Monday 30 April 2018

माझ्या कविता - १ सृष्टीची कोडे


सृष्टीचे पडले कोडे
कोणास ते उलगडेल
फक्त मानवत एवढे
दुसरे कोणी सापडेल

आहेत इतर संस्कृती
कधी घडेल संवाद
कळाली तयांची कृती
तर मिटेल आपला वाद

वेग अमाप प्रकाशाचा
तसे कोण जाईल
मिळाला वेग तयाचा
तर काय होईल

शृंखलेतील प्रश्न अनेक
उत्तर कधी मिळेल
करीता प्रयत्न कित्येक
निसर्ग आपला सांगेल

विश्वाचा विस्तीर्ण विस्तार
असंख्य ग्रहतारे त्यात
मानवाचा सर्व कारभार
जणू बुडबुडा सागरात

मराठी हॉरर कथा / भय कथा यांची सुरवात

नमस्कार मित्रांनो ........।

लवकरच आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी चालू करत आहे मराठी हॉरर कथा किंवा भय कथेची  मालिका  .....।

मराठी कविता - 4 सरांना डिस्टर्ब होते तेव्हा

शिकवताना जेव्हा डिस्टर्ब
होतो तेव्हा लाले लाल होतात सर
उपदेशाचे डोस देतात भरभर
शिकवण्याची link तुटते
पुन्हा कधी न जुळते
त्यामुळे न सुचते
काय करायचे ते
या साऱ्या नादात
शिकवताना चुका होतात
मग म्हणतात थांबूय येथे
शिकवलेले वाचावे जेथे च्या तिथे
मग कुजबुजतात सारी मुले
विसरले विसरले
सर सारे पाठ केलेले

माझ्या कविता. - ३ इच्छा

तीर सुटता इच्छेचा
धनुष्यातून मनाच्या
नकळे त्या आस पास
फक्त ध्येयाचाच ध्यास
विचारांचे उग्र वारे
दिशेविना  पळणारे
एकाच दिशे पळते
मना मदत करते
गुलाम शरीर वष
मनही त्यावर खुश
कळूनी सारे नकळे
एकाच वाटेने पळे
सारे काही विसरते
गोष्ट एकचि दिसते
तीच हवी त्या असते

माझ्या कविता - २ जीवनसाथी

शूर वीर असा तो राजा
क्रूर कृती तयाची मजा
शिकार तयाला आवडे
वनात जाई तो सवडे
सूर्य असता मावळतीला
अद्याप न तो परतिला
वनात दिसता हरणी
तो प्रत्यंचेला बाण धरी
का तयाचे द्रवले चित्त
मन झाले अनुकंपित
हरिणीचे नेत्र देखिले
दया भाव मना छेदिले
त्याच स्थळे तो का स्थिरला
काळाचे भान विसरला
स्वप्न सृष्टीतचि  रंगे
ढोलाच्या  आवाजे तो भंगे
ढोल वाजते आवेशाने
असे किती गोंगाट वने
तरीही हरणी न हाले
असे ते आश्चर्य देखिले
वनात काही लोक वसे
उत्सव त्यांचा होत असे 
तयात एकाला पाचारी
हरिणीचे तया विचारी
ढोल जरी का वाजतसे
हरणी येथे उभी असे
पावलाचा आवाजे पळी
येथे उभी का ही पुतळी
मग सांगे वनवासी
ढोल एकाया ती येतसी
हे तो  नवलच ऐकले
राजा कारण विचारले
बोल असे वनवासीचे
हृदय भंगे ते राजा चे
कातडे असे जे ढोलाचे
ते तिच्या जीवनसाथीचे

सुरवात

नमस्कार मित्रांनो .......
आज पासुन मी सुरुवात करत आहे , काहीतरी लिहायला काहीतरी सांगायला .
हा  काही उपदेश नाही , सल्ला नाही , माझ्या मनात जे आहे, जे मला माहीत आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे.