Sunday 8 July 2018

दशानन


    दशानन ही जयंत जोगळेकर यांनी लिहिलेली एक अतिशय उत्तम कादंबरी आहे .
      या कादंबरीबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर रामाला देव बनवणाऱ्या रावणाची ही गोष्ट आहे
      ही कादंबरी म्हणजे रामायण नाही तर रावणायन आहे .
        या कादंबरीत रामायणाची कथा एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे लहानपणापासून आपल्या मनावर असे संस्कार झाले आहेत की रावण म्हणजे दृष्ट रावण म्हणजे पाप रावण म्हणजेच वाईटपणा .आपण असं म्हणू शकतो की काळ्या आणि पांढर यांच्या युद्धात रावण हा पूर्णपणे villain ठरला . पण खरंच तसं होतं का. ?  दशानन या कादंबरीत याचा मागोवा जयंत जोगळेकर यांनी घेतलेला आहे .
   कोणताच व्यक्ती पुर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट नसतो . व्यक्ती म्हणजे चांगल्या व वाईट यांचे बेमालूम मिश्रण असते . रावणाने सीतेचे अपहरण  वासनेपोटी केले असं आपल्या मनावर ठसवलं गेलेलंआहे पण ते कितपत खरं होतं ?  रावणाने केलेलं सीतेचं अपहरण हा एक राजकीय डाव होता . पण नंतर त्याच्या मनात सीतेबद्दल प्रेम निर्माण झालं होतं मात्र तरीही त्याने तिच्यावरती जबरदस्ती केली नाही . आपण असे म्हणू शकतो की रावण वाईट होता पण बिभीषणाचा काय ? त्याने स्वतःचीच लंका शत्रूला जिंकून दिली .  पण जिंकणारा च्या बाजूकडे असल्यामुळे त्याचा भगवद्भक्त म्हणून उदोउदो झाला .  ह्या कादंबरीचा मते बिभीषण रामायणाचा मुख्य खलनायक ठरतो . रावण चांगला आहे , चांगला होता ,  असं या कादंबरीत सांगितलेले नाही पण तो श्रेष्ठ पुत्र होता  , भक्त होता आणि शत्रू होता हे सिद्ध केलेलं आहे .

No comments:

Post a Comment