Monday 30 April 2018

माझ्या कविता. - ३ इच्छा

तीर सुटता इच्छेचा
धनुष्यातून मनाच्या
नकळे त्या आस पास
फक्त ध्येयाचाच ध्यास
विचारांचे उग्र वारे
दिशेविना  पळणारे
एकाच दिशे पळते
मना मदत करते
गुलाम शरीर वष
मनही त्यावर खुश
कळूनी सारे नकळे
एकाच वाटेने पळे
सारे काही विसरते
गोष्ट एकचि दिसते
तीच हवी त्या असते

No comments:

Post a Comment