Monday 11 May 2020

गोम



गोम


" आता मी तुझ्या तळहातावर आहे " ती मला म्हणाली . ती एक गोम होती .  तांबडा रंग , शेकड्यांनी असलेले तिचे पाय , माझ्या तळहातावर वळवळ करत होती . ती वळवळ मला सहन होत नव्हती . मी झटकायचा प्रयत्न केला पण ती गोम माझ्या तळहातावरुन  सरकत माझ्या खांद्याकडे निघाली . 
" तु मला पकडू नाही शकत.." 
" कसा नाही पकडू शकत बघतोच मी..." मी माझा डावा हात जोरात उजव्या हाताच्या दंडावरती मारला.  मला वाटलं गोम चेंदामेंदा होऊन तिथेच मेली असेल , पण ती माझ्या काखेत जाऊन बसली होती . 
" उबदार आणि ओली जागा आहे , मला अशाच जागी राहायला आवडतं ....
      मी माझे उजवी काख जोरात दाबली , पण ती  तिथून निसटून छातीवरून डाव्या काखेत गेली . मी डावी काख  दाबण्या अगोदरच ती मानेवरून चढत माझ्या केसात घुसली  . मी जोरात माझा हात केसात फिरवला . ती माझ्या डोक्यावरून हातात आली . मी हात जोरात झटकला पण तो हात माझ्या तोंडाजवळ असल्याने तिने माझ्या चेहऱ्यावरती उडी घेतली . 
" किती मउ आहेत ना तुझे गाल ...
       ती माझ्या गालावरुन फिरत कानामध्ये असलेल्या पोकळीत शिरायचा प्रयत्न करत होती . गोम साधारणपणे तीन इंच होती . कानात शिरताना तिची शेपटी मला सापडली . मी जोराने ओढायचा प्रयत्न केला पण ती कानात जातच राहिली .  शेवटी ती अर्धी तुटत माझ्या हातात आली . आता अर्धी गोम माझ्या कानात शिरली होती व अर्धी माझ्या हातात . 
" तु मला तोडलं , आता मी तुला तोडल्याशिवाय राहणार नाही... 

    ती  माझ्या कानात जोरात ओरडली . मी तुटलेली अर्धी गोम फरशीवर टाकली आणि पायाने चेचुन तिचा चेंदामेंदा करून टाकला . कानात गोम असली तरी मला फार काही जाणवत नव्हतं .  ती हालचाल करत नव्हती . जखमी झाल्यामुळे तिला पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागणार होता .  त्याचे वेळाचं मी सार्थक करायचे ठरवले .  गॅस चालू करून त्यावर ती मी पाणी तापायला ठेवलं . 

" पाण्याचा माझ्यावर परिणाम होत नाही , पाणी ओतलं तर तुझ्या कानाचा पडदा फाटलाच म्हणुन समज...

     जनु तिला मी पुढे काय करणार आहे ते समजत होतं . ती माझं मनातलं ओळखु शकत होती काय...?
" अरे , तुला सांगितले नाही का मी , मी तुझ्यासारख्या मानव रूप धारण करुन माणसात फिरणाऱ्यांचे विचार ऐकु शकते. त्यासाठीच तर बनले आहे मी ... 

    मला धक्का बसला , ती माझं विचार एकु शकत होती . ' कसंही करून आपले विचार तिच्यापासून लपवायला हवेत.....' पहिल्यांदा हाच विचार माझ्या मनात आला 
" नाही , तु माझ्या पासुन काही लपवू शकत नाही , तुझी सर्व रहस्ये मी एकु शकते....
 
   रहस्याचा उल्लेख होताच , नको असलेले विचार डोक्यात गर्दी करू लागले . मी पुरलेली रहस्ये माती उकरत त्याचं अस्तित्व प्रकट करू लागली . मी कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी पुराच्या पाण्याप्रमाणे माझ्या मनाचा गुप्ततेचा बांध फोडत बाहेर येत राहिली.
" वा , सरते शेवटी ज्यासाठी आले ते मिळालं तर ...

     काय बोलत होती ती . काय मिळालं तिला...? तिला माझी रहस्ये जाणून घेण्यासाठी नक्की कोणी पाठवलं होतं...? माझी रहस्ये जर उघड झाली तर अनर्थ होइल  . तिनं नक्की कोणतं रहस्य उकरून काढलं होतं. नाही , मला तिला संपवायलाच हवं होतं ..

       का मी हे मानवी रुप धारण केलं...? भरपुर झाला खेळ.....! ' कुणी पाठवलंय तुला...? कोणतं रहस्य सापडलं तुला...? त्याचं काय करणार तु...' मी मनातंच तिला विचारलं... 

" तु नको विचार करू . वेळ आली कि कळेलंच तुला... 

    आता मला तिला संपवायलाच हवं होतं . मी कपाट उघडत एक डबी काढली , त्यातील सुइ घेत मी कानात टोचवली . हे तिला माझ्या विचारावरुन अगोदरच कळालं होतं . सुइ कानात टोचण्यापुर्वी तिने कानातून बाहेर झेप घेतली . मी सावधपणे  तिला हातात पकडलं . मघाशी तिचे तुकडे झाले होते , पण आता ती चत्मकारिकरित्या पुर्ववत झाली होती . मी हातातच तिला जोरात कुस्करलं . तिचं पीठ करून उकळलेल्या पाण्यात टाकलं .  मला वाटलं संपलं सगळं. शेवटी माझी रहस्ये माझ्याकडे सुरक्षित होती . मात्र माझा भ्रमनिरास झाला . त्या उकळत्या पाण्यात अजुन एक गोम तयार होत होती . तिचं पीठ झालेलं शरिर पाण्यात उकळून पाणी गढुळ झालं होतं . त्या गढुळ पाण्यातून तिने बाहेर उडी घ्यायचा प्रयत्न केला . यावेळी मी तिला पाहिलं , ती पुर्वीपेक्षा जास्त लांब व जाड होती . मी पुन्हा एकदा तिला हातात पकडलं व चेंदामेंदा करत पाण्यात टाकलं . ती पुन्हा अधिकच लांब व मोठी झाली . आता मला नको ते करावं लागणार होतं . 

     मानवी शरिर धारण केलं आमची मुळची  किटकनाशक क्षमता याही शरिरात असतेच . विश्वात आमची प्रजाती सर्वात शुद्ध आहे  . ती गोम आता फुट लांब व चांगलीच जाड झाली होती . मी माझं मस्तक थोडं मोठं करत जबड्याचा आकार वाढवला . माझ्या हातात ती वळवळ करत होती . तिची शक्ती आता भलतीच वाढली होती . तरीही कसतरी तिचं तोंड पकडत मी माझ्या जबड्यात घातलं व करकर चावत संपूर्ण गोम संपवली . पोटात जाताच आम्ले व जंतुनाशकांचा मारा सुरु झाला . ती गोम आता पुन्हा जीवंत होणार नव्हती .  
 
    आता या मानवी शरिराचा त्याग करायची वेळ आली आहे .  ही गोम नष्ट झाली कि मी शरिर त्यागुन मुख्यालयात या हल्ल्याची नोंद करयाला निघुन जाइन . , पण ही गोम साधी नाही , तिचं विष आमच्यासारख्या शुद्ध जीवावर देखिल परिणाम करणारं आहे. माझा मृत्यु निश्चित आहे . 

.............................................................................

आजकाल काहीही करतात लोक .  सकाळी मी सहजच टीव्ही लाउन बसलो होतो तर भलतीच बातमी पाहिली .  त्या निवेदकाचे शब्द अजुनही जसेच्या तसे माझ्या डोक्यात फिरत आहेत... 

"  ठराविक विधी करून व गोम शिजवुन खाल्ल्याने चिरतरून राहता येतं या अंधश्रद्धेने घेतला  बळी. ...

मी मागच्या प्रयोगशाळेत गेलो , अजुन एक गोम काढली...

" त्या मानवरुपधाऱ्याकडुन सर्व रहस्ये मला पाठव ... 

    मी त्या गोमेला आदेश दिला . मानवरुपधाऱ्याकडे भरपुर शक्ती होत्या . हे माणासात राहतात , आपलं सारं शिकतात , मग नंतर आपलं जग काबीज करतात . बरेच छोटे देश त्यांनी काबीज केले आहेत . त्यांची रहस्यं व शक्तींविषयी माहिती करूण घेतल्याशिवाय मानवता तग धरू शकणार धाही . 

नंतर मी वहीत नोंदवलं 
गोम क्रमाक ४३ 
हल्ला ३५७

समाप्त 

Monday 6 April 2020

धाडस

 धाडस

    तो शांतपणे झोपला होता .  एक हात तिच्या अंगावरती होता.  ती जागी होती .  टक्क जागी होती . काही वेळापूर्वी जे काही झालं होतं त्यानंतर तिला झोप येणं शक्यच नव्हतं .  तिने हळुवारपणे त्याचा हात बाजूला केला व बेडवरून उठली . तिने  नाईट ड्रेस नीटनेटका केला .  बेड खालील कप्प्यातून तिने तिची बॅग काढली व तिला लागतील तेवढे कपडे व इतर गरजेच्या वस्तू बॅगमध्ये भरून गुपचूप घराबाहेर निघाली . दारातून बाहेर पडताच तिने रुचाला फोन लावला

" कुठे आहेस तू...?  आलीस का नाही ?

"  काय झालेय श्वेता , मला सांगशील का ...? मी आलेय  खाली .  चाललय काय तुझं...?  इतक्या रात्री का बोलावलंयस मला....?

"  आलेच . आल्यावर सांगते...

     ती जेवढ्या शांत सुरात म्हणता येईल तेवढ्या शांतपणे म्हणाली व लिफ्टकडे निघाली  . इतक्यावेळ संयमाने आवरून धरलेले अश्रू लिफ्टमध्ये एकांत मिळताच  मोकाट वाहू लागले .  ती भरपूर रडली . लिफ्टचे दार उघडताच तिने गडबडीने अश्रू पुसले .  पार्किंग मध्ये रुचाची कार उभी होती .  तिने श्वेताच्या  हातात बॅग पाहताच गाडीची डिकी उघडली .  श्वेताने बॅग मागे ठेवली व रुचाच्या शेजारच्या सिटवर येऊन बसली . ती अजूनही शांत होती

" आता तरी सांग ... रुचा म्हणाली .

" इथुन चल अगोदर .. रुचाने काही न बोलता  गाडी चालू केली व दोघेही निघाल्या....

    रात्रीचे दोन वाजले होते. तरस्त्यात कुठेतरी एखादी कार वगळता संपूर्ण रस्ते रिकामे होते .  बराच वेळ दोघीही शांत होत्या . कोणी काहीच बोलले नाही . ती जीवघेणी शांतता असह्य होऊन शेवटी रुचा म्हणाली

" श्वेता काही सांगणार आहेस कि नाही ...? झालंय काय नक्की...?

    दुसऱ्यासमोर रडायचं नाही ,  आपली जखम उघड करायची नाही,  श्वेताचा स्वभावच होता तसा . मात्र  तिने बराच वेळ ते रडू रोखून धरलं होतं ,  शेवटी त्याचा भडका उडाला .
" He raped me..." ती रडत रडत म्हणाली. 
रुचा  काही न  समजून म्हणाली
" He what...? काय , काय बोलतेस काय तू....?

 " He raped me , रुचा , He raped me ,   त्याने माझा बलात्कार केला....
        त्याने पुन्हा तीच वाक्ये उच्चारली .  ती मोठ्या मोठ्याने रडत होती .  ती घटना घडल्यापासून ठेवलेला संयम आता ढासळला होता  . श्वेताला काय बोलून  शांत करावे हे समजत रुचाला नव्हतं  . हळूहळू तिच्या रडण्याचा सुरु ओसरला व नंतर काही वेळाने ती रडायचं थांबली . ती रडायचं थांबल्यावर रुचा म्हणाली

" मला सांगशील का नीट काय झाले...? अगं दोन वर्षापासून तो तुझा नवरा आहे आणि त्या अगोदर तीन वर्षे तुझा प्रियकर होता तुमचं लव मॅरेज आणि आता तू म्हणते की he raped you , I mean ...

तिचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच श्वेता म्हणाली

" काही नसतं नवरा ,  प्रियकरा वगैरे . पुरुष तो पुरुषच.... तिच्या स्वरातून उद्वेग होता .

" अग सांगशील का काय झालंय नक्की...?"  ऋचा मोठ्या आवाजात म्हणाली .

" काही नाही ग तेच ते जे सगळ्या घरात  घडते . इतक्या दिवसानंतर जयचेचे पेरेंट्स म्हणजे माझे सासु-सासरे घरी राहिला आले ...

" हो माहित आहे मला.... पुढे  ...

" पुढे काय .... आमच्या सासूबाईंनी सासूगिरी करायला सुरुवात केली . माझ्या घालायच्या कपड्या पासून बोलण्याच्या सवईपर्यंत सर्व काही चुका काढल्या . बाईच्या जातीने असं करू नये , बाईच्या जातीने तसं करू नये ..... मी म्हटलं काळ बदललाय आता , तुम्ही पण बदला ... पण तसं थोडीच होणार होतं . घरात चिढ चिढ आणि वाद होऊ लागले .    शेवटी वैतागून मी माझे कपडे वगैरे वेगळे घालायला सुरुवात केली ....

" अरे त्यामुळे बदलले होते होय कपडे... मला वाटलं नवीन फॅशन ट्रेड ट्राय करते काय....

 रुचाने वातावरण मोकळं करायचा प्रयत्न केला .  त्याच्याकडे लक्ष न देता श्वेता बोलतच राहिली.

"  एकेक मागणी पूर्ण झाल्यावर त्यांची हिंमत भलतीच वाढली .  काल सकाळी जय म्हणाला " अगं संध्याकाळी जरा लवकर येशील का ..? आईला जरा मंदिरात घेऊन जायचंय.  मी संध्याकाळी लवकरच येणार होते , मग मी हो म्हटलं . आईंना मंदिरात घेऊन गेले . तिथे चर्चा व गप्पागोष्टी झाल्या . कधी नव्हे ते त्या मोकळेपणाने बोलत होत्या . मी त्यांच्याशी खुलून बोलत होते .  मला छान वाटत होतं . मात्र तेव्हाच त्यांनी नको ते बोलायला सुरुवात केली .
' जयलाही पगार भरपूर आहे. सगळं व्यवस्थित चाललंय . काही अडचण आली तर आपली गावाकडे जमीनही आहे ....' सुरुवातीला मला त्यांच्या बोलण्याचा रोख कळला नाही.
'  अग तुझ्या नोकरीच म्हणतेय मी .  तुला काही गरज नाही नोकरी करण्याची ..'
    मला राग आला पण चारचौघात तमाशा नको म्हणून मी शांत राहिले .... "

   रुचा ऐकत होती . तिला हळूहळू कळत होत श्वेता इतकी अपसेट का झाली होती . ती बोलत होती .


" घरी आले . तो आला होता  . स्वयंपाक झाला . जेवण झालं.  आम्ही बेडरूममध्ये आलो  . मी जय पुढे विषय काढणारच होते.  तेव्हाच तो म्हणाला
" मग काय विचार आहे तुझ्या आईच्या सजेशन बाबत....?  त्याचं ते वाक्य ऐकून मला धक्का बसला.  म्हणजे त्याला हे सगळं माहीत होतं आणि तरीही तो मला विचारत होता .
" म्हणजे तुला माहीत होतं आई  विचारणार आहेत,  त्यामुळेच तु मला त्यांना मंदिरात घेऊन जायला सांगितलं होतंसतर......"  मी त्याला चिडून म्हणाली
" हो पण ते फक्त सजेशन आहे . तुला जबरदस्ती थोडीच आहे ....चिडतेस कशाला...
"  तुला माहितीय माझे विचार नोकरीबाबत काय आहेत आणि तरीही तू म्हणतो चिढू नकोस . तू आईंना माझी बाजू समजावून सांगायची तर उलट ......
"  हे बघ जास्त issue करायची गरज नाही .  तुला सोडायची नसेल तर नको सोडून...
 तो शांतपणे व समजुतीच्या स्वरात म्हणाला . त्याने मला मिठीत घेतले .
" तुला माहितीये ना... I love you... तुला नकोय ना ,  तर नको सोडू . मी सांगेन समजावून आईला ..
तो जवळ येत म्हणाला . मला त्यांच्या नाटकीपणाचा राग आला . त्याला झिडकारून  लावत मी म्हणाले
"  अगोदर समजून जायचं होतं ना..
" हे बघ तू उगाच भांडण उकरून काढतेयस , मी म्हटलं ना सांगेन म्हणून ..." त्याचा आवाज जरा चढला होता .
" मी ,  मी भांडण काढतेय ,  मी.... आई आल्यापासून माझी नुसती कोंडी चालू आहे .  मीच ऍडजेस्ट करतेय सगळं ... आणि तुला साधं समजावून सांगणं होत नाही का तुझ्या आईला.....?
       मी रागात म्हणाले
"  काय..?  काय ...? Adjust केलं तू ...? हं ,  सांग ना मला पण...."  तो रागात होता .
" तुला जणू माहीतच नाही ,  आईला आवडत नाहीत म्हणून मी कपडे बदलले ....
" काय झालं बदलले म्हणून , तसेही ते अतीच 'तसले' असायचे ....
त्याच्याकडून हे उत्तर मला अपेक्षित नव्हतं . माझा पारा भलताच चढला , पण मीही त्याला तोडीस तोड प्रतिवाद केला.
"  तुला जर माझ्या आई-बाबांनी अमुक कपडे घाल , तमुक कपडे घालू नको म्हटलं तर चालेल का...?
      तो काही क्षणासाठी शांत झाला . त्याला काय बोलावं कळेना . मग मीही रागाच्या भरात बोलून गेले...

" मग सांग ना समजाउन तुझ्या म्हातारीला ...

" काय म्हणाली....? तो रागात माझ्याजवळ आला.

" सांग ना समजाउन तुझ्या म्हातारीला ...
     मीही उद्दामपणे म्हणाले . त्याने हात उगारला .  माझ्या गालावर जोरात चापट बसली .
" मार मला , मार . पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी पुरुषांना फक्त मारायला आणि  झवायालाच येतं ...
      माझीही जीभ नको तितकी घसरली. ते वाक्य कोणाही पुरुषाला लागेल असंच होतं , म्हणूनच मी बोलले होते . मला मात्र त्याच्याकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती . त्याने मला जोरात थोबडावत बेडवरती पाडलं  .
" मस्ती आलीय ना तुला... 
     मग त्याने नाईटी व panty सारली . मी त्याला विरोध केला पण ..
" He did it , He did in asshole ...

    आणि ती पुन्हा रडत सुटली.....  मोठमोठ्याने .

   श्वेताला anal sex आवडायचा नाही हे तिला माहित होतं . तिचा अपमान करण्यासाठी , तिच्या  मताला काही महत्त्वच नाही हे दाखवण्यासाठी त्यांना ते कृत्य केले होतं , असं रुचाला वाटलं .

      श्वेताला तिने मनसोक्त रडू दिलं ।  शेवटी ऋचा म्हणाली
" मग पाच वर्षाची रिलेशनशिप तु या कारणासाठी मोडणार का....?

"  हे कारण छोटं नाही ऋचा....  श्वेता म्हणाली

    आणि दोघेही शांत राहिल्या . रात्रीच्या अंधारात गाडी वाटेवरून जात राहिली .


समाप्त ......

लफडं

 लफडं

   हात त्याचाच होता .  त्याच्या हातात दगड होता . रक्ताचे थेंब जमिनीवरती ठिबकत होते . त्याच्या समोर ती पडली होती .  तिचा कधीकाळी सुंदर दिसणारा चेहरा ,  आता फक्त रक्त व मांसाचा चिखल होता .  हातातील दगडा  धक्क्याने खाली फेकला . तिचा पडलेला मुडदा पाहून त्याला भडभडून उलटी आली . त्यानं तोंड बाजूला करायचा प्रयत्न केला , पण  त्याच्या पोटातील अर्धवट पचलेला अन्नाचा तो पिवळसर चिकट द्रव तिच्या विवस्त्र शरीरावरती पडला . ते दृश्य पाहून त्याला अजून जास्तच उबळ आली .  भिंतीचा आधार घेत त्याने भडभडून उलटी केली .  आता त्याच्या मेंदूला त्या दृश्याचा अर्थ लागला . त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली होती .  त्याची पत्नी , अर्धांगिनी ,  जिच्यासोबत त्याने संसार मांडला होता , अशी ती आता त्याच्यासमोर मरून पडली होती . त्याने तिला मारलं होतं . आता त्याचा राग ओसरला होता .  रागाच्या भरात चूक घडून गेली होती .  तिच्या निश्चल पडलेल्या मृतदेहाला मांडीवर घेऊन तो जोरात रडू लागला ,ओरडू लागला .

काही तासांपुर्वी .

 " मी जाऊन यितु जरा , उशीर हुइल यायला ..." तो म्हणाला

"  कुठं चाललाय , कशाचं काम हाय ....?" ती दारात उभी राहत म्हणाली

" काय न्हाय ,  बँकेचं काम हाय आणि परत खत बी आणायचा हाय...  संध्याकाळ हुइल , जनावराचं तेवढं बघ तू व्यवस्थित . नुसता टी व्ही बघत नकं बसू....

   तो असं म्हणाला आणि त्याच्या मोटरसायकलला किक मारून निघून गेला .  त्याचं घर आडबाजूला होतं . फारशी वस्ती नव्हती घराच्या आजूबाजूला . तो निघून गेला व तिने लगेच मोबाईल काढला . कोणाला तरी फोन लावला .

" तासा-दीड तासाने ये ,  कोणी नाही घरी ..." एवढंच बोलली आणि तिने फोन ठेवला . तो गाडी घेऊन निघाला खरा पण पुढे जाऊन गाडी बाजूला काढून लपून राहिला . 

      लफडं . गावात कधी लपून राहत नाही .  त्याच्या कानावर कुरबुर आलीच होती , तिला रंगेहात पकडायचं असे त्याचे नियोजन होतं . त्याने त्याचा फोन काढला उगाच काहीतरी करत बसला . प्रत्येक क्षण त्याला त्रासदायक वाटत होता . मनोमन तो हे सारं खोटं असावं अशी प्रार्थना करत होता . त्या अफवाच असाव्यात असं त्याला वाटत होतं . अफवा पण काही हवेतच बनत नसतात . एकदाच काय तो निकाल लावायचा असे त्याने ठरवलं होतं . त्यांच्या लग्नाला तेरा वर्षे झाली होती .  एकुलता एक मुलगा बोर्डिंग शाळेत शिकायला होता .  त्याला तीन एकर शेती होती , पाणी कमी असल्यामुळे त्यातून उत्पादन निघायचं नाही . त्यातून बोर्डिंग शाळेचा खर्च अधिक , त्यामुळे तो मिळेल ती शेत मजुरीची कामे घ्यायचा . तो कष्टकरी होताच . आई-बाबाच्या एका खोपटा पासून त्याने सुरूवात करून एक चार खोल्यांचे घर बांधलं होतं , तेही स्वतः घेतलेल्या तीन एकर जमिनीत .

   सर्व काही व्यवस्थित चाललं असेल तर कुठेतरी माशी शिंकते आणि काहीतरी घोळ होतोच . बऱ्याच दिवसापासून त्याच्या कानावर त्याच्या बायकोच्या लफड्याविषयी गोष्टी येत होत्या . सरळ सरळ नाही पण कळतात लोकांच्या बोलण्यावरून , हावभावावरून अशा गोष्टी .  म्हणूनच त्याने हा डाव मांडला होता . त्याला वाटायचं , घरी जावं आणि तिला सरळ सरळ विचारावं.  पण विचारणार काय ...? कसं बोलणार...?  काय सांगणार ....?  अफवांवर विश्वास ठेवून स्वतःच्या पत्नीवर संशय घ्यायचा का...?  आणि तसं नसलं तर उगाच  वाद . त्यापेक्षा हा डाव चांगला . तसं काही नसलं तर विषयच नाही आणि असेल तर काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा...

     तो बराच वेळ बसुन होता .  तासाभराने एक दुचाकी त्याच्या घराकडे जाताना दिसली . तो मनाचं समाधान करून घेत होता . ' असेल कुणाचातरी शेताकडे आलेला '  .  त्याच्या घराच्या रस्त्याला दुसरी घरे नव्हती , पण लोकांची बरीच शेती होती .  त्यांच्या गाड्या अधून-मधून यायच्या .

    गाडी निघून गेल्यानंतर तो बराच वेळ थांबला .  खरं काय ते उघड होणार होतं , मात्र त्याचा सामना करायला त्याचं मन तयार नव्हतं . जर खरंच तिचं लफडं चालू असेल तर काय ....? या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हतं .  त्याने तसा विचारच केला नव्हता . त्याने गाडी बाहेर काढली व घराकडे निघाला .  घरापासून काही अंतरावर  त्याने गाडी थांबवली . घरापुढे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली एक गाडी लावलेली होती . तो जो कोणी होता त्याने ती गाडी बाजूला किंवा दुसरीकडे लपवण्याचे जरादेखील कष्ट घेतले नव्हते . ही गाडी त्याला ओळखीची वाटत नव्हती ,  तो कोण होता हे त्याला आत गेल्याशिवाय कळणार नव्हते .

   वैरी न चिंती ते मन चिंती .  घराचं दार बंद होतं , कधीच त्यांच्या घराचं दार बंद नसायचं .   घरात त्याची पत्नी व दुसरा कोणीतरी होता .  बाहेर तिचा पती उभा होता .  त्याच्या डोक्यात नको ती चित्रे उभा राहिला वेळ लागला नाही .  त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली .  तो धावत गेला आणि दार वाजवू लागला . बराच वेळ गेला  तरी दार उघडले जात नव्हतं . त्याचा संयम संपला . ते तकलुपी असलेल्या लाकडी  दाराला तो जोरात धक्के देऊ लागला .  काही धक्क्यानंतर  दार उघडले . दार उघडल्या नंतर लगेच समोर हॉल होता , त्याला लागूनच उजव्या हाताला किचन होते व किचनच्या मागे बेडरूम होती . तो पटापट पावले टाकत हॉलमधून किचनमध्ये व तिथून बेडरूममध्ये गेला . झोपायच्या खोलीला मागे उघडणारे दार होते .  ते सताड उघडे होते , तो जो कोणी होता तो तिथून पळाला होता . त्याची पत्नी विवस्त्र होती .  तिने स्वतःभोवती पटकन साडी गुंडाळून घेतली होती .

   " कुठाय त्यो ? कोणाय त्यो .. ?"

    आणि तो पुन्हा दाराकडे निघाला.  तेव्हाच  दारात उभी असलेली गाडी चालू झाल्याचा आवाज आला . तो पळत बाहेर आला . गाडी रस्त्याला लागली होती . त्याने एक दगड उचलला व नेम धरून मारला . दगड त्या गाडी चालवणाऱ्या डोक्याला बसला . गाडी वेगात असल्यामुळे व अचानक डोक्याला लागलेल्या दगडाने त्याचा तोल ढासळला आणि तो गाडी घेऊन कोसळला .  गाडीच्या खाली पाय येऊन त्याचा पायाला जखम झाली . तो वेदनेने कळवळला .  तोपर्यंत हा जवळ आला आणि  पाहिलं  . दुसरा पुरुष त्याच्या ओळखीचा होता .  त्याने त्याच्या तोंडावर जोरात लाथ मारली ...

"  तुझ्या आयचा *** , आयघाल्या... का...."

 " विचार की तुझ्या बायकोला ...? "

  त्याही परिस्थितीतही तो दुसरा पुरुष स्वतःच्या कृतीचा गर्व असल्यासारखं बोलत होता .  सहा महिन्यापूर्वी घराचे रंगकाम काढलं होतं .  रंगकाम गावातल्या एका पोराकडे दिल होतं . तो तोच होता .  रंग द्यायच्या वेळेस तो मजुरीसाठी बाहेर गावी गेला होता . त्याला राग आला . त्या पोराचं त्याला माहीत होतं , पण स्वतःच्या बायकोने असं का वागावं हे त्याला कळत नव्हतं . तो रागात घराकडे निघाला .  त्याची बायको दारात उभी होती . कशीतरी साडी गुंडाळली होती . दारातून आत जाताच त्याने तिला जोरात मुस्काटीत मारली . तोंडातून सासुचा अवयवांचा उद्धार करणाऱ्या शिव्या चालू होत्या .

" का ...? "  त्याने विचारलं ती काहीतरी बोलत होती .  त्याचे डोळे , कान सर्वकाही रागाने भरले होते . त्याला ऐकू येत होतं ,  पण रागाचा ज्वर असलेल्या मेंदूला शब्दांचा अर्थ लागत नव्हता . त्याच्या डोळ्यातून येणाऱ्या आसवांमुळे त्याला नीट दिसत नव्हतं .

" कशाला घातलीय आता साडी . त्याच्या खाली झोपली तवाच सगळी लाज आब्रु वेशीला टांगली त्वा.."

      त्याने साडीचा पदर खेचुन तिला विवस्त्र केलं .

" माझं ऐकून तर घ्या ....?

" काय ऐकायचं तुझा ग...?  दुसऱ्या बायांकडे मी नजर वर करून दिकुन बघत नाही , सुपारीच्या खांडाचसुदिक यसन न्हाय , अन् तु असली थेरं करती व्हय....

    त्याने तिला लाथाडले . तीही रडत होती .

" का ..? सांग... न्हायतर...."

     तो मारायला काहीतरी शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहत होता .  किचनमध्ये असलेला तो दगडी गोटा त्याला दिसला .

" नुस्त पैशाच्या मागून लागून चालत नसतंय बायकोकडंबी लक्ष द्यायचं असतंय.......  " बाहेरुन आवाज आला व तो गाडीवर निघून गेला . त्याच्याकडे परत पाहता येईल म्हणून तो तिच्याकडे वळला .

" काय कमी होतं तुला ...? बोल की .." तो खाली बसत म्हणाला .

   ती घाबरली होती .त्याच्या हातातून गोटा पाहून तिची दातखीळ बसायची राहिली होती .

"  काय न्हाय ,  काय कमी नव्हती ,  मी चुकले...."  ती कशीबशी म्हणाली .

    अजून शिव्या हासडून तो म्हणाला ,
" का माझी अब्रू काढली तु का ...? "
      काहीतरी बोलण्यासाठी तिनं तोंड उघडलं पण त्या अगोदरच तो दगड तिच्या तोंडावर पडला आणि पडतच गेला . जोपर्यंत त्याचा राग होता तोपर्यंत . चेहऱ्याची हाडे तुटली , मांसाचा चिखल झाला.  रक्ताचे शिंतोडे त्याच्या सर्वांगावर उडाले .

       त्याला कधीच कळलं नाही ती तशी का वागली . तेरा वर्षांचा संसार , बारा वर्षाचं मुल ,  सगळं काही चांगलं असताना तिला दुर्बुद्धी का सुचली . तिने काही सांगण्या अगोदरच त्याने तिला संपवून टाकले .

      आता तिचा मृतदेह घेऊन तो रडत होता . टाहो फोडत होता . माफी मागत होता .  चुकलं म्हणत होता ,  पण घडलेलं घडून गेलं होतं .  ती आता जिवंत होणार नव्हती.....