Thursday 31 January 2019

Farmhouse 3


    ते फार्महाउस गावाच्या बाहेरच्या बाजूला होते . पूर्णपणे मोकळ्या ओसाड माळरानावर .  छोटी-मोठी खुरटी झुडपे सोडली तर एकही मोठे झाड त्याठिकाणी नव्हते .  ओसाड माळरानावर असलेले ते फार्महाउस  भयाने ओतप्रोत भरलेले होते . गण्याला वाटेत वेळोवेळी दिशेचं ज्ञान होत होतं . तो    त्या पोलिसाला सांगत होता आणि असे करत करत तिघांचाही ताफा त्या फार्महाउस कडे चालला होता .  शेवटी ते फार्महाउस पाशी पोहोचले .  त्याठिकाणी पोहोचेपर्यंत सूर्य मावळून संध्याकाळचा गार वारा सुटला होता .  पश्चिमेकडे पसरलेल्या लालिम्याच्या पार्श्वभूमीवर ते फार्महाउस शिकारीसाठी टपून बसलेल्या आहे हिंस्र श्वापदाप्रमाणे दिसत होते . गार वाऱ्यामुळे की अनामिक भीती मुळे तिघांच्याही अंगावरतीं शहारे येत होते .  काळोख पसरत चालला होता . त्यांनी रस्त्याच्या बाजूलाच गाडी उभा केली.  फार्महाउस पर्यंत गाडी जात नव्हती.  मुरमाड व काट्याकुट्यांची एक पायवाट   जात होती . दूर असलेले ते फार्महाउस अंधाराची चादर ओढून कोणत्यातरी अघोर कार्यात व्यस्त असल्यासारखे भासत होते
  शैलाने पाऊलवाटेवर पाय ठेवला व ती त्या दोघांचीही वाट न बघता सरळ चालू लागली .
" शैला थांब जरा मिळून जाऊ ....
   गणेश तिच्या मागोमाग पाउलवाटेकडे जात म्हणाला पण जेव्हा त्याची पावले वाटेवरती पडली तो मंतरल्याल्याप्रमाणे तिकडे चालू लागला । त्या फार्महाऊसमध्ये जे काही होते ,  त्याची शक्ती अपार होती . ते तिघेही संमोहित अवस्थेत त्या फार्महाउस कडे खेचले जाऊ लागले . आता पूर्ण अंधार पडला होता .  कातळ काळोखात बुडून गेलेल्या त्या फार्महाउस समोरच एक लोखंडी प्लेट होती . तिला वरती हुक होता . शैलाने ती प्लेट उचलून एका बाजूला केली . आत एक भुयार होतं . तिघही त्या पायर्‍या उतरून खाली गेले.
   जेव्हा गण्या शुद्धीवर आला तेव्हा त्याने पाहिले तिघेही त्यांच्याच उंचीच्या खांबाला बांधले गेले होते . त्यांचे हात मागच्या बाजूला व संपूर्ण शरीराभोवती दाव्याने गुंडाळा केला होता . त्यांच्यापुढे सहा-सात फूट व्यासाची व दीड-दोन फूट उंच वर्तुळाकार वेदी होती . त्याच्या वरती काळे पडलेले रक्ताचे डाग होते . ती वेदी बळी देण्यासाठीच वापरली जात असावी . त्यांच्या उजव्या बाजूला एक  यज्ञकुंड होतं . त्याचा वापर नक्कीच चांगल्या कामासाठी केला जात नसनार.   यज्ञकुंडाच्या आजूबाजूला चित्र विचित्र साहित्य होत . हळद , कुंकू , गुलाल , तांदूळ , लिंबू , मिरच्या , बीबे , कातडी चपला , मांसाचे तुकडे , हाडे , कसले तरी केस  आणि दोन-तीन मडक्यात काही तरी भरून ठेवलेले होत . अशा चित्रविचित्र वस्तू त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या . त्यांच्या डाव्या बाजूला उंच , विशाल , अजस्त्र आणि तितकीच विचित्र मुर्ती दिसत होती . ती अंधारात गडप झाली होती . त्या वर्तुळाकार वेदीवर बरोबर मध्यभागी लावलेल्या मशालीच्या उजेडात याचा अर्धवट दिसत असलेल्या भागाण कुणालाही  घाबरवायला पुरेसा होता .  समोरच सिंहासनासारखं काहीतरी दिसत होतं .  अंधार असल्याने त्याच्यावर कोणी बसलेय का नाही याचा अंदाज लागत नव्हता .....
" झालं का पाहून ...? निरीक्षण करून ....."
     उजव्या बाजूच्या यज्ञकुंडात जवळ कोणीतरी उभं असलेलं अंधुक उजेडात दिसत होतं .
" बप्पा तुम्ही इथे ...." गण्या
" हो मीच ...."
" मला माहित होतं की तुम्ही येणार आमच्या मदतीला ....."
  "  मग मी येणारच होतो..... पण तुमच्या नाही त्यांच्या ,  आमच्या हुकुमच्या मदतीला ....."
  " काय .....कोण हुकुम .....? बाप्पा काय बोलताय .....?"
     बप्पा जरा पुढे सरल्यामुळे त्या मशालीच्या उजेडात त्यांच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य दिसत होतं......
" तुला काय वाटलं मी तुमच्या बाजूने आहे.......? "
आणि आसमंत एक कुत्सित हास्याने भरून गेला. बाप्पा त्यांच्या मूर्खपणावर  हसत होते .
" अरे मीच तुमचा बळी देणार , आणि पुन्हा आमच्या हुकुमना जिवंत करणार , पूर्ण शक्तीनिशी ......"
  
     पुन्हा एकदा बाप्पांनी हास्याची कारंजी उडवली . इतके दिवस जा बप्पा वर गण्याने आंधळेपणाने डोळे झाकून विश्वास ठेवला होता . तेच शत्रू होते . त्याला एकदाही जाणीव का झाली नाही ......? त्याला पश्चाताप वाटत होता  . त्याने बाप्पा वर विश्वास ठेवला त्याचा त्याला राग येत होता .  स्वतःच्या मूर्खपणाने इतरांनाही त्यांने संकटात टाकलं होतं .
" म्हणजे ते सत्याचा शिलेदार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी खोट्या होत्या ..... आमचा बळी द्यायचा होता म्हणून गुंफलेलं जाळं होतं तर.....
    गण्या निराश होऊन म्हणाला
" नाही रे ते सगळं खरं होतं . फक्त मी त्यात कुठेच नव्हतो .  तू सत्याचा शिलेदार होतास आणि आहेस . पण मी नव्हतो . मी तुला मदत करायला नव्हतो मी तुझा बळी देण्यासाठी तुझ्याशी मैत्री जोडली होती......  "
" मग इतक्या दिवस मी तुझ्यासोबतच होतो .... मग तू आमचा बळी का नाही दिलास....?
" अरे बळी देण्यासाठी योग्य वेळ , योग्य ठिकाण आणि योग्य तयारी करावी लागते . सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळून आल्या तरच त्याचा उपयोग होतो..... आणि तुम्हा मूर्ख लोकांना कळलं सुद्धा नाही मी त्या बळीचीच तयारी इतक्या दिवस करत होतो आणि मूर्खासारखं तुम्ही मला साथ देत होता   ...... म्हणून मी तुमचा मनापासून आभार मानतो
   आणि पुन्हा एकदा बप्पा त्यांच्या गडगडाटी हास्यात हरवून गेले....
" बहोत खुब ... बहोत खुब ... सेवक ,  ये जो भी खेल तुम ने खेला है उस खेल के पीछे मेरा दिमाग है ये मत भुलना.....
त्यांच्यासमोर असलेल्या सिंहासनावरती एक गडद काळी छाया अवतरल्यासारखे वाटत होते . तिथुनच त्या भसाड्या आवाजाचा उगम होता... बप्पांनी सिंहासनाकडे वळून कुर्निसात करतात तसं केलं .
" तुझा जगणार नाहीस.... तुझा जगण्याचा हव्यासच तुझ्या मृत्यूचं कारण झाला होता , आणि आता ही होईल ....." इतका वेळ शांत असलेली शैला गंभीर आवाजात म्हणाली .
  " हो तुझा आता शेवट होणार आहे ..." गण्याही त्याच गंभीर आवजात म्हणाला....
" गणेश ,  ये गणेश , तू आलास ,  माझ्यासाठी आलास ... " तो अंजलीचा आवाज होता   " आता आपण या साऱ्यांना संपवू , तू खरंच किती शूर आहेस तू माझ्यासाठी या संकटात पडतोयस , खरंच मी किती भाग्यवान आहे मला तुझ्या सारखा मित्र मिळाला..... मला आज खरंच खूप आनंद झाला......"
     आणि ती हसू लागली  . एकाएकी कोमल मधुर असणारा तिचा आवाज बसका व चिरका होऊ लागला.... हळूहळू तो आवाज भसाडा होऊ लागला.....
" हाssss हाssss हाsssss किती सहजपणे फसतात काही मूर्ख लोक ..."  तोच तो त्या हुकुमच आवाज होता...
   " अंजली , अंजली कुठे गेली ...? काय केलस तू तिला.....? "
पुन्हा एकदा तो हसला
   " अंजली कधी नव्हतीच .....तिची प्रतिकृती मीच निर्माण केली होती . तुझी फक्त एक आठवण आठवण मी उलटी फिरवली होती..... आठव , आठव तो पकडापकडीचा खेळ . तुम्ही झाडावर चढला होता .  तू घसरतो , मग ती  तुला पकडते  .  पण हे कधी घडलं नव्हतं   हे सारं खोटं आहे . ही आठवण मी तुझ्या मनात कोरली आहेत .  खऱ्या आयुष्यात पकडापकडी खेळताना तू घसरलाच नव्हता . घसरली होती ती अंजली , आणि अंजलीला तू वाचवू शकला नव्हता .  अंजली घसरली तेव्हा खाली पडून तिचा मृत्यू झाला व ती तेव्हाच मुक्त झाली . मात्र तिच्या आठवणीचा उपयोग करून मी तुला फसवलं....हा हा sssssss
तो आवाज गन्याला त्रास देत होता . त्याने गण्याचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं .  बप्पा ही त्याच्या विरोधात होते . आता अंजली कधी अस्तित्वातच नव्हती हे जेव्हा गाण्याला कळालं तेव्हा तो पूर्णपणे ढासळून गेला . ते फक्त आता दोघेच उरले होते . तो आणि शैला . त्या दोघांना या बलाढ्य शक्ती विरुद्ध लढा द्यायचा  होता .  त्यांची मदत कोण करणार होतं....?  मदत केव्हा होणार होती .....? त्याच्या मृत्युनंतर....!
  गण्याला राग आला ,  खूप राग आला . तो वैतागला त्याच्या आयुष्यावर , त्याच्या दैवावर .  त्याला जगण्याची मुळीच इच्छा नव्हती.  तो ढासळून गेला  . त्याचा आत्मविश्वास ,  त्याचे आधार कोसळले . उन्मळून पडलेल्या वृक्षाप्रमाणे त्याची अवस्था झाली . एक वादळ त्याच्या आयुष्यात आलं होतं . त्या वादळाने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली होती .  त्या वादळाने त्याच्या आयुष्यात परिवर्तन आणलं होतं . पण तेच परिवर्तन , तीच कलाटणी त्याच्या आयुष्याला घातक ठरली होती . तू लढायला सक्षम होता . लढा द्यायची ताकद  त्याच्यामध्ये होती . पण त्याच्यापुढे प्रश्न होता लढायचं कशासाठी ....? लढायचं कोणासाठी....?
" पण मग गण्याला तू त्या अघोरी बेटावरून का वाचवलं........? " शैला विचारत होती गण्या आता काही ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हता . तो हरवला होता .  त्याचे जगण्याचे आधार हरवून गेले होते . त्याची जगण्याची इच्छा या क्षणाला नष्ट झाली होती .
" मीच वाचवलं होतं त्यावेळी त्याला .  कारण मला गाण्याचा माझ्यासाठी बळी द्यायचा होता.  तो खरंच उत्तम बळीचा बकरा आहे . बळी जाण्यासाठी ज्या काही अटी गुणधर्म लागतात ते त्याच्यामध्ये पुरेपूर भरलेले आहेत . तुमच्यासारख्या स्पेशल माणसांचा बळी दिल्यानंतर तो खूप खुश होतो .  त्यावेळी जो कोणी बळी देत होता त्याच्या कचाट्यातून त्याला कसं सोडवले मी हे माझं मलाच माहित आहे . आणि आता ती वेळ आलेली आहे . आता मी गण्याचा बळी देणार .... नंतर मला शरीर मिळणार , तेही नेहमीसाठी... अमरत्व , चिरंजीव अमर्याद काळासाठी अनंत जीवन . म्हणूनच मी आत्ता या जगावर राज्य करण्यासाठी तयार आहे......
" तुला जर आमचाच बळी हवा होता तर इतर लोकांना तू का मारलं ......?  ती डायरी,  गोगलगाय हे सारं कशासाठी होतं......? "
" तुला काय वाटलं ,  मी फक्त चार-पाच , दहा-पंधरा माणसे मारली असतील .... मी तब्बल 1109 माणसे मारली आहेत आतापर्यंत ......तेही स्वतः अमर होण्यासाठी ....मागची पाचशे ते सहाशे वर्षे याच उपद्व्यापात मी गुंतलेलो आहे..... आणि हा सेवक पिढ्यानपिढ्या तेच करत आहे....आता तुमच्या असामान्य सत्यतेचा बळी दिला कि 1111 बळी पूर्ण होणार आणि मी अमर होणार .....हा हा हाssssss...
" सेवक भरपूर झालं बोलंणं , त्या पैलवानाला आता वेदीवर टाक ,आपल्या शिकारी गोगलगाय खुप भुकेल्या आहेत....
" जी हूकूम.....
तो पोलीस अजूनही बेशुद्ध होता .  बापाने त्या पोलिसाला सोडवले व वेदीवरती टाकले . वेदीच्या बरोबर मध्यभागी जे होल होते त्यातून  गोगलगाय निघू लागल्या व पोलिसाच्या शरीराभोवती गराडा करू लागल्या....
बप्पा त्याचं शक्ती च्या बाजूने होते ज्याविरुद्ध त्यांना लढायचे होते . पोलीस आता शिकार झाला होता , आणि गण्या हतबल झाला होता . तो काही ऐकायच्या करायच्या मनस्थितीत राहिला नव्हता . आता उरली होती शैला . तीलाच दुष्ट शक्ती विरुद्ध काही ना काही करायला पाहिजे होते......
   शैलाचे हात बांधलेले होते . ती ते सोडवायचा प्रयत्न करू लागली .  तिचे मन पूर्णपणे ते हात सोडवण्यावर गुंतले . मनाची पूर्ण शक्ती , शरीराची पूर्ण शक्ती तिने हात सोडवण्यासाठी  वापरली आणि तिचा हात सुटला.....
तिने हालचाल केली नाही . ती तशीच थांबली . तिने विचार केला ' आपल्याला जर यांना पराभूत करायचं असेल तर ते एकट्याला शक्य नाही . आपल्या गण्याचेही हात सोडवावे लागतील .....पण कसे?
तिने गण्या कडे पाहिले . गण्या  निश्चिल ,  डोळे झाकून उभारला होता , जणू काही तो बेशुद्ध पडला होता .
शैला पटपट विचार करणे भाग होते . अजून घाई केली नाही तर त्या पोलिसाचा मृत्यू होणार होता , आणि  काही क्षणानंतर त्या दोघांचाही बळी दिला जाणार होता . ती विचार करत होती . तिला एक कल्पना सुचली आणि तिने जलद हालचाल केली . ज्या यज्ञकुंडपाशी बाप्पा बसले होते त्या यज्ञकुंडात पाशी असलेल्या सर्व वस्तू तिने विखरून टाकल्या .  दोन-तीन मडक्यात जे काही द्रव भरून ठेवले होते ते तिने सांडून दिले . यज्ञकुंडात पेटलेला अग्नी तिने विझवून टाकला........
  
आणि पुढे काही करणार तोवरच ती हवेत उचलली गेली ...
तिच्या गळ्याभोवती दाब वाढू लागला जसं कोणी  तिचा गळा दाबत होतं . तिला श्वासोच्छवास घेणं कठीण जाऊ लागलं . डोळ्याभोवती काळा निळ्याजांभळ्या पिवळ्या तांबड्या चित्रविचित्र रंगाच्या रेषा दिसू लागल्या . दृश्य धूसर होऊ लागलं .  काहीही ऐकू येईनासा झालं .  सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना बधिर झाल्या . तिला वाटल आपला मृत्यू झाला.......
  गण्याने जलद हालचाल केली . त्याने खिशात हात घातला . त्याच्या खिशात ते सूत होतं . त्याला कोणी दिलं ,  कोणी ठेवलं हे काही आठवत नव्हतं .  फक्त होतं . त्याने एक टोक शैलाकडे फेकलं , दुसरं स्वतःच्या हातात धरलं . त्याला तीन टोके होती .  जेव्हा शैला व गणेश दोघांनीही एकेक टोक धरले तेव्हा आपोआपच तिसरा टोक बप्पा कडे जाऊ लागले व त्यानी ते पकडलं....
     तेव्हाच तिला स्पर्शाची संवेदना जाणवली .  तिच्या हातात काही तरी होतं . तिने ते घट्ट पकडून ठेवलं .  हळूहळू सर्व ज्ञानेंद्रियांच्या संवेदना परतू लागल्या .  तिने डोळे उघडले .  तिच्या हातात सप्तरंगी सूत होतं .  त्या घनदाट अंधारात चमकणारं......
त्या सुताला तीन टोके होती व मध्यभागी वर्तुळाकार भाग होता .  एक टोक शैला हातात होतं ,  दुसऱ्या गाण्याच्या आणि तिसरे टोक बप्पाच्या हातात होतं ......
" शांत व्हा ,  मी सांगतोय शांता ह्वा ,  मनातील सर्व विचार काढून टाका .  तेच विचार करा जे गरजेचे आहेत ,या वेळेला गरजेचे आहेत ......"
   बप्पा धीर गंभीर आवाजात बोलत होते
एरवी त्या दोघांनाही विचारांना आवरणं शक्य नव्हतं  . पण ते सुत आणि बप्पाचा आवाज यामध्ये नक्कीच काहीतरी जादू  असली पाहिजे . कारण त्यांनी कधी विचारही न केलेल्या गोष्टी त्यांच्या विचारात येत होत्या त्यांनी कधी पाहिली नसतील अशी दृश्ये त्यांना दिसत होती . समोरचं दृश्य हळूहळू पालटत गेलं . ते  एका नव्या जागी पोहोचले......
स्वच्छ सूर्यप्रकाश प्रकाश , आजूबाजूला हिरवळ , सर्वत्र एक मंद सुगंध आणि हळूहळू वाहणारा मंद गार वारा. हा परिसर किती अल्हाददायक होता असं वाटत होतं की कायमसाठी इथेच राहावे पण काही क्षणासाठीच.....
  त्या तिघांनी एका वेगळ्या मितीत प्रवेश केला होता व त्या प्रवासाचे चालक होते स्वतः बाप्पा . बप्पानी त्यांना या ठिकाणी आणला होतं.....
" बाप्पा तुम्ही ...? "शैला म्हणाली
" सांगतो सारे काही सांगतो . पण आत्ताची वेळ बरोबर नाही .  आता संघर्षाची वेळ आहे . आपल्याला त्याच्या विरुद्ध तिघांना मिळून लढायचा आहे .  दोघही सावध व्हा .  आता आपला संघर्ष होणार आहे......
त्यांनी बाप्पाला वाईट व दुष्ट समजलं होतं बाबा खरं तर त्यांच्याच बाजूने लढत होते....
आजूबाजूचा परिसर दुरून बदलात येत होता . दुरून कोणीतरी येत होतं दुर्गंध काळोख घेऊन त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी.....
तोच तो हुकूम होता . ना त्याला आकार होता न कसलं शरीर होतं .  काळोखाची काळी छाया , त्याचबरोबर  , निराशा , क्रोध , भय वासना ,  सार्‍या नकारात्मक भावनांचा मिलाफ घेऊन तो आला होता....
ते तिघेही वर्तुळ करून बसले होते . बाप्पा पुन्हा एकदा म्हणाले " काहीही दिसो ,  काहीही होऊ , मी जरी येऊन म्हणालो तरीही हे सूत सोडू नका......
आजूबाजूचा परिसर पूर्ण पालटला . बाग बगीचा  फुलझाडे नि आल्हाददायक गारवा सारं काही नष्ट झालं .  सर्वत्र दुर्गंधी पसरली . झाडे वाळून कुजून गेली . वाळला पालापाचोळा सर्वत्र पसरला . हाडे गोठवून ठेवणारी थंडी वाजू लागली.....
" तुला काय वाटलं , तू मला हरवलं ,  मला फसवलंस.....?
  मी तुला पहिल्यांदाच ओळखलं होतं , जेव्हा तू माझ्याकडे आला होता माझा दास बनून माझा सेवक बनवून पण मी तुझा वापर करून घेतला . तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नव्हतं ....? तू काय करणार आहे मला माहीत नव्हतं .....? मला सारं माहीत होतं आणि आता तुझा शेवट होणार आहे......
आसमंतात एक भयानक किंकाळी घुमली . ती  बप्पाची होती   .  बाप्पाचे दोन्ही हात मनगटापासून तुटून बाजूला पडलज . त्याठिकाणी रक्ताचे पाट वाहू लागले . बप्पा च्या हातून ते सुत सुटलं होतं . त्यामुळे आता त्याला रोखणारी , थांबवणारी कोणतीच शक्ती त्याठिकाणी अस्तित्वात नव्हती  .  बप्पा वेदनेने विव्हळत होते ,  ओरडत होते  . दोघांचेही मनोधैर्य खचत चालले होते तरीही दोघांनीही ते सूत सोडले नव्हते . सुताची दोन टोके ते दोघेही धरून बसले होते । त्यांच्यापासून काही फुटांच्या अंतरावर बाप्पा व त्यांचे दोन मनगटापासून तुटून पडलेले हात अस्ताव्यस्त पडले होते . समोरचे दृश्य अधिकाधिक किळसवाणे होत चालले होते त्यांच्या हातातून रक्ताचा स्राव थांबत नव्हता . तो रक्ताचा स्राव कसेही करून थांबवायला हवा होता . अन्यथा पप्पांचा मृत्यू फार दूर नव्हता .
गण्या तिथून उठला . तो विसरला बप्पांनी स्वतः सांगितले होते की काहीही झाले तरी तिथून उठू नको पण शेवटी गण्या तिथून उठलाच .  त्याने आपल्या शर्टाची बाही फाडत बापाच्या हाताला बांधली . तेव्हाच विकृत हास्याचा गडगडाट त्याठिकाणी ऐकू येऊ लागला .
" आता मला अमरत्वाच्या मार्गापासून कोणीच रोखू शकत नाही..... " पुन्हा तेच विकृत हास्य.....
" सेवक तू तयार राहा भयंकर वेदनेसाठी . तू मला धोका दिला आहे तुझा मृत्यु इतका भयानक होणार आहे की साक्षात अघोर सुद्धा घाबरेल .....  दयेची भीक मागितली तरी मृत्यू देणार नाही .....अगणित काळासाठी वेदना व तडफडीच्या सागरात तुला जगावं लागेल.......
  आवाज हवेत  विरतो न विरतो , तोच पुन्हा बाप्पाची किंकाळी ऐकू आली . यावेळी बाप्पाचा हात कोपरापासून तुटला होता . दोन्हीही पायाची दहाच्या दहा बोटे इतस्ततः विखरून पडली होती.....
ते दृश्य किळसवाणे होते . शैला ओरडून बेशुद्ध झाली...... एवढ्या भयानक वेदना होत असूनही बप्पा बेशुद्ध होत नव्हते .  ते अजून जागे होते आणि एवढं रक्त जाऊनही त्यांचा मृत्यू होत नव्हता जणू तो हुकूम स्वतः बापाला बेशुद्ध होऊ देत नव्हता आणि मरूही देत नव्हता . सार्‍याच्या सार्‍या वेदना बप्पाला सोसाव्या लागत होत्या . त्या वेदनेमुळे बप्पाचा मेंदू बधीर झाला होता.  त्यांना काही सुचत नव्हते न काही कळत होते . ते फक्त ओरडत होते .  किंचाळत होते....
ते तिघे पूर्णपणे त्याच्या तावडीत सापडले होते . त्यांचा मृत्यू होणार होता आणि साधासुधा मृत्यू नाही ; तर वेदनेने परिपूर्ण असलेला  नरकातही अशा वेदना नसतील इतक्या भयानक वेदना त्यांना या ठिकाणी भोगाव्या लागणार होत्या....
शैला बेशुद्ध झाली होती . बाप्पा वेदनेने विव्हळत होते .  गण्याला कळना त्याला काय करावे.....?
बाप्पा विव्हळत -विव्हळत बारीक आवाजात अडखळत-अडखळत बोलत होते
" अरे गणेश माझ्या पिशवीमध्ये एक काचेची छोटीशी कुपी आहे . त्या कुपी मधील ते पवित्र जल तू या ठिकाणी शिंपड म्हणजे आपल्यासाठी नेहमीच्या जगात जाण्याचा मार्ग खुला होईल . या जगात मी त्याला आणले होते मला वाटले मी आपण त्याचा पराभव करु शकू ,  पण ते आता आपल्याला अशक्य आहे . आपण लवकरच जर नेहमीच्या जगात नाही गेलो तर आपल्या अंत निश्चित आहे....
गण्याने पिशवीकडे उडी घेतली तशा पिशवीतील सर्व वस्तू हवेत उडाल्या.... हवेतच उंचावरती ती काचेची कुपी होती . कितीही उड्या मारल्या तरी गणाच्या हाताला की कुपी यणं  कधीही शक्य नव्हतं..... त्याचवेळी बाप्पांनी कसल्या तरी विचित्र भाषेत विचित्र शब्द एकदम मोठ्या आवाजात उच्चारले आणि क्षणभरासाठी त्या हवेत उडालेल्या वस्तू जमिनीवरती स्थिर झाल्या . गण्याने ती काचेची कुपी पकडली  पण त्यामागोमाग बाप्पाचा तीव्र स्वरात किंचाळण्याचा आवाज त्यांच्या कानी आला व पुन्हा त्या सर्व वस्तू हवेत उडाल्या .
गण्या त्या कुपीचं  बुच काढून त्यातील ते पवित्र जल शिंपडण्याचा   बेतात होता . पुन्हा एकदा त्याच्या हातातून ती उडाली व काही अंतरावर जाऊन खळकन फुटली . पण त्यातील पवित्र जल खाली पडल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच्या जगात जाण्यासाठी वाट खुली झाली होती...
पण त्या ठिकाणी गण्याला एकट्याला जायचे नव्हते दोघांनाही घेऊन जायचे होते . तो बाप्पाकडे वळला ,  पण बप्पाच म्हनाले  आधी शैलाला नेउन सोड.... गण्या शैला कडे वळला त्याने शहराला उचलले व तो चालू लागला...
हवेत रंगीत पाण्याचा फवारा उडावा त्याप्रमाणे नेहमीच्या जगातील म्हणजे ते काही वेळापूर्वी ज्या भुयारात होते त्याठिकाणचं एक दृश्य दिसत होतं... समोरची अजस्र विशाल मूर्ती होती . त्या मूर्तीच्या समोर बरोबर ती वाट खुली होत होती.... गण्या चालत निघाला पण या वेळी कोणताच प्रतिकार झाला नाही मागे बाप्पा तीव्र स्वरात मोठ्या आवाजात काहीतरी बडबडत होते.....
गण्या त्या भुयारात पोहोचला व मागे वळणार पण वाट बंद होऊ लागली होती पण आवाज येत होता त्या मूर्तीच्या हातामध्ये असलेल्या घाडग्यातील रक्त सांडून दे आणि दुसर्‍या घाडग्तील हाडे पाण्यात बुडवून टाक.......
ती वाट बंद झाली होती आणि बप्पांचा आवाजही म्हणजे बप्पा त्या ठिकाणीच राहिले होते . याचा अर्थ बप्पाचा मृत्यू निश्चित होता .  जे काही करायचे होते ते फक्त आता त्याला एकट्यालाच करावे लागणार होते . शैला तर बेशुद्ध होती . तो पटकन मूर्तीकडे वळाला...
मूर्तीचे हात जमिनीपासून आठ ते दहा फूट उंचीवर होते . त्या हातात जे गाडगं होतं ते त्याला खाली पाडायचं होतं .  तो पोलीस अगोदरच त्या हातापर्यंत पोहोचला होता .  पोलिसांबद्दल गण्या तर विसरलाच होता . त्या पोलिसाने ते गाडगे सांडून दिले .  ते गाडगे खळखळ आवाज करत फुटले .  त्यातील रक्त जमिनीवर सांडले . त्या मागोमाग भयंकर ओरडल्याचा , किंचाळण्याचा आवाज आला.  ते जे काही होतं ते नक्कीच चवताळलं होतं.....
तो पोलिस आठ दहा फुटांच्या उंचीवरून बेदमपने जमिनीवर आदळला गेला . त्याच्या डोक्याला मार लागला आणि तोही बेशुद्ध झाला . कसेही करून आता गण्याला त्याच्या दुसऱ्या हातातील गाड्यांमध्येही जी हाडे होती . ती पाण्यात टाकणे आवश्यक होते .....
पण सरळ सरळ त्या मूर्तीकडे तो आता पळत जाऊ शकत नव्हता कारण ते जे काही होते ते जागृत झालं होतं व त्यावर हल्ला करायचा प्रयत्न करणारच होतं .  त्याही अवस्थेत गण्याने जरा डोकं चालवलं व भुयारातून बाहेर जाण्याचा जो मार्ग होता त्या बाजूला तो पळत सुटला...... तो हुकुम चवताळला होता त्याला गण्याला मारायच होतं . तो घरातून बाहेर जाण्याच्या मर्गाकडे पळाला पण त्याने गण्याला बाहेर निसटू दिले नाही . गण्या   हवेत उडाला आणि जोरात विरुद्ध बाजूला येऊ लागला . त्याचा फायदा घेऊन गाण्याने आपले शरीर त्या मूर्तीच्या बाजूला झोकून दिले व तो मूर्ती वर जाऊन आदळला... तो पटकन मूर्तीच्या हाता पर्यंत पोहोचला व ते हातातील घाडगे घेऊन खाली आदळणार तेव्हा त्याच्या लक्षात आले त्याला तर ती हाडे पाण्यात टाकायची होती पण येथे पाणी कुठेच नव्हते....
आणि काय आश्चर्य भुयारात सर्वत्र पाण्याचे झरे लागावेत तसं पाणी भरलं गेलं.  गण्याने ती हाडे त्या पाण्यात टाकून दिली . हाडे पाण्यात पडतात न पडताच जोरात किंचाळल्या ओरडल्याचा आवाज येऊ लागला हळूहळू शांत झाला ......
ते जे काही होतं ते नष्ट झालं होतं पण ते पाणी आलं कुठून गण्या मनात विचार करत होता तेव्हाच आवाज आला
" जेव्हा कोणताही मनुष्य आपले अवजड शरीर  त्यागून जातो तेव्हा त्याच्याकडे निश्चितच  अधिक चेतना शक्ती जागृत होते कारण अवजड शहरांमध्ये तेच आत्मतत्व असते तरीही त्या चेतना जागृत होत नाहीत कारण त्याला जडाचे बंधन असते....
" बप्पा तुम्ही .....?
" जाता जाता तुम्हा दोघांना एकच सांगतो तुम्हाला अजून खूप शिकायचं आहे . तुम्हाला लवकरच कोणीतरी भेटेल जो तुम्हाला सारं काही सांगेल........
" पण बप्पा......."  गण्याला एक हुंदका दाटून आला शैलाच्याही डोळ्यातह आसवे गोळा झाली होती...
" रडू नका ....... बाप्पा चा आवाज आला . गाण्याच्या हुंदका  कुठल्याकुठे हरवला .शैलाच्या डोळ्यातली आसवेही विरून गेली.... काय आश्चर्य ते दोघेही रडायचे थांबले . बप्पा पुढे बोलू लागले....
" मी तुम्हा दोघांचीही माफी मागतो . मी तुम्हाला या माझ्या नियोजनाची पूर्वकल्पना द्यायला हवी होती . मी याच परंपरेचा पाईक असल्याचं त्याला दाखवत त्याच्या परंपरेत घुसलो होतो . त्याला कसेही करून मारायलाच हवा होते . पण ते मला एकट्याला शक्य नव्हतं म्हणून मी तुम्हा दोघांची वाट पाहत होतो . त्याची परंपरा फार वर्षांपासून चालत आलेली आहे . आता तुम्हा लोकांचा बळी गेला असता तर तो निश्चितच शक्तिशाली झाला असता . पण आपण तिघांनीही  त्याला रोखले ,  ते तुम्हा दोघा शिवाय कधीही शक्य नव्हते .
माझ्या उघड्या डोळ्यांनी मी गण्याची विटंबना पाहत होतो . जी विटंबना तो  अंजली च्या रूपात करत होता . माझ्या उघड्या डोळ्यांनी मी ती डायरी त्या गोगलगाय व ते सिरीयल किलींगचं  प्रकरण पाहत होतो . पण मी एकटा काहीच करू शकत नव्हतो . या सर्व गोष्टींच्या मागे तोच होता . त्याने त्या सर्व गोष्टी घडवल्या होत्या.
   फार पूर्वीपासून त्याची परंपरा चालत आलेली आहे . त्याने सुरुवातीला अमर व्हायचा प्रयत्न केला होता पण तेव्हा तो यशस्वी झाला नव्हता . मग त्याच्या साधकांकडे पिढ्यानपिढ्या त्याने हे प्रकार चालू ठेवले होते  . पण मला जेव्हा याविरोधात लढायची वेळ आली तेव्हा मी ती परंपराच बंद करून टाकली . मी एकाचा मृत्यू घडवून आणला व त्याच परंपरेचा पाईक असल्याचे दाखवत त्याच्या या खेळात सामील झालो . त्याच्यावाचून माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता......
नंतर मी तुम्हा दोघांची वाट पाहत होतो तुम्हा दोघांबाबत मला पूर्वकल्पना जाणिवा येत होत्या . जेव्हा मला तुझी जाणीव झाली तेव्हा मी मुद्दाहून तुझ्याबद्दल त्याला सांगितले . तेव्हाच त्याने तुला त्या अघोरी बेटावर येऊन वाचवले .....
पुन्हा एकदा सांगतो . तुम्हाला खूप शिकायचं आहे . तुमचं  आयुष्य आता पूर्वीसारखे राहिलेले नाही . तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून  गेलेलं आहे . त्याला कलाटणी मिळालेली आहे . त्याला परिसाचा स्पर्श झाला आहे . ते आता सोनं झालं आहे .
तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर असेच लढे द्यावे लागतील . तुमची निवड झालेली आहे.....
आणि एकाकी तो आवाज बंद झाला . त्या दोघांनाही या जगात दृष्टांविरुद्ध  लढण्याची जबाबदारी देऊन   . इतक्यावेळ वेळ ते शांत राहिलेले  दोघेही हुंदके देऊन रडू लागले.........
समाप्त


Saturday 26 January 2019

भुताची वाट

    असं म्हणतात हा रस्ता खूप सुनसान आहे .  या रस्त्यावरती म्हणे रात्रीची भुते फिरतात . बरेच चकवे आहेत म्हणे या रस्त्यावर .  मला बिलकुल विश्वास नाही असल्या भुताखेतांच्या गोष्टीवर . म्हणूनच माझी मित्रांबरोबर पैज लागली. मी म्हटलं या रस्त्यावरून मी जाऊन दाखवणार व व्हिडिओ शूटिंग काढून तुम्हा सर्वांना आणून दाखवणार. मग ठरल्याप्रमाणे त्या अमावस्येच्या रात्री मी माझी मोटार बाईक काढून निघालो. मित्र म्हणत होते अरे बाबा एखाद्या देवाचा फोटो किंवा अंगारा वगैरे घेऊन जा , पण असल्या या अंधविश्वासू गोष्टींवरती माझा मुळीच विश्वास नाही .  मी नेहमी या अंधश्रद्धांच्या विरोधात बोलत आलेलो आहे . त्यामुळे मी असल्या अंधश्रद्धा बाळगणे हे माझ्या मनाला न पटणारे होते . त्यामुळे या कोणत्याच गोष्टी न घेता मी जायचं ठरवलं . स्टेट हायवे असल्यामुळे रस्ता तसा बराच रुंद होता. एकावेळी चार चार-चाकी वाहने जाती एवढा मोठा . माझा अंदाज चुकत असेल तर ,  कमीत कमी तीन तरी वाहने कशीही जातील इतका मोठा रस्ता होता. दोन्ही बाजूला  चिंचेची झाडे होती. दोन्ही बाजूला घनदाट जंगल व या जंगलाला कुंपणसारखी लावलेली ती चिंचेची झाडे  . मी गाडी घेऊन चाळीस ते पन्नास या स्पीडने निघालो होतो . डोक्या वरती हेल्मेट होते . हेल्मेट घालायचं कारण थंडी होतं . हा रस्ता बराच कुख्यात असल्याने रात्रीच्या वेळी ना कोणते मालवाहू वाहन जात होते ना कोणती चार चाकी . त्या किर्र् शांत असलेल्या रस्त्यावर  मी एकटाच जात होते.

   मला एक कळत नाही लोक सहजपणे कोणत्याही गोष्टीवर विश्वास कसे काय ठेवतात . जेव्हापासून या रस्त्याबद्दल च्या गोष्टी कानावर येऊ लागल्या होत्या तेव्हापासूनच मी या रस्त्याबाबत घडणाऱ्या गोष्टी वरती निरीक्षण ठेवले होते . त्यामुळे मला एक गोष्ट कळाली होती . जेव्हापासून या रस्त्याच्या बाबतीत वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या त्याच्या आधी एक गुंडांची टोळी या भागात लपायला आली होती . नंतर ती एन्काऊंटर मध्ये मारली गेली हा भाग अलाहिदा पण तेव्हा उठलेल्या वावड्या थांबायचं नाव घेत नव्हत्या , वरचेवर लोकांना वेगवेगळे अनुभव येतच होते . या गोष्टीवरून कोणताही माणूस जो साधा का असेना तर्क लावू शकतो , तो समजू शकत होता की या भागांमध्ये गुंडांची टोळी अजूनही सक्रिय होती व तीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकांना घाबरवण्याचे काम करीत होती . पण माझ्यासारखे बुद्धिमान लोक त्याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी वर्तवू शकतात . पहिली गोष्ट ती म्हणजे या टोळीला कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याचे मोठे पाठबळ असणार . दुसरी गोष्ट ती म्हणजे या टोळीकडे अत्याधुनिक हत्यारे असणार .  तिसरी व शेवटची गोष्ट म्हणजे या टोळीला चालवणारे जे काही डोके होते ते हुशार असणार . पण मला ग्यारंटी होती ते माझ्या इतके हुशार नक्कीच नसणार , कारण मी बुद्धिमत्ता व तर्क लावण्याच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलो आहे आणि हे माझ्या मित्रांना ही मान्य आहे . त्यामुळे खरं तर या भागात शिरताना मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नव्हती .

मी स्पीड न वाढवता मी स्थिर गतीने जायचं ठरवलं होतं .  कारण आजूबाजूला जंगल असल्यामुळे एखाददुसरं जंगली जनावर गाडीच्या अडव आलं असता फुकटची फजिती व्हायला नको. पण मी जाताना निरीक्षण करणार होतो . साधंसुधं निरीक्षण नाही तर आमच्यासारखी बुद्धिमान माणसे सिंहावलोकन करतात त्यामुळे माझ्या नजरे खालून एक ही गोष्ट सुटणार नव्हती . मी बरेच अंतर आत आलो होतो पण अजूनही  वेगळी किंवा विचित्र गोष्ट माझ्या नजरेस पडली नव्हती . पण मी माझं निरीक्षण चालूच ठेवलं .  बऱ्याच दिवसापासून मला गाडी चालवण्याचा व गाडी चालवता-चालवता निरीक्षण करण्याची सवय असल्यामुळे मी सहजच कुठेही गेलो तरीही त्या रस्त्यावरच्या साऱ्या खाणाखुणा मला लगेच पाठ होतात . या वाटेवरून येण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे मी अधिकच करड्या नजरेने सिंहावलोकन करत होतो .

मी त्या रस्त्याच्यी निम्मी लांबी  पार केली असेल . त्या ठिकाणी मला एक विचित्र गोष्ट दिसली . ती सहजासहजी कोणालाही दिसली नसती . माझी निरीक्षण करण्याची क्षमता सामान्य लोकांपेक्षा जास्त असल्यामुळे ती मला सहजच दिसली . चिंचेच्या झाडावर प्रकाश टाकताच एक लाल चकती चमकत होती . ती जराशी उंचीवर असल्याने गाडी च्या हेडलाईटच्या प्रकाशापासून वंचित राहत होती . पण माझ्या डोळ्याच्या प्रकाशापासून ती वंचित राहू शकली नाही . रस्त्यावर अशी रेडियम आर्ट विचित्र मुळीच नाही पण या संपूर्ण रस्त्यावर कुठेच रेडियम आर्ट नव्हती त्यामुळे ती विशेष करून माझा डोळ्यात भरली . यामागे नक्कीच काहीतरी गोम होती असा माझा तर्कशुद्ध मेंदू सांगत होता . या ठिकाणी नक्कीच कोणासाठीतरी हेतुपूर्वक ठेवलेली खूण होती . ज्या कोणा माणसासाठी ही खूण ठेवली होती फक्त त्यालाच दिसेल अशा हिशोबाने ती ठेवली होती . मात्र माझ्या चाणाक्ष नजरेखालून कोणतीच गोष्ट सुटू शकत नाही . मग ही साधीसुधी खूण किस झाड की पत्ती....

मी माझ्या मेंदूने तर्कशुद्ध विचार करायला सुरुवात केली की हघ खूण कशाची असू शकते ...? मला वेगवेगळी उत्तरे मिळू लागली . त्या उत्तरांना शक्यतेच्या कसोटीवर तपासून बघायला मी चालू केलं . एकतर त्या टोळीला जो कोणी सपोर्ट करत होता त्या सपोर्टसाठी ही खूण  असणार . दुसरं म्हणजे हे जंगल इतकं दाट होतं की तो माणसालाही ही स्वतःची जागा शोधणे अवघड असावं , म्हणून त्यांनी स्वतःसाठी केलेली ही खूण असावी. आणि तिसरं म्हणजे माझ्यासारख्या बुद्धीमान माणसाला स्वतःचे पितळ उघडे पाडण्यासाठी ठेवलेला पुरावा . मी तिथेच बाजूला गाडी थांबवली . ज्या चिंचेच्या झाडाला जरा वरच्या बाजूला ती लाल  
रेडियम आर्ट होती त्या झाडाचे
व त्या आजूबाजूच्या परिसराचेही निरीक्षण करायला सुरुवात केली .बाकी झाडाच्या खोडाच्या जवळ व संपूर्ण झाडाखाली चिंचेचा पाला पाचोळा इतर काट्या-कुट्या , काड्या आश्या गोष्टी साचलेल्या होत्या पण त्या झाडाखाली चक्क  प्लास्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या , काचेच्या बाटल्यांमध्ये , बहुदा दारूच्या , आणि प्लॅस्टिकचे रंगीबेरंगी रॅपर्स होते .

यावरूनही बऱ्याच गोष्टी माझ्या तर्कशुद्ध मेंदूला समजल्या . त्या म्हणजे इथे जे काही लोक होते ते दारू पीत होते . दारू पिणारे होते म्हटल्यानंतर बाहेरचा कोणी माणूस  दारू पिण्यासाठी इथे येणे शक्य नाही . म्हणजे इथलाच असणार , इथलाच असणार म्हटल्यानंतर तो गुन्हेगार असणार व टोळीतील सदस्य असणार जी इथे काम करत होती .  मी त्या सार्‍या गोष्टीच्या मुळाशी पोहोचलो होतो . ती सारी माणसे इथेच असणार त्यामुळे मला आता सावध राहायला लागणार होतं . पण येथे कोणता निवाराही दिसत नव्हता त्यामुळे मला माझ्या तर्कावर ती शंका येत होती . पण माझे तर्क हे नेहमीच तर्कशुद्ध असल्यामुळे त्यांना तर्कशुद्ध शंकिंशिवाय शंका घेणे रास्त नव्हते . त्यामुळे मी तर्कशुद्ध शंका घेण्याचा प्रयत्न केला पण तर्कशुद्ध शंका निष्फळ ठरली कारण उघड्यावरती निवारा थाटायला ते इतके मूर्ख नव्हते . त्यामुळे निश्चितच त्यांनी लपून-छपून निवारा थाटला असणार . त्यामुळे  माझे डोळे लपलेल्या खुणांचा शोध घेऊ लागले . मी त्या अंधार्‍या रात्री त्या शांत वाटेच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाखाली गोल गोल फिरत इकडे तिकडे बघत त्या खुणांनचा शोध घेऊ लागलो . पण मला काही सापडेना त्यामुळे वैतागून मी पुढे जायचं ठरवलं व गाडीकडे निघालो . तेव्हाच माझ्या पायाला ठेच लागून मी ठेचकाळुन पडलो . आणि मी ज्यासाठी शोधत होतो ती खुण मला सापडली .

मला बऱ्याच वेळा आश्चर्य वाटतं की निरीक्षण करूनही मला जी गोष्ट सापडली नाही ती गोष्ट ठेच लागून पडल्यावर ती कशी सापडली ....?किंबहुना बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी अपघातानेच सुचतात किंवा सापडतात . पण तसे अपघात का होतात ....? कसे होतात .....? याचा तर्कशुद्ध विचार मी करतो आहे पण उत्तर काही सापडत नाही....?

तो एक मोठा दगड होता . आता दगड ही काय खूण झाली का ...?त्यात काय दगड कुठेही पडलेले असतात . हे झाले सामान्य माणसाचे बोलणे . पण पण माझ्यासारख्या तर्कशुद्ध विचार , निरीक्षण आणि अभ्यास असलेल्या माणसासाठी तो दगडही बहुमूल्य होता .कारण त्या भागात तशाप्रकारचा दगड पृष्ठभागावर ती सापडत नव्हता  . त्यासाठी खोलवरती खाणकाम करणे आवश्यक होते . याचा अर्थ खाणकाम केल्यानंतर जो दगड निघतो तो दगड या ठिकाणी होता . म्हणजे या ठिकाणी निश्चित काहीतरी खाणकाम चालू असणार . तर्कशुद्ध विचाराबरोबरच शरीरालाही मी महत्त्व देत असल्याने माझी शारीरिक तब्येत खणखणीत व दमदार होती त्याचाच मला आता उपयोग झाला . मी तो दगड सहजपणे बाजूला सारला त्याच्याखाली मला एक दीड बाय दोन फुटाचा लोखंडी पत्रा दिसला जो गंजून गेला होता . म्हणजे माझी शोधमोहीम बरोबर होती तर मी तो लोखंडी पत्रा बाजूला सारला त्याच्या खाली एक निळसर रंगाचं प्लास्टिकचे बटण होतं जे दाबल्यानं तर नक्कीच आजूबाजूला काहीतरी उघडणार होतं . मी ते प्लास्टिकचं बटन दाबलं आणि माझ्या मागच्या बाजूला खरखर सळसळ विचित्र आवाज येऊ लागला. मी मागे वळून पाहिलं तर ते एक पंचर काढण्याचं  दुकान होतं .

शेवटी माझा तर्क बरोबर आला होता तर या ठिकाणी नक्कीच कुणीतरी वास्तव्याला होता तेही छुप्या प्रकारे . एखाद्या माणसाने दुरुन येताना हे पंचर चे दुकान पाहिले तर त्याला वाटणार इथे कोणीतरी आहे . पण नंतर हे बटन दाबून जर की दुकान खाली सारले म्हणजेच भुयखरात सारले तर या ठिकाणी काहीही नसणार याचाच अर्थ ते भुताटकी सारखेच होते . म्हणूनच न समजणारे विज्ञान म्हणजेच मॅजिक अशी व्याख्या करतात ती काही चुकीची नाही......

इथे कोणत्याही प्रकारची भुताटकी नव्हती हे माझ्या लक्षात आले त्यामुळे मी म्हणत होतो ते शेवटी सिद्ध झाले होते . पण आता हे आपण चर्चा दुकानाची पाहणी करणे मला क्रमप्राप्त होते व त्याचा व्हिडिओ काढून माझ्या मित्रांना दाखवणे ही ..... मी मोबाइल काढला पण मला त्या दुकानातून हालचाल जाणवली .  आत कोणीतरी होते . पाठोपाठ बंदुकीचा आवाज आल्यासारखख वाटला . त्यामुळे मी पटकन तिथून निघून जायचं ठरवलं . मी हेल्मेट डोक्यावरती चढवलं व गाडीवरती बसून सुसाट निघालो.

गाडीचा स्पिडोमिटर चा काटा तुटून बाहेर पडेपर्यंत मी गाडी पळवली . ते गॅरेज आता तिथे दिसेनासे झाले होते मी खूप लांब आलो होतो .

मला समोरून चार चाकी गाडी येताना दिसत होती . ती बहुदा क्रुझर सारखी मोठी असावी किंवा क्रूजर असावी अंधारात नीट कळालं नाही . पण ती त्या गॅरेजकडे चालली होती त्या गाडीमध्ये बरीच माणसे असावीत असं मला वाटत होतं व ती गाडी गॅरेजच्या  दिशेने निघाल्या मुळे त्यांच्या जीवाला धोका होता . मी त्यांना अडवून थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती गाडी काही थांबेना .

मी त्या लोकांना चांगले क्रमप्राप्त होते एक दक्ष नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य बजावणे गरजेचे होते त्यामुळे त्यांच्या गाडीचा मागे मी माझी गाडी दामटली व त्यांना  ओरडून सांगू लागलो . पण त्यांच्या गाडीचा वेग अतिशय जास्त होता त्यामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नसावा त्यामुळे मी गाडी अजून जोरात पळू लागलो इतक्यावेळ ते ग्यारेज त्या ठिकाणी दिसत नव्हते . गडबडीत मी त्या झाडाची खून विसरलो व अगदी जवळ गेल्यानंतर ते गॅरेज मला त्या ठिकाणी दिसू लागले . तोपर्यंत ग्यारेज मधील माणसे बाहेर आली होती व त्यांनी गाडी अडवली होती गाडी मधल्या माणसांना त्यांनी खाली उतरवले होते मी बाजूलाच थांबून सारा प्रकार पाहत होतो . माझ्यात पुढे जायची हिंमत नव्हती . सगळी माणसे खाली उतरली.  पण ती गाडी आपोआपच पुढे पळाली ती खूप वेगात तिथून निघून गेली .

गॅरेजमधील त्या लोकांनी त्या माणसांचा निर्घुणपणे खून केला . मी तो खून असाह्यपणे पाहिला ......

.

.

.

.

काही दिवसानंतर स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये खालील बातमी आली होती

भुताच्या वाटेन  घेतला आणखी एक बळी

गावाला लागूनच काही अंतरावर ती असलेला स्टेट हायवे हा  भुताची वाट म्हणून कुप्रसिद्ध आहे . या वाटेने अजून एक बळी घेतला आहे . काल रात्री संतोष खंडेकर हे क्रुझर या गाडीने त्यांच्या काही मित्रांसोबत येत होते . मात्र वाटेत त्यांना चकवा लागला त्या चकव्यातून ते  एकटेच कसेबसे निसटले असून बाकीचे मित्र त्या चकव्यात सापडले व मृत्यू पावले असा त्यांचा दावा आहे . पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण साहेब या गोष्टीचा अधिक तपास करीत आहेत .

संतोष खंडेकर सांगतात

" काल रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला होता उगाच उशीर नको म्हणून आम्ही जवळच्या वाटेने म्हणजेच त्या भुताच्या वाटेने येत होतो . थोड्या अंतरावर आत गेलो असेल नसेल तोच समोरून जुनीपुराणी खटारा मोटरसायकल येताना दिसली . तिच्यावर ती कोणीतरी बसल्यासारखं वाटत होतं . आम्हाला वाटलं कोणीतरी माणूस असेल पण ते काहीतरी भलतंच धूड होतं . त्याचे हातही हँडल वरती नव्हते .  ते मागे बांधले होते . डोक्या वरती हेल्मेट होतं . हेल्मेट मधून जळून गेलेली  कवटी चारीबाजूंना गरगर फिरत होती . आम्ही ते पाहिलं तसं गाडीचा वेग वाढवला . पण ते धूडही आमच्या मागेच येत होते . आम्ही वेग वाढवत होतो तसे ते  धूडही वेग वाढवत होते . काही अंतरावर गेल्यानंतर आम्हाला तिथे बल्ब लावलेला दिसला . त्यामुळे मदतीसाठी आम्ही गाडी थांबवली . सगळे जण खाली उतरले . मला जरा  वेळ लागला . पण मी उतरायच्या आधीच त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या मी मागे वळून पाहिलं त्याठिकाणी कोणीच नव्हतं . माझी खाली उतरायची हिम्मत झाली नाही . मी लपूनच इकडेतिकडे बघितलं कुठे कोणी दिसत आहे का...?  पण माझ्या मित्रा पैकी एकही जण त्या ठिकाणी दिसत नव्हता . उलट दूरवरुन कुठूनतरी त्यांच्या किंकाळ्याचा आवाज माझ्या कानात रुतत चालला होता . भीतीपोटी मी तिथून पळालो . "

काय आहे भुताची वाट.....?

मागच्या वर्षापासून ही भुताची वाट फारच कुख्यात झालेली आहे . आतापर्यंत भुताच्या वाटेवरती कैक लोकांचे बळी गेलेले आहेत . मागील वर्षी एक नक्षलवाद्यांची टोळी याठिकाणी सक्रिय असल्याचे बोलले जात होते . त्या वाटेच्या कडेला असलेल्या जंगलात थोरियमचे दुर्लभ साठे असल्याचे आमच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे .  त्या नक्षलवादी टोळीला पहिल्यांदा एका पत्रकाराने उघड केले . त्या पत्रकाराने व्हिडिओ काढून त्याच्या मित्रांना सेंड केला होता व त्या टोळी मागे कोणाचा हात आहे हेही सांगितले होते . कोणतातरी गद्दावर राजकीय नात्याचा एक नातलग त्या टोळीच्या आड लपून थोरियमचा धंदा करत असल्याचे उघड झाले होते .  तो पत्रकार जिवंत परतू शकला नाही . त्यानंतर एका सर्च ऑपरेशन करून त्या टोळीला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले . तेव्हापासून भुताची वाट ही आपले एके-एक बळी घेत आहे .


समाप्त......

Monday 21 January 2019

प्रतिबिंब लघू-गुढकथा


प्रतिबिंब एक लघु-गुढकथा
तो आरशामध्ये पाहत होता , त्याचं स्वतःचं शरीर . त्याला स्वतःच्या शरीराचा गर्व होता . त्याच्या पिळदार शरीराचा , आखीव-रेखीव देहाचा , जे त्याने कमावलं होतं आणि जन्मताच सुंदर असलेल्या मुखड्याचा त्याला गर्व होता .  तो स्वतःशीच हसला आणि त्याच्या सोनेरी केसांमध्ये त्याने कंगवा फिरवला . कंगवा फिरवताना तो आरशाकडे पाहत होता .  आरश्यामधील प्रतिबिंब देखील त्याच्याबरोबर हालचाली करणं अपेक्षित होतं . पण कुठेच कोणतीच हालचाल होत नव्हती . ते प्रतिबिंब एकटक्कपणे त्याच्याकडे रोखून पाहत होतं . हे त्याचंच प्रतिबिंब असलं तरी त्याला त्याची भीती वाटली . त्याची ती नजर जीवघेणी होती . असं वाटत होतं की ते प्रतिबिंब कोणत्याही क्षणी आरशातून बाहेर येईल आणि....... पुढची कल्पनाच भयावह होती .
त्याला वाटलं त्याला भास होत असेल . त्याने डोळे मिटून पुन्हा उघडले आणि पुन्हा एकदा हालचाल करून पाहिली     .  मात्र त्याही वेळी ते प्रतिबिंब एकटक त्याच्याकडे पाहत होते . त्याने आरश्याला हात लावला .... 
प्रतीबिंबा ने ही हालचाल केली . त्यानेही आरशाला हात लावला . तो हसला .  त्याचा हास्यात निर्मळपणा होता . प्रतिबिंबही हसले पण त्यात खुनशीपणा होता .  ते छद्मी हास्य होते , हे त्याला कळाले नाही.....
इतक्या वेळ टणक असलेला आरसा बिळबिळीत होऊ लागला . त्याच्या हाताचा आधार ढासळू लागला.  पाण्यामध्ये बुडल्या प्रमाणे त्याचा हात आरशामध्ये जाऊ लागला व हवेत फेकलेला चेंडू जसा गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचला जातो त्याप्रमाणे तो त्या आरशात खेचला जाऊ लागला  . तो रडू लागला . किंचाळू लागला . ओरडू लागला . आक्रोश करू लागला .
आताही त्याच्यापुढे तोच उभा होता पण त्याला हालचाल करण्याचा स्वातंत्र्य नव्हतं , ना कुठे जाण्याचा स्वातंत्र्य होतं .  तो बंदिस्त झाला होता . त्याच आरशात ज्या आरश्यात काही वेळापूर्वी त्याचं प्रतिबिंब होतं .  ज्या जगात तो इतके दिवस वावरत होता , ज्या जगात त्याने माणसे जोडली होती ,  जी त्याची स्वतःची होती , जिव्हाळ्याची होती ; त्या माणसात वावरण्यासाठी , फिरण्यासाठी त्याचं प्रतिबिंब मोकळं झालं होतं .......


Tuesday 8 January 2019

Farm house 2

त्याने पाहिले , तो पाहत होता ,आणि तो पाहतच राहिला .  त्याने अंजलीला पाहिलेच होते .  तेव्हाही तो चाट पडला होता.  पण या सौंदर्यावर तो मनातून मोहित झाला होता. त्यात वासना नव्हती ,ना प्रेम होतं . त्याच आकर्षण होतं . एक वेगळं समाधान होतं .

" गणेश ......"
तिचे ओठ विलग झाले  . थोडी हालचाल झाली , पण गाण्याच्या कानापर्यंत कोणताच आवाज पोहोचला नाही .

    तो एका वेगळ्याच विश्वात , एका वेगळ्या मितीत पोहोचला होता . त्याने पूर्वी दोन वेळा अशा सुंदर रूपवतींना पाहिले होते . पहिली म्हणजे शेवंता व दुसरी अंजली .  पण या रुपाचे सौंदर्य काही औरच होते . गण्यासाठी जणू आजूबाजूचा स्थल-काल अनंत काळासाठी त्याच क्षणावर थांबला होता .  किती वेळ झाला होता काय माहित ? तिचे सौंदर्य ,  ते रूप कितीही पाहिले तरी जूनं होतच नव्हतं .

इतका वेळ स्तब्ध असणाऱ्या त्या वातावरणात अचानक हालचालींचा वेग वाढला .त्याच्या सर्वांगावर शिरशीरी येऊन गेली . नि इतका वेळ फक्त डोळ्यांच्या संवेदना वाचण्यात गुंग असलेल्या मेंदूला इतर ज्ञानेंद्रियांची संवेदना वाचायला वेळ मिळाला. मग अचानक कानामध्ये आवाज वाढले . त्वचेला वेदना झाल्या . डोळ्यांनाही त्या रूपाला सोडून इतर परिसराची जाणीव झाली .

"  तू तर फारच बिघडलेला निघाला की रे ...!

   तो पोलीस अधिकारी म्हणाला ज्याने त्याला सोडवून आणलं होतं   त्यानेच त्याच्या पाठीत धपाटा घालत गन्याला ताळ्यावर आणले .

"  अरे ऐक तर ती काय म्हणते " तोच म्हणाला ..

गन्याने तिच्याकडे पाहिले ...

"आता काही नाही म्हणणार ती  , आता मीच सांगतो टेबलावरती गरम-गरम जेवण वाढले आहे ,  जेवून घे , मग बोलू....

जेवण म्हटल्यानंतर त्याच्या पोटात आगीचा डोंब उसळला .  भूक इतकी लागली होती की त्याला काही सुचलं नाही , तो सरळ टेबलाकडे निघाला .

" अरे आंघोळ वगैरे तर कर ...

" करतो , करतो  विसरलोच....

सगळा कार्यभाग आटपून तो जेवायला बसला . त्याच्या आयुष्यात त्याने प्रथमच इतके स्वादिष्ट जेवन चाखले असावे .  त्याला तिच्या हाताची चव फार आवडली .

" जेवण फार चविष्ट झालेय अं ....

आणि त्याने तिच्याकडे कटाक्ष टाकला .

" तिच्याकडे बघुन नको , तिनं नाही बनवलं . हॉटेलमधून मागून ठेवलं होतं काल , तिने फक्त गरम केलंय....

या प्रात्यक्षिक विनोदावर तिने हळूच हसून आपला प्रतिसाद दिला . हा विनोद जरी गण्या वरती झाला असला , तरी त्याला वाईट वाटलं नाही . उलट तिला हसताना पाहून पुन्हा एकदा त्याच स्थल-काल स्तब्ध होणार होतं , पण यावेळी त्या पोलिस अधिकाऱ्याने अगोदरच सपाटा लावला . त्यामुळे त्याला ठसकाही लागला...

"  असू दे ,  असू दे नाहीतर पुन्हा एकदा स्तब्ध झाला असता...."

जेवण आटोपल्यावर ते तिघेही सोप्या वरती बसले . त्या पोलिस अधिकाऱ्याने बोलायला सुरुवात केली  .

' मी रामचंद्र इंगळे शहरात सध्या जी सिरीयल किलींग चालू आहे , त्यासाठी नेमलेल्या विशेष तपासणी पथकाचा प्रमुख आणि ती मुलगी शैला . मलाही तिच्याबद्दल एवढंच माहित आहे . तुझ्या मनात बरेच प्रश्न पडले असतील मी माझ्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतो . आणि काही गोष्टी शैला तुला सांगणार आहे पण आधी मी सांगतो ...

हे सिरीयल किलिंगचा प्रकरण ऐकून माझ्या कानावर आलं होतं . पण त्याच्या तपासणी पथकात माझी प्रमुख म्हणून निवड होईल असं वाटलं नव्हतं . कारण निवृत्त होऊन मला दोन वर्षे उलटली होती .  माझ्या तब्येतीकडे बघून वाटत नसेल तुम्हाला माझं वय इतकं असेल पण वय जरी थांबवता येत नसलं तरी तब्येत सांभाळा येते . त्या दिवशी मंत्री साहेबांचा फोन आला त्यांनी प्रकरण सांगितलं . नाही म्हणायचा विषय नव्हता , कारण मी बऱ्याच अशा केस  सोडवल्या आहेत ज्या सर्वांनी अशक्य म्हणून बंद करून टाकल्या होत्या . मग ही तर किरकोळ केस होती .

मी तपासावर रुजू झालो तेव्हा दोन खून झालेच होते .  तेही एकाच पद्धतीने . मी ज्या दिवशी रुजू झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक खून झाला . मी त्या ठिकाणी पोहोचलो सर्व खोली रक्ताने माखली होती . एक भयानक दुर्गंधी संपूर्ण खोली मध्ये पसरली होती . ज्याचा खून झाला होता त्याच्या शरीरावर मांस शिल्लकच नव्हते .  मागच्या दोन्ही वेळेस असे झाले होते . फॉरेन्सिकचा म्हणण्यानुसार खून करण्यासाठी कोणत्या तरी सरपटणाऱ्या प्राण्यांचा वापर केला जात होता . जसं एखाद्या जळवाचा . पण आतापर्यंत दोन्ही ठिकाणी एकही सरपटणारा प्राणी सापडला नव्हता .  मात्र यावेळी त्या माणसाच्या हातात काहीतरी होतं . आम्ही उघडून पाहिलं तर त्याच्या हातात एक गोगलगाय होती .

त्या गोगलगाई ची ही आम्ही तपासणी केली . ती काही वेगळी नव्हती . नेहमी असते तशीच होती . मला कळेच ना की गोगलगायीचा वापर एखादा खून करण्यासाठी कसा केला जाऊ शकतो .....? आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर गोगलगाय आणणार कशा......?

सगळा तपास चालू असताना मला त्याच्या (म्हणजे ज्याचा खून झाला होता तो ) टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक डायरी सापडली . ती उघडून बघितली की डायरी पूर्ण कोरी होती .  मला कधीच काही लिहायचा शौक नाही पण त्यादिवशी मला इतकी तीव्र इच्छा झाली की आपण की डायरी लिहायला हवी .  मग मी तिथून चक्क चोरून घरी आली व लिहायला चालू केली

मी पहिल्या दिवशी जरा सविस्तर लिहिले . दुसऱ्या दिवशी फारच तोकडी लिहिली , आणि यावरून मला एक धक्कादायक गोष्ट समजली .

   मी पहिल्या दिवशी मंत्री साहेबाबद्दल लिहिलं होतं . दुसऱ्या दिवशी कळालं की हार्ट अटॅक मुळे त्यांचा मृत्यू झाला . पण ते साफ खोटं होतं .  मला थोडा तपास करता समजले की त्यांचाही मृत्यू त्याच पद्धतीने झाला होता , आणि ते मुद्दाम लपवलं होतं . ते बरोबरही होतं जितला मंत्री सुरक्षित नाही तिथले लोक कसे सुरक्षित राहतील ..?

   मला मनात एक गोष्ट जाणवली की मुळात आपल्याला लिहायची सवय नाही ती डायरी आल्यापासून आपण लिहायला लागलो .  पहिल्याच दिवशी मी डायरीमध्ये मंत्री साहेबांबरोबर दोघांचा उल्लेख केला होता आणि ज्यांचा उल्लेख केला होता त्याचापैकी एकाचा मृत्यू झाला . पण मला हा योगायोग वाटला म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्याची चाचपणी करायची ठरवली . दुसऱ्या दिवशी मी मुद्दामूनच त्रोटक आणि कृत्रिम माहिती लिहिली . त्या माहितीमध्ये मी एका तुरुंगातल्या कैद याबद्दल लिहिलं होतं जी संपूर्णपणे बनावट होती . पण दुसऱ्या दिवशी बरोबर तुरुंगातील एका कैद्याचा मृत्यू झाला .

       मला कळालं नाही किमी तुरुंगातल्या कैद्याला भेटलोच नव्हतो . ही हकिकत बनावट व कृत्रिम होती , तरीही तुरुंगातल्या कैद्याचा मृत्यू का झाला ....? नंतर मी जेव्हा विचार केला तेव्हा मला कळलं की मी डायरीत ती कृत्रिम हकीकत लिहीत असताना त्याच कैद्याचा विचार करत होतो ज्याचा दुसऱ्या दिवशी खून झाला होता....!

काल रात्री जेव्हा मला या साऱ्यांचा उलगडा झाला तेव्हा मी लिहिलेली पाने काढून बाजूला ठेवली . नंतर मला वाटलं की ती डायरीच जाळून टाकावी ,  पण जेव्हा मी हा सर्व विचार करत होतो माझ्या पुढे ती डायरी मी उघडून ठेवली होती . मी उठलो ती डायरी डस्टबिन मधे टाकली .  मी लाईटर शोधू लागलो , तेव्हाच  तिथे सर्वत्र गोगलगायींचा गराडा पडू लागला . मला वाटतं मी डायरी उघडून तिच्यापुढे बसून सारे विचार केल्यामुळे त्यांना माझे विचार कळाले असावेत त्यामुळे त्यांनी माझा नाश करण्यासाठी गोगलगाईंना पाठवलं असावं असं मला वाटतं .

  मला माहित नाही मी त्या ठिकाणी किती वेळ बेशुद्ध होतो .  नंतर तू मला सोडवलं .  मग मी कसेतरी ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि बेशुद्ध झालो .  मला नंतर कळालं की दवाखान्यातील लोकांनी पोलीस स्टेशनला फोन केला होता..  शैला मला म्हणाली की तुला पोलिसांनी पकडलं आहे आणि हे सगळं निस्तारण्यासाठी तुझी गरज आहे . आणि तू निर्दोषही होता म्हणून मी तुला सोडून बाहेर आणलं...

रामचंद्र इंगळे साहेबांचा बोलून झालं होतं त्यांनी प्रश्नाची उत्तरे दिली पण गण्या मात्र अजूनच बुचकळ्यात पडला.....


तिच्या मधुर आवाजात ऐकत असताना त्याच्या समोर सारे शब्द दृश्यात रूपांतरित होत होते . शैला बोलत होती -

   " आता तू म्हणशील कि मला हे सारं कसं कळलं वगैरे ....?  तर ऐक , मीही एक प्रतिनिधीच आहे .  तुझ्या सारखी .  आपलं एकच काम आहे ते म्हणजे त्यांचा विनाश . ज्या दृष्ट आणि पाशवी शक्तींबरोबर आपला संघर्ष चालू आहे त्यांच्यासोबत एकटा-दुकटा लढू शकत नाही .  आपल्यासारखे अजूनही असतील त्यांचा ही त्या शक्तींविरुद्ध लढा चालू असेल . ज्याला-त्याला , ज्याच्या-त्याच्या कामगिरी वाटून दिल्या आहेत . आतापर्यंत तु तुझी कामगिरी करत होता ; मी माझी कामगिरी करत होते . आता आपल्याला मिळून एक कार्य पूर्ण करायचं आहे .  आपल्याबरोबर अजूनही येथील ,  पण तूर्तास तरी आपल्यालाच पुढची पावले टाकायला हवीत . तेही अगदी जपून .

" पण शैला मला एक सांग तुला माझ्या आणि गणेश च्या संदर्भात सारं कसं कळालं ...?
तो रामचंद्र इंगळे म्हणजेच पोलिस विचारत होता .

" तुम्हाला एखादं काम दिलं तर ते काम कसं करायचं हे सुद्धा सांगितलं जातं . आपल्याला फक्त सांगितलेलं करायचं असतं . एक मात्र खरं आहे आपल्याला ओळखायला यायला हवं की आपल्याला नक्की काय काम सांगितलेलं आहे....?
आणि सांगण्याच्याही बर्‍याच पद्धती असतात . ज्या त्या व्यक्तीच्या जाणिवा , मानसिक शक्ती ,  खंबीरता व कुवतीवर त्याला ते संदेश पोहोचवले जातात .  मला म्हणाल तर अंतरात जाणीव होते , काही चित्रे व रेखाटने साकारली जातात , त्याबरोबर काही शब्द लिहिले , जातात बऱ्याच वेळा सारं काही माहित असल्या सारखं मला आपोआप उमगंतं की आता आपल्याला काय करायला पाहिजे.....? "

" तेच म्हणतो मी काय करायचं .....?
पुन्हा इंगळे साहेब म्हणाले

गण्याच्या प्रश्नाची थोडीबहुत उत्तरे त्याला मिळाली होती .  पण अजूनही त्याच्यापुढे कृतीचा रस्ता अस्पष्टच होता .  त्याला मार्गच दिसत नव्हता .  अचानक त्याच्या ध्यानात बप्पां व त्यांचा मठ आला .

" आपण बप्पाच्या मठात जाऊया ; बप्पांनी आपल्यासाठी काहीतरी चिट्ठी वगैरे सोडली असेलच .  ते स्वत:ही असतील तिथे.

" कोण बप्पा..?
दोघेही एकदमच म्हणाले

" चला गाडी काढा ,.जाता - जाता सांगतो ....

पुन्हा एकदा ते मठाकडे निघाले

     गाडी मठापाशी पोहोचली .  गण्या उतरून पळतच निघाला . उत्सुकतेपोटी त्याला दोघांचेही भान राहिलं नाही . त्याने दार उघडलं आणि आत पाऊल टाकले .  त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना तो मठ नव्हताच . अगोदर जे पाहिले ते वेगळेच आणि आता पाहतो तर त्या जागेचे रुपच बदलले होते . सर्वत्र जाळ्या लागल्या होत्या .   जणु काही तो बंगला कैक वर्षे बंद होता . सर्वत्र धूळ नि पालापाचोळा साचला होता .  कोणीही ती जागा पाहून जराही विचार न करता सांगितलं असतं की ती जागा कैक वर्षे मानवी वापरात नव्हती  . मानवी वास्तव्याची पुसटशीही खून  त्याठिकाणी दिसत नव्हती .  गाण्याला कळालच नाही की तो फक्त एकटाच त्या खोलीत आला होता . ती खोली बाप्पांच्या माठातील नव्हतीच . त्याला अंजलीने येथे आणले होते .  फक्त त्यालाच.....

" गणेश .....
कातळ काळोखातील घनगंभीर शांततेला चिरत आलेल्या आवाजाने गण्या दचकला . जेव्हा अंजलीचा आवाज त्याने ओळखला तेव्हा निर्धास्त होऊन त्या आवाजाला त्याने प्रतिसाद दिला

" मला इथे का आणले ...?

" तुला काहीतरी सांगायचं , काही तरी दाखवायचंय.....

"  काय...?

ती सांगू लागली -
" तू मला नेहमी विचारतोस ना ...  लहानपणा नंतर मी कुठे गेले...?  माझ्यासोबत नंतर काय झालं ...? मी ही अशी का झाले ..? आणि माझी मुक्ती कशी होणार...? मला तुला सारे काही सांगायचं .  सांगायचं आहे म्हणण्यापेक्षा ,  दाखवायचं आहे .  तुला मी सारं काही दाखवते ; त्यानंतरच तू ठरव तुला व तुझ्या साथीदारांना काय करायला पाहिजे .

  तो मध्यभागी एका सिंहासन सारख्या दिसणाऱ्या सोनेरी , मखमली  खुर्चीवर बसला . त्याच्या चारी बाजूंना अंधार होता . कुठेतरी एक सोनेरी प्रकाश शलाका चमकली ; व छोटासा विस्फोट झाला .  त्यानंतर त्याच्या चारी बाजूला तेच सोनेरी रंगाचे विस्फोट होत गेले .  त्यातून विविध रंग बाहेर पडू लागले व पसरू लागले   . जणू काही कोणतातरी चित्रकार त्याच्या कुंचल्याच्या फटक्याने त्रिमितीय चित्र काढत होता....

  किती रमणीय देखावा होता .  ते मोठे वडाचे झाड होते .  त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत पसरल्या होत्या . त्या वडाच्या झाडाला कितीतरी पक्षांनी आपलं घर बनवलं होतं . त्यांच्या त्या किलबिल आवाजाला दोन मुलांच्या खेळण्या चा आवाज साथ देत होता .  त्यात एक मुलगा व एक मुलगी होती .  त्यांचा शिवाशिवीचा खेळ चालू होता . मुलगा पुढे पळत होता व मुलगी मागे . मुलगा भरभर पारंब्यावरून चढत जात होता .  तोच गणेश , त्याने स्वतःला ओळखलं . त्याच्यामागे तीच होती , अंजली .  तीपण  पारंब्या वर चढत होती .  तो वरपर्यंत पोहोचला . तिला सापडू नये म्हणून तो जोरात पळू लागला . पण त्याचा पाय घसरला . तो पडणारच होता , पण किती चपळतेने उडी मारून  त्याचा हात धरून तिने त्याला वर घेतले .....

  पुन्हा एकदा डोळे दिपवणारा प्रकाश चकाकला . त्याची तीव्रता इतकी होती , की काही सेकंद त्याने डोळे उघडले नाहीत . त्याच्या झाकलेल्या डोळ्यापुढे काळ्या , निळ्या जांभळ्या , लाल नि गुलाबी ज्वाला झळकत होत्या . त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्यापुढे एक खोली होती . त्याला आठवलं की ती  अंजलीच्या घरातील खोली होती  . एक दारुडा  रंग झडून गेलेल्या सतरंजीवर आणि पापुद्रे निघालेल्या भिंतीला टेकून ;  त्याच्या  घाणेरड्या हाताला न शोभणाऱ्या चकाकणाऱ्या काचेच्या ग्लासात उंची दारू पीत होता . त्याच्यापुढे रंग उडालेल्या खुर्चीत एक माणूस सिगारेट फुकत बसला होता .  त्या खोलीत डोकावून दुसरे एका माणसाने सांगितले ....' चल बे काम झाले ' . दूर कुठेतरी लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता . त्याला कळालं अंजलीच्या दारुड्या बापाने काही पैशासाठी स्वतःच्या मुलीला म्हणजे अंजली विकलं होतं .....!

    पुन्हा एकदा समोरचा देखावा पालटला . आता ते एखाद्या संस्थेच्या कार्यालयात होते .  एका खुर्चीवर पन्नाशी ओलांडलेला म्हातारा बसला होता .  त्याच्या पुढे दोन इसम होते . तेच ते दोघे ज्यांनी अंजलीला विकत घेतलं होतं .
" थोड्या दिवस राहू दे तुझ्या अनाथाश्रमात , कळीचं फूल होईपर्यंत ....
" आता रेट वाढवलेला आहे आपण , जास्त पैसे द्यावे लागतील ....
तो पन्नाशी उलटलेल्या माणूस बोलला
" ठीक आहे......  कळतात सारे तुझे पण नखरे ......असू दे तरीपण .....

पुन्हा एकदा देखावा बदलला जिथे तो बसला होता त्या खोलीत आला......

" मी इतकी ही लहान नव्हते की काय चाललंय ते कळू नये....  मला सारं कळत होतं . पण मी काय करू शकत होते..?  कुठे जाऊ शकत होते ..? माझा एकुलता एक आधार तो माझा बाप . त्यांनेच मला विकलं , मी त्यावेळी खरच अबला होते .  मला कोणाचाच आधार नव्हता .  बाहेरच्या जगात जगण्यासाठी ना माझ्याकडे कोणती कला होती , ना काम होतं ,  ना मला काही करता येत होतं ..... बाहेरच्या जगात माझ्या शरीरांवरती बोचणाऱ्या नजरा मला पदोपदी जाणवत होत्या .  त्यामुळे तिथून पळून जायचं मी मुळीच प्रयत्न केला नाही .  उलट तिथेच जमवून घेतलं अनाथाश्रमाच्या शाळेत शिकू लागले . चांगले गुण मिळवू लागले . मी मॅट्रिकला पहिला नंबर काढला . अनाथाश्रम चालवत होते त्यांच्या नजरेत मी आले . त्यांनी मला तिथून काढून दुसऱ्या वस्तीगृहात टाकले . मी त्या दलदलीतून इतक्या सहज सुटले कि मला आकाशही ठेंगणे वाटू लागले . मला घेऊन जाताना त्या म्हातारऱ्याने विरोध करायचा प्रयत्न केला . पण शेवटी त्याला झुकावं लागलं . नंतर मला कळाले की त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ; पण मला माहित होतं ज्या दोघांनी मला विकत घेतलं होतं त्या दोघांच्या हातून मी नसल्यामुळे त्या म्हाताऱ्याचा त्यांनीच खून केला होता ....

कॉलेज झालं .  तिथेही मी चमकलेच  . नंतर ग्रॅज्युएशनसाठी माझा नंबर एमबीबीएसला मेरीट मध्ये बसला . तिथेच असताना माझ्या आयुष्यात तो आला .  माझ्या निराधार मनाला त्याने आधार दिला . तो माझा ,  माझ्या आयुष्याचा साथीदार बनला .  आमच्या लपून-छपून गाठीभेटी होऊ लागल्या ....
आणि आवाज थांबला . पुन्हा एकदा आजूबाजूचा देखावा पालटला

ती एक बेडरूम होती .  मधुचंद्रासाठी सजवतात तशी सजवली होती .  तीच ती रूपवती अंजली बसली होती . गाण्याच्या काळजात नकळत एक घाव पडलाच पण पुढची दृश्य पाहून त्याचं ह्रदयच पिळवटून निघाले   . त्या खोलीत तिचा तथाकथित साथीदार आलाच नाही . आलं होतं ते दुसरीच कुणीतरी ,   कोणीतरी म्हणण्यापेक्षा काहीतरी  ....
काळा आकार,  पोत्यामध्ये माती भरावी तसा , अवाढव्य अस्ता- व्यस्त ,संपूर्ण शरीरावर ती लांब लांब काळे केस ते मानवी शरीर नव्हतंच .... काही दृश्य त्याच्या अंतर्मनावर उमटताच त्याने डोळे मिटून घेतले . नंतर खोली तिच्या किंचाळण्याने ,  भयानक दुर्गंधीने , रक्ताचे शिंतोडे आणि  ग्लब-ग्लब करून काहीतरी खाण्याच्या आवाजाने  भरून गेली.....
मी ज्याच्यावर ती सर्वस्व अर्पण केलं होतं ;  त्यानं मला एका बळीसाठी अर्पण केलं .  तो एका नीच , अधम पंथाचा उपासक होता . त्याने बळीसाठी ठराविक अटींमुळे माझी निवड केली होती .  हेतुपूर्वक माझ्याभोवती जाळे गुंफले होते .  त्या पिशाच्याच्याने माझा  उपभोग घेऊन मलाच भक्ष्य बनवलं .  माझा मृत्यू झाला खरा पण मी मुक्त झालेच नाही  . मला कळालं नाही की मी भूत बनून का वावरत होते ....? मला राग आला . भयानक राग आला . माझा बळी दिला होता आणि ज्याने घेतला होता त्यांचा....  मी रागाने दोघांवरही चाल करून जाणार होते . माझं काहीही हो,  मला त्यांना सोडायचं नव्हंतं . पण मला तेव्हाच इतकी तीव्र अंतर-प्रेरणा झाली की ~'  योग वेळेसाठी थांब .  प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्माचे फळ मिळतं .  कुणीही कितीही वाईट असू दे , पापाचा घडा भरला की तो संपतोच .  म्हणून तू प्रतीक्षा कर.  योग्य वेळेची वाट पहा .' मग वेळोवेळी अशा गोष्टी जाणवतच गेल्या . अशा गोष्टी मुळेच मी तुला वाचवायला त्या टेकडीवर पोहोचलो जिथे तू स्वतःहून बळी जायला निघाला होता . नंतर  मी वेळोवेळी तुझ्या स्वप्नात आले , घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या , या सर्व गोष्टी त्यांनी घडवून आणल्या आहेत . या सर्व गोष्टी मागे त्यांचा हात आहे . त्याच शक्ती ,  ज्या  दुष्ट अमानवी पाशवी   अमंगलमय शक्ती विरुद्ध लढत आहेत.

आत्ताच ती वेळ आली आहे . त्यांच्या नाशाचा काळ जवळ आला आहे . त्यांचे विनाशक आपणच आहोत .   आपल्यामागे त्या शक्‍तींचा बळ आहे . फक्त तु तुझ्या साथीदारांना घेऊन योग्य जागी पोहोचायचयं....

"  कोणती जागा ....?

"  तीच ती , मी पहिल्यांदा तुला घेऊन गेले होते ती ...

" _ _  व फार्महाउस .... ?

"  हो तेच तेच ते फार्महाउस आहे जिथे माझा व माझ्यासारख्या कित्येकांच्या बळी दिला गेला आहे.....!

      तो शुद्धीवर आला तो बप्पांच्या मठाच्या हॉलमध्येच होता .

" म्हणजे मला हे सारं सांगण्यासाठी अंजलीने केलं होतं ....

" काय बोलतोय गणेश ...?  काय केलं होतं ...? कोण अंजली....? "
 
   आपल्या मधुर आवाजात शैला विचारत होती . गण्याने तिला जत्रेपासूनची कहाणी व आता कळलेला सारा वृत्तांत सांगितला .

  " मग आपल्याला लवकरात लवकर त्या फार्महाउस ला पोहोचलं  पाहिजे...
   रामचंद्र इंगळे साहेब म्हणत होते .

" हो जायलाच पाहिजे ....."  शैला ही म्हणाली

" थांबा जरा ... बप्पांनी माझ्या नावाची डायरी लिहिली होती.  त्यामध्ये आपल्याला काहीतरी सापडेल.....

   तीच ती डायरी जेव्हा गण्या पहिल्यांदा आला होता  आणि इकडे तिकडे शोधाशोध करताना त्याचं नाव लिहिलेलं ती डायरी त्याला सापडली होती . त्या डायरीत त्याच्याबरोबर घडलेल्या घटना लिहिल्या होत्या . त्यांनी शोधाशोध केली पण डायरी काही सापडली नाही .

शेवटी गण्या , शैला व तो पोलीस रामचंद्र इंगळे तिघेही फार्महाऊसकडे निघाले . तेथेच साऱ्या गोष्टींचा उलगडा होणार होता


Tuesday 1 January 2019

Farm house 1

@फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे...

  # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये मिळतील .

$ त्यामुळे तुम्ही जत्रा ही कथा वाचली नसेल तर  अवश्य वाचा .....

【सारांश जत्रेचा 】
¢ गावातील जत्रेमध्ये आलेला ऑर्केस्ट्रा पहायला निघालेले तीन मित्र काटेवाडीचा जंगलातील भुताच्या तावडीत सापडतात .
¢  तिथून निसटताना त्यांच्यातील दोघे मृत्यू पावतात व एका मित्राला म्हणजेच गण्याला त्याच्या लहानपणीची मैत्रीणचे ,  अंजलीचे भूत   वाचवते .....
इथून पुढचा भाग या कथेमध्ये आलेला आहे तुम्ही प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन जत्रा आवश्य वाचा .
 त्या पोलिस अधिकाऱ्याने गाण्यावर ती प्रश्नांची सरबत्ती लावली होती

  " तू इथे काय करत होता ?
  " कशाला आला होता ?
"  तुझ्याबरोबर अजून कोण कोण होते ?
  " स्फोट कसा काय झाला ?

  आणि काय काय प्रश्न तो विचारत होता .
   गण्या त्याला काय सांगणार होता की तो त्याच्या मित्रांसोबत गावाच्या जत्रेला निघाला होता . काटेवाडीच्या जंगलातल्या वाटेने जाताना ते भुताच्या तावडीत सापडले .  त्यात त्याचे दोन मित्र त्याने गमावले आणि त्याला त्याच्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या भुताने वाचवलं . ज्या मैत्रिणीला त्याने लहान पणा नंतर कधी पाहिलंच नव्हतं . त्यालाच माहित नव्हतं की तो इथे कसा आला . तो पोलिसांना काय सांगणार होता  ?
तो फक्त म्हणाला
" मला माहित नाही ....
" माहित नाही काय .....? चल पोलीस स्टेशनला , दोन काठ्या पडल्या की सारं माहीत होईल....

"  मला खरच माहित नाही . मी खोटे का बोलेन ...

  आणि ते खरंच होतं .  पण तो काहीच करू शकत नव्हता गपचूप पोलिसांबरोबर जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच नव्हता .

     माणसाच्या आयुष्यात काय होईल सांगता येत नाही .   काल रात्री गण्या जत्रेतला ऑर्केस्ट्रा पाहायला निघाला होता आणि आज तो तुरुंगात होता .  तरुंगात बसून त्यानं खूप डोकं चालवलं . त्याने खूप विचार केला की नक्की काय झालं असेल .  तो इथे कसा पोहोचला असेल . पण सारी खटपट व्यर्थ होती .  शेवटी वैतागून तो वेड्यासारखा इकडे तिकडे पाहत बसला .  त्याला बसल्या जागीहून पोलिसाचा टेबल दिसत होता . तेथे गाऱ्हाणं घेऊन येणारी माणसं दिसत होती . त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख ,  उदासीनता , क्वचित कधी राग आणि संताप सुद्धा दिसत होतं .  पण आत्ता आलेला इसम या साऱ्यांच्या विरुद्ध होता . त्याचा चेहरा हसरा होता . तो होताच थोडा विचित्र .

     काळ्याभोर झुपकेदार मिशा , पांढरे शुभ्र धोतर ,  त्यावर पांढरा सदरा  आणि काळा कोट . डोक्यावर जुने लोक घालतात तसे फेटा कम पगडी . तोंडात पानाचा तोबरा असल्यामुळे ओठ लाल झालेले . तो अर्धाभरतास त्या पोलिस अधिकाऱ्याबरोबर बोलत होता . मधून मधून गण्याकडे बोटही करत होता .  तो पोलिस अधिकारीही खुलून बोलत होता . मध्येच त्याने खिशातून पानाची चंची काढली पान तयार करून त्याने पोलिसालाही दिले आणि स्वतः खाल्ले .   शेवटी पोलिसांने गण्या कडे बोट करत काहीतरी सांगितले .  हवलदार चावी घेऊन त्याच्याकडे आला . त्याने गण्याला सोडवून बाहेर आणले .

तो पोलीस म्हणाला

"  बप्पा तुला सोडवायला आले म्हणजे काहीतरी खास असशील तू ....
" अजून काही मदत लागली तर सांगा बप्पा

" व्हय साहेब सांगतु की...  निघू का आता ..
     चला गणपतराव चला .

    गण्याला काहीच कळेना हा बप्पा कोण होता ? त्याने गण्याला का सोडवले ? आणि त्याला गाण्याचे नावही माहीत होते .  गण्या पुरता चक्रावला . जेव्हा पासून तो जंगलात घुसला होता , त्याचं आयुष्य म्हणजे धक्क्यांची मालिका झालं होतं .  धक्क्या मागून धक्के येत होते , त्याला सावरायलाही वेळ मिळत नव्हता .

" कुठं  हरवला गणपतराव येताय नव्हं ......

" पण मी ओळखलं नाही तुम्हाला ...?

" हुईल वळख हळूहळू आता चला माझ्यासंग

एरवीअनोळखी माणसाबरोबर तो गेलाच नसता पण ती वेळच अशी होती की तो गुपचूप त्याच्या बरोबर गेला ..
  सहा  खोल्यांचा मठ होता तो .  बप्पा म्हणाले होते हा आपल्या मठ .  2 बेडरूम , 1 किचन , एक हॉल व किचनला लागूनच जेवायची खोली होती .  बेडरूमही मोठ्या होत्या.  एका एका बेडरुममध्ये चार-चार बेड होते . म्हणजे खरच ही धर्मशाळा किंवा मठ असावा . त्याला टॉयलेट-बाथरूम दाखवून बप्पा जेवण आणायला बाहेर गेले

  गण्याने अंघोळ करून घेतली तेव्हा त्याला ताजतवानं वाटायला लागलं . बेडरूम मध्ये त्याच्या मापाचे कपडे ठेवलेच होते . त्याने ते बदलून घेतले व हॉल मध्ये येउन बसला . इतका वेळ त्याला विचार करायला वेळच मिळाला नव्हता . घटना इतक्या पटापट घडत गेल्या की त्याला प्रतिक्रिया द्यायला देखील वेळ मिळाला नाही . आता तो नव्या दमाने विचार करू लागला.  त्याला अंजलीने वाचवलं नंतर तो बेटावर होता .  तिथून पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलं .  तिथून बप्पाने त्याला सोडवून आणलं .

   ' हा बप्पा नक्की आहे तरी कोण ? आणि त्याला माझं नाव कसं माहित ?  महत्त्वाचं म्हणजे त्याला कळालं कसं की मी तुरुंगात आहे ? हा कसला मठ आहे नक्की ?  एक माणूस दिसत नाही . आपल्याला शोध घ्यायला पाहिजे . त्याने हॉलमधील टेबलाचा ड्रॉवर शोधायला सुरुवात केली .  त्याला पाहिजे ते काहीच सापडत नव्हते . ना कोणतं माहिती पत्र होतं ना कोणतं रजिस्टर . एकदम खालच्या कप्प्यात त्याला एक वही दिसली . त्या वही वरती एक कागद लावला होता .  त्याच्या वरती नाव होतं ^ गणपतराव ^ त्यांना पहिलं पान उघडून पाहिलं .

                      '  तिसरा शिलेदार '

व्हय तिसराच . आतापतुर दोन शिलेदार आलं  . गणपतराव तिसरा शिलेदार हाय . मागच्याबारीला पण अशीच सपनं पडली हुती .  ह्याबारीला जरा  जास्तीच  सपान  पडाया लागल्याती .

पहिल्या पानावरचा मजकूर येथेच संपला होता . दुसऱ्या पानावर मोठ्या अक्षरात एक आकडा टाकला होता .

                               ' १ '

किर्र जंगलात  तीन पोर जिवाच्या धास्तीने पळायल्यात आगीचा इस्फोट आणि दोघांचे मराण . एक जण वाचला त्यो पळतूय . पळता पळता एका समुद्राच्या बेटावर गेला .  परत स्फोट झाला . पुन्हा एकदा तो वाचला . आता तरूंगात बसलाय  . पोलीस स्टेशन वाटतय .

दुसऱ्या पानावरचा मजकूर इथेच संपला होता .

" तुला काय इचारायचं असेल तर मला इचार की इकडं-तिकडं  काय हुडकतुय " बाप्पा म्हणाले

सकाळी धोतर आणि कोटात बघितलेले बप्पा आता विजार आणि सुती बंडित ओळखू येत नव्हते .

" या वहीत काय आहे हे " गण्या म्हणाला

" तू वाचलीय ना . तुला कळालं न्हाय  का ?

" माझ्याबरोबर जे घडलं ते तुम्हाला कसं माहीत ?

" सांगतु आधी जेवण करू ,  मग सगळं सविस्तर सांगतु

   जेवण झाल्यावर ते दोघे हॉलमध्ये बसले बप्पांनी आपली पानाची चंची काढली पानाचा विढा तोंडात टाकून त्यांनी गाण्याला सारं सांगायला सुरुवात केली

     संघर्ष , लढाई सगळीकडे तेच चालू आहे . माणूस , प्राणी निसर्गातील सारे काही संघर्षच करत आहेत . अगदी किडा-मुंगी ,  छोट्यातला छोटा जीव मग तो  एकपेशीय का असेना ,  तो संघर्ष करतो . हा सारा संघर्ष चालला आहे तो स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी .  एकदा जीविताची हमी आणि पोटापाण्याचा प्रश्न मिटला की सुरू होते वर्चस्वाची लढाई .  बऱ्याचदा वर्चस्वाची किंवा सत्तेची लढाई ही सामूहिकरीत्या लढली जाते . त्यात एक गट दुसर्‍या गटावर मात करण्याचा प्रयत्न करतो . हा संघर्ष मानवाला नवा नाही .  तो त्याच्या मनात पूर्वापार चालत आले आहे . त्याला या साऱ्यांची जाणीव आहे .

     हाच संघर्ष चालत आला आहे त्याच्या मनावर ती सत्ता मिळवण्यासाठी . हा संघर्ष चालत आला आहे त्या दोन शक्ती मध्ये ज्याला आपण सुर-असुर , दैवी-राक्षसी , मानवी-अमानवी ,  चांगली-वाईट , मंगलमय-अमंगलमय , पवित्र-अपवित्र म्हणतो .  आपण हेही जाणतो त्यापैकी दैवी , मानवी चांगल्या आणि मंगलमय गोष्टीने तो संघर्ष जिंकून मानवी मनावर वर्चस्व स्थापन केले आहे . पण अजूनही अमानवी , अघोरी शक्ती मानवी मनाच्या तळाशी दडून बसली आहे .  पावित्र्याची पकड ढिली झाली की ती अघोरी शक्ती आपलं अस्तित्व दाखवून देते . आपले शिलेदार बनवते व लढाई उभारते प्रस्थापितांविरोधात . मग त्यांच्या बरोबर दोन हात करण्यासाठी ती मंगलमय ,  पवित्र शक्ती मानवाला शिलेदार बनवून पुढे करते . मानवाला सामर्थ्य पुरवते.  पण शेवटी लढाई मानवालाच लढायची असते . बरेच जण ती जिंकतात , काही हरतात , काही धारातीर्थी पडतात तर काही शत्रूचे मांडलीकत्व  स्वीकारतात .

असा शिलेदार म्हणून गण्याची निवड झाली होती .

    बप्पाने असं काही सांगितलं की गण्याची बोबडीच वळली .  तो अन मांगल्याचा , पावित्र्याचा म्हणजेच साक्षात देवाचा शिलेदार .  हे शक्यच नव्हतं . हे खरं नाही . हे सारे घडत नाही . नक्कीच काहीतरी घोटाळा आहे .

" कसं काय तुम्ही असं म्हणताय .  मला काय येतंय.  मला निवडलं असतं तर मला कळालं असतं .  माझ्यात कोणतीच शक्ती नाही . ना मला उडता येते , ना मारामारी , ना माझं कशाचं प्रशिक्षण झालं .

" अरं येड्या तू स्वतःला सुपरहिरो समजायला का काय ?  तुला निवडलं हे नक्की . उद्यापस्न तू कामाला लागशील ते पण स्वतःहून तुला कुणी सांगायला लागणार नाही ..

    आणि बाप्पा निघून गेले . गण्या मात्र वादळाने उन्मळून पडलेल्या वृक्षाप्रमाणे सुन्न पडला .  आपली मुळं वर आली आहेत आणि पुन्हा ती रुजवायचे असतील तरी लवकर गाव गाठायला पाहिजे . असं वाटून तडक तेथून बाहेर पडला व गावाकडे निघाला . बप्पाने गण्याला  पाहिलं पण त्याने गण्याला हटकलं नाही कारण त्याला माहित होतं तो उद्या याच ठिकाणी माघारी आलेला असेल .

      तो सकाळी सकाळी आला.  आल्या आल्या बाप्पांची गचांडी धरून त्यांना मागे ढकलत चढ्या आवाजात बोलू लागला

"  ए थेरड्या सांग काय केलं तू . मला गावात कोणचं ओळखत नाही . अरे माझा बाप सुद्धा मला ओळखत नाही .  सांग काय केलं ? सांग नाहीतर ....

   असे म्हणत त्याने हाताची बुक्की उचलून बप्पांना मारणार तेवढ्यात बप्पाने त्याचा मानेला धरलेला हात उडवून लावला आणि दोन्ही हाताच्या मुठी ने त्याच्यावर प्रहार केला आणि गण्या कळवळत खाली कोसळला .

बाप्पाने इतकी जलद व चपळपणे हालचाल केली कि त्याच्या वयाच्यामानाने ती सर्वथैव अशक्य होती .

"  गणपतराव इथं मी काहीच करू शकत न्हाय .  सारं काही त्या शक्तीच्या मर्जीने हुतं . तिने तुमाला निवडलं .  तवा तुमाला हे करावंच लागणार दुसरा उपायच नाही तुमच्याकडं .....

निळ्याशार आकाशाखाली  एका झाडाच्या सावलीत ते दोघे बसले होते . गण्या आणि अंजली .

" तू माझ्या स्वप्नात का येते .....


" हे स्वप्न नाही

" तुला काही सांगायचं असेल तर सांगून टाक  उगाच सारखं सारखं स्वप्नात येऊन मला छळु नकोस

कधी नव्हे ते निर्विकार राहणाऱ्या अंजलीच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव उमटले . पण ते भितीचे भाव होते . आणि तेही क्षणभरासाठीच .

" माझ्यासोबत चल तुला काही तरी दाखवायचं आहे..

दोघेही चालू लागले . ते एका बंगल्याच्या गेट समोर येऊन पोहोचले . बंगल्यावरती लिहिलं होतं

                  `  _ _ व  फार्महाउस `

काहीतरी तीन अक्षरी नाव होतं पण दोन अक्षरे जागेला नव्हती .  गण्या गेट कडे जाऊ लागला

" जाऊ नकोस ..

" का ...?

" नको ...

असं म्हणून ती अंतर्धान पावली .  तिथून नाहीशी झाली .  तेव्हाच जोराचा पाऊस सुरू झाला. ढगांचा गडगडाटी आवाज येऊ लागला . त्याला असं वाटत होतं की ते ढग  गणपतराव-गणपतराव म्हणत होते .  हळू हळू आवाज वाढत गेले व स्पष्ट होत गेले

"  गणपतराव , ओ गणपतराव  डोळे उघडा . बरं झालं तुम्ही डोळे उघडलं .  मला वाटलं लईच मार पडला तुम्हाला त्याच्यामुळच बेशुद्ध झाला का काय तुम्ही ....?

" कशाला उठवलं बप्पा . अंजली मला एक घर दाखवत होती आत  चाललो होतो . पण तुम्ही उठवलं राव.....

"  घोटाळा झाला की मग गणपतराव .असू द्या आता . हातात काय हाय ?

त्यानं हात उघडला तसं सडलेल्या माणसाची दुर्गंधी नाकात शिरली .  त्याच्या हातात एक शिंपला होता . जसा गोगलगायीला असतो तसा .

        त्या शिंपल्याचा लिबलिबीत स्पर्श त्याला तेव्हाच जाणवला . प्रतिक्षिप्त क्रिये मुळे त्याने तो शिंपला जोरात खाली आपटला त्यामुळे फुटलेल्या शिंपल्यातून सडलेल्या मासांचे शिंतोडे फरशीवरती उडाले व एक गोगलगाय सरपटू लागली .

   साधारणपणे सरपटत असताना चिकट पांढरा द्रव गोगलगाय मागे सोडते .  मात्र ही गोगलगाय रक्त सोडत होती ते रक्त क्षणात वाळत होते व त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत होती .  बाप्पांनी आपल्या पायाखाली तिला चिरडून टाकले तसा तिथे रक्तस्राव झाला . ते रक्तही क्षणात वाळून गेले पुन्हा एकदा घरात भयंकर दुर्गंधी पसरली . बाप्पा पळत जाऊन फिनाईल व कापड घेऊन आले . ते सडलेले  मांस बाप्पांनी कागदावरती भरून बाहेर फेकून दिले . फरशी पुसून घेतली .  तेव्हा कुठे दुर्गंधी कमी झाली .

       त्या क्षणभरात जो काही प्रकार घडला होता तो नक्कीच अमानवीय होता पण गाण्याच्या हातात तो शिंपला आलाच कसा ? कारण तो स्वप्न बघत होता , त्यामुळे स्वप्नातील सत्यात येणं शक्यच नव्हतं . मुळात स्वप्नातही कुणी शिंपला दिल्याचे त्यांना आठवत नव्हते . मग नक्की शिंपला त्याच्या हातात आला तरी कसा ..  ?
" गणपतराव तुमच्या अंजलीने भारीच मजा केली म्हणायची .
" अहो हा शिंपला अंजलीने नाही दिला...
आणि दिला असता तरी स्वप्नातला शिंपला
सत्यात कसा येईल......?

" गणपतराव ते स्वप्न नव्हतं ..."

तेव्हाच गण्याला अंजलीचे बोल आठवले

"  हे स्वप्न नाही ......

म्हणजे तो खरंच घरासमोर गेला होता की काय....? त्याने आपल्या पायाचे तळवे बघितले त्याला ओली माती चिटकली होती .....

" पण मी तिथे जाईलच कसा......? मी तर इथेच होतो ना तुमच्यासमोर बेशुद्ध पडलेला...."

"  बरोबर आहे तू बेशुद्ध होता पण तू इथे नव्हता ...

" मला काहीच कळेना तुम्ही काय म्हणताय ते ...

"  म्हणजे फकस्त तुझं शरीर इथं होतं , तू मनाने आत्म्याने तिथेच होता .....

" पण हे कसं शक्य होतं......"

"  कळल ,  हळू-हळू सगळ्या प्रश्नाची उत्तर एकदम मिळत नसतात.....    मला एक सांगा गणपतराव तो शिंपला तुमच्याकडे कोणी दिला ?

"  बप्पा मला काहीच आठवत नाही की कोणी दिला ....नि माझ्याकडे कसा आला....?

तेव्हाच किचनमधून भांडी पडल्याचा आवाज झाला...
बाप्पा पळतच किचनमधे गेले.

"  काय झालं बप्पा...?

" काय नाय गणपतराव मांजर आहेत ..

  थोडावेळ भांड्यांचा आवाज येत राहिला . नंतर सर्वत्र शांतता पसरली .  त्या शांत वातावरणात गण्या विचारांच्या गर्तेत हरवून गेला.

'  बरोबर आहे ते स्वप्न नव्हतं . म्हणजे खरंच होतं ते सारं... अंजली म्हणाली होती ते स्वप्न नाही .' तरी त्याच्याकडे शिंपला कसा आला...? त्याला काहीच आठवत नव्हतं . त्याने डोक्याला खूप ताण दिला तरीही त्याला काही सुगावा लागेना . जसं काही कुणीतरी त्याच्या जुन्या आठवणी पुसून टाकल्या होत्या.

थोड्यावेळाने बप्पा दोन दुधाचे ग्लास घेऊन आले . त्यांनी स्वतः एक घेतला व गण्याला दुसरा दिला .  ते गोड गरम दूध पोटात जाताच त्याच्या डोळ्यावर झोपेचा पडदा येऊ लागला .  अगोदर झालेली थकावट व मनावरच्या ताणामुळे तो लगेच झोपी गेला .

' टक-टक ' कुणीतरी दगडावर हातोड्याने घाव घालावेत असा आवाज येत होता . तो आवाज हळूहळू वाढतच गेला .   कानाचे पडदे फाडून मेंदूच्या सर्व संवेदना बधीर करत होता .   तो आवाज कुठून येतोय बघायला गण्याने डोळे उघडले .  कुणीतरी दारावरती टक टक करीत होते .  खोलीत अंधार होता .  खिडकीतून पडलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशात समोरच्या घड्याळाचा काटा 12 वाजल्याचे दाखवत होता . म्हणजेच तो 12 तासांपेक्षा जास्त झोपला होता .  तो बेडवरून उठून दार उघडायला गेला . दार उघडलं तर समोर अंजली
" तू
"  चल माझ्याबरोबर
"  कुठे , आता .....?
"  चल गुपचूप महत्त्वाचं आहे
"  थांब मी बप्पाला उठवतो

"  नको तू एकटाच चल , चल लवकर नाहीतर उशीर होईल...

  अंजली पुढे जात होती  . गण्या   मागे .  आता एक कॉलनी नजरेत पडत होती.  कॉलनीत सारी घरे एक सारखीच दिसत होती .  रात्रीच्या बारा वाजून गेल्याने साऱ्या घरातल्या लाईट बंद होत्या .  फक्त एकच घराच्या दुसऱ्या मजल्यावर ती पिवळसर उजेड तेवत होता .
त्या उजेडाकडे बोट करत अंजली म्हणाली

"त्याच घरात जिथे उजेड दिसतोय ना तिथल्या एका माणसाला वाचवून बाहेर आणायचं आहे

" पण मीच का...? आणि कोण आहे तिथे ....

" कारण तुझीच निवड झाली आहे आणि तिथल्या माणसा वरतीच माझं भवितव्य अवलंबून आहे .....

हे ऐकून गण्या  त्या घराकडे पळतच  निघाला .....

  घराचं दार उघडंच होतं . त्याने ते सताड उघडलं  आणि आत शिरला . दाराच्या झरोक्यातून येणाऱ्या उजेडात त्याची उंचच्या उंच काळी सावली अभद्र दिसत होती . त्याने उजव्या बाजूच्या भिंतीवरील बोर्डाची सारी बटणे दाबली पण कुठेच उजेड पडला नाही . बाहेरून पडणाऱ्या अर्धवट उजेडात त्याला डावीकडे वर जाणारा जिना दिसला .  तो जिन्यावरून चढून वर पोहोचला . एकाला एक लागून तीन खोल्या होत्या .
 
         तीनीही दार लावली होती . मधल्या दाराच्या फटीतून उजेडाची लकीर समोर पसरली होती . तो सरळ गेला आणि दार उघडलं . इतका वेळ निर्भय व निडरपणे वावरणारा गण्या भीतीने म्लान झाला . समोरचं अमानवी , अघोरी किळसवाणे दृश्य पाहून त्याचं काळीज पिळवटून निघालं....

ती संपूर्ण खोली गोगलगायांनी गच्च भरली होती . टेबलावरच्या दिव्याच्या प्रकाशात सरपटणाऱ्या गोगलगायींचा रक्ताचा स्राव किळसवाणा दिसत होता .  खोलीत जमीन किंवा कुठलीच वस्तू दिसत नव्हती फक्त त्यांचा आकार जाणवत होता...

" पण या इथे आल्याच कशा ....?

    या प्रश्नाला काहीच अर्थ नव्हता . तो अशा शक्तींच्या विरोधात लढत होता .  जिला काहीही शक्य होतं . गण्याला सर्वत्र गोगलगाय दिसत होत्या . कुठे माणूस दिसतच नव्हता ,  ज्याला वाचवायचा होतं   तोच दिसत नव्हता . त्याला कळेना कि अंजलीने त्याला कोणाला वाचवायला सांगितलं होतं .

    सरपटणाऱ्या गोगलगायींची लयबद्ध हालचाली पेक्षा वेगळ्या हालचाली त्याला जाणवल्या .  समोर खुर्चीवरती कोणीतरी होतं . त्याचं शरीर दिसत नव्हतं .  गोगलगायींच्या खाली अच्छादला होता . तो आत जाऊ शकत नव्हता कारण त्यालाही मृत्यूचं भय होतं . पण तो थांबूही शकत नव्हता. त्याला त्या खुर्चीवरचा माणसाला वाचवायला हवं होतं . पण त्याचा पाय पुढे पडायला तयार नव्हता .

   पण माणसाच्या मनाचा थांगपत्ता कुणालाच लागला नाही .  इतका वेळ घाबरून आत जायला नको म्हणणार त्याचं मन क्षणार्धात तयार झाले आणि त्याने खोलीत पाय टाकला .  त्याने पाय टाकायला आणि गोगलगाय आणि बाजूला सरकून जागा व्हायला एकच गाठ पडली . त्याचा पाय गोगलगायावरती न पडता जमिनीवर पडला....

    आणि काय आश्चर्य पुढची सारी पाउले जमिनीवरच पडत गेली . गोगलगाय बाजूला सरकत त्याच्या पाऊलाला जागा करून देत होत्या.

' पण का ....?
     ज्या गोगलगायींनी  त्या खुर्चीवरचा इसमाला जेरबंद करून त्याचा जीव घ्यायचा घाट घातला होता त्याच गणाच्या  बाबतीत इतक्या सौम्या का होत्या ?  त्या गोगलगायींचे आणि गण्याचे   जूनं काही नातं होतं का.....?

     तो खुर्चीजवळ पोहोचला तेव्हा जेरबंद असलेला इसम ,  गोगलगायींनी ज्याला यमसदनी काढायचं ठरवलं होतं , तो मोकळा झाला .  तो चांगलाच धष्टपुष्ट व हट्टाकट्टा होता . दोन गड्यांना जागेला भुईसपाट करू शकेल इतका पैलवान गडी होता  .  त्यावरून कळत होतं की त्या गोगलगायी मध्ये किती ताकत होती .

     तो खुर्चीवर बेशुद्ध पडला होता गण्याकडे फार वेळ नव्हता .  सध्या तरी गोगलगाई त्याला जागा करुन देत होत्या .  पण पुढचा अंदाज तो  बांधू शकत नव्हता . त्याने त्या इसमाचा एक हात आपल्या खांद्यावर घेत त्याला आधार देऊन चालवायचा प्रयत्न केला . पण तो खूप जड होता त्याला शुद्धीवर आणि गरजेचं होतं . त्याने त्याला खुर्चीवर बसवलं . एवढ्यानेच गण्याची दमछाक झाली .  त्यामुळे त्यांनी आधारासाठी टेबलावर हात ठेवला .  टेबलावरच्या गोगलगाय बाजूला झाल्या . तिथेच त्याला पाण्याची बाटली दिसली .  गण्याने त्याच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले .

तो शुद्धीवर आला.
"  ती डायरी , ती डायरी  ...

गण्याने त्याला आधार देत उठवलं . दोघही दरवाजाकडे जाऊ लागले.  आताही गोगलगाय रस्ता करून देत होत्या . तो इसम बाहेर पोहोचला .

" ती डायरी , टेबलावरची ...लवकर आण....

गण्या पुन्हा आत वळला .  पण या वेळेला गोगलगायींनी जागा दिली नाही .  त्याने गोगलगाय वरती पाय दिला .  गोगलगाय मधून रक्तस्राव झाला . आणि तेव्हाच त्याच्या सर्वांगावर गोगलगायींचा वेढा पडला . तो गोगलगायींनी असून अच्छादुन जाऊ लागला . तो खाली कोसळला गोगलगाई त्याला पायापासून डोक्यापर्यंत आच्छादून टाकत होत्या . त्याला दरारून घाम फुटला . मृत्यू त्याच्या पुढे दिसत होता . हळूहळू त्याचं सर्वांग गोगलगायींनी आच्छादून टाकलं .  त्याला श्वास घ्यायला अडचण होऊ लागली . त्याच्या नाकातोंडात सर्वत्र  गोगलगाई भरून उरल्या .
मृत्यु फार दूर नव्हता....


पुढे चालू........




     तो दचकून जागा झाला .  तो बेडवरतीच होता .  तो घामाने निथळून निघाला होता . तो त्याच खोलीत होता , जिथे तो झोपला होता . शेजारीच बाप्पा बसले होते . त्याला चेहऱ्यावरचा घर्मबिंदू टिपताना पायाला भयंकर वेदना जाणवल्या . त्याच्या पायावरती कोणीतरी धारदार वस्तू ने ओरखडे   ओढले होते . त्यामुळे रक्तस्राव होत होता . बप्पांनी पटकन ते रक्त पुसून घेऊन त्याला अँटीसेप्टिक लावले .

" कुठे गेलता .....

" मला माहिती आहे तो बंगला ,  ती वाट ...

" मग चल लवकर ,  नाहीतर उशीर होईल ....

"  पण मग मी इथे आलोच कसा ....?

"  म्हणूनच म्हणलं तू शिपाई हाइस ,  साध्या माणसाला हे शक्य नाही ....

" पण ते स्वप्न होतं की वास्तव....?

" ते  स्वप्न नव्हतं ....!


     बप्पा आणि गण्या तिथे पोहोचले .ते वर गेले . त्याच खोलीत गेले . दार सताड उघडं होतं .  सर्वत्र दिव्याचा प्रकाश पडला होता .  पिवळसर उजेडात फरशीवरती रक्ताचे शिंतोडे व काहीतरी रक्ताने माखलेलं सरपटत गेल्यासारखं वाटत होतं . जसं एखादं मढं . खोलीत सर्वत्र रक्ताचे शिंतोडे उडाले होते .  रक्ताचे फटकारे मारल्यासारखी ती खोली गोगलगायींच्या सरपटण्याने झाली होती . मात्र आता तिथे एकही गोगलगाई नव्हती . ना तिथे तो मनुष्य होता ज्याला गण्याने वाचवलं होतं . मग झालं तरी काय ....? त्या मनुष्याच्या मृत्यू झाला का .....? त्याला काहीच कळू शकत नव्हतं . रक्ताने माखलेली ती खोली फक्त घडलेल्या घटनांची साक्षी होती ती .....

" ती डायरी...  ती डायरी कुठे आहे ते शोधायला पाहिजे....." गण्या

"  कुठली डायरी ........" बप्पा

" तो माणूस म्हणाला होता .....टेबलावर आहे वाटतं ....

   त्याने डायरी उचलली . ती पूर्ण कोरी होती . बाजूलाच काही पाने पडली होती .   ती पाने डायरीचीच होती पण फाडून वेगळी केली होती .  त्या पानावरती काहीतरी लिहिलं होतं . गण्या त्या पानावरचा वाचनात गुंग झाला . त्याला भानच राहिले नाही की तो कुठे होता...

पहिला दिवस

    ' आज भल्या पहाटे झोप मोड झाली .आज तिसरा खून झाला होता .पंधरा दिवसात तिसरा खून झाला होता , तो सुद्धा एकाच पद्धतीने.   पहाटेच डिपार्टमेंट मधून फोन आला " सर खून झाला आहे "  आता मी विशेष तपासासाठी नेमलेल्या पथकात असल्याने मला जाणे भागच होते .

      आता दिवसाची सुरुवातच खराब झाली म्हटल्यावर दिवस कसा चांगला जाणार . दिवसभर कोणाची ना कोणाची किर-किर माझ्या मागे होतीच . सकाळची बातमी दुपारपर्यंत सगळ्याच्या    कर्नोपकर्नी झाली त्यामुळे मंत्री साहेबांनी फोनवरून  झापले . डिपार्टमेंटमधे समोर उभा करून हजेरी घेतली ती वेगळीच . एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या तरी एक गोष्ट मात्र चांगली घडली होती .  खूप दिवसानंतर आम्ही रात्री हॉटेलवर candle light dinner साठी जाणार होतो  , म्हणून मी आनंदात घरी आलो .  घरी आलो खरा पण घराला कुलूप होते  . माझ्याकडे शिल्लक असलेली चावी होती . मी कुलुप उघडून आत गेलो .  सोफ्याजवळच्या टीपॉय वरती एक चिठ्ठी होती .

" किती फोन करायचे माणसानं ....
ड्युटीवर असलं म्हणून आम्हाला विसरायचं का ....।?
मामाची तब्येत बिघडली आहे जरा जाऊन येते ....
हॉटेलवरून जेवण मागून ठेवलं आहे ,  जेवून घ्या


मी फोन काढून बघितला तर 27 मिस कॉल होते . मी माघारी फोन लावला तर नॉटरिचेबल.

दुसरा दिवस

काही मानसे खरंच विचित्र असतात......
तुरुंगात एक कैदी आहे . त्याचा या केसमध्ये काही संबंध असावा म्हणून त्याला विचारायला गेलो तर त्या विक्षिप्त माणसाने मुर्खासारखी उत्तरे दिली .
सरळ सांगेना म्हटल्यावर नेहमीची पद्धत वापरली तरीही सांगेना  .....


झालं . त्या चार पानावर एवढाच मजकूर होता  .

त्याला पोलिसांच्या सायरनचा आवाज आला.

" काय करायचं बप्पा ...?
बप्पांनी उत्तर दिलं नाही . ते उत्तर द्यायला तिथे नव्हतेच  ते केव्हाच ती डायरी घेऊन पसार झाले होते .  तो पुन्हा एकदा पोलिसांच्या तावडीत सापडला . त्यांने पळायचा वायफळ प्रयत्न केला ,  पण तो निष्फळ ठरला . तो पुन्हा एकदा तुरुंगात पोहोचला .

एखादा कागदाचा तुकडा असेल आणि जर तो पाण्यात टाकला तर तो झिजून झिजून नष्ट होतो .  पण उलट त्याच कागदाच्या तुकड्याच्या काही घड्या घातल्या आणि होडी बनवली तर ती होडी पाण्यात तरंगते .  त्याच कागदाच्या तुकड्याच्या घड्या वेगळ्या पद्धतीने घातल्या तर तोच कागदाचा तुकडा हवेतही उडू शकतो . त्याचप्रमाणे परिस्थिती व अनुभव मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या व स्वभावाच्या अशा प्रकारे घडी घालतात की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तो त्याविरुद्ध लढतो .  अनुभव मनुष्याला बनवतात  , उभा करतात आणि जगवतात .

आतापर्यंत गण्याने ही बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी अनुभवल्या होत्या . त्या अनुभवावरून तो बरेच काही शिकलाही होता . त्यामुळे यावेळी तुरुंगात गेल्यावर त्याने स्वतःची स्थिती ढासळू दिली नाही.  तरीही राहून राहून त्याच्या मनात बप्पाचे विचार येत होते .

'बप्पा कुठे गेले असतील....?
गपचुप का गेले असतील ...?
मला मुद्दाम पोलिसांच्या तावडीत सोडलं असेल का .....?
त्यांनी ती डायरी का पळवली असेल ....?
त्या डायरीत काय होतं ....?
बप्पा खरंच माझी मदत करत होते का ....?
त्यांचा दुसरा काही हेतू असेल का ....?

असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आवासून उभारले होते . त्याची द्विधा अवस्था झाली होती बप्पांनी त्याला जाळ्यात ढकलून स्वतः मोकळे झाले असे एक मन म्हणत होतं .  तर दुसरे मन त्या कृतीमागचा चांगल्या कारणाचा शोध घेत होतं आणि बप्पा कसे त्याचा हितासाठीच त्याला  सोडून गेले हे सांगत होतं .....
हे विचाराचं द्वंद्व असाच चालू राहिलं असतं पण शेवटी त्याने या विचारांना मनाच्या तळाला दाबून टाकले.

पृथ्वीवर ती माणसं मरत असली , तरीही लोकसंख्या कमी होत नाही . उलट दिवसेंदिवस ती वाढतच जाते . माणसांच्या मनात सुद्धा कितीही वेळा विचार मनातून काढून टाकले तरी प्रत्येक वेळी नवीन विचार उगम पावतातच . त्यामुळे बप्पाबद्दल येणारे विचार मनाच्या गाभाऱ्यातून हाकलून दिले पण मनाचा गाभारा रिकामा कधीच राहत नाही . त्याला आता त्या डायरीचे विचार अस्वस्थ करीत होते .

एकूणात आतापर्यंत त्याच्याबरोबर घडलेल्या साऱ्या घटनाच विचित्र व अतर्क्य होत्या .  एकामागून एक अशा विचित्र घटनांच्या शृंखलेत तो सापडला होता . ती शृंखला तुटायचे नावच घेत नव्हती .  वरचेवर वरचेवर जास्तच अशक्य कोटीतील , भयंकर नि अमानवी अशा घटनांना तो सामोरे जात होता .

पहिल्यांदा जेव्हा तो मृत्यूच्या दाढेत अडकला होता त्यावेळी अंजलीने त्याला वाचवलं .  दुसऱ्यांदा अंजलीने त्याला स्वप्नात एका बंगल्याच्या आवारात नेले .  त्या वेळी हातात आलेली गोगलगाय व घरात घडलेला प्रकार  अमानवी होता .  तिथून सुरू झालेली ही शृंखला पुढे चालत राहिली . आज रात्री पुन्हा एकदा अंजली त्याला त्या पोलिसाच्या घरापाशी घेऊन आली होती जिथे पोलीस मरणाच्या वाटेवर निघाला होता . अंजलीने त्या पोलिसाला वाचवायला सांगितले पण त्या पोलिसाला वाचवताना तो स्वतः धारातीर्थी पडणार होता .  पण न जाणो कशामुळे तो जागा झाला व त्याचा मृत्यू चुकला .

त्याला अजूनही कोडं सुटलं नव्हतं .  ते म्हणजे तो स्वप्नात असायचा पण घडणाऱ्या सारा घटना खरोखरच घडायच्या . मग तो खरेच स्वप्नात असायचा कि वास्तवात...?  का तो एकाच वेळी दोन ठिकाणी असायचा ....? पण हे कसं शक्य होतं ...? विचार करून करून त्याचा मेंदू थकून गेला पण त्याला उत्तर सापडलं नाही .

एकापाठोपाठ एक विचित्र घटना त्याच्या आयुष्यात घडत चालल्या होत्या.  त्याला कोणतीच स्पष्टीकरणं  नव्हती स्पष्टीकरणं असली तरी , त्याला  ती स्पष्टीकरण  माहित नव्हती . जेव्हा तो त्या खोलीपाशी पोहोचला तेव्हा सर्वत्र गोगलगाय होत्या , पण जेव्हा त्याने आत पाय टाकला तेव्हा त्यांनी वाट करून दिली .  त्या माणसाला बाहेर सोडेपर्यंत वाट करून देणाऱ्या गोगलगाय नंतर आक्रमक का झाल्या ...?

या सगळ्या घटनांना वरचष्मा म्हणून त्या डायरीतली विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालू लागले .....जे खून त्याने केलेच नव्हते त्या खुनाचा आरोपी म्हणून त्याला पकडण्यात आलं होतं .  डायरीमध्ये ज्या खुनांचा उल्लेख होता त्या खुनाच्या आरोपात साठी त्याला पकडलं होतं ,  पण त्याने ते खून केलेच नव्हते . मग त्याला का पकडलं .....? उलट तो त्या पोलिस अधिकाऱ्याला वाचवायला गेला होता पण तोच अडचणीत सापडला.

त्याच्या मेंदूचा विचाराच्या ओझ्याने भुगा झाला . सर्व गोष्टीवरती प्रश्नचिन्ह दिसत होती . त्या प्रश्नांच्या गर्दीत त्याचं मन गुदमरून जात होतं .

" माने , संभाळून राहा बरं ....झोपशील नाहीतर
पाच- पाच खून केलेत त्यानं तुझा पण कार्यक्रम होईल म्हणून सांगतो.....

ड्युटी वरती बदलून आलेल्या हवालदाराला ,  घरी जाणारा हवलदार सावधानतेचा इशारा म्हणून हे  सांगत होता .....
पण त्याला हेच कळालं नाही की डायरी मध्ये फक्त तीन खूनांचा उल्लेख होता .  मग पाच खून कुठून काढले .
'  मी कधी केले ५-५ खून '  तो जाम वैतागला

इथे काहीतरी भलताच घोटाळा होता. त्याच्या विचारांची चक्रे उलटी सुलटी धावत सुटली . त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला . तेव्हाच त्याला तो बदलून आलेला हवलदार म्हणाला ....

" का ओ भाऊ , जगावर एवढा कसला राग तुमचा ....?
पाच पाच खून केले ते पण एवढ्या बेकार पद्धतीने...
तुम्हाला खून तर कसं करू वाटले एवढ्या क्रूरतेने ...? "

गोल चेहरा ,  सावळा रंग , पान खाऊन लाल झालेल्या ओठावरती काळी मिशी  ,  सुटलेलं पोट आणि समाधानी चेहरा  . तो माने हवालदार होता .

" मी नाही केले ......

" मग डिपारमेंट काय वेढं आहे का तुम्हाला पकडायला .....? आणि आज तर स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या हेड लाच मारायला निघालात तुम्ही .....?

" अहो मी त्यांना वाचवायला गेलो होतो आणि मीच वाचवलं त्यांना . नाही तर त्यांचा मृत्यू निश्चित होता .

"  रंगेहात पकडलंय तुम्हाला आज आणि म्हणताय मी वाचवायला गेलो होतो ...!
पण मला एक कळत नाही एवढं 5 खून केल्यावर एकही पुरावा सोडला नाही तुम्ही पण आजच कसे सापडला......?

गन्या काही बोलणार तोवर आवाज आला ...

" माने सोडा त्याला . काय करताय तिथे...?

"  साहेब तुम्ही ...? तब्येत ठीक आहे ना ..?

"  एकदम मस्त आहे , त्याला बाहेर काढा . चुकीच्या माणसाला पकडलंय  .

" हो साहेब सोडतो , लगेच बाहेर काढतो .

मानेनं  पळत जाऊन चावी आणली आणि लगबगीने गण्याला सोडवून  बाहेर काढलं .

" गणेश , गणेशच ना.... चल माझ्याबरोबर .....

हा तोच माणूस होता ज्याला गण्याने खोलीतून गोगलगाईच्या तावडीतून सोडवूलं होतं . आता त्याच माणसांना त्याची तुरुंगातून सुटका केली .
गण्याला कळेना काय चाललं होतं ते . त्या माणसाला तरी विचारावं म्हणून तो म्हणाला

"  पण तुम्ही ....

त्याला मध्येच तोडून तो  म्हणाला

" चल गपचूप माझ्या बरोबर ,  शांत रहा ,  आणि तुला भूक वगैरे लागली असलच , घरी गेल्यावरती जेवण कर .  मग निवांत बसून बोलू.....

त्याला इतक्या वेळ काहीच जाणवलं नव्हतं . पण जेव्हा जेवणाचं ऐकलं तेव्हा त्याला कडकडून लागलेली भूक जाणवली .  दोघे घरी पोहचले .  तेच घर होतं ज्या ठिकाणी तो काही तासापूर्वी आला होता . एक भयंकर अमानवी प्रकाराला ती वस्तू सामोरी गेली होती . पण त्याची खूण ती वरची खोली सोडली , तर कुठेच नव्हती . कारण जसजसा काळ पुढे जातो तसतसे स्थळ-काळात बदल होतच असतात .  दार उघडंच होतं .ते दोघेही आत गेले....

"  हाच ना गणेश ......
तो पोलिस  कोणालातरी म्हणाला

" हो ,  हो हाच ....

एक मधुर आवाज त्याच्या कानावर पडला . आपसूकच त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले , आणि तो पाहतच राहिला .  मूर्तिमंत सौंदर्य त्याच्यापुढे अवतरले होते . ते काळेभोर केस ,  गोल डोळे ,ज्याकडे पाहिल्यावर  कोणताही नशा फिका वाटेल , ते गुलाबी ओठ , ज्यात गुलाबाच्या पाकळ्याहून जास्त मार्दाव होते ,  ते लांब काळे केस , तो अटकर बांधा , ती नाजूक कटी , सारे काही सुंदर होते........

क्रमशः