजून फक्त एकदाच टाईम लूप रिसेट होणार , एकदा का प्रीतीचा ९ वेळा  मृत्यू झाले की पुढे लूप रिवाईंड होणार नाही .  दहाव्यांदा मृत्यू झाला की तो मृत्यू कायमचा असेल .  आणि मी हे करत नाही , सर्वकाही तू स्वतः करतोयस....... महेंद्र रवीला म्हणाला ....
      " काहीही काय बोलतोयस , मी का प्रीतीला मारेन...  संकेत ऐकून काय घेतोस तु याचं ,  याला मारल्याशिवाय प्रीतीला वाचवणं शक्य नाही......"
    " अरे रवी ,  तू म्हणजे तू नाही  , भविष्यातला तू...  भविष्यातल्या रवी प्रीतीला मारायचा प्रयत्न करतोय.....
  
   " भूतकाळ वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ मी तिला कधीच मारू शकत नाही .  संकेत तो आपल्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय ...
   
    " मला खोटं बोलून काय मिळणार आहे तुम्हाला खोटं वाटत असल्यास माझ्याकडे पुरावे देखील आहेत ... 
    असं म्हणत त्याने तेथील एक व्हिडिओ प्ले केला .  व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती रवी सारखी दिसत होती .  रवी सारखी दिसत होती म्हणण्यापेक्षा तो रवीच होता . पण भविष्यकाळातला . 
"  ती तेव्हाच मेली असती तर माझ आयुष्य काही वेगळच असतं . मला आता ते बदलायचे आहे . मी भूतकाळात जाऊन इच्छितो . मी तिला त्या वेळेस मारून टाकेन.... 
    "  हा एडिटेड व्हिडीओ आहे संकेत....  
    "  होय हा एडिटेड आहे .  मीच एडिट केला आहे .  यातून फक्त माझा आवाज कापलाय . तुझा आवाज खरा आहे ......
    ." महेंद्र म्हणजे तू याला मदत केलीस .... संकेत म्हणाला 
     " होय . I am scientist and I wanted to test my theories and I got the volunteer . Why would I lose such opportunity ....
  
    " तुझ्यामुळे हे सर्व झाले आहे , तू या साऱ्याला कारणीभूत  आहे . तू एक मूर्खाला मदत केली जो स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता दुसऱ्या दोष देतो . त्याला मदत करून तू तुझी हुशारी सिद्ध केली आहेस ...
      " माझ्या हुषारीच बोलूच नका , मी जर हुशारी दाखवली नसती तर प्रीती पहिल्यांदाच मृत्यू पावली असती . मी लूप रिवाइंड करण्याची पद्धत अवलंबली नसती तर तुम्हाला काहीच करता आलं नसतं . त्यामुळे मला रागावण्या ऐवजी माझे आभार माना... I gave you chance to save her .....

    " तू मूर्ख आहेस का तूच तर पहिल्यांदा तिला मारणासाठी मदत केली...
 " Science needs sacrifice . या छोट्याशा एक्सपिरिमेंट मधून मी बरंच काही शिकलो आहे .   Time loop , realities , alternative time line , functioning of brain in different realities , memories ... 
तो बराच वेळ अशा काही गोष्टी बडबडत होता ... 
    तुम्हाला काय सांगतो हे सगळं ...? मी केलेल्या छोट्याशा प्रयोगामुळे संपूर्ण मानव जातीला किती मोठा फायदा होणार आहे याची तुम्हाला कल्पना नाही...
" पण आमच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार तुला कोणी दिला.....
    "  तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का ...? भरपूर झाली तुमची प्रश्नोत्तरे . आता तुम्हाला बाहेर काढायलाच पाहिजे.....
     तो त्याच्या डेस्ककडे वळला . तेव्हाच रवीने त्याच्यावरती झडप मारली .  दोघांनी मिळून त्याला खुर्ची वरती बांधलं . 
    "  आम्हाला सांग हे थांबवायचं कसं ....? रवी म्हणाला
    "  जोपर्यंत दोघातील एक मरत नाही , किंवा असे म्हटले तरी चालेल जोपर्यंत प्रीतीला रवी मारत नाही तोपर्यंत हे थांबनार  नाही . अजून फक्त दोन वेळा लूप रिवाइंड  होईल . दहाव्या वेळा तर ती मेली तर ती कायमसाठीच....
      महेंद्र विकृतपणे हसत बोलला
   "  संकेत तुला माहितीये , मी प्रीतीला कधी मारणार नाही . I love her , you know that right . 
  " तू नाही रे करणार , ते मलाही माहीत आहे .पण भविष्यातल्या तू , त्याला कोण अडवणार . त्यामुळे तर प्रत्येक वेळी त्याला आपला ठिकाणा माहीत होता .  तुला जे माहित आहे , ते त्यालाही माहित आहे .   तू जे पाहतो ऐकतो , ते त्याच्या आठवणीत जमा होतं . ....
     " अरे संकेत हुशार आहे तू , पण तुला हे कळले नाही कि प्रीती तुला का सोडून गेली ...? तिने  रवीची निवड का केली ,  तुला नाकारून ....? हा प्रश्न अजूनही तुला छळतो ना ...? "  महेंद्र त्याला खुनशीपणे हसत विचारत होता. 
संकेत ने त्याला जोरात बुक्की मारली . त्याच्या तोंडून रक्त आले .  तो बोलला 
    " होय ना रवी .  तुला माहित आहे ना सारे...  प्रीतीला संकेतचा राग का आला...  तू सांगितलं नाहीस का संकेतला खरे कारण ..... 
     " संकेत त्याचं काही ऐकू नकोस , तो आपल्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करतोय ... रवी  म्हणाला 
     " मी , मी प्रयत्न करतोय फूट पाडायचा . तुझं काम आहे ते . माझं नाही.  आठव संकेत .  प्रीती आणि तुझं कधी भांडण झालं होतं का....?  तुमच्या आयुष्यात रवी येईपर्यंत ... 
     रवी नेही त्याला जोरात बुक्की मारली 
    " संकेत त्याचा ऐकू नकोस ...
     " आणखी एक गोष्ट त्या भांडणाचा तुला कधी संदर्भ लागला का ...? ती काय बोलत होती ...? का रागला गेली होती हे तुला कळलं का ....? नाही ना....! तू तेच ऐकत होतास आणि समजत होतास जे रवी तुला सांगत होता .  रवीला विचार ना,  त्याने तुझ्याशी मैत्री का केली ...? त्याला प्रीती  हवी होती . तुझा वापर करून तुमच्या दोघात फूट पाडून त्याने प्रीतीला मिळवलं.....
" रवी काय बोलतोय हा....! 
" तो खोटं बोलतोय संकेत , तू त्याचं ऐकू नकोस ...."
   रवी म्हणाला . तो घाबरला होता . संकेत त्याच्या अंगावरती धावून येत होता .  तेव्हाच तिकडे भविष्यातल्या रवीने पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या प्रीतीला मारले आणि आणि लूप पुन्हा एकदा रिवाइंड झाला .... 

9

विश्वास हा फार मोठा शब्द आहे .  विश्वास घात हा आजकाल दैनंदिन वापरातील शब्द झाला आहे . कॉलेजचे दिवस . अकरावीत असताना रवी पहिल्यांदा त्याला भेटला होता . प्रीती व संकेत आनंदात होते पण महेंद्रने बोलेल्या गोष्टीमुळे संकेत आता विचार करू लागला होता .  त्याने बोलली प्रत्येक गोष्ट खरी होती . शब्द न शब्द तंतोतंत लागू पडत होता . त्याचा एवढा जवळचा मित्र आणि त्यानेच एवढा मोठा डाव खेळला होता . त्याला आश्चर्य करावे की दुःख ,  रवीचं सत्य उघड झालं म्हणून आनंद व्यक्त करावा की प्रीतीला वाईट वाटेल म्हणून शोक काहीच कळत नव्हतं . टाईम लूप रिवांइड झाला होता .  ही नववी वेळ होती . म्हणजे ही शेवटची संधी होती .  फक्त अजून एकच वेळा  लूप रिसेट होणार होता . संकेतने डोक्यातले विचार बाजूला सारत रवीला फोन केला 
   " कुठे आहात रे तुम्ही.... 
    " प्रीतीला आठवतय सार , मागच्या वेळी तिने भविष्यातल्या रवीला पाहिलय .  आणि आता तिला सारं काही आठवतंय....
   " तुम्ही घरीच आहात ना....
    " हो रे ....
      "  तिथेच थांबा मी आलो.... संकेत 
" कोणाचा फोन होता...." प्रीती 
  " संकेतचा तो येतोय... रवी 
" त्याला माहीत आहे का की तूच....? प्रीती
" होय मागच्या वेळी आम्ही टाईम पोर्टलमध्ये गेलं होतो तिथं कळालं आम्हाला....
" पण कारवी का तू असं करशील....? 
" अगं प्रीती तो मी नव्हेच .  तो भविष्यातला रवी आहे .  मी तुला कधीच दुखावणार नाही... रवि तिला समजावत म्हणाला
" तरीही असं काय झालं भविष्यात , कि भविष्यातला रवी मला मारण्यासाठी भूतकाळात आलाय...
" मला माहित नाही , पण तो महेंद्र वेडा होता भविष्यातला . त्याच्यासाठी हा फक्त एक प्रयोग आहे...
" रवी माझ्याकडे बघ ,  मला सांग सर्वकाही , मला माहित आहे तू मला दुखावणार नाही पण मला वाटतंय तू काहीतरी लपवत आहेस...  I still love you . माझं तुझ्यावरती प्रेम आहे भविष्यातल्या रवी वरती नाही....

      तेव्हाच संकेत तिथे आला .  
   " मला तुम्हाला दोघांनाही काहीतरी सांगायचं आहे ....रवी म्हणाला 
    संकेत व प्रीती दोघेही तिथे  बसले आणि रवी बोलू लागला
" पैज ही वाईट गोष्ट आहे , आणि मी तेव्हा माझ्या उनाड मित्रांनी बरोबर ती लावली होती . त्या वेळी ती गोष्ट फार शुल्लक वाटली , पण ज्यावेळी मला त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं होतं , तोपर्यंत फार उशीर झाला होता ....
   "  काय बोलतोयस काय  रवी.... प्रीती 
  " तुला जिंकायची पैज लावली होती त्यानं ,  जणू तू काही वस्तू होतीस ... संकेत रागाने बोलून गेला  " गोष्टी ऐकत बसायला आपल्याकडे वेळ नाही भविष्यातला रवी कधीही येऊ शकतो .....
     त्याने रवीच्या डोळ्याला पट्टी बांधली .  कानात बोळे कोंबले आणि डोक्यावरती काळी पिशवी झाकली . 
    " काय करतोयस नक्की संकेत तू....?  प्रीती म्हणाली " त्याला जे काही दिसतं ते त्याच्या आठवणीत जमा होतं .  आणि ते भविष्यातल्या रवीला माहीत होतं . त्यामुळे तर प्रत्येक वेळी त्याला आपला ठिकाणा माहीत व्हायचा ...
 संकेतला एक मेंटल इन्स्टिट्यूट माहीत होती . ज्याठिकाणी रूग्णाला असलेल्या खोल्या बाहेरच्या परिसरापासून पूर्णपणे वेगळ्या केलेल्या असतात . ते तिघेही कुठे आहेत ते रवीला कळणे अशक्य होतं . तिघेही त्या खोलीत गेले.  दार वगैरे लावून घेतल्यानंतर त्यांनी रविच्या डोळ्यावरची पट्टी काढली . कानातले बोळे काढले . 
" बोल आता ....संकेत म्हणाला
" प्रीती मी जे काही केलं त्याची मला लाज वाटते पण मी तुझ्यावरती खरच प्रेम केलं होतं ... रवी म्हणाला 

     " पण तू काय काय नि कसं केलं ते सांग आधी .. " संकेत म्हणाला 
    " मी त्यावेळी खरंच मूर्ख होतो .   कोणताही विचार न करता कृती करायचो.  माझी पैज लागली होती तुला माझ्या प्रेमात पडायचं पण झालं उलटंच मी तुझ्या प्रेमात पडलो . पण हे नंतर . सुरुवातीला मी हे सर्व प्लॅनिंग केलं होतं .  संकेत बरोबर मैत्री . इतका जवळचा मित्र होतो की त्याचे पासवर्डही मला माहित होते . मग  एका मुलीला आम्ही त्याला फसवण्यासाठी तयार केलं . संकेतच्या अकाऊंटवरून तिच्या सोबत सेक्स चॅट केल्याचे स्क्रीन शॉट काढून मी प्रीतीला दाखवले . कन्फर्मेशन करायला ती मुलगी होतीच .  मला त्यावेळी हा सारा खेळ वाटला होता . पण आता जेव्हा तिला झालेले दुःख आठवते तेव्हा माझं हृदय पिळवटून निघत . संकेतला याबाबतीत काहीच माहिती नव्हतं . तो फारसा मोबाईलही वापरायचा नाही . मीच त्यावेळी त्याला सर्व अकाउंट तयार करून दिले होते . त्यामुळे तिच्या बोलण्याचा त्याला काहीच संदर्भ लागला नाही .  पण मी तुम्हा दोघांचा एकमेकांसोबत  संपर्क होऊ दिला नाही . मी तुम्हा दोघांनाही वेगवेगळ्या गोष्टी सांगून दूर केलं .  प्रीतीच्या मनात संकेत विषयी विष कालवलं . तिचं मन पूर्णपणे द्वेषाने भरलं . पण संकेतच्या मनात द्वेषला जागा नव्हती .  मी त्याला पटवून दिलं की प्रीतीला तो आवडत नाही . तिला सरळ सांगनं चुकीचं वाटतंय म्हणून तिने भांडण केलं . वगैरे वगैरे . तिला मी आवडतो ती आनंदी आहे ,  म्हटल्यानंतर एका आदर्श प्रेमी प्रमाणे तोही आनंदी झाला . सगळं झालं . ठरल्याप्रमाणे मी पैज जिंकलो होतो , पण मला खाल्ल्यासारखं वाटत होतं... तुम्हा दोघांना दूर केल्यामुळे माझं मन मला खात होतं . पण त्या अपराधीपणाला मी आतल्या आत गाडून टाकलं .  मी प्रीती बरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं पण आता माझं तिच्यावर ती खरंच प्रेम झालं होतं . अजूनही आहे आणि मी मरेपर्यंत राहील... 

   हे सारं काही ऐकून संकेत व प्रीती दोघेही निशब्द झाले .  प्रीतीला स्वतःचा राग येत राग येत होता .  तिचे संकेत वरती प्रेम होतं पण विश्वास नव्हता . विश्वास असता तर तिला कळालं असतं की संकेतने तिचा विश्वासघात केला नव्हता . रवीने  सांगितलेल्या व त्या दुसऱ्या मुलीने खात्री केलेल्या गोष्टी तिने संकेतला स्पष्टीकरण देण्याची ही संधी न देता खऱ्या मानल्या होत्या . तिला स्वतःच्या मूर्खपणाची किव येत होती .  संकेतच्या खऱ्या प्रेमाचा तिला अभिमान होता .  तिने वेळोवेळी संकेतचा अपमान केला होता पण अजूनही तो तिच्यासाठी झटत होता .  तिला आता प्रश्न पडला होता या प्रेमाला आपण पात्र आहोत का...?  या सार्‍या गोष्टी तिच्या डोक्यात चालू असताना प्रीती रडत होती .  संकेत तिच्या जवळ जात तिला शांत करायचा प्रयत्न करू लागला...
" I am so so sorry माझी चूक झाली रे ...
" असू दे तुझी चूक नव्हती ,  तुला जे सांगितलं , दाखवलं त्यामुळे तू तशी वागलीस.  तुझ्या जागी मी असतो तर मीही तसंच केलं असतं ....
   " नाही ना...  तू तसं काहीच केलं नाही .  मीच मूर्ख होते , नाही मीच मूर्ख आहे ... मी तुझ्या प्रेमाला खरंच पात्र नाही....  ती जोरजोरात रडत होती . स्वतःचा राग करत होती .  त्याच वेळी त्या खोलीचं दार उघडलं. 
   "  तर आता सगळ क्लिअर झालय ...  तर एकदाच हा खेळ संपवून टाकू.... 
भविष्यातल्या रवी आत येत बोलला... 

10 
     
   .." मी तुला कधीच मदत करणार नाही . मी तुझ्या सारखा कधीच होणार नाही .  .....
   वर्तमानातल्या रवी त्या भविष्यातल्या रवीला म्हणाला .      "    तू आणि मी आपण दोघे काही वेगळे नाही आहोत .  तुला ही आतल्याआतमाहित आहे की ज्यावेळी तुझं खरं बाहेर आलं त्यावेळी ती तुझ्यासोबत राहणार नाही .... काही वर्षांनी तुझी अवस्था माझ्यासारखीच होईल ... तू बाजूला सर . मला माझं काम करू दे .  नंतर तू माझं आभार मानशील . वर्तमानातला रवी भविष्यातल्या रवी च्या समोर उभा होता . भविष्यातल्या रविने  बंदुक काढली आणि त्याच्या अंगावर धावून गेला .  वर्तमान काळातल्या रवीने भविष्यकाळातल्या रवीच्या हातून बंदूक घेतली व बाजूला फेकली . त्या दोघांची मारामारी चालू होती . 
    "  संकेत बंदूक उचल नि गोळी घाल... 
     संकेतने बंदुक उचलली खरी पण तो बंदूक घेऊन शब्द उभारला .  त्यांची मारामारी चालु होती गोळी कोणत्याही रवीला लागली तर समस्या सुटणार होती .  आताच्या रवीला मारलं तर भविष्यातला रवी राहणारच नाही आणि भविष्यातल्या रवीला मारलं तरी हे चक्र थांबणार होतं . त्याला कितीही राग आला असला तरी तो तो  वर्तमानातल्या रविला मारू शकत नव्हता आणि भविष्यकाळातल्या रवीला मारण्यास त्याचा निशाणा नव्हता . ते दोघेही सतत हलत होते . 
    "  फार वाट बघू नकोस ...
भविष्यकाळातल्या रवी समोर वर्तमान काळातला रवी फार काळ टिकू शकला नाही त्याला जोरात लाथा रडत भविष्यातला रवी संकेत कडे धावला त्याच्या वरती नेम धरत संकेतने बंदूक चालवली पण त्याने चपळतेने गोळी चुकवली संकेत जवळ येत त्याने त्याच्या हातून बंदूक घेत संकेतवरतीच गोळी झाडली .  गोळी संकेतच्या डोक्यातून आरपार जात रक्ताचे शिंतोडे उडवत मेंदूचे भाग सर्वत्र पसरवत गेली . संकेत जागीच ठार झाला . भविष्यातल्या रविने आता प्रीतीवरती  निशाणा धरत ट्रिगर ओडला पण तेव्हाच प्रीतीला बाजुला ढकलत असताना ती गोळी वर्तमानातल्या रवीला लागली . वर्तमान काळातल्या रवीचा मृत्यूमुळे भविष्यातला रवी ही जागीच  विरून गेला .  काही कळायच्या अगोदरच प्रीतीवरती प्रेम करणाऱ्या दोन्ही तरुणांचा  मृत्यू झाला होता . 

     समाप्त....

No comments:

Post a Comment