Monday 23 December 2019

प्रलय-३०

प्रलय-३०

    आयुष्यमान जेव्हा दुसऱ्यांदा प्रलयकारीके चा सामना करण्यासाठी  मारूतांच्या जुन्या मंदिरात सामोरा गेला ,  त्यावेळी प्रलयकारिकेच्या आत्मबलीदानाचा विधी पूर्ण झाला होता . प्रलयकारिका संपूर्ण शक्तिशाली झाली होती .  तिच्या त्या काळ्या डोळ्यात पाहत असतानाच तो तिच्या नियंत्रणाखाली आला होता . ज्यावेळी ती पेटी आयुष्यमानला दिसली त्यावेळी प्रलयकारिकेचा सेवक जागृत झाला . आयुष्यमानने ती पेटी चोरली व सुरुकु सोबत प्रलयकारीके  कडे निघाला .

              इकडे तीन बहिणींच्या किमीयेमुळे प्रथम मानवांचा प्रमुख अंकितला प्रलयकारिकेला लढण्याची शक्ती प्राप्त झाली होती . प्रलयकारिकेचा मृत्यू निश्चित असतानाच , सुरूकू व आयुष्यमान त्या ठिकाणी आले .  त्या दोघांबरोबर प्रलयकारीका तिथून निघाली . पेटी पाहिल्यानंतर तिने आयुष्यमानला रक्षक राज्याकडे न्यायला सांगितले . ज्या ठिकाणी या साऱ्याची सुरुवात झाली होती , ती घटना ज्या ठिकाणी घडली होती , तिथेच त्याचा जन्म व्हायला हवा होता म्हणून ते  रक्षक राज्याकडे चालले होते . उत्तरेच्या जंगलात असलेल्या सैनिक तळ हाता रक्षक राज्यातील महालात पोचला होता .  विक्रमाच्या वधानंतर त्यांना काहीही न करता महाल ताब्यात घेतला होता .  सरोज भिल्लव सार्थक अधिरात आणि अद्वैत   बरोबरच सर्वजन उत्साहात होते . नाही म्हटलं तरी महालात  उत्सवाचे स्वरूप आले होते . महाराज विक्रमांची काळी छाया गेल्यामुळे जनु महालही  आनंद झाला होता .

         पण खरी दुरावस्था होती ती महाराणी शकुंतलेची .  काही केलं तरी विक्रम त्यांचा मुलगा होता . नवीन जन्मलेला राजपुत्र नसत्या कारणासाठी बळी गेला होता .  पहिला मुलगा स्वतःच्या पतिनेच म्हणजेच महाराज सत्यवर्माने जिवंत जाळला होता . तिचा आयुष्य म्हणजे एक शोकांतिकाच होती . सारा उत्साहाच्या वातावरणात महाराणी शकुंतला त्यांच्या कक्षात शांतपणे बसल्या होत्या . महाराज विश्‍वकर्माचा परतीच्या मार्गावर आहेत हे सांगण्यासाठी भिल्लव गेला होता पण महाराणींनी द्वारही उघडले नाही .

      सरोज हातात मदिरेचा प्याला घेऊन महालाच्या एका बाजूला असलेल्या सज्जातून बाहेर पाहत होती .  समोर पसरलेलं नगर दिसत होतं.  थोडंसं दूर , जुन्या जळून खाक झालेला महालाचा सांगाडा दिसत होता . जिथे या साऱ्याची सुरुवात झाली होती .

    " तुला काय झालं अजून अशी काय एकटी उभारली आहेस ......" भिल्लव सुरोजला म्हणाला ....
     " काहीही म्हण पण जरा उदास वातावरण वाटतय ,  जणू काही वादळापूर्वीची शांतता.....
     " काही नाही सगळे व्यवस्थित झालय .  आपण जिवंत आहोत , राजद्रोही नाही आहोत आणि चक्क राजमहालात शाही मदिरा प्राशन करत आहोत . अजून काय पाहिजे.....
     " अरे ते तर आहे रे पण ,  प्रलय प्रलयकारिका या गोष्टी ऐकल्या नि मनात उगाच  हुर हुर लागलीय रे .....

      भिलवा ने तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठाचे चुंबन घेतले " आता गेली का तुझी भीती......"
 आणि दोघेही हसले

      त्याचवेळी जळालेल्या जुन्या महाला वरती एक गोलाकार प्रकाश कोसळला . एक मोठा विस्फोट झाला . त्याच्या ज्वाला पसरत काही क्षणात त्या दोघांपर्यंत पोहोचल्या .  एकमेकांच्या मिठीतच ते होत्याचे नव्हते झाले . राजमहाल व रक्षक राज्याची राजधानी काही क्षणात पृथ्वीतलावरून नाहीसे झाले होते .

     ज्यावेळी प्रलयकारीका व आयुष्यमान रक्षक राज्याच्या राजधानी वरून सुरूकु वर बसून निघाले होते ,  त्यावेळी आयुष्यमानच्या हातात असणारी पेटी हलू लागली व ती खाली पडली . त्यातून निघालेला निळसर प्रकाश त्या जळालेल्या मालाच्या सांगड्याकडे गेला .  आणि एक मोठा विस्फोट झाला .  विस्फोटानंतर  काही वेळ ते आकाशात उडत राहिले नंतर ज्या ठिकाणी तो जूना महाला होता त्या ठिकाणी उतरले .  त्याठिकाणी आता फक्त काळी राख होती . तो निळसर गोलाकार प्रकाश एका गोलाकार उंचवट्यावरती चमकत होता . प्रलयकारिका तिथे गेली आपला हात पुढे केला चाकूने कापला . त्यातून रक्त पडू लागले . त्यावेळी ती कसलेतरी मंत्र बरळू लागली . तिच्या हातातून रक्त पडत होते व त्या प्रकाशात विलीन होते . हळूहळू त्या प्रकाशाचा आकार मोठा होऊ लागला.  आताच्या प्रकाशाच्या गोलातून गोलाकारा दोरखंड निघाले व त्यांनी सुरुकुला स्वतःमध्ये सामावून घेतले . सुरुकुचा बळी त्या प्रकाशाने घेतला व त्यानंतर एक छोटासा विस्फोट झाला . आयुष्यमान व प्रणय कार्यक्रम दोघेही मागे फेकले गेले आता त्या प्रकाशाचा कार भरपूर मोठा झाला होता । पुन्हा एकदा त्यातून दोन विजा चमकल्या . एक वीज आयुष्यमान वरती पडली व दुसरी प्रलयकारीके  वरती आयुष्यमानचा जागीच हाडाचा सांगाडा तयार झाला व तोही हवेत विरून गेला . प्रलयकारीका मात्र फक्त बेशुद्ध झाली व खाली पडली .

     हळू हळू तो प्रकाश लहान होत गेला व शेवटी त्यातून एक लहान मुलाप्रमाणे दिसणारा तरीही विचित्र असा आकार बाहेर पडला . त्याचे संपूर्ण शरीर समुद्राच्या पाण्यासारखे फिकट  निळे होते . डोळे काळेकुट्ट होते . हाताची पायाची नखे व जीभ लालभडक होती . जन्मताच एखाद्या  प्राण्यासारखे चार पायावर चालत तो आकार  निघून गेला  प्रलयाचा जन्म झाला होता .

                          उपसंहार

          जन्म त्याचा झाला होता
          विनाश धरतीचा आला होता
         मृत्यू एक वेळ बरा , पण आता
          धरतीवरती नर्क येणार होता

         माणसाची माणुसकी
        सर्वात आधी संपणार होती
        माणुसकी संपल्यावरती
        मानवता कुठे उरणार होती
         एकदा का मानवाची
        मानवता जर हरवली
           मानवाची कर्मे मग
      दानवाला ही घाबरवतील

       तीन राजांच्या नावाखाली
         धरती जेव्हा एक होईल
         प्रलयला मात्र तेव्हा
         पळता भुई थोडी होईल




1 comment: