Monday 30 July 2018


         सद्य राजकीय परिस्थितीवर जळजळीत भाष्य करणारी कादंबरी म्हणजेच विजय तेंडुलकर यांची कादंबरी दोन होय.
    कोणत्याही घटनेचा उपयोग राजकरणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कसा करतात ,  सत्ता मिळवण्यासाठी किंवा असलेली सत्ता टिकवण्यासाठी  राजकारणी कोणत्याही थराला कसे जाऊ शकतात याचे इतंभूत वर्णन कादंबरी दोन या विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीत येते .
         सलग 22 वर्षे नगरावर अधिसत्ता गाजवूनही नगराच्या अडचणी दूर करण्यास अपयशी ठरलेला नगरपाल , नगर पालाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी कोणत्याही कृत्यासाठी तयार असणारे विरोधक आणि त्यांच्याच ताटाखालील काही चमचे ,  नगरात येऊन एकाच दिवसात नगरातील उंदरांची समस्या निकालात काढणारा उंदीरमाऱ्या किंवा अवलिया , आणि तिथून सुरू होणारा नगरपारालाचा खडतर प्रवास सत्ता मिळवण्यासाठी नगरपाल आने चालवलेले त्याचे डोके नक्कीच अचंबित करून सोडते....
              या कादंबरीत उंदीर हे रूपक  वेगवेगळ्या समस्यांसाठी व ती समस्या निर्माण करणार्‍या लोकांसाठी वापरले असावे .

No comments:

Post a Comment