Monday 6 April 2020

व्यसन

 व्यसन


   तो त्याच्या रूम मध्ये गादीवरती पसरला होता . त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल होता , कानात हेडफोन होता आणि दुसऱ्या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होतं . मोबाईलवर अश्लील वेबसाईट  वरील व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते . काहींना मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटली असती पण त्याला ती फारच चित्तवेधक वाटत होती . जसा जसा तो व्हिडीओ पुढे सरकत होता तसतसे त्याच्या दुसऱ्या हाताची हालचाल वाढत होती . शेवटी शेवटी त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला कानात फक्त आवाज येत होता. तो जोरात हालचाल करु लागला , त्याचा श्वास चढलेला होता . आता कोणत्याही क्षणी तो मोकळा होणार होता , तेव्हाच त्याच्या रूमचे दार उघडले . दारात त्याची आई उभी होती . त्याच्या छातीत धस्स झालं .  श्वास कोंडला गेला , कुणीतरी त्याच्या छातीवरती भलंमोठं वजन ठेवावं अशी त्याची छाती दुखू लागली.   त्याने पटकन त्याची पॅन्ट  ओढून घेतली .   आईलाही चुकीच्या क्षणी आलो याची जाणीव झाली तिने दार पटकन लावून घेतले व बाहेर गेली .

           या आठवड्याभरात ही तिसरी वेळ होती .  आठवड्याभरात तो तीन वेळा आईला सापडला होता . त्याला स्वतःची लाज वाटत होती .  त्याने मनातल्या मनात स्वतःला कितीतरी वेळा बंदुकीच्या गोळ्या घालून टाकल्या . आई गेल्यानंतर त्यांना काही वेळ जाऊ दिला नंतर हळूच दार उघडलं आणि चोरपावलांनी तो घराबाहेर पडला . 


     ' मी काही चुकीचं केलं नाही ,  हस्तमैथुन नैसर्गिकच आहे ' तो स्वतःला समजावत होता . ' नैसर्गिक असले म्हणून त्याचा इतका अतिरेक करावा का..?' दुसरा आवाज  म्हणत होता . त्याचा स्वतःशीच युद्ध चालू होतं .  एका बाजूने तो स्वतःच्या कृतीचे समर्थन करायचा आणि दुसऱ्या बाजूने तो स्वतःच्या कृतीची निंदानालस्ती करायचा , ती  कृती किती चुकीची आहे हे स्वतःला समजून सांगायचा . त्याच्या मित्रांबरोबर ह्याबाबतीत बोलणं व्हायचं . इंटरनेटवर इकडे तिकडे  त्यानं बऱ्याच वेळा ऐकलं होतं हस्तमैथुन करणं नैसर्गिक आहे . त्यात काही चुकीचं नाही .
' हस्तमैथुन करायला मी कुठे नको म्हणतोय पण मग तो पोर्न बघायची काय गरज आहे...? '

    त्याने स्वतःला प्रश्न विचारला आणि स्वतः त्याचे उत्तर दिलं .
     ' पोर्न बघ ना कुठे चुकीचा आहे पूर्ण बघितला म्हणून काही होत  नाही '  त्यांना स्वतःच्या कृतीचं समर्थन करायचा प्रयत्न केला , पण नकळत त्यालाही जाणवत होतं , त्यानं सीमा ओलांडली होती .

      बारावीच्या वर्षातली नीटची परीक्षा रिपीट करत होता .  मागच्या वेळी हवा तसा स्कोर न मिळाल्याने त्याला चांगलं कॉलेज मिळालं नव्हतं . घरची परिस्थितीही बऱ्यापैकी होती , त्यामुळे त्याने परीक्षा रिपीट करायचं ठरवलं होतं .  घरच्यांची ही त्याला साथ होती . पण नव्या शैक्षणिक वर्षाची कुठे सुरुवात झाली नव्हती , आणि आताच त्याला निराशेने ग्रासलं होतं . चांगलं नसलं तरी मिळालं होतं ते कॉलेज बरं होतं . त्याचे सर्व मित्र मिळाले त्या कॉलेजला गेले होते . तो एकटाच मागे राहिला होता .  त्याच्या वडिलांची इच्छा होती चांगलं कॉलेज मिळावं आणि त्याचाही चांगलं कॉलेज मिळावं असाच हट्ट होता .  म्हणून त्याने परीक्षा रिपीट करण्याचं ठरवलं होतं , पण आपण घेतलेला निर्णय चुकला तर नाही ना याची त्याला चिंता सतावत होती .

        त्यामुळेच की काय आताशा त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं .  बराच वेळ त्याचा मोबाईल वरती जात होता . व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ,  मूव्हीज आणि वेब सिरीज . पण काही दिवसानंतर त्याचाही कंटाळा येऊ लागला .  सर्वकाही नीरस वाटत होतं .  आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे ,  आपण कॉलेजला जायला हवं होतं . सर्वकाही असताना , सर्व काही सुख त्याच्या पदरी असताना त्याला स्वतःचा आयुष्य नीरस वाटत होतं .

' यावेळी देखील स्कोर हवा तसा आला नाही तर काय करायचं...?  '
       त्याला ही चिंता सतत सतवाची .  यामुळे अभ्यास ही व्हायचा नाही आणि ती चिंता सतावू नये म्हणून तो काही ना काही करण्यात  व्यस्त राहाण्यचा प्रयत्न करयायचा . त्यामुळेच की काय त्याचं मोबाइलचं व्यसन भयंकर वाढलं होतं .  मोबाईलच्या  बरोबरच तो पॉर्नच्या देखील आहारी गेला होता , सतत पॉर्न पाहनं आणि हस्तमैथुन करना हे त्याच्या सवयीचा झाला होतं . आताशा त्याला काळवेळ काही समजत नव्हती .  स्वतःची वेगळी खोली होती त्यामुळे प्रायव्हसी असायचीच . मात्र वेगळी खोली असूनही दार लावणं देखील त्याच्या डोक्यात येत नव्हतं . थोडं फार काही झालं ,  कुठे काही पाहिलं की लगेच erectionजाणवायचं आणि मग लगेच पॉर्न उघडायचा आणि हस्तमैथुन करायचा .

     मागच्या दोन तीन आठवड्यापासून तर त्याचं व्यसनच झालं होतं .  त्यामुळेच या आठवड्याभरात तो तीन वेळा त्याच्या आईला हस्तमैथुन करताना सापडला होता . एकदा बाथरूममध्ये आणि दोन वेळा त्याच्या खोलीत . त्यालाही आईचा सामना करताना मेल्याहून मेल्यासारखे व्हायचं पण काही इलाज नव्हता .
' तिने अजून बाबांना सांगितलं नव्हतं म्हणून बरं ' तू विचार करायचा आणि आतापासून काही करायचं नाही असं मनाशी निर्धार करायचा .

     टिकेल तो निश्चय कसला एका वेळी ठरवलं तासाभराच्या आतच त्याचा निश्चय मोडायचा आणि पुन्हा एकदा तो दृढनिश्चय करायचा . दिवसातून सहा सात  वेळा त्याचं चालायचं . रात्रंदिवस त्याच्या डोक्यात हाच विषय रेंगाळत असल्यामुळे एकदा दोनदा त्याला स्वप्नदोषही झाला होता .
'  हे वागणं बरोबर नाही लवकरात लवकर सुधारायला हवं '   तो स्वतःशीच म्हणायचा आणि मग लगेच दुसरं मन जोरात ओरडायचं
'  काय चूक आहे या वागण्यात सर्वकाही नैसर्गिक तर आहे....'
' काही नैसर्गिक नाही यात ', दुसरं उत्तर तयार असायचं .

     त्याने त्याच्या मित्रांसोबत बोलायचा प्रयत्न केला होता पण जो तो त्याच्या कॉलेजच्या जीवनात व्यस्त असायचा .  पूर्वीसारखा बोलायला त्यांना वेळच मिळायचा नाही . तो एकटा पडत चालला होता  . ट्युशन ही असायची पण ट्युशन मधील सर्व चेहरे नवे . स्वतः सोबत काय होतेय याचं वैचारिक विश्लेषण बराच वेळ केलं आणि संध्याकाळ होत आल्यानंतर तो घराकडे परतला .

       त्याचे वडील सरकारी कर्मचारी  ते घरी आले होते .  मोठी बहीण शहरातीलच कॉलेजला इंजिनिअरिंग करत होती .  तिघेही त्याची वाट पाहत बसले होते . त्याला नको ती शंका आली
'  आईने बाबांना सांगितलं की काय...? '

     तो त्यांना पाहिलं न पाहिल्यासारखं करत त्याच्या खोलीकडे जायला निघाला , तेव्हाच त्याच्या वडिलांचा आवाज आला.
" विराज इकडे ये तुझ्याशी बोलायचं आहे ...."

          शरमेने महिने त्याची मान खाली झुकली होती .  आता पुढे काय होणार याची त्याला बऱ्यापैकी कल्पना होती .  असं व्हायला नको होतं ,  स्वतःच्या अब्रूचे काढले जाणारी धिंडवडे त्याला नको होते ,  पण वडिलांपुढे त्याचं काही चालायचं नाही . तो गुपचुप गेला आणि त्यांच्या समोर जाऊन बसला .

" तो मोबाईल काढून ठेव , तुला खरंच काही कळत नाही का ...?
    वडील जरा रागात होते आई आणि त्याची बहीण किचन मध्ये गेल्या होत्या .

" एवढा कसा वासनेच्या आहारी गेला आहेस तू , निदान दार लावायचे तरी भान ठेवत जा...! मान्य आहे हस्तमैथुन अयोग्य नाही पण करताना आजूबाजूच्या परिसराचं तरी ध्यान ठेवत जा... आणि तुला जर हस्तमैथुन करायचं असेल ,  तर ते पोर्न वगैरे पूर्णपणे बंद कर . व्हायचं असेल तर सर्वकाही नैसर्गिकरित्या होऊ द्या

      त्याला वडिलांकडून हे अपेक्षित नव्हतं . त्याला वाटलं होतं वडील त्याला भरपुर रागावतील , पण ते तर त्यांना रागात उपदेशाचे डोस देत होते . त्याच्या चेह-यावरील आश्चर्य त्याच्या वडिलांना पासून लपले नाही .

" हस्तमैथुन अयोग्य नाही पण त्यामुळे जर तुझ्यि दैनंदिन आयुष्यात अडचणी येत असतील तर ते कितपत योग्य आहे तूच ठरव   . तुला खरच कळतय का पॉर्न पाहून तुझं किती नुकसान होतंय ते....

      तो शांतपणे ऐकून घेत होता .  काही बोलण्याचा त्याला धाडस होत नव्हतं .

" तू आईला तीनवेळा सापडला आहे , म्हणजे एकांतात तू हे सर्व किती वेळा करत असतील याची कल्पनाच न केलेली बरी .  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही... अलीकडे होणाऱ्या टेस्टची निकालही चांगले नाहीत ,  मी तुला बोलणार होतो पण उगाच कशाला तुला ताण द्या म्हणून मी बोललो नाही... यामुळेच निकाल कमी झाले असतील  ..

     त्याने गुपचूप मान हलवली .

" मोबाईल जप्त करणे योग्य नाही , मोबाईल तर तुला लागतोच . पण तुझं इंटरनेट मात्र बंद राहील आणि एक लक्षात ठेव पॉर्न पूर्णपणे बंद , तू जर मला किंवा घरातील कोणाला बघताना सापडला मग पुढच्यावेळी  शिक्षा असेल....

        तो गुपचूप उठून खोलीत गेला . बरोबर मोबाईल होताच . वडीलांनी इंटरनेट असलेलं  सिम कार्ड काढून घेतलं होतं आणि मोबाईल त्याच्याजवळ दिला होता .  तो आत गेला त्याने दार लावून घेतलं . पुन्हा एकदा निराशेची   भावना त्याच्या मनात दाटून आली .  हृदयात खोल कुठेतरी एक मोठं भोक असल्यासारखं वाटू लागलं . हृदय जोरजोरात धडकु लागतं . त्याने त्याच्या बॅगमध्ये असलेला पेन ड्राइव काढला . Otg मार्फत त्याने मोबाईलला जोडला . पेन ड्राईव्ह मध्ये असलेली क्लिप त्याने उघडली .  हेडफोन घातला . एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात त्याचं अर्धवट ताठरलेलं  लिंग होतं ,  आणि तू पुन्हा एकदा हस्तमैथुन करू लागला .


No comments:

Post a Comment